Skip to main content

पानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे ?


पानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे ?

राज्य पेशव्यांचे आणि पानिपत मराठ्यांचे कसे ? 
         पानिपत कोणाचे झाले ? असा प्रश्न विचारला की, पहिलीच्या मुलांपासून ते पदवीधर तरुणांपर्यंत सर्वजन एकच उत्तर देतात की, मराठ्यांचे पानिपत झाले.परंतू यामध्ये आपल्या मुलांचा किंवा त्या तरुणांचा दोष नाही.कारण त्यासाठी जबाबदार आहे ती  शिक्षण व्यवस्था आणि इतिहासकार वि.का.राजवाडे, अ.रा.कुलकर्णी, सेतु माधवराव पगडी, पांडुरंग सदाशिव पिसूरलेकर,व्ही.टी.गुन्हे, के.एन.चिटणीस, शं.ना.जोशी, वा.क्रु.भावे, सरदेसाई इत्यादी इतिहासकारांनी मराठ्यांचा इतिहास लिहित असताना मराठ्यांचे पानिपत झाले हा विचार इतिहासामध्ये जाणिवपुर्वक रुजवला.परंतू इतिहासाचा एक चिकीत्सक अभ्यासक या नात्याने विचार केल्यास आपणास ही गोष्ट सिद्ध करता येईल की, पानिपत हे मराठ्यांचे झाले नसून पेशव्यांचे  झाले आहे.
               इतिहासामध्ये पानिपतच्या एकुण तीन लढाया झाल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे - 
१) पहिली पानिपतची लढाई - २० एप्रिल इ.स.१५२६(इब्राहिम लोबी द बाबर)
२) दुसरी  पानिपतची लढाई - ५ नोव्हेंबर इ.स.१५५६(अकबर द हेमू)
३) तिसरी पानिपतची लढाई - १४ जानेवारी इ.स.१७६१(पेशवे द अहमदशाह अब्दाली)
            यापैकी तिसर्या पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचे नव्हे तर पेशव्यांचे पानिपत झाले, ते कसे आपण पाहू.
 मराठ्यांच्या सत्तेचा कालखंड - इ.स.१६३० ते इ.स.१७१३.
पेशव्यांचा म्हणजेच ब्राह्मणांचा कालखंड - इ.स. १७१३ ते इ.स. १८१८.
              इ.स. १७१३ मध्ये बाळाजी विश्वनाथ हा मुख्य पेशवा झाला आणि तेंव्हा पासुनच मराठा छत्रपतींच्या हाती नाममात्र सत्ता राहुन सर्व राजकीय सत्ता पेशव्यांनी आपल्या ताब्यात घेतली.त्याच मराठा राज्याची राजधानी सातारा बदलून ती पुण्यास करण्यात आली.याच बाळाजी विश्वनाथला इतिहासकार मराठा सत्तेचा दुसरा संस्थापक असे म्हणतात.
          बाळाजी विश्वनाथ नंतर पहिला बाजीराव (इ.स.१७३०-४०) हा पेशवेपदी आला. या पहिल्या बाजीरावाच्या शौर्याबद्दल तर इतिहासकार फ़ारच उदो उदो करतात.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर शौर्य आणि धाडस यासाठी पहिल्या बाजीरावाचाच क्रम लागतो, असे इतिहासकार लिहितात.कदाचित असे लिहुन छत्रपती शिवाजी महाराजांइतकी लोकप्रियता पहिल्या बाजीरावालाही मिळेल असे त्यांना वाटत असावे.पण आपण एक गोष्ट समजून घ्यायला हवी ती म्हणजे पहिल्या बाजीराव पर्यंतच मराठा स्वराज्य होते नंतर त्याचे रुपांतर पेशवाईत झाले 
          पहिल्या बाजीरावाच्या म्रुत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ़ नानासाहेब (इ.स.१७४०-६१) हा  पेशवेपदी असता याच दरम्यान म्हणजे इ.स.१७४८ मध्ये छत्रपती शाहूंचा म्रुत्यू झाला.त्यामुळे संपुर्ण मराठ्यांची सत्ता ही नानासाहेब पेशव्यांच्या हाती आली.(याचा अर्थ असा होतो की, पेशवे ठरवतील तीच पुर्व दिशा, मराठे ठरवतील ती नव्हे !).नानासाहेब पेशव्यांच्याच कालखंडात दोन महत्वाच्या घटना घडल्या 
१) अटक येथील प्रदेशावर विजय (१७५८) 
२) पानिपत लढाईमध्ये पराजय (१७६१)
            या दोन घटनांच्या विशेषणा वरून इतिहासकारांचा पक्षपातपणा लक्षात येतो. कारण इ.स.१७५८ मध्ये नानासाहेब पेशव्यांचा कनिष्ट भाऊ रघुनाथरावाने इंदुरच्या मल्हारराव होळकरांच्या मदतीने अटक किल्यावर जरीपटका फ़डकावून विजय मिळवला.या विजयाचे वर्णन करण्यासाठी इतिहासकारांनी इतिहासामध्ये एक म्हण प्रचलित केली :-
" पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले."
             काही हरकत नाही रघुनाथरावाच्या नेत्रुत्वाखाली विजय मिळवला म्हणुन इतिहासकारांनी अगदी सत्य इतिहास समाजासमोर आणण्यासाठी या म्हणीचा उपयोग केला असेल.
             परंतू अवघ्या ३ वर्षानंतर म्हणजेच इ.स.१७६१ मध्ये नानासाहेब पेशव्याचाच चुलत भाऊ सदाशिवराव याच्या नेत्रुत्वाखाली पानिपतचे युद्ध झाले.या पानिपतच्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या "गनिमीकावा" या युद्ध तंत्राचा सदाशिवरावांनी वापर केला नाही, म्हणुनच पानिपतच्या लढाईत पेशव्यांना पराभव पत्कारावा लागला. हा पराभव आपला नसून मराठ्यांचा आहे, हे सांगण्यासाठी ढोंगी इतिहासकरांनी आणखी एक म्हण प्रचलित केली :-
" मराठ्यांचे पानिपत झाले"
           अशा प्रकारे या दोन घटनांचे विश्लेषण त्यांच्या पद्धतीने केले आहे.विजयाचे श्रेय स्वत:च्या नावावरती घेतले आणि पराजय मात्र मराठ्यांच्या नावावर खपवला.आमचे एवढेच म्हणने आहे की, पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले असतील तर पानिपतही पेशव्यांचेच झाले आणि मराठ्यांचे पानिपत झाले असेल तर अटकेपार झेंडे ही मराठ्यांनीच लावले, याला म्हणतात वस्तुनिष्ठ इतिहास लेखन करणे. परंतू वस्तुनिष्ठ इतिहास लेखन न करता त्यांना अनुकूल असा इतिहास लिहिला.
            परंतू छत्रपतींचा मावळा आता पुस्तक वाचनातून जाग्रुत होत आहे.तो आता कोणत्याही षडयंत्राला बळी पडनार नाही.कारण आता  इतिहासाच्या पुनर्लेखनास सुरुवार झाली आहे.

