१०० % सहमत. तुम्हाला ताई म्हटलं तर चालेल ना?
तुमचे विचार खुप छान आहेत. आणि तुम्हीही मान्य केल्यामुळे की कांही व्यक्तींमुळेच हिंदू धर्माबद्दल व्देष निर्माण होतो आहे. या विचारांशी मी पूर्णतः सहमत आहे. ( तुमच्या वैयक्तिक मतांशी हं....)
परंतू क्वोराचं आणि माझंही असं मत आहे की तुमचे वैयक्तिक मत हे कोण्या समान विचारांचं, समुदायाचं, घटकाचं जेंव्हा प्रतिनिधीत्व करत असेल तर ते वैयक्तिक रहात नाही. हे आपल्याला अपवोट, कमेंट्सवरून समजत असतेच.
तुमच्या मतांची ताई जरी पाच लोक असती... ( मुळ रचनाकार भीमशाहीर वामनदादा कर्डक)
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते
वाणीत भीम आहे करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते
गोळी खुशाल घाला, फाशी खुशाल द्यारे
खोटे इथे खऱ्याचे दुसरेच टोक असते
तत्त्वाची जाण असती बिनडोक लोक नसते
सारे चलन तयांचे ते रोखठोक असते
सद्भाव एकतेचे जर अन्तरात असते
तुटले कुणीच नसते सारेच एक असते
वामन, समान सारे स्वार्थाने अंध नसते
तुझिया नीतीप्रमाणे सारेच नेक असते
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते
---लोकशाहीर वामनदादा कर्डक
तर या ठिकाणी भीम या ठिकाणी प्रत्येकाने स्वतःला, किंवा इतिहास घडवू शकणाऱ्या प्रत्येक महात्म्याला ग्रहीत धरा. सार ( तात्पर्य) फार काही वेगळा असेल काय?
आता आपले मत काय तर.
🔴 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी हिंदू धर्मात राहूनच सुधारणा करायला हवी होती?
👉 बऱ्याच हिंदूंचं असं मत आहे.की,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी हिंदू धर्मात राहूनच सुधारणा करायला हवी होती? परंतु मुळातच कर्म आणि तत्वज्ञानाचं सोंग घेऊन चातूर्वर्णावर मनोरा उभारावा असं उभारलेल्या हिंदूंनी आपुल्या मुळाचा विसर पडावा, असं का बरे करावे?
या मनोऱ्याचा पायाच मुळात मुलनिवासी आहेत.
( भ्रुण कसे निर्माण होते? किंवा इमारत कशी बांधायची असते ?) याचे उत्तर भावनिक देणाऱ्याला भक्ती म्हणूयात.
आणि ( ज्ञान, विज्ञान, यंत्र, तंत्र, कर्म यांनी सिद्ध करणाऱ्यांना)शक्ती म्हणूया.
खरेतर या दोघांनीही गुण्यागोविंदाने राहणे अपेक्षित असताना, यांत अहंपणा आला. प्रचंड संघर्ष झाला.
आस्तिक आणि नास्तिक असा दोन गट तयार झाले. ( यात दोघेही अज्ञात शक्तींचं आस्तित्व मान्य करतात. परंतु त्यांचेत फक्त एकमेकांत द्वेषभावनिर्माण असल्याने आपआपल्याच मतांशी ठाम होते.
एकाने भक्तीने त्या अनामिक शक्तीला वेगवेगळी नावे दिली. तर दुसऱ्याने त्याच अनामिक शक्तीला फक्त नावे ठेवली. ( नाव दिले काय ठेवले काय एकच परंतू याला आपण सकारात्मक नकारात्मक घेऊ लागलो)
भक्ती वाली स्वर्ग कल्पना करू लागली. शक्ती वाली नरक कल्पना करु लागली. भक्तीवाले सुखाच्या शोधात मृगजळाच्या मागे होते.शक्ती वाले फक्त त्यांचे मत खोडायचेच काम इमानेइतबारे करत होते.
भक्तांनी पुजायचं, भजायचंच काम केलं, त्या शक्तींनी त्याचं रक्षण करायचं काम केलं. मुळात ती अनामिक शक्ती चराचरात होतीच. ज्याला जसा प्रत्यय येईल. तसा तो शरण यायला लागला. जो झुंजला अर्थातच मरणारच ना?
या शक्तीचं अध्यात्मातून चिंतन केले वैदिक गट झाले.
याच शक्तीचं सर्वांगाने सिध्द केले ते बौद्धिक गट झाले.
