जांबूळ आख्यान
जांभुळ आख्यान ही विचारार्थ घ्यावे. लिहणारेही कधी कधी प्रमाणिक थोडीच असतात. जांभूळ आख्यान ही व्यासांच्याच समांतर लोककला, लोककथा आहे.जी लोककलावंताच्या प्रामाणिक सादरीकरणातून पिढयानपिढया समाजमनावर रुजविण्याचा प्रयत्न आहे.
लोकशाहीर लोककलावंत समाजप्रबोधनाचे महान कार्य करतात. बेताल आणि असमर्थनिय वक्तव्य करणे शक्यच नाही. पुस्तक वाचलेला कधीच नतमस्तक होत नसतो वाचाल तर वाचाल म्हणणारे मुर्ख होते का ? पुस्तक म्हणजेच मनुस्मृती जाळूनही लोकांच्या मनावरिल उच्च -निच्च -श्रेष्ठत्वाचीस्मृती नष्ट करण्यात आंबेडकर नक्कीच कमी पडले. ग्रहीत धरा मनुस्मृतीचा जगातूनच समुळ नष्ट केलेय पण ' कांहींनी ' स्वार्थापोटी अशांना प्रवित्र स्मृती मानून त्याचे वेगळ्या प्रकारे संवर्धन केलेले असेलच की.
व्यास- वाल्मिकी यांचेही भारतीय राज्यघटनेतील लवचिक भूमिकेमुळे लोकहिताचे लेबलखाली सोयीनुसार घटना बदल झालेले असतील. त्यावर संस्करण केलेले असतील. मुळ कृतीचीच सुधारित आवृत्ती आपण नक्कीच नव्या लेखकाच्या नावाने आकर्षक कव्हरसह जरी प्रकाशित करत असलो तरी. मुलोद्देशाचा अवमान, पायमल्ली होतेय का नाही याचीही शहानिशा करणे गरजेचेच आहे ना राव?
एकीकडे बहुजनांने गुलाम करण्याचा डाव करायचा, दुसरीकडे स्वतःचेच स्वतःच्या साम्राज्याचे नाव शिरसावंद्य असावं ही कुटिल दुटप्पी भूमिका नक्कीच संशयास्पद आहे ना भाऊ?
बहुजन अजूनही मुळ रचनेच्याच अनुषंगाने प्रश्न विचारतात, आणि तुम्ही सुधारित आवृत्तीचा नियमाचा, मला असे वाटते वजा जी.आर. दाखवत सारवासारव करता.
अहो शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणणाऱ्यांरे आम्ही वारसदार. आणि आम्ही वारसदार म्हणाल्यावर जातपात, धर्म, गुण,पद, प्रतिष्टा, अशा तकलादू गोष्टींचा शोध काढून माग काढून संदर्भ देऊन हे स्पष्ट करण्यात तुम्ही उगाच वाष्फळ गप्पा मारतात की, वारसदार छे छे शक्यच नाही. उपरोक्त ओळी या वाण्या बामण्याच्या मग हा शुद्र वारसदार कसे घोर अज्ञान.
कांही वेळा फालतू कमेंट, पोस्ट लाचपण सहज शे दोनशे लाईक्स मिळतात. कारण लाईक करणाऱ्यांचा आवडतीचाच विषय तो शिवाय विचारांच स्वातंत्र्य असलेला भारतीय तो कोण कोणाचा बाप आहे का?
अशा लाईक्स करणाऱ्यांनी पोस्ट कर्त्याला फॉलो केलंल असतं. त्याच्या विचारांत मिळतंजुळता दुवा मिळालेला असतो. आता फॉलो करणं म्हणजे अनुसरण अथवा अनुकरण करणं असेल तर नक्कीच त्या विचारांचं केलेलं असेल ना?
मग विचारांचा वारसा चालवणाऱ्या शुद्रांच्या दहा पिढयांत वाण्या बामणांचा अंश सापडणार नाही का?ज्यानं ज्यानं शोधला त्यांनी पंढरपुरचा विठ्ठलच भगवान गौतम बुद्ध मानला तर देव या तत्वानं ' स्विकारला. अगदी भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे देशबांधव आहेत. याच मानलं तर आहेत नाही तर नाही तत्वातला?