50 प्रतिक्रिया :

  1. अप्रतीम लेख आहे. खरच हेच संभाजी ब्रिगेड चे ध्येय आहे इतिहास बदलने नाही तर विचार बदलने. आता या लेखात काहीही बदलले नाही फ़क्त विचार बदलावा लागतो म्हणजे समजते की काय खरं आहे ते.
    दि ग्रेट मराठा...

    Reply
    Replies
    1. Panipath Marathyanche zale !! 
      Aapalya lokanmadhe 1ki nhavati mahnun panipath zale .... aani aatapan tech hot aahe !!
      History la samor theun tyamadhil jya aapalya chuka aahet tya sudharun aapalya samajacha utakarsh kasa hoil te pahanyapeksha aapasat bhandanat swatacha kay mothepana siddha karat aahat ????

    2. Panipath MARATYANCHE ZALE !!

      Itihasatun zalelya chuka parat na karnyapeksha tyach parat karat aahot aapan !!

      Aapalyach madhe 1ki nahi

      Maharashtra rahanara aani "Chatrapati Shivaji Maharajana " Daivat mananara Maratha aahe ..!!



    3. 1st..
      !! मराठी कट्टा हा ग्रुप बनवल्या बददल खुप खुप अभिनंदन !!

      पानीपत मराठ्यंचे झाले !!
      आतातरी इतिहासतुन आपल्या कडून झालेल्या चूका आपण परत करू नका ..
      आपल्या मधे एकी न्हवती म्हणून आपले "पानीपत " झाले .

      विश्वास पाटील यांचे पानिपत हे पुस्तक वाचा !!

      आनी मराठी लोकानी सर्व मतभेद विसरुन एक मेकाची मदत करुण पुन्हा एकदा खरया आर्थाने "छत्रपति शिवाजी महाराजांना " 
      शर्धांजलि अर्पित करावी !!

  2. अमोल कळेकरSunday, 01 July, 2012

    अभिजीत पाटील खुप छान लेख लिहिलात. आणि असे प्रबोधन घडने अत्यंत आवश्य़क आहे. त्यासाठी अशा विचारांची आणि इतिहास अभ्यासाची गरज आहे.

    Reply
  3. खुप छान लेख आहे अभिजीत पाटील आणि संशोधनात्मक लेख आहे हा. कोणीही मग तो मराठा असो वा मराठेत्तर खरा इतिहास अजुन कुणाला माहीत नाही. इतिहास समजुन घेतला पाहिजे यामध्ये दिसुन येते की ब्राह्मण इतिहासकारांनी इतिहासाचे विक्रुतीकरण केले नाही पण उदाहरणं देतानं चुक केली. आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. पेशव्यांचेच पानिपत झाले.

