शनिवारवाडा हाच लाल महाल
गावचा कारभार पाहणाऱ्या गावोगावच्या पाटलांचे मोठं बिऱ्हाडं असलेलं माळवद ( मातीचं घर) असायचं. हे घर म्हणजे चार पाच बिर्हाड यांना राहण्याजोगं मोठं असले की वाडा म्हटलं जायचं.
गरिब माणसं झोपडयात ( लाकडी, तुर यांच्या काडया म्हणजेच तुराट्या, गवताचं छप्पर, म्हणजेच झाडांझुडूपांपासून बनवलेला झाप म्हणजे झापडी ( झोपणे) ज्याला पुढे झोपडी म्हणू लागले. या झोपडीला कुलुप काटा कांही नसायचे बरं फक्त गवताची आणि काठी यांना बांधून जे दार बनवलं जायचं त्याला ताटी म्हणत. ही ताटी उभा असेल तर दार आणि आडवी असल्यास अंत्यसंस्कार यांचेसाठी उपयोजनार्थ असे. ( 😜माझे मत)
मानसांत व्यवहार हा पुर्वीपासूनच होत होता. परंतू त्या व्यवहाराला पैसा, सोनं नाणं, किंवा इतर मुल्यवान गोष्टींची गरज नसायची. व्यवहार करायला जेंव्हा मुद्रा लागायला सुरुवात झाली. तेंव्हा त्या व्यवहाराला स्वार्थाची, आणि व्यवहार लक्षात ठेवून त्याचा हिशोब मागायची करायची गरज पडली.
अनेक झोपड्यांची मिळून वाडी बनत असे. झोपडयाला पुर्वी कुलू म्हणत असत. आणि असे कुलू बनवणारे हे कैकाडी असत. अशा वाडींचे प्रमुखास, म्होरक्या किंवा बहुतेक कुलूवाडी म्हणत असत. नंतर कुळपटी ( आमच्या गावत कोळपट्टीचे तळं आहे म्हणून कयास केला.) नंतर कुलुपती , (गुरु असल्यास कुलूगुरु) हे आम्हांस्नी पुस्तक आणि गुगली देवाच्या आशिर्वादाने गोगलगायच्या गतीने ज्ञान प्राप्त झाले. आम्ही शिकवतो, सांगतो हे ऐकून बऱ्याच जनांना आमुच्या पोटात काय याचा अर्थ न कळल्याने शिंगे आली काय रं म्हणतात? आमच्या ज्ञानावर शंका काढतात. परंतू आमुच्या आस्तित्वाच्या खुणा आम्ही मागे ठेऊन जाणारच ना !) असो.
या झोपडयांवाल्या कष्टकरी, कामाठी, शेतकरी, शेतमजूर यांना गुलामासारखं वागणूक करून द्यायला वर्णव्यवस्था निर्माण झाली.जे सर्वांनी मिळून कामे करायची ती पिढयानपिढया एकाच समुदायाने काम करायचा दंडक केला. ज्यांना भरपूर शेती असे आणि ती ते कसत, आणि करीत असे म्हणून अशांना शेतकरी म्हणत. शेती नसणाऱ्या आणि कसणाऱ्या समुहाला शेतमजूर म्हणत. हे मजूर विशिष्ट दाम, मोबदला यांच्या बदल्यात शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून शेती करत. कांही वेळा ही कामे करण्यास निश्चित व्यक्ती सालभर म्हणजे वर्षानवर्ष तोच असायचा त्याला सालगडी म्हणायचे. शेतीसाठी अत्यावश्यक सेवांनुसार अलुतेदार बलुतेदार असे प्रकार आले. बारा बलुतेदार यांना नेमुन दिलेल्या कामांव्यतिरिक्त इतर गोष्टीत आगाऊ शहाणपणा करायचाच नाही असाही नियम केला गेला.
