दिव्य औषधी- पांढरी मुसळी
दिव्य औषधी- पांढरी मुसळी – Marathisrushti Articles
शेती हा व्यवसाय सामान्यता परंपरागत पद्धतीने केला जातो, परंतु जर त्याला व्यावसायिकता, आधुनिकता तसेच अद्यावत तंत्रज्ञान वापरले गेले तर शेती अधिक फायद्याची ठरू शकते. जागतिक बाजारपेठ व काळानुरूप विविध वस्तूंची मागणी याचा विचार केला तर शेतीच्या पिक उत्पादन तंत्र बदलणे आवश्यक आहे.
पारंपारिक पिक घेण्यापेक्षा औषधी शेती केव्हाही फायद्याची ठरते. जागतिक बाजारपेठेत काही औषधांना फार मोठी मागणी आहे. अशीच एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणजे पांढरी मुसळी होय. जगातील एकूण उत्पादनाच्या सहा ते सात पट जास्त मागणी असलेली औषधी आयुर्वेदात फार प्रसिद्ध आहे.
पांढऱ्या मुसळीचे शास्त्रीय नाव – Chlorophytum borivillanum
कुळ- Liliaceae
मराठी नाव- पांढरी मुसळी
सफेदा हिंदी नाव- सफेद मुसली
धोली मुसली संस्कृत नाव- मुसला
ही कंदवर्गीय वनस्पती असून, या वनस्पतीसाठी रेती मिश्रित व पाण्याचा निचरा होणारी शेती आवश्यक आहे. कमी पाणी असणारी शेतीही या पिकास उपयुक्त ठरू शकते. उष्ण व समशीतोष्ण हवामान या पिकास मानवते. शेतीची योग्य मशागत करून पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यात याच्या कंदांची लागवड करतात. आवश्यकतेप्रमाणे सिंचन करावे.
आक्टोबर ,नोव्हेंबर मध्ये हे झाड वाळून जाते. झाड वाळल्यानंतर साधारणता तीन महिन्यांनी कंदांची काढणी करतात. कंदांवर योग्य प्रक्रिया करून उन्हात वाळवून घ्यावी. ह्या वनस्पतीच्या वाळलेल्या कंदांचे साधारणपणे साडेचार क्विंटल एकरी उत्पादन मिळते, वाळलेल्या कंदांना २००० रुपये प्रती किलो प्रमाणे भाव मिळतो.
घटक :- पांढऱ्या मुसळी मध्ये कार्बोहायड्रेडस , प्रोटीन, स्यापोजेनीन, स्यापोनीन, तसेच अनेक खनिज आढळतात.
उपयोग :- शारीरिक दुर्बलता तसेच ताकतीसाठी, पौष्टिक व बलवर्धक, स्तनदा मातांचे दुध वाढविण्यासाठी, प्रसवोत्तर होणारे स्त्रीरोगांवर उपयोगी, मधुमेह, वंधत्व कमी करण्यासाठी, शुक्रजंतू वाढीसाठी अशा अनेक आजारांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात होतो.
अशा प्रकारे बहुउपयोगी असलेली ही वनस्पती शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळवून देवू शकते. गरज आहे ती फक्त नवोपक्रमशिलतेची….
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

Comments
Post a Comment