    Reply
  4. प्रथमेश जोशीSunday, 01 July, 2012

    अभिजीत साहेब आपल्याकडे या लेखाचा संदर्भ आहे काय किंवा पुरावा आहे काय ? की पेशव्यांचे पानिपत झाले होते की मराठ्यांचे. काय उगाच कुठुन तरी ऐकलेलं लिहिता आपण ? इतिहास हा इतिहास असतो तो बदलता येत नाही हे लक्षात ठेवा.

    Reply
    Replies
    1. @ प्रथमेश जोशी
      अरे येड्या संदर्भ कशाला पाहिजे ? लेख वाच मग कळेल की काय सत्य आहे ते .सरळ त्यांनी लिहिलय की पानिपत झालं तेंव्हा पेशव्यांचे राज्य होते आणि हे खरंच आहे. मग पानिपत पेशव्यांचे झाले हे सिद्ध होते. त्याला संदर्भ किंवा पुरावा कशाला लागतो. डोकं वापरा म्हणजे समजेल.

  5. प्रथमेश जोशीSunday, 01 July, 2012

    अभिजीत पाटिल साहेब आपले म्हणने बरोबर आहे की पानिपत युद्धाच्या वेळी पेशव्यांचे राज्य होते. पण त्यावेळी महाराष्ट्रात राहणार्या सगळ्या लोकांना मराठा म्हणत मग पेशव्यांचे पानिपत म्हणजे मराठ्यांचे असा सरळ अर्थ निघतो की राव कशाला उगाच जास्त वाद घालायचा ? होय ना ?

    Reply
    Replies
    1. बरोबर आपण म्हणत आहात ते खरं आहे महाराष्ट्रात राहतो तो मराठा मग तो कोणत्याही जातीचा असो पण मग १७५८ साली कटक चे युद्ध जिंकल्यावर पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावे याऐवजी मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले असे लिहायला हवे होते. बरोबर ?

    2. पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले असं मी तरी कधीच वाचलं नाही , मराठ्यांनी लावले असच वाचलंय , हा सारा इतिहास मराठ्यांचा इतिहास (महारष्ट्रातील रहिवासी -मराठे )असाच शिकवला गेला.....आता पेशव्यांचा इतिहास ,मराठ्यांचा इतिहास आणी कुणाचा इतिहास ...हा निव्वळ अक्कलशून्य पणा आहे...

  6. अतिशय छान लेख आहे. आपले इचार खूप छान आहेत असेच लिहित राहा.
    धन्यवाद !

    Reply
  7. जुने विशय तसेच ठेवुन पुन्हा नविन विषय ? हरकत नाही
    एक गोष्ट क्लिअर करतो की मी मराठा आहे ... आणि भटांचे कैवारी असे म्हनुन तुमच्या मनाला समाधान लाभत असेल तर माझी कहीच हरकत नाही . 
    आणि पेशव्यांबद्दल माझा जास्त अभ्यास नाही त्यामुळे याविषयी जास्त काही बोलत नाही पण एक नक्कीच सांगेन की तुम्ही "मराठे" कोणाला म्हणता ? याठीकाणि "जातीने" मराठे असा शब्दश: अर्थ गेत असाल तर तो चुकीचा आहे . आजपर्यंत ’महाराष्ट्रात राहतो तो मराठा’ या उद्देशानेच मराठा या शब्दाचा वापर केला आहे . उदाहरनार्थ भारतीय सैन्यामध्ये असलेली "मराठा रेजिमेंट" ! यामध्ये सर्वच जातीचे लोक पण महाराष्ट्रातले म्हणजेच मराठी बोलणारे अशांची सर्वांनी राठा रेजिमेंट !!!! प्रत्येकवेली "मराठा" हा शब्द तुम्ही जातिवाचक घेता आणि तुमचा गोंधळ होतो. आणि अशा गोंधळातुन वरिलप्रकारे लेख रचले जातात वास्तविक तुमचा वरील ब्लॉग हा मानसीग गोंधळाचा उत्तम नमुणा आहे. यातुन तुमचीच गोंधळलेली अवस्था लोकांसमोर येते बाकी काही नाही.

    Reply
    Replies
    1. संदीप पाटीलMonday, 02 July, 2012

      तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आणी मला ही माहीत आहे की मराठा हा जातीवाचक शब्द नाही. त्यामध्ये महाराष्ट्रात राहणार्यांचा समावेश होतो.पण आपण वरील लेख वाचला असाल तर समजेल काय परिस्थिती आहे.मी आधीच म्हणतो की ब्राह्मणांच्या डोक्याने विचार करू नका आपलं डोकं वापरा. अता तुम्ही म्हणता तसे महाराष्ट्रात राहणारे सर्व मराठे मग इ.स.१७५८ ला कटक ची लढाई जिंकली तेंव्हा पण "मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले" असे म्हणायला हवं होतं ना ? पेशवाच का ? काय जिंकलं की आम्ही ब्राह्मण आहोत आणि पराभुत झालो की मराठा, असं का ? तर महाराष्ट्रात राहतो म्हणुन.मग लढाई जिंकता तेंव्हा कुठे राहता ? महाराष्ट्रातच ना मग तेंव्हा का ब्राह्मण ? हा विचार करा . याला इतिहास बदलणे नाही म्हणत, फ़क्त विचार बदलला की समोर येते सगळे.