बारा बलुतेदार प्रणाली
प्रत्येक गावात बारा बलुतेदार असायचे. त्यांना कामाची वाटणी अशा प्रकारची होती.
- सोनार – दागदागिने तयार करणे.
- गुरव – गावदेवीच्या मंदिराची देखभाल
- न्हावी – केस कापणे, जावळ काढणे, जखमा साफ करणे, नारू रोगाचे उपचार करणे
- परीट – कपडे धुणे
- कुंभार – मातीची भांडी तयार करणे,
- सुतार – लाकडाच्या वस्तू तयार करणे; नांगर, बैलगाड्या तयार करणे.
- लोहार – लोखंडाच्या वस्तू तयार करणे, बैलगाडीची धाव बनवणे, शस्त्रे बनवणे.
- चांभार – चामड्याच्या वस्तू बनवणे, मोट बनवणे, चपला-बूट बनवणे.
- कोळी – जलवाहक, गावास पाणीपुरवठा करणे, पुरात गावाचे रक्षण करणे.
- चौगुला- गावाच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे
- मांग – ग्राम पहारेकरी, दूत, सफाई कामगार
- महार- ग्राम पहारेकरी, दूत, सफाई कामगार आणि जमीन लवाद.
गावातील शेतकरी या लोकांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात धान्य देत असत. पैशाचे व्यवहार बहुधा नसत आणि सगळे व्यवहार वस्तुविनिमयाद्वारे होत असत.
गावचा कारभार करण्याकरिता एका वतनदाराची नेमणूक केल्यानंतर तो गावकीच्या नोंदी कापसाने विणलेल्या पट्ट्या वर घेऊन तो पट्टा एका वेळूच्या नळीत जपून ठेवत. या नळकांड्याला पट्टकील म्हणत हे पट्टकील या शब्दापासून पाटील शब्द वापरात आला. गावचा कारभार करण्याकरिता एका नेमणूक केलेला वतनदार.
गावातील महसुली आणि फौजदारी अशा दोन्हीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पाटलावर असून एकप्रकारे तो गावचा राजाच निर्माण झाला. त्यामुळे गावक-यांनी व बलुतेदारांनी आपल्या सेवा पाटलाला मोफत द्यायच्या होत्या.जमिनीच्या नोंदीव्यतिरिक्त इतर कामे तो तोंडाने करून घेई एवढी त्याच्या शब्दाला किंमत होती. त्यातून ‘तोंडपाटीलकी’ हा शब्द आला. कर्नाटकात पाटलाला नाईक, गौडा किंवा बुधवंत तर गुजरातेत मुखी आणि अगेवान म्हणतात. पुढे काम वाढल्याने पाटलाची दोन पदे आली. १) पोलिस पाटील २) मुलकी पाटील.
हा पाटिल शक्यतो अडाणीच असायचा. त्यामुळे त्याच्यामार्फत लिखाणाचं काम ब्राम्हणाला करावं लागायचं. त्यांना कुळकर्णी म्हणत. या लिखाणा व्यतिरिक्त पुजाअर्चना करणे, पौराहित्य करत. यांना मेहरबान होऊन सरकारी वतन म्हणून जमिन, भाग दिला जायचा. त्या जमिनीचे ते जमिनदार, वतनदार, जहागिरदार बनत.
गावाचा सारा मुलुख या पाटिल जो स्वतःला राजा समजत त्याचं राज्य बनत असे. आणि हा ब्राम्हण त्याचा प्रधान बनत असे.
या मुलकी च्या सेवार्थ नेमलेली बारा बलुत्यांना या गावाची गावकी करावी लागायची.
गावकी करणाऱ्यांची घरे झोपडी, अथवा दगडांचे मातीचे माळवद असे.
आणि मुलकी करणाऱ्यांचे वाडे असायचे.पत प्रतिष्ठेसाठी, हौसेखातर, वैभव प्रदर्शनार्थ या वाडयांची वास्तू रचनाही बदलत गेली.