( म्हणजे गटतट हा आपला जन्मसिध्द हक्क होताच काय?)
अखंड भारतात हेच दोन गट होते. हे ध्यानात घ्यायला हवं.
आस्तिक नास्तिक यांचे संघर्षातूनच स्वास्तिक निर्माण झाले.
बौद्ध इतर धर्मासारखा परका नाहीयच. बौद्ध धर्म हा कांहींचा व्देषी विषय वाटत असला तरी. हाच मुळात इथला प्राचिन देशी धर्म आहे. फक्त यातीलही सुधारणा करुन या धनाला शुध्द केले ते शाक्यपुत्र महागणपती, महाकारूणिक तथागत सिध्दार्थ गौतम बुध्द यांनी आणि त्यांचा धम्म म्हणून प्रसिद्ध झाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही बुध्द आणि त्यांचा धम्म असेच म्हटले आहे. म्हणजे बुद्धांच्या नव्हे तर संस्कृतीच्या मुळापासूनच बौद्ध धम्म आहेच.
माझ्यासारख्या सुमार विचार करणाऱ्याला अवघड शब्दप्रयोग करताच येत नाही, कठिण संज्ञाही पचत नाही. म्हणून मी माझ्या ढोबळमानाने मला सुचलेली, रुचलेली, पचलेली धर्माची व्याख्या केली. धर्म म्हणजेच धारणा. विचारधारा, जीवंत अनुभव ,इतिहास होय.
म्हणून धर्म चांगला किंवा वाईट हा आपआपल्या त्या धर्माबद्दलच्या धारणा यावरच अवलंबून असतो.
ताई आपण आंबेकर आणि ते डॉक्टर.आंबेडकर यांत जवळजवळ साम्य असतानाही भेद निर्माण होतो ते केवळ ड मुळेच हा ड लॅटिनमधून D म्हणजे धर्मभेद, धारणाभेदातून जगाने ठरवलीय. मुळात येथे तुमच्या धारणेला किंमत आहे. सर्वकष, सर्वात्मक, अत्तदीपभवोची प्रचितीतूनच ही धारणा तुम्हाला येणारेय.
तुम्हाला हिंदू धर्म आडव्या वसाहतींप्रमाणे वाटतोय. तो मुळात तसा नाहीचंय . तो तसा दाखवला जातोय.
हिंदू धर्म आडवा नसल्याने तो कोणालाच आडवे चालत नाही. हे माझं स्पष्ट मत आहे. (🙏🏼)
तर ज्यांनी खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला पाहिलेय. तत्वचिंतन केलेय, अनुभव घेतलेय अशांनी हिंदू आडवी इमारत नसून उभा मनोरा आहे. हे सिध्द केलेय. जो आडवे चालत नाहीय तर जीवंत गाडण्याचे काम करतोय.
ब्राम्हण
क्षत्रिय
वैश्य
शुद्र
असा हा सिडी नसलेला मनोरा शुद्रांना जमिनित गाढून उभा राहण्याचा नेहमी प्रयत्न करतो आहे. शुद्र पाया मानला तर यशोशिखरांवर असलेल्या ब्रम्हांला ( ब्राम्हणाला) जमिनोध्वस्त करण्याचं पाप लागेल म्हणत. मातीत गाढण्याचं काम करणे योग्य आहे काय?मुळात ब्रम्हानेच धर्माचा पाया शुद्रांनी रचला हे सुचक केलेले असताना भ्रमाने शुद्रांना पायदळी तुडविन्याचे खरे महापातक कोण करतेय याचे खरंच चिंतन, आत्मपरिक्षण करायला हवे.
चातूर्वर्ण विरहित हिंदूधर्म शक्य आहे काय? कोण्याही विध्दानांनी सांगावं? मग मानवानेच मानवाचं शोषण करणे म्हणजेच हिंदू धर्म काय?नकोय तुमची भक्ती म्हणणारा वैदिक कर्मकांड, चातुर्वर्ण झुगारणारा बौद्धिक धारणा ज्यावेळी धारण करतो तेंव्हा त्याने Automatically बौद्धधम्म ग्रहण केलेला असतो.
बाबासाहेबांनी हिंदूधर्मात राहूनच हिंदूधर्म सुधारणांचे प्रयत्न केले नव्हते काय?