    2. @ संदीप पाटील : छान उत्तर दिलत. धन्यवाद.
      @ सुरज महाजन :
      आपण मराठा असुन सुद्धा ब्राह्मणांची साथ देता यात काही विशेष नाही.पण कसं होतं की आपण एवढे आहारी जातो की तो स्वत: सांगत असला की मि तुझा शत्रु आहे तरी आपल्याला मान्य होत नाही. मी कोणी थोर लेखक नाही,मी एक विद्यार्थी आहे आपल्यास क्षेत्रातला. माझे बरेच मित्र ब्राह्मण आणि जास्तित जास्त मित्र.पण मी त्यांना दोष देत नाही कधी किंवा माझे मित्र ब्राह्मण अहेत म्हणुन मी माझ्या जातीचा किंवा महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही.खेड्यातल्या ब्राह्मणांना तर या वादाचा गंध सुद्धा नाही मग अशा ब्राह्मणांना अपमानित करणं म्हणजे मुर्खपणाच नाही का ? 
      तुमच्या प्रतिक्रियेला उत्तर मिळाल संदिप कडून म्हणुन मला उत्तर देण्याची गरज नाही असं वाटतं.
      धन्यवाद !

    3. सुरज आपण जे बोलता आहात ते बरोबर आहे !!

      आपला समाज मागे राहीला आहे याचे कारण आपणच आहोत !!

      इतिहासातून चुका शिकून परत त्या नाही केल्या पाहिजेत एवडी सरळ गोष्ट या लोकांना समाजात नाही हे दुर्दैव आहे !!

      स्वताला मराठा म्हणता आणि दुसऱ्या मराठ्याला शिव्या देता/ कमी लेखता तुमचा मते जे पेशव्यांनी केले आता तुम्ही करत आहात !!

      "There is power in unity "

      आपला वेळ आणि बुद्धिमत्ता positive गोष्टी करण्यात वापरा , आपल्या आणि आपल्या समाजाचा भल्याकरता !!

      "जय शिवाजी "

  8. अगदी बरोबर आहे ब्राह्मण इतिहासकारांनी ब्राह्मणांना जास्त महत्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचं हे अत्यंत महत्वाचे उदहरण आहे. या गोष्टीला खरं तर पुरावा किंवा संदर्भ देण्याची गरज नाही. सर्व काही पक्षपातीपणा लगेच लक्षात येतो.आता हे ब्राह्मण मान्य करणार नाहीत.बाजीरावाला तर हे भट इतिहासकार प्रतिशिवाजी म्हणवतात.म्हणजे लेखणी हातात घेतली की काय वाट्टेल ते बरबटत सुटायचं, आणि त्या बाबासाहेब पुरंदरेची पण लायकी जगासमोर येईलच थोड्याच दिवसात.

    Reply
    Replies
    1. मयुर स्वामीMonday, 02 July, 2012

      बाबासाहेब पुरंदरेंनी संपुर्ण हयारभर शिवरायांच्या चरित्र्यावर लेखन केलं. त्यांनी मनात आणलं असतं तर पेशव्यांवे लेखण केलं असतं.याला जातीयवाद म्हणत नाहीत.आता वरील लिखाण काही एका इतिहासकार लेखकाने लिहिले नाही प्रत्येकाचे विचार वेगळे असतात त्यामध्ये समस्त ब्राह्मणांना दोषी धरणे चुकीचे ठरेल.

    2. पुरंदरे हा तसा पेशवे इतिहासाचा लेखक होता. पण चारित्र्यहिन पेशव्यांच्या (व्यभि)चरित्र्याला त्याला तिकडे लोकमान्यता मिळाली नाही म्हणुन शिवचरित्राकडे वळला आणि सर्व इतिहास विक्रुत करून ठेवला.बाह्मण किती नालायक आणि खाळ्च्या पातळीवरचे असतात हे त्यांच्या लेखणाद्वारे कळते. हरामी बाब्या.सर्व ब्रह्मण जातभाई एकसारखेच असतात.हे त्रिवार सत्य आहे, आणि तुम्ही विदेशी आहात हे मान्य करा कींवा याच देशातील असाल तर खेडेकर साहेबांनी लिहिले ते मान्य करा तरच तुम्ही स्वदेशी म्हणवून घेऊ शकता.कारण आम्ही स्वदेशी आहोत.