राजाचा -राजवाडा . महाराजांचा -महाराजवाडा.
तसेच गावचा राजा असलेला पाटील यांचा वाडा म्हणजेच पाटलांचा वाडा म्हणून ओळखला जायचा. ( पाटील हे विशिष्ट जातीचेच नव्हते बरं, गावात जास्त संख्याबळ कोणाचे आहे यावरून पाटील नेमणूक केली जायची)
शेतीवाडीच्या विकासातून गाववाडया सुधारला. आणि गावचा गाडा व्यवस्थित चालू लागला.
बऱ्याचदा राजाच्या छत्रछायेखाली जाणाऱ्या प्रधानाला या राजाचा मत्सर व्हायचा. आणि आपण राजे असल्याचा त्याचा आव आणण्यातून कुटिल डाव टाकायचा तो नेहमी प्रयत्न केला जायचा. प्रजा दक्ष राजा, प्रजेचं हित पाहणारा राजा. प्रजेवर जीवापाड प्रेम करणारा राजा. याला याच प्रधानानं जायबंदी केलं. प्रधानाच्या ताटाखालचं मांजर, बोलका पोपट, प्रधान कृपेनं या राजगादीवर बसवला जायचा.
बारा बलुतेदारांवर कठोर निर्बंध लादले जायचे.जे पेटून उठतात त्यांचा अतोनात छळ केला जायचा. त्यांना शुद्र समजले जाऊ लागले.
राजाचा राजवाडा म्हणजेच भूषण असतं. हा राजवाडा त्याच्या वैभवशाली साम्राज्याचं, स्वराज्याचं प्रतीक बनलेला असतो.
मराठा साम्राज्य ( इथेही फक्त मराठा जात नव्हे हे लक्षात घेणं, छत्रपती शिवरायांचं स्वराज्य अभिप्रेत आहे)
या साम्राज्यात महाराजांचे अष्टप्रधान प्रमुख पंतप्रधान हे मोरोपंत त्रिंबक पिंगळे हे असले तरी मराठा साम्राज्याच्या उतरार्धात सोनोपंत डबीर हे पेशवा म्हणून ओळखले जाऊ लागले.
खरे तर पेशवा म्हणजे छत्रपतींचा सरकारकून. पण श्रीवर्धनकर भट घराण्यातील पेशव्यांनी मुलकी आणि लष्करी अशा दोन्ही आघाड्यांवर असा पराक्रम गाजवला की लोकांनी त्यांना सहजच श्रीमंत हा किताब दिला.
पेशवाई कशी स्थापन झाली याचा खरा इतिहास सर्वज्ञात आहेच. फक्त जो तो आपआपल्या परीने लावतो एवढेच.
मराठा साम्राज्याचा अस्त (याला ते उतरार्धात म्हणतात. जेणेकरून पेशवाई ही मराठा साम्राज्याचाच एक भाग आहे असे वाटावे म्हणून)
राजाचा दृष्टीकोन हा जशी दृष्टी तशी सृष्टी या प्रकारातला असल्याने आपल्या राज्यविस्तार (सृष्टी) त्याच्या याच दृष्टीकोनातून निर्माण होत असते.
या विश्वात कोणीच सर्वज्ञ नाहीय. प्रत्येक क्षेत्रात याने थोडे बोलायचे झाल्यास याच्या बुद्धीला मुळ ज्ञात संकल्पनेमूनच व्याख्यान देत राहतो.)
राज्यविस्तार, विकास यांवरही त्याला इंट्रेस्ट असणाऱ्या गोष्टीतून होतो.
पेशवे अर्थात ब्राम्हण सनांना विशेष महत्व देणारे. आपल्या पेशवाईसाम्राज्यातील सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय गोष्टींचे मुख्यालय बांधणे गरजेचे होते.