ताई संविधान आम्हां शुद्रांचा प्राण आहे. तो वाचल्याशिवाय का आम्ही बोलतो? आम्ही भक्तही नाहीत तर अंधभक्तचा प्रश्नच उध्दभवत नाही. आम्ही अनुकरण, अनुसरण करणारे अनुयायी आहोत.
हिंदूधर्मात भक्त निर्माण करण्याचं काम करतात.
बाबासाहेब हिंदू- महार असतानाच हिंदू कोड बिल आणले? हिंदू महार असतानाच मनुस्मृती जाळली? हिंदू महार असतानाच राममंदिर प्रवेश केला? हिंदू महार असतानाच वर्तूळ परिषदेत शुद्रांचे नेतृत्व केले? हिंदू महार असतानाच भारताचे संविधान लिहीले? हिंदू महार असल्यानेच जातियतेचे चटके सोसले? अजून काय सुधारणा अपेक्षीत आहे तुम्हाला?
या सुधारणा तुमच्या देवाने केल्या काय? नक्कीच नाही? त्या सुधारणा केल्या फक्त शिक्षणांमुळेच.
याचा अर्थ हिंदूमध्येच त्यांनी एवढया सुधारणा अपेक्षित होत्या हे निष्ठून सांगूनही काय केले हिंदू धर्माने? म्हणजे बाबांसाहेबांनी कांहीच साध्य केले नाही का हिंदूधर्मात राहून?.
परंतू त्यांनी जे साध्य केले ते सात आठ हजारात एकाही देवाने केले नाही ते करून दाखविले.
आणि तुम्ही आता समांतर, समता समानता बंधुता, न्यायपूर्ण विचार करू शकतात तो विचारही मांडण्याचं स्वातंत्र्य दिले. ताई शुद्रांमध्ये तुम्हीही येतातच, स्त्रीही पण तुमच्या हिंदू धर्मा मते शुद्रच आहे.
विचार बदलले की धारणा बदलते. तसंच हिंदू धर्माविषयीचे त्यांचे उदात्त विचार बदलले. या धर्माला बदल ही संकल्पनाच आवडत नाही. त्यामुळे हा पवित्र आहे. त्याकडे बोट करणाऱ्याचा आम्ही बदला घेणार एवढेच का रुजविले जाते?सुधारणा नाहीच पण उलट ज्यांना पटत नाही त्यांना दार उघडे आहे असा परखड सल्ला दिला. यातून धर्मांतरणे झाली, फाळण्या झाल्या त्याला सर्वस्वी हिंदू धर्मच जबाबदार आहे. देवापुढे सर्वच शुद्र असताना ब्राम्हण श्रेष्ट कसा हे तुम्ही सिध्द करायला ब्रम्हाचा संभ्रम पुरावा देणे उचित ठरते नाही काय?
देवकृत हिंदूधर्म त्यामुळे मनुष्य हस्थक्षेप करू शकत नाही तर कशाला हवाय हो धर्म. हा सारासार विचार मांडण्याचाही अधिकार हिंदू धर्माने दिला होता काय?
व्यक्ति अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिंदू धर्माने दिले होते काय? द्या उदाहरण ? विचारांची युद्ध हरण्याची चिन्हे दिसली की बहिष्कृत करणे हा आहे काय धर्म?
मानवाचा जन्माचा शोध घ्यावा तर चमत्कार?
इथला शुद्र बहुजन नाहीचंय, तर इथल्या बहुजनांला शुद्र बनविले जातेय. हे षडयंत्र रचने म्हणजेच धर्म काय?
मुद्दा असा उपस्थित होतो की, हिंदू धर्मावरच फक्त टिका होते. इतर धर्मावर टिका करा.परिणाम बघा काय होतात ते? याची धमकी बहुजनांना देऊ नका _ इतर धर्म पाहूणे आहेत. त्यांनाही माहितेय ( विचारशील असलेले मान्यही करतील.) त्यांचे मुळकुळ कोणते आहे ते?
आता ते स्वतंत्र भारतात राहतात आणि केवळ भारतीयच आहेत असं मी मानतो. त्यांचे नेहमीप्रमाणे राजकारण नकोय.
चातूर्वर्णाव्दारे बहुजनांवर सर्वाधिक अन्याय अत्याचार करणारा हिंदू धर्म असल्याने त्या विरुद्ध बहुजन अशी स्थिती निर्माण होणारच.