    3. Khedekarche kay vichar aahet te kalalet attaparyant sarvana...

  9. अभिजीत छान लेख आहे पण इतिहास बाजुला ठेऊन आपण आजच्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे.असं मला वाटतं.
    हा लेख वाच खुप छान वैचारीक आहे.
    http://sanjaysonawani.blogspot.in/2012/06/blog-post_30.html

    Reply
    Replies
    1. धन्यवाद अंजली 
      मी वाचले आहे पण काही मुद्दे चुकीचे आहेत. असो इथे नको उगाच नाहीतर नवीन वाद नको

  10. शेखर फ़डनीसMonday, 02 July, 2012

    एकदम मस्त लेख आहे. खरं तर आता या भटांचे रुप बाहेर येत आहे, आणि ते संभाजी ब्रिगेड मुळे हे आपण विसरता कामा नये तेंव्हा आपणही सर्वांनी संभाजी ब्रिगेड च्या पाठीशी राहावे ही विनंती. त्यांच्या मुळे खरा इतिहास लोकांपर्यंत येत आहे.
    जय संभाजी ब्रिगेड ॥ जय मुलनिवासी

    Reply
  11. खुप छान लेख लिहिलात.पानिपत पेशव्यांचेच झाले होते.अगदी बरोबर

    Reply
    Replies
    1. @ मयुरी काटकर :
      धन्यवाद !

  12. छान लेख लिहिलात आता यामध्ये जातीचा - किंवा धर्माचा प्रश्नच येत नाही. शेवटी कोणीही इतिहास अभ्यासक म्हणेल की पानिपत पेशव्यांचे झाले होते मराठ्यांचे नाही.पण मला असं वाटत की यामुळे पेशव्यांना किंवा इतर ब्राह्मणांना दोष देण्यात काय अर्थ नाही.उदा. झाशीची राणी यांना मराठे "इंग्रजांची बटीक" म्हणुन संबोधतात.पण हे मान्य की छ. राजारामांची पत्नी ताराराणी ह्या श्रेष्ट होत्या पण ब्राह्मण इतिहासकारांनी त्यांची दखल घेतली नाही त्या मध्ये दोष कुणाचा ? इतिहासकारांचा की झाशीच्या राणीचा ? अशी बरीच उदाहरणे आहेत तसेच पेशव्यांचे आहे. इतिहासकारांनी भलेही पेशव्यांना मोठे करण्यासाठी लिहिले असेल पण त्यामुळे मराठ्यांचा पराक्रम लोप पावतो ? अजीबात नाही.
    एवढंच, भेटु वरचेवर, ब्लोग छान लिहिलात. लेख चांगले आहेत.
    माझा ब्लोग http://yuvabrahman.blogspot.com/ नविन लिहितोय.
    मी आपल्या ब्लोग वरील काही लेख माझ्या ब्लोग लिह इच्छितो. परवानगी असावी.

    Reply
    Replies
    1. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद !
      बरोबर आहे ब्राह्मण इतिहासकारांमुळेच ब्राह्मणांचा अपमान होत आहे पण हे ब्राह्मण मान्य करतिल तेंव्हा ना.
      आमच्या ब्लोग वरिल लिखान सुरक्षीत केलं गेलं अहे, त्याची नकल होत नाही. मि तुम्हाला इमेल करतो मग पोस्ट करा.

  13. मग म्हणुयात ना आपण की "मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले" म्हणुन काय प्रॉब्लम आहे ? आपल्याला कोण आडवनार आहे ?
    पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले हा उल्लेख तुम्ही कशा कशात वाचला ?

    Reply
    Replies
    1. संदीप पाटीलTuesday, 03 July, 2012

      अरे मित्रा पण हि म्हण आहे ती जगप्रसिद्ध झाली आहे.
      तू म्हणालास कि तुझा बाप तुझाच आहे पण जग म्हणताय कि तुझा बाप शेजारचा आहे मग राग येणार काय ? असा म्हणणार जग म्हणतंय म्हणून देत, मी असा नाही म्हणार.
      विचार करा अजून वेळ गेलेली नाही.

    2. अनामित :
      इथेच तुमचं अज्ञान दिसतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही . आपण बोलुया "मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावलेत" प्रश्न बोलायचां नाही इथे प्रश्न आहे तो इतिहास वस्तुनिष्ट न लिहिन्याचा.हा विचार करा.

  14. लेख छान आहेत. इतिहासाबद्दल मला जास्त कळत नाही पण मला अश्या लेखामुळे वाद वाढतो. भूतकाळ विसरून आताचे अडचणी बघायला पाहिजेत असं माझं मत आहे.

    Reply
    Replies
    1. भुतकाळात आत्ताच्या काही अडचणी दडलेल्या आहेत.मान्य आहे निव्वळ इतिहासात रमून काहीहि साध्य होत नाही पण इतिहास दुर्लक्षित किंवा विसरून चालत नाही.