जगात कुठलीच संकल्पना धारणा केल्याशिवाय प्रत्यक्षात उतरणारच नाही हे माझं सुमित सरवदेचं स्पष्ट मत आहे. या समाजवर आपण जसे पेरु तसेच संस्करीत होणार आहे. संस्कारातूनच संसार साकार होणार आहे !
मात्र या भारतीय समाजावर संस्कार करण्याचा कांहींनी ठेकाच जणू घेतल्याचा अविर्भाव असणाऱ्यांना संस्कार करणाऱ्या बहुजनाच शुद्रत्व दिसतं काय?
श्रेष्ट कनिष्ट यांच्या अहंमपणातून संघर्ष होत होते. दोन मोठे विरोधी गट निर्माण झाले.अजूनही होताहेत. यात अप्रत्यक्ष भाग घेणारे, अथवा न घेणारे यांचे पुढे गट होत गेले. या चांडाळ चौकडीलाच चार्तुवर्ण नाव देऊन दोन मुख्य भेदाचे पुन्हा उपभेद पाडून संभ्रम निर्माण करून कुटिलपणे द्युत खेळणे याचे रहस्य अजूनही रहस्य आहे. विनाकारण समजाचं, लोकहिताचं, देशभक्तीचं, राष्ट्रीय ऐक्याचं नाव लावून बहुजनांना वेडयात काढणे योग्य आहे काय?
श्रेष्ट- कनिष्ट, उच्च -निच्च, पाप - पुण्य,स्वर्ग -नरक, गरिब_श्रीमंत, ज्ञान -अज्ञान, स्त्री पुरुष, चांगला वाईट, सत्य-असत्य, देव-राक्षस,ब्राम्हण शुद्र यांचे संघर्षातून गटतट पडलेले असताना या गटातून वर्ण निर्माण केले.
वर्णातून जाती आणि जातीतून पोटजाती आता दोन मुळ गटांना धर्म, त्यातून चातुर्वर्ण, परत जाती आणि त्यातही पोटजाती किंवा उपजाती यांचेत पुन्हा तोच श्रेष्ट- कनिष्ट, उच्च -निच्च, पाप - पुण्य,स्वर्ग -नरक, गरिब_श्रीमंत, ज्ञान -अज्ञान, स्त्री पुरुष, चांगला वाईट, सत्य-असत्यतेचा भेद घालून काय साध्य करायचं असावं बरं या संधी साधूंना.
साधी कपोलकल्पनांलाही, काव्यांलाही धर्माइतकं श्रेष्टत्व बहाल करून यावर टिका करणारे सगळेच सरसकट शुद्र काय?
मग भगवत गीतेवर कडाडून टिका करणारे संत ज्ञानेश्वर आम्ही बहुजनांनी डोक्यावर घेतले. तर कांहींनी डोक्यात घेतले. ज्यांनी डोक्यावर घेतले त्यांना तुम्हीच काय आम्हीसुद्धा अंध भक्तच म्हणतो की.
आता आंधळ्याची काठी जो होईल. त्या आंधळ्यासाठी तोच जगजेठ्ठी होणारच ना भाऊ.
भेदाचा वेध घेण्याचा आम्ही बहुजनांनी कितीही आटापिटा केला. आणि त्यात त्याला यश जरी आलेच तरी त्या यशात पुन्हा भेद घालण्याचं काम बेमालूम करणारे आम्हांला कळत नाही असे का बरं वाटतंय तुम्हाला?
लोकसंख्येनं बहुजन असलेल्या माझ्या समाजात अंधार पसरून आंधळे करायचे. सत्याचा, पुण्याचा मार्ग दाखवतो याचा बहाणा करत त्यांना आपण उपकार नव्हे कर्तव्य पार पाडतो असल्याची भूलथाप मारून आपणच श्रेष्ट असल्याची धारणा त्या आंधळ्या आईबापांत येणे, रुजविणे यात ते निष्णात आहेत. परंतू आंधळ्यांना काला अक्षर भैस बराबरच ना.?