मुळात जन्माने नव्हे तर कर्माने शुद्र किंवा ब्राम्हण ठरतो इतका महान तत्व देणाऱ्या धर्माला तुम्ही ज्या '' कांही वाईट व्यक्ती" म्हणता तेच सत्ताधारी असतात. आणि सत्तेपुढे शहाणपण चालतच नाही. मग शहाणपण सत्ता मिळविल्यानेच प्राप्त होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ते सप्रमाण करूनच आमुचा उद्धार केलेला आहे.
स्वातंत्र्यानंतरच चातूर्वर्ण नष्ट झाले. असे असताना आजही जे बहुजनांवर अन्याय अत्याचार होतात ते याच चातूर्वर्णाचे समर्थन करणाऱ्या अंधभक्तांकडूनच.
आता तुमचा दुसरा प्रश्न तुम्ही स्वतः ब्राम्हण आहात. आणि समानतेचा, एकात्मतेचा सारासार विचार करतात. म्हणून माझ्या मनात आदर असलेले ज्या कांही ब्राम्हण समाजसुधारक, विचारवंत आहेत त्यांच्या यादीमध्ये आपणास समाविष्ट करतो आहे. खरंच तुम्ही हे व्यथा जाणता आहात म्हणूनच तर तुमच्याशी हितगुज करावं वाटतं, दुःख उगळावं वाटतं, वाद नव्हे तर संवाद साधला जाईल याची किमान आशा करण्याचे धारिष्टय केले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात भेद नव्हता, नाही, आणि नसणारेय.
उलट दोघेही समदुःखी, समविचारी, बहुजन उद्धारक त्यांचेप्रती मरेपर्यंत बहुजनांत आदर होता,आहे,असेलच यात शंकाच नाही.
मात्र हिंदू बौद्ध वाद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनापती डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाद म्हणण्याचा कुत्सित मुर्खपणा सोडायला हवा.
वर्णावर फक्त ब्राम्हण आणि शुद्र याच जाती, वर्ण मला तरी दिसतात.
क्षत्रिय, वैश्य हा गुणधर्म आहे. जो सगळयात होता. क्षात्रतेज म्हणजेच जर क्षत्रिय असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही क्षत्रियच म्हणायला हवेत की. त्यांचे वडिल रामजी सुभेदार होतेच की.
मुळात हिंदूंनी दिशाभूल करणारी माहिती वेगवेळी आणि वेळोवेळी देऊन भ्रमित समाजाचं आपल्या स्वार्थासाठी भांडवल करुन संधी साधून घेतलीय, घेतो आहेच? असे माझे स्पष्ट मत आहे.
क्षत्रिय म्हणजे काय? वैश्य म्हणजे काय? मला स्पष्ट करावं?
तुमच्या चातूर्वर्णव्यवस्थेचे आभासी मनोरे आहेत हे यामुळेच ब्राम्हण हवेत तरंगत त्याचा फील घेतो आहे. मनोरा ढासळलेला आहे. वर्णव्यवस्था नष्ट झालेली आहे. सर्वांनाच समता समानता आलेली आहे. मग ही अगतिकता का? कशासाठी?
हातचा राखून ठेवण्यात पटाईत लोकांच्या अंगी शकूनीमामांसारख्या भारलेले फासे आहेत. जे सोईनुसार एकेक जातीभोवती आवळ्याचे अयशस्वी प्रयत्न करत आहेत.
श्रेष्टत्वाचं, सत्तेचं,माना-पानाचं लालच दाखवून अपमान करणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांला स्वाभिमान दिलाय हे विसरता कामा नये.
ज्यांच्याकडे हा स्वाभिमान नाही त्याला हाताला धरून हाच बहुजन समाज म्हणणं चुक आहे.
बहुजन समाज वैचारिक, बौद्धिक समाज आहे. अपवादात्मक जातियदंगली हे घडवून आणणारे आपलेच आहेत असा आपलेपणात गफ्फलत गेल्यानेच , तो बोलवता, घडविता धनी कोण हे त्या न कळल्यानेच घडल्याचे त्यांना ठाऊक आहेत. शाहू- फुले -आंबेडकर चळवळ ही छत्रपतींच्या स्वराज्याचं पावित्र्य राखण्यासाठीच झटणारी आहे.
आणि हो देवाशी आमचं हाडवैर नाहीचय.
हवं तर विचारा देवाला?
धन्यवाद. ताई. तुमच्यासारखीच जर सर्वच लोक असती तर सोन्याचा धूर आजही निघाला असता.
उषःकाल होता होता, काळरात झाली | अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली |
असो.
आपलाच बांधव,
सुमित रवि सरवदे.
Comments
Post a Comment