  15. "पहिला बाजीरावाचा फार उदो उदो करतात" म्हणजे काय ??? ज्या माणसाने आयुष्यात ४० लढाया जिंकल्या आणि एकही लढाई हरली नाही, दिल्लीत जाऊन मुघल बादशहाचे सैनिक कापून काढले, दिलेल्या वचनापायी त्वरेने छत्रसाल राजाच्या मदतीला गेला, होळकरांच्या चुकीने १००० मराठी सैनिकांचे प्राण गेले असताना सुद्धा त्यांना सांभाळून घेणारे, होळकर-शिंदे-गायकवाड अशा अ-ब्राम्हण लोकांना सरदारकी बहाल करून न्यायाची चाड असणाऱ्या माणसाचा उदो उदो नाही करायचा तर काय निजामांना जाऊन मिळणाऱ्या दाभाड्यांचा, धर्मवीर संभाजी राजांना औरंगजेबाच्या हवाली करणाऱ्या गणोजी शिर्क्याचा, शिवाजी महाराजांच्या विरोधात लढणाऱ्या मराठे सरदार आणि ब्राम्हणांचा उदो उदो करायचा ??? आणि तुम्हाला वाटत तेवढीच लोक आम्हाला प्रिय नाहीत. आम्हाला पेशवे आणि शिवरायांपेक्षाहि अधिक हिंदू धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा अभिमान आहे, ज्यांनी घरच्या भेद्यांना काही मुलाहिजा ण ठेवता शासन केले, संस्कृत मध्ये ग्रंथनिर्मिती केली, ८ वर्ष सतत औरंगजेबी अजगराला खेळवत राहिले, आपल स्वराज्य एक गुंजभरही कमी होऊ दिल नाही आणि मरतानाही मृत्यूलाही लाज वाटेल अशा शौर्याने मरणाला सामोरा गेला. त्याचा नावावर तुम्हीच हिंदू धर्मात फूट पडतंय त्याच काय ???

    Reply
    Replies
    1. १.संभाजी राजांनी १२८ लढाया केल्या एकही न हरता. याला म्हणतात शौर्य. आणि तुमच्या चिटणिस ने संभाजींना बदनाम केलं.पण तरीही भट इतिहासकार बाजीराव ला प्रतिशिवाजी म्हणण्याचा नालायकपणा करतात.
      २.होळकर- शिंदे- गायकवाड हे ब्राह्मण नव्हते.
      संभाजी राजांना आदर देता म्हणुन त्यांच अपमान करता. वा ! काय आदर आहे.
      तुम्ही फ़क्त शिवरायांचा अपमान थांबवा नाहीतर ब्राह्मणांचे जे हाल होनार आहेत भविष्यामध्ये हे सांगणे कठीन आहेत.

    2. घंटा.हाल करतायेत तुम्ही त्यांचे.
      आम्ही नाही स्वीकारत कुणाची राजेशाही...
      आम्ही नाही स्वीकारत कुणाची पेशवाई....
      आम्ही फक्त न फक्त स्वीकारतो लोकशाही....

    3. तो तुमचा प्रश्न आहे काय मानायचं आणि काय मानायचं नाही..अत्याचार झाला की असंच उर बडवत बसा लोकशाही लोकशाही करत

  16. पेशवे हे धनाजी जाधवांच्या बियापासून जन्मलेले आहेत. बाळाजी विश्वनाथ हा धनाजी जाधवांचा आश्रित होता. पहिला बाजीराव हा धनाजीचाच अनौरस पुत्र होता.

    Reply
    Replies
    1. He tumachya sadakya buddiche pratik aahe aapan bigredi aahat he lakshat theva.

  17. panipat marathyanche nahi kiwha peshwyanchehi zale nahi, te maharashtriyanche zale.

    Reply
    Replies
    1. हो पण हे सगळ्यांपर्यंत पानिपत हे मराठ्यांचेच असणार ना ?

  18. panipat marathyanche nahi kiwha peshwyanchehi zale nahi, te maharashtriyanche zale.

