कांहीही हं श्री🤫🤭🤣😜

माणसाचा सर्वात मोठा गैरसमज हा फुकटच्या अहंपणातूनच निर्माण होतो. मीपणा हाच सर्वात मोठा गैरसमज. हे फक्त माझंच. मीच सर्व शक्तीमान, धैर्यवान, बलवान, गुणवान, धनवान,रुपवान, स्वरूपवान, मीच सर्वज्ञ, मीच सर्वेसर्वा, आणि हे सर्व माझंच आहे फक्त नि फक्त माझंच.

मी ते प्रेम पुर्वक मिळवेन अथवा बलपुर्वक कुणाचा काय संबंध ते फक्त माझंच आहे. मी हवं तसं कसंही वागेन मला तेवढं स्वातंत्र्य दिलेय. माझ्याच माणसांनी त्यांनी आपला आपली म्हणायलाच मुळी शिकवलं नाही. फक्त माझा, माझी आणि माझे मग मी माझे, माझे मी कसं वागायचे ते मीच ठरवेन ना कुणी का?कशाला?कशासाठी सांगायला हवं?

आणि मला शिकविण्याइतकं तुम्ही मोठे शहाणे आहात काय? म्हणजे आम्ही वेडे आणि तुम्हीच तेवढे शहाणे काय?

हा भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. त्यांचेशी कसं वागायचं ते माझं मी ठरवेन. त्यांचा आणि त्यांच्या विविधतेतल्या एकतेत फुटपाडून राजकारण करायचे की नाही हे मीच ठरवेन. त्यांच्या परंपरेचा पाईक व्हायचं की नाही हे माझं मीच ठरवेन.

आणि पालक , गुरूजन, वडिलधारे माणसे असं कांहीही नसतंच मुळी ते आपल्यावर उपकार थोडीच करतात. ते त्यांचं कर्तव्य करतात . बस्स आणि सौजन्यनेने मी का बरं वागावं, थोडं त्यांनीच समजून घ्यायला हवं ना? वयाने कोण मोठं आहे? आणि हो मला शिकवायला मी ही आता लहान नाहीय बरं. मलाही साऱ्यातलं सारं कांही समजतं हं !

कुणाशी निष्ठा राखायची, कुणाचं सुखसमृध्दी कशात आहे, कल्याण कशात आहे हे आता आम्हांला कळतंय. ज्यांना कांहीच काडीची अक्कल नाहीय ते आम्हाला शिकवायला निघालेत?

हे म्हणजे आजोबाला नातवानं शिकवावं असंच झालं नव्हे काय?

होय बाप पणाचा आपल्या दोघांतील दुवा, सेतूच बंधनष्ट करण्यात आलाय. तुम्हाला आमचेशी नातं दाखवायचे असेल आम्हाला आपले म्हणायचे असेल तर बाप दाखव. अन्यथा माझेच महानपण मान्य कर. अथवा मलाच बाप म्हणून स्विकार.

आता आमुच्याच धडावर आमुचे डोके नाही.?

आमुचा बाप आणि आम्ही खरेय की खोटेय कांही?

यात संभ्रम आम्हीच इथल्या प्रत्येक सुजाण, सजग, सम्यक, सम्बुद्ध, सकल जनांच्या मनामनांत पेरलाय. मी संतुष्ट आहे?मी अजेय आहे? मी अमर आहे?मीच देव आणि मीच दानव आहे? या शुद्र मानवाला मीच जाती पंथात, धर्म अधर्मात मीच गुंतवले आहे?मीच या विश्वाच्या दुःखाचे समुळ कारण आहे. मीच या कुरापतीचे कुळ आहे.

शोध म्हणजे सापडेल.मीच अदृश्य आत्मा आहे. मीच परमात्मा आहे. मीच विश्वात्मा आहे. मीच घराघरात आहे.मी चराचरात आहे.

मला बाप नाहीच आहे .मीच मला व्यायलेलो आहे. पण मी मात्र तुमचा बाप आहे हे मात्र विसरू नका?