त्या आंधळ्या आईबापांचा खरा श्रावण हा श्रवणातूनच ओळखू येणार ना?भले तुम्ही राजकारणात महारथ असाल, दशरथ असाल तरी त्या आंधळ्या राष्ट्राला खरा श्रावण ओळखू येणारच ना? आमचं दुर्देव असे की इथल्या न्यायव्यवस्थेने सबळ पुराव्याअभावी, बहुजनांनाची कत्तल करणाऱ्यांना निर्दोष सुटका करून पुन्हा अन्यायच केलेला आहे.
न्यायव्यवस्था ही भावना, आणि धारणेला किंमत देत नाही. डोळ्यावर पट्टी घालून दोन पक्षांच्या दलाली ऐकण्यात काय मिळते तिलाच ठावूक.
खोटा पोवाडा (स्तूती, भाटगिरीच्या हेतूने घेतलाय बस.) खोटा पोवाडा ऐकून न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायव्यवस्थेला आम्ही मुळीच दोष देत नाहीत?उलट आम्ही तिला सन्मानच करतो?
आमची लढाई राजाचं खेळणं, गरिबाचं मरण या अघोरी वृत्तीबरोबर आहे. जाती जातीत ब्राम्हण्य पेरणाऱ्यांविरुद्ध आहे. आम्हाला आमचंच दुःखाची जाणिव, कणव असणाऱ्यांची गरज आहे. आपण गुलाम आहोत याची त्यांना जोपर्यंत जाणिव होत नाही तोपर्यंत, आम्ही अविरत लढू जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रूंसंगे युद्ध आमुचे सुरु. ( अय्यो आमचंच गाणं चोरलं ) असंही म्हणणारे खुप आहेत. आम्ही फक्त आमुचेच म्हणणाऱ्या धर्ममार्तंडांना हे विश्वची घर आणि वसुधैव कुटुम्बकम् ची खरी व्याख्या काय कळणार.
सनातन धर्म तुम्ही स्थापला. त्याला भजन्याचं, पुजण्याचं, आणि त्याच्या नावावरच जगण्याचं साधन केलं. आणि बहुजनांनी या सनातन धर्माची रक्षा आणि सेवेसाठी केवळ प्राणार्पनच करायचे काय?
सरसकट सर्वच ब्राम्हणांना आम्ही दोष देत नाहीच. बहुजनांच्या सुग्रीव, बिभिषण सांरख्याच्या मनात भेद घालून सक्का भाऊ पक्का वैरी, भाऊ नव्हे भाऊकी, तुझ्यापुढे काय आहे त्याची लायकी म्हणत भेद घालण्याचे राजकारण फक्त तुम्हालाच जमू शकते.
आमची कीव, कणव, किंवा आमचेबद्दल करुणा असणारा, सत्याचा वाली असतोच कारण आमची न्यायव्यस्थेवर अगाद श्रध्दा आहे. देर है अंधेर नही हे आम्हाला अनुभवाने चांगलंच ठाऊक आहे.
जगातली सर्वश्रेष्ट अशी न्यायव्यवस्था पुर्वग्रह, द्वेषभाव, संकुचितपणा, तुलनात्मक, दृष्टीकोनातून न्याय देणारी नाहीय. सत्यमेव जयते.
मी प्रथमतः आणि अंतिमत : भारतीयच आहे.
मग सिद्धार्थ गौतमबुध्द भारतीय तर जगत्गुरु तुकाराम महाराज ही भारतीय.
छत्रपती शिवाजी महाराज भारतीय तर घटनापती डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेही भारतीय.
राम भारतीय तर रहिम ही भारतीय.
विठोबा भारतीय तर चोखोबा ही भारतीय.
ब्राम्हण भारतीय तर शुद्र ही भारतीयच.
आणि
भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचाआणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन.
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे.
याचे विस्मरण व्हायला नको.
-सुमित रवि सरवदे
Comments
Post a Comment