    Reply
  19. पानीपतच्या युध्यात मराठ्यांच्या पराभवाला जबाबदार असणारी युध्द प्रणाली म्हणजे पेशवे युध्दानिती. बांडगूळ बुणगे पेशव्यांची धार्मिक वृती या युद्धात अतिमारक ठरली. पुण्यातील राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून यात्रेकरूंना फौजेबरोबर मोहिमेत सामील करण्यात आले. एकास एक असे होत त्यांची संख्या लाखापेक्षाही जास्त झाली. सैन्याच्या मोहिमेच्या संरक्षणात आपल्याला उत्तर भारतातील देवस्थाने (तीर्थस्थाने) पहायला मिळतील. या भाबड्या कल्पनेमुळे सर्वजण आले होते. तसेच गेली ५० वर्षे मराठे जवळपास अपराजितच होते. पहिल्या मोहिमांमध्ये अनेकांनी विनासायास उत्तर भारत यात्रा पूर्ण केली होती व यावेळेस तसेच घडेल असे वाटले. कदाचित कुणालाच मोहिमेचे गांभीर्य कळाले नाही. या यात्रेकरूंमध्ये वृद्ध-बायका मुले यांचीच संख्या जास्त होती ज्यांचा प्रत्यक्ष युद्धाच्यावेळेस काहीच उपयोग झाला नाही. उलट दोन गोष्टी अत्यंत नुकसानकारक ठरल्या - पहिली म्हणजे मिळालेल्या रसदेमधील मोठा हिस्सा या बुणग्यांना जात होता, त्याचा अतिप्रचंड ताण सेनेवर पडला. युद्धाअगोदर काही आठवडे नोंदीनुसार माणसांना खायला नाही म्हणून घोडे हत्ती यांचा चारा बंद करण्यात आला त्याचा परिणाम प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेस दिसला. दुसरी गोष्ट म्हणजे बुणग्यांच्या मोठ्या संख्येमुळे मराठ्यांच्या आक्रमणाच्या अनेक योजना कागदावरच राहिल्या. मराठ्यांना लढाईच्या वेळेस बुगण्यांच्या संरक्षणासाठी कित्येक सैनिकांच्या तुकड्या खर्ची पडल्या तसेच बुणग्यांना घेउन लढाईचा हा मार्ग शक्य नाही म्हणून अनेक उपायकारक आक्रमणाच्या योजना बारगळल्या. मराठ्यांची सेना तुफानी वेगासाठी प्रसिद्ध होती पण तो वेग, चपळता व धडाडी कुठेच दिसली नाही. आणि म्हणूनच मराठ्यांचा पराभव झाला असे म्हणतात. पण मी म्हणतो अटके पार झेंडे लावले ते पेशव्यांनी आणि पानीपतात हरले ते मराठे वारे पेशवे हा मनुवाद तुम्हाला तरी पटतो का? ज्यावेळी पानीपत चालू होते त्यावेळी देखिल सत्ता पेशव्यांचीच होती मग मराठ्यांचा पराभव कसा झाला? उलट पेशव्यांचाच पराभव झाला असे म्हंटले पाहिजे. पण मनुवाद्यान्नी मराठ्यांचा पराभव झाला म्हणून सांगायला सुरुवात का केलि?

    Reply
  20. ईतर पेशवे निषक्रिय असतील पण बाजीराव पेशवे हे पराक्रमी होते ईतिहास साक्षिआहे एकाहि युद्धात पराभुत न झालेला बाजीराव मराठ्यांच्या ईतिहासातिल एकमेव सेनापती आहे

    Reply
  21. kahihi.. Panipat ranbhoomi bagha jara jaun ani mag ganimi kava vaparayla hava hota ki nahi te tharva.. ugaach brahmananchya maage laagnyat kahi artha nahi.

    Reply
  22. थोरले तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे यांच्या पराक्रमामुळे मराठ्यांनी अटक जिंकले ..पण याचे श्रेय मात्र फक्त पेशव्याला मिळाले . ही बाब खटकणारी आहे. सिंहगड जिंकला तेव्हा तानाजी मालुसरे चा पराक्रम आठवतो कारण शिवरायांनी तानाजीला पुढे केले , स्वतः श्रेय नाही घेतले . तसे मोठेपण पेशव्यांना नाही जमले ..पराक्रम करायचे मराठ्यांनी आणि श्रेय घ्यायचे पेशव्यांनी असे चित्र इतिहासकारांनी उभे केले आहे . असो पराक्रम हा पराक्रम असतो ..बाजीराव पेशव्याचा पराक्रम आम्ही कधीच अमान्य नाही केला कधी पण त्याच बरोबर इतरांचा पराक्रम लपवण्याचा काम ब्राह्मणी इतिहासकारांनी केला आहे ..

    Reply
  23. आशिष पाटीलSaturday, 14 January, 2017

    भूतकाळातील वाद मिटवल्याशिवाय वर्तमानातील मिटणार नाहीत आणि भूतकाळातील चुका वर्तमानात सुधारल्या नाहीत तर भविष्य सुधारणार नाही.
    म्हणून बाबासाहेब आंबेडकर सांगतात जो कॉम अपना इतिहास नही जानती वो कॉम अपना भविष्य नही बना सकती

    Reply
    Replies
    1. म्हणून इतिहासातच रमून जाऊन चालत नाही.भविष्याचा पण विचार करावा लागतो.इतिहास अभ्यासाठी आणि प्रेरणेसाठी ठिक आहे पण सर्वकाही इतिहास असे वागने चुकीचे आहे.
      हुतात्म्यांना अभिवादन

  24. This comment has been removed by a blog administrator.

    Reply
  25. This comment has been removed by a blog administrator.

