भीमा-कोरेगावात पेशवे हरले, मग जिंकले कोण?
भीमा-कोरेगावात पेशवे हरले, मग जिंकले कोण? 7 Jan 2018, 7:30 am 2256 भीमा -कोरेगावची दंगल आणि महाराष्ट्रातील उद्रेक टाळता आला असता. या असंतोषाचे जनकत्व कुणी घेऊ नये. एकसंध महाराष्ट्रात जातीयतेच्या ठिणग्या उडवून पेटवणारे ‘इंग्रज’ मानसिकतेचे गुलाम आहेत. राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्र नष्ट करण्याचे कारस्थान सत्ताधाऱ्यांनी उधळून लावायचे असते, पण २०१९ च्या निवडणुका जिंकणे हेच एकमेव ध्येय असणाऱ्या सर्वच राजकारण्यांकडून महाराष्ट्रहिताची अपेक्षा करावी काय? सगळ्यांनाच ‘फोडून, झोडून’ राज्य पुन्हा मिळवायचे आहे. आापले महाराष्ट्र राज्य नेमके कोणत्या दिशेने चालले आहे या प्रश्नाचे उत्तर भीमा-कोरेगावच्या दंगलीत मरून पडले आहे. २०० वर्षांपूर्वीचा इतिहास चिवडण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्राच्या एकात्मतेचे कलेवर जणू कोसळून पडले आहे. आधार काय? भीमा-कोरेगावात दलितांच्या शौर्याचा २००वा विजय सोहळा साजरा झाला. हा शौर्य दिवस कसला व त्यास आधार काय हे कुणीच सांगायला तयार नाही. १ जानेवारी १८१८ रोजी पेशवे बाजीराव (द्वितीय) आणि इंग्रज फौजांत कोरेगावात युद्ध झाले. त्यात इंग्रजांकडून पेशव्यांचा पराभव झाला....