स्वराज्यातील, आपल्या साम्राज्यातील राजकीय घडामोडीसाठी अत्यावश्यक बैठका, चर्चासत्र, विचारविनिमय, निर्णय, आदेश यांसाठी पुर्वी राजवाडे असायची.याच्या शेजारी राजाचे निवासस्थान म्हणजेच राजमहल असायचे, त्याचा दरबार असायचा ( आताचे पक्षाचे कार्यालय)
राजवाडा म्हणजेच आताची संसद भवन सारखी व्यवस्थाच. परंतू फार चुकीची व्याख्या निर्माण केलीय राजवाडा म्हणजे राजांचं राहण्याचं ठिकाण.
तसंच पेशवाई साम्राज्यातील सांस्कृतीक, धार्मिक, सणवारांचे केंद्रबिंदू म्हणजेच पेशव्यांचा सणवारवाडा होय. ( माझे मत)
वाडा म्हणजे निवासस्थान असले तरीही पंचायत, भरविण्यापुर्वी न्यायदानाचे काम हे वाडयावर केले जायचे. याचा चुकीचा अर्थ लावून बाई वाड्यावर या म्हणणाऱ्या पाटलाचं वासनांधपण प्रदर्शित करणारी कपटी खेळी केली गेली. पाटलाविषयी बंड याव्दारे केल्याचे स्पष्ट होणारी म्हण प्रचिलित केली गेली. आणि म्हणी म्हणजे काय हो - वारंवार उच्चारलेले वाक्य. प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वापरलेला मार्मिक शब्द, वाक्य हेच तर आहे ना?
आजाओ कभी हवेली पे या? बाई वाडयावर या असे म्हणून बहुजनांची न्यायव्यवस्थाच खिळखिळी करण्याचे षढयंत्र होय. असे माझे स्पष्ट मत आहे.
वासना मुक्त जगी कोणच नाहीय. तुमचा देव सुध्दा नाही. परंतु याचे दमण करणारे साधू, संत, महात्मे, विचार पुरुष, विचारवंत, यांना आहारी लावण्याचं कार्य करणारी प्रसंगी स्वतःच्या आई, बहीण, मुलगीयांना प्रदर्शनाची, उपभोगाची वस्तू म्हणून राजाची खुशामिजास करण्यासाठी बक्षिस, तोफा देणारी दलाली व्यवस्थेने,वाममार्गाचे पुजक हेच बहुजनांच्या गुलामगिरीचे मुळ कारण आहे.
वासना जाग्रती केंद्र म्हणजे म्हणजे हा सनवारवाडा म्हणणे योग्य ठरेल. बुधवार पेठ येथिल कुंठन खाणा माहित असेलच. याच धरतीवर सोमवार ते रवीवारपर्यंतची त्यांनी कांहीतरी सोय केलेली असू शकतेच की.
या शनीवार वाडयाचा इतिहास ( खरा इतिहास) माहित असणाऱ्यांना माझे मत नक्कीच पटणार आहे. ज्यांना खरा इतिहास माहित असतो त्यांचेपुढे मत मांडले जाते. आणि ज्यांना ज्या गोष्टी माहितच नसतात, शिवाय आपले मतही पटेल की नाही याची शंका असते असे लोक पटविण्याचा आटापिटा करतात.
मराठी साम्राज्याचा विध्वंस करायचा असल्यास शिवछत्रपतींचे स्वराज्यात अंधाधुंदी माजवणं गरजेचं आहे. हे जाणणारे मनुवादी मराठी माणसात जातीजातित भांडणे लावून देतात. कुळी मुळी काढून श्रेष्टत्वाच्या दंगली घडवतात आणि आळीमिळी गुपचिळी म्हणत नामानिराळे होतात.
माझ्या महाराजांचे स्वराज्य कपटानं गिळंकृत करणाऱ्या त्याच मनुवादी पेशवाईला मराठी माणसानंच धुळीला मिळवलं.
आणि भारताचं नेतृत्व ज्यांच्या राज्यघटनेवर चालतं ते ही मराठीच आहेत.