    Reply
  26. कृपयापूर्ण वाचण्यासाठी कष्ट घ्यावे ही विनंती :
    आरेरे काय हा लेख अन त्यावर ही प्रति उत्तरे , लेख जितका द्वेषाने लिहिलाय त्याला दाद देणे म्हणजे शिवराय संभाजी बाजीराव वगेरे च्या कार्याचा अपमान आहे .. अरे विद्वानांनो या सर्व विभूतिनी जातीच्या पलीकडे जावून शिवरायांचे स्वराज्य वाचविले ... ह्या इंग्रजांनी रायगड ही जाळला आणि शनिवार वाडही जाळला . लेख लिहिणारा नक्कीच परिपूर्ण संशोधक नाही ... ही सिद्ध लेखा च्या शीर्षका नेच व माहितीने सिद्ध होते . याला कृपया जातीने कुणीही असो पण बळी पडू नये ही विनंती ... पेशवा हे शेवट पर्यन्त राज्याचे म्हणजे राजाचे पाईक च होते त्यांना राजे व्हायचे असते तर झालेही असते पण ती भारतीय संस्कृती ची परंपरा नव्हे ... जे होते यश अपयश हानी लाभ हार जीत ती त्याकाळी मराठ्यांचीच होती आणि त्याकाळचे मराठे म्हणजे सर्व जातींनी तयार असलेली मराठी सेना जी शिवरायांच्या विचारांनी लढणारी सेना .. ती लोक आपल्यापेक्षा मेहनती व चिवट व हुशार होती .. पनिपताचे अपयश ची कारणे कुठलीही जात नव्हती नाही अटके पार झेंड्याच्या यशाला . हा वाद करणे म्हणचेच इंग्रजांचे कर्म अजूनही फलदायी करण्याची प्रक्रिया ... आपल्या कुणाच्याही बापाच्या बापाची अशी आधीच्या १५ पिढ्यांची पूर्वज कोण होते माहीत नाही तरी त्यावर गप्पा आणि अहंकार मूर्ख पणा आहे . ज्या गोष्टी ची स्थापना द्वेषात होते त्याला भविष्य नसते उदा पाकिस्तान .. अशी बरीच उदा आहेत ... brigade चे ध्येय व स्थापना इतिहासातील गोष्टींना पूर्ण संशोधन वा अभ्यास न करता फक्त विशिष्ट जाती द्वेषावर आधारित असल्याने ते प्रत्येक समाजाला हानिकारक च राहणार . इथे कुणाला दुखविणे उद्देश नाही . पण सत्य पडताळून पाहण्यासाठी खूप सचोटी परिपक्वता व निस्पक्षता लागते . महाराष्ट्राला जातीच्या राजकरणात गुंतवून ठेवणे यासाठी खूप भले लोक भले पैसे घेवून कार्य करता आहेत .. आज आपण सर्व एक असतो तर ज्या आपल्या मराठी म्हणजे त्याकाळच्या मराठ्या नी जो इतिहास गाजविला होता त्यांच्या ह्या पिढीत एकही जण दिल्लीत प्रधान झाला असता ना ??? याचा विचार करा . त्याकाळी पानिपत ज्या कारणाने हरलो ते इतिहासाला माहीत आहेच पण आज मात्र आपण जातीपाती करून सर्विकडे हरतोय आणि शिवाजी महाराज वा बाजीराव वा तमाम सर्व मराठी लढवय्ये मावळे यांचा अपमान करतोय . हे नक्की . लाज वाटली पाहिजे त्यांची तुलना करून महाराष्ट्राची अस्मिता गहाण टाकू नका . अरे हा लेख खोटा का खरा हे जावूद्या पण तुमची रीप्लाय वाचून मराठी विरोधी नक्कीच हसत असतील अन म्हणतील ज्यांनी १५० वर्षे तलवार गाजविली त्यांची पिल्ले पहा कशी भांडतात ... महाराज पहात असावे ... अशा पिढीत कशाला ते जन्माला येतील .... त्यांच्या आत्म्याला अजून किती क्लेश देणार आपण ... नियतीही पहाना त्यांना कदाचित माहीत असावे आपली पुढची पिढी अशी भांडखोर असावी म्हणून त्यांचे रक्ताचे वंशज राहिलेच नाही जी काही बघतोय ती दत्तकयांची वंशावली आहे .... इतिहास वाचा जाणा अभ्यास करा पण त्यातून वाद न करता शिका हे आपणा कडून महाराजांना अपेक्षित आहे ... बाकी जे आपण पेरू त्याप्रमाणे उद्याचा महाराष्ट्र असेल ... तो brigadi असावा का महाराजयानी स्वप्न पाहिलेल्या स्वराज्यातील अभ्यासू तेजोमय पराक्रमी एकी असलेल्या निरजातीय तरुणांचा हे योग्य वेळी ठरवा .....

    Reply

टिप : "नाव/URL" च्या सहाय्याने प्रतिक्रिया देताना आपल्या नावासमवेत सामाजिक संकेतस्थळ (उदा. फ़ेसबुक,ट्विटर इ.) खाते जोडणे आवश्यक आहे.तरच प्रतिक्रिया प्रकाशित केली जाईल.तसेच अनामित प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जाणार नाहीत.

Comments

Popular posts from this blog

क्यों असरदार होते हैं बीज मंत्र?

इतिहास लेखन पद्धति

अनुसूचित जाती व जमाती