अरे बापरे इतकं विश्वभ्रमण करूनही मनानं या एवढं ज्ञान प्राप्त करूनही हा मीपणा कसा जाईल याचा कुणीच कसा उपाय सांगितला नाही रे. फक्त मीपणा त्यागणे हा त्यावर उपाय नाहीच हे माझं स्पष्ट मत अनुत्तरीच राहतंय की काय?कारण मीपणा त्यागला की लगेच तो कोणी ना कोणी ग्रहण करतो आहे.जगातलं शाश्वत सत्याइतकंच हा मीपणाही चिरकाल अमरत्वे घेऊन सृष्टीत उभा आहे.

याच्या उत्तराला अपवोट का करायचं, का कमेंट करायची, का शेअर करायचं? मी काय कमीय आहे काय?

पण मी आयुष्यभर मत मांडायचं नव्हे तर मत खोडायचंच का काम करावं. आयुष्यभर कोणाचेच मत स्विकारायचे नाही का? माझ्यात मीपणाचा अहंमपणाचा, कोठून शिरकाव झाला. आपल्यात हे ब्राम्हण्य कसे आले.?

आजी जात्यावर गुणगुणतेय.

सावध राहा रे मोडा, संसार थोडा

सावध राहा रे मोडा, संसार थोडा

बहु पाण्याचा बुडबुडा सावध राहे.

बहु पाण्याचा बुडबुडा सावध राहे.

किती करशील माझं माझं, कबाड ओझं...

कुणी घेणार नाही तुझं, सावध राहे...

सावध राहा रे मोडा, संसार थोडा

किती करशील पैका पैका कोटोन कोटी

तुझ्या हाथी रे चिंधोटी, सावध राहे.

सावध राहा रे मोडा, संसार थोडा

ज्या आजोबाला आमच्यासारख्या नातवाला शिकवायचं धाडस केले ना? त्या मागे हीच आमुची आजी होती. माय माऊली होती?

ज्या दिवशी जगात रामराज्य येईल. जीवनातला राम हरवला असेल?हाराम प्रत्येकाचाच वेगवेगळा आहे. राम सर्व धर्माचा नायक आहे. यावर प्रत्येक धर्माचा अधिकार आहे. हे माझं सुमित सरवदे चं स्पष्ट मत आहे.

सनातनांचा श्रीराम, हिंदूंचा सीताराम, बौद्धांचा साधूराम, इस्लामचा रामजान ज्याचा त्याचा नायक हा काल्पनिक आहे. पण नायक आहे. म्हणून या जीवनाच्या रंगमंचाचे आम्हीच तर नायक आहोत ना?

आता आम्हाला नायक म्हणावे, खलनायक म्हणावे की नालायक म्हणावे?तुमच्या तोंडाला हात थोडीच लावता येणारेय?

राम नाम सत्य है |

आम्ही प्रत्येकांनाच देव बनविणार आहोत. या पृथ्वीला स्वर्ग बनविण्याचेय आहे. यासाठी खुप मोठा विधी, निधी आवश्यक आहे. प्रत्येकात हा राम जाग्रत करायचा आहे?

मान्य करणाऱ्यांला सोबत घेऊन न मान्य करणा-याला जीवंत गाडूया. कोणी उकरलेच तर त्याचे आस्थींचे आस्तित्व म्हणून भलेमोठे मंदिर उभारुया.

आज मनमोकळेपणानं स्वच्छंदी विहार करणाऱ्यांवर एक ना एक दिवस प्रहार पडणारेय हे थोडीच समजणार आहे?

नाटाळांना टाळ कुटायला, टाळी वाजवायला, घंटा वाजवायला लावू. त्यांना भणंग भिकारी करू.

अरे अच्छे दिन येणारेच आहेत... पण आपले हे त्यांना कुठे कळतेय? आणि कळलेच तर काय फरक पडणारेय हम तो फकीर आदमी है झोला उठा के चले जाऐंगें?

केसानेच गळा कापणे.... हा आपल्या रामबाण उपायामधील एक बाण बघुयात काय चमत्कार करतोय ते?

अरे सांगायचे विसरलोच की

रात्री माझ्या स्वप्नात साक्षात राम आले. त्यांनी सांगितलेय रामराज्य येणारेय म्हणून.... शुsss🤫🤫🤫 कांही हं श्री?

©✍️सुमित रवि सरवदे

Comments

Popular posts from this blog

क्यों असरदार होते हैं बीज मंत्र?

इतिहास लेखन पद्धति

अनुसूचित जाती व जमाती