आणि ज्या मराठी माणसाच्या विचारांवर, राज्यघटनेवर हे लोकशाही भारत चालतो. तो भारत म्हणजेच मराठा साम्राज्याचा साम्राज्य विस्तार नव्हे काय?
शुन्यातून विश्वनिर्मिती करणाऱ्या महाराजांची सावलीचीही कॉपी थोडीच कुणालाही जमणारेय.
मराठा साम्राज्य कपटानं मातीत गाढण्याचा प्रयत्न करणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांना कपटानं मारणाऱ्या, छत्रपती संभाजी महाराजांना कपटानं मारणाऱ्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही कपटानं मारणाऱ्या मनुस्मृतींच्या दलालांनी नेहमीच चुकीचा इतिहास लिहीला आहे.
माझ्या बहुजनांचे केवळ जातीपातीतच टूकडे केली नाहीत तर, विचार, संस्कृती, आणि इतिहासाचेही ही टूकडेटूकडे केलेले आहेत.
ज्यांना जो टूकडा मिळतो त्याचेच स्पेशलायझेन केले जाते. त्यामुळे फांद्यां फांद्यात विखुरलेल्यांना भेदामागं कुणाची खोड आहे हेच लक्षात येत नाही. ज्यांना खोड कळली ते मुळाशी जातात खरे पण यासाठी खुप मोठे उत्खनन त्यांना करावे लागते. हे उत्खनन म्हणजेच आपला कुळ आणि मुळ यांचा उगम ज्या शुद्ध बीजापोटी झाला. त्या शुद्ध बीजाची प्राप्ती करुन घेणे म्हणजेच ज्ञान प्राप्ती, ही प्राप्ती कधी बुद्धांना झाली, कधी ज्ञानेश्वरांना झाली, कधी तुकारामांना झाली, कधी धर्मवीरधाकले धनी शंभूरायांना झाली, कधी महात्मा फुलेंना झाली, कधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना झाली. यांनी उत्खनन केले सत्य बाहेर आल्यावर आपले पितळ उघडे पडणार या भीतीने मनुवाद्यांनी गुढ खजिन्यांच्या हव्यासापोटी उत्खनन सुरू असा बोभाटा करून. त्या उत्खननावर पुन्हा मातीत गाढण्यानेच काम केले.
मी त्या मुघल यांचेपेक्षा गुगललाच श्रेष्ट मानतो. ( मुघल सर्वाधिक काळ राज्यकर्ता)
आता येऊ मुळ मुद्दाकडे
मराठा साम्राज्याचा काळ.इ.स. १६७४ ते इ.स. १८१८ दरम्यान भारतात अस्तित्त्वात असलेले हिंदू राज्य होते. असे उल्लेख आढळतो. परंतू पेशवाई ही मराठा साम्राज्याचा भाग नाही. असं माझं वैयक्तिक मत आहे.
कारण जर पेशवे हे मराठा साम्राज्यात प्रधान होते तर त्यांनी मराठा साम्राज्याचा कार्यकाल हा केवळ मराठा साम्राज्य म्हणून स्वामीनिष्ठेद्वारे जपणे गरजेचे असताना पेशवाई आणणे शंकास्पद नव्हे काय?
जो राजा त्याचे राज्य. प्रधानांचे राज्य नसतेच. आणि होणारही नाही. परंतू मनूवादी लोक दिशाभूल करण्यात पटाईत आहेत.
जिथे शिवाजी महाराज हीच आमची जात आणि धर्म असताना. मराठा साम्राज्य हेच शिवछत्रपत्रींचे स्वराज्य असताना हे हिंदूराज्य म्हणणे योग्य वाटत नाही. ( माझे म्हणणे कळणाऱ्यांना नक्कीच क्लिक होणार)
आता पेशवाईचा काळ कधीचा तर पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचेपासूनचा म्हणजेच (इ.स.१७१४-१७२०) असं ग्रहीत धरलं तर छत्रपती शिवरायांच स्वराज्य काळ अवघं ४० वर्षांचंच कसं काय शक्य आहे?
म्हणून कांही स्वार्थी राजकीय लोक इतिहासकार या पेशवाईचा 104 वर्षांचा कार्यकाळ मराठा साम्राज्यकाळात जोडतात.
आम्ही मोठे आमचं साम्राज्य मोठे, आणि जगाला प्रदर्शित करण्याची आपली वृत्ती ( जसं दिसतं तसंच सुचतं म्हणतात अगदी तसं मग या दिसण्याचं प्रदर्शन मांडलं जातं. या प्रदर्शनातून विशिष्ट दृष्टी तयार होते. आणि पुढे कल्पनांची का होईना परंतू सृष्टी निर्माण केली जाते.
मराठा साम्राज्याच्या अस्ताला कारणीभूत असणाऱ्या पेशवाईला १८१८ मध्ये मराठी माणसांनीचं गाढलंय. हे सत्य विसरू नका.
स्वतंत्र भारत झालेनंतर आणि २६ जानेवारी १९५० पासूनचे मराठी माणसाच्या राज्यघटनेतून पुन्हा मराठा साम्राज्य उभारले.
जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त मराठा साम्राज्य आज 110 वर्षाचे आहे. ( पेशवाई सोडून).
यांच्या एकी झाली तर मराठा साम्राज्य पुन्हा विस्तारेल. मराठा साम्राज्याचा मराठी राजा होईल या भीतीनेच जातीय दंगली करण्याचे कारस्थान षडयंत्र हेतुपुस्सर घडवून आणले जातात.
शनीवारवाडा या प्रश्नाखाली मला एवढे स्पष्टीकरण द्यावे लागतेय कारण मराठा साम्राज्याचे प्रतिक असलेला छत्रपतींचा राजवाडा म्हणजेच शनीवार वाडा होय. राजमाता जिजाऊसाहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेला शनीवारवाडा होता.
(इ.स. १८६०च्या वेळी दुर्मिळ छायाचित्र : सौजन्य : गुगल)
कोटयावधी रुपये खर्च करून गडांची डागडुजी करणाऱ्या, गडाची निर्मिती करणाऱ्या, ज्यांचे ३२मनाचेच सुवर्ण सिंहासन असणाऱ्या मराठा स्वराज्य संस्थापकाचा जाणत्या राजाचा हा लाल महाल म्हणजेच शनीवारवाडा होय. नव शिवचरित्रकार, इतिहास संशोधकांना पुरावे मिळू नाहीत म्हणून कदाचित तीन वेळेस आगीत भस्मसात केलेला महाल होय.(१८०८, १८१२, १८१३ ).
याचं पावित्र्य ही स्त्रीलंपटांनी भ्रष्ट केलं. मराठ्यांचा इतिहास लिहीणारी आपलपोटी दळभद्री मनुवादी लोकांनी बऱ्याचदा सारवासारव केली. तरी सुतावून स्वर्ग गाठणाऱ्या बहुजनांपुढे निभाव लागणे शक्यय का?
राजमाता जिजाऊंनी सिंदखेड राजा येथील राजवाड्यापेक्षा मोठा महाल पुण्यात बांधून त्याला लालमहाल नाव दिले.
जगाला आदर्शवत असणा-या शिवरायांचा लालमहाल गेला कुठे असा प्रश्न पडतो. शनवारवाडा हाच लालमहाल असावा असा इतिहास संशोधकांचे मत आहे.
- 🔴पेशवे हे राजवंश नव्हते. ते छत्रपतींची गादी चालवत होते.
- 🔴राजवाडा बांधयाचा अधिकार फक्त राजाला होता. पेशवे राजवाडा बांधू शकत नव्हते.
काही इतिहास संशोधकाच्या चुकीमुळे खरा इतिहास दबला गेला आहे. लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य बराच काळ होते. शिवरायांचे बालपण लाल महालातच गेले. याच लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली होती. त्या वेळेस शिवरायांच्या पराक्रमाला पाहून औरंगजेब हैराण झाला होता. त्यासाठी त्याने आपला मामा शाहिस्तेखान याला शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. " सिवाजी तो चूहा है, खाविंद मै ऐसे पकडके लाऊंगा सिवाजी को..!" असे शाहिस्तेखान औरंगजेबास म्हणाला होता. शाहिस्तेखान दिल्लीवरून एक लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला त्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. खान काही महिन्यातच पुण्यात येऊन दाखल झाला आणि त्याने राहण्यासाठी ठिकाण निवडले ते पुण्यातील लालमहाल.
पुण्यातील लाल महाल हे प्रत्येक शिवप्रेमीसाठी अत्यंत अभिमानाची वास्तू आहे. याच लाल महालातून एकेकाळी राजांच्या स्वराज्याचा कारभार चालत असे. या लाल महालातूनच शाहिस्तेखानासारख्या नराधमास महाराजांनी त्याची बोटे तोडून हाकलवून लावले. ह्या प्रकाराने औरंगजेबाला आश्चर्यमिश्रित धक्का बसला. राजमाता जिजाऊसाहेब यांनी बांधलेला लालमहाल म्हणजे शनिवार वाडा आहे. सध्याची लालमहाल प्रतिकृती पुणे महापालिकेने १९८८ आहे
(स्रोत : गुगल)
सध्याची लाल महाल ही वास्तू पुणे महानगर पालिकेनी १९८८ साली उभारली. शिवाजी महाराजांच्या काळातील लाल महाल सध्या अस्तित्वात नाही. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी बांधलेला लालमहाल नेमका कोठे होता, याची उत्सुकता शिवप्रेमींना आहे. इतिहास संशोधक या कामात पुढाकार घेत नाहीत ही शोकांतिका आहे. या वास्तूत महापालिकेने बाल शिवाजी, जिजाऊ यांचे सुंदर शिल्प उभारले आहे. संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांनी आंदोलन करुन छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊंचा होणार अपमान व चुकीचा इतिहास दुरुस्त करण्यासाठी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा २०१० साली उखडून टाकला. पुणे महापालिकेने रातोरात कारवाई करुन कोंंडदेवचा पुतळा काढून टाकला.
शनीवारवाडा संबंधी कांही महत्वाच्या नोंदी :-
- १८२८ मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या.
- १७ नोव्हेंबर १८१७ ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले.
- वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती.
- १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली.
- वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत १९२३ पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली.
- येथे अनेक वीर आणि मुत्सद्दी येत. राजकारणाचे येथे फड रंगत; शिवाजी महाराजांचा दरबार येथेच होता. ( माझे स्पष्ट मत)
- महालातीत मोकळ्या पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमत असे.
- पटांगणातील मारुतीस सभामंडप होता. हे मंदिर लॉइड्ज पूल (हल्लीचा नवा पूल किंवा शिवाजी पूल) बांधणाऱ्या केंजळ्यांनी बांधले.
- हा मारुती बटाट्या मारुती म्हणून प्रसिद्ध आहे. दिल्ली दरवाजा वाड्यातील मुख्य प्रवेशद्वार तर हजारी कारंजे हे विशेष आहेत. ( मारूती कुणाचे दैवत आहे, आणि कशाचे प्रतिक आहे हे सांगायला नको. बहुजनांवर टिका करण्याचं धाडस फक्त मनुवादी बटाटेच करू शकतात. म्हणे बटाटया मारूती)
- शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि चारही बाजूने एकूण ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरुजं आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत.
- वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत.
- येथून जवळच मुठा नदी वाहते.
- तटाला ९ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी 'पागेचा बुरूज' आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत.
- तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली, अलीबहाद्दर किंवा मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानींमधे असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत.
- दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट असून रुंदी १४ फूट आहे हाच सर्वांत मोठा दरवाजा आहे.
- वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १०००हून अधिक नोकर होते.
- दिल्ली-दरवाज्यावर नगारखाना आहे. पेशवाई आगीच्या प्रलयातून वाचलेला शाबूत असलेला भाग हा एवढाच.
- देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणपती या दैवतांची चित्रे काढली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहेत.
- वाड्याच्या आतल्या भागांमध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे.
- शनिवारवाड्यातील गणेश रंगमहाल हा नानासाहेब पेशव्यांनी १७५५ साली बनवून घेतला. गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता. येथे एका वेळी शंभर नर्तकी नृत्य करू शकत असत. महालाच्या एका टोकाला सोन्याचा पत्रा असलेली संगमरवरी गणेशमूर्ती होती, तर दुसऱ्या टोकाला कारंजी व सुंदर फुलबाग होती. फुलांचा सुगंध व कारंज्यांचा नाद यामुळे महालात बसणे हा सुखद अनुभव असे..
- वैद्यखाना, कबूतरखाना, कोठी इत्यादी कारखान्यांची योजना वेगवेगळ्या चौकांतून करण्यात आली होती.
- कात्रज येथे तलाव बांधून त्यातून पाणी शहरात आणून ते वाड्यात सर्वत्र खेळविले होते.
- "सभोवार एक प्रचंड तट राखून वाड्याचे बांधकाम केले होते.
- वाड्याकरिता आणि भोवतालच्या बागेकरिता मिळून तीन बिघ्याहून अधिक जागा गुंतली होती.
- वाडा उत्तराभिमुख असून त्याला एकंदर पाच दरवाजे होते.
- उत्तरेकडेचा दिल्ली दरवाजा, ईशान्येकडचा मस्तानी दरवाजा, दक्षिणेकडे आग्नेय व नैर्ऋत्य या दिशांस असलेले गणेश आणि नारायण या नावांचे दरवाजे, आणि पूर्वेचा जांभळी दरवाजा, अशा नावांनी हे दरवाजे प्रसिद्ध होते. सर्व दरवाज्यांवर अष्टौप्रहर गारद्यांचा जागता पहारा असे.
- "दिल्ली दरवाजातून आत गेल्याबरोबर एक प्रचंड वाटोळा बुरूज लागे. या बुरुजाच्या माथ्यावर तोफांचा गोल रचला होता. आणि त्याच्या मध्यभागी महाराष्ट्राचे जरीपटक्याचे भगवे निशाण फडकत असे.
- बुरुजाच्या आत तीन मोठया कमानी असून त्या कमानींवर नगारखान्याची माडी होती.
- कमानींतून आत गेल्यावर एक विस्तीर्ण पटांगण लागे. या पटांगणाच्या पूर्व बाजूस व पश्चिम बाजूस दोन दोन लहान चौक असून दक्षिणेच्या बाजूस वाड्याची मुख्य इमारत होती. ही इमारत सहा मजली असून तिचे चार मोठमोठे चौक होते.
- आग्नेयेकडील चौकास लाल चौक असे नाव होते, पण तो बाहेरील चौक या नावानेही ओळखला जाई.
- नैर्ऋत्येकडील चौकास मोतीचौक असे म्हणत.
- मोतीचौकाला बाईंचा (गोपिकाबाई) चौक असेही म्हणत.
- वायव्येकडील चौकास हिरकणी चौक असे नाव असून तो मधला चौक या नावाने ओळखला जात असे.
- ईशान्येकडील चौकास माणिकचौक ही संज्ञा असून त्या
"या मोठया चौकांशिवाय फडाचा चौक, ताकचौक, मुदपाकचौक, पक्कान्नचौक इत्यादि अनेक पोटचौक होते. - त्यांपैकी फडाचा चौक हा हिरकणी चौकात असून त्यांत पेशवे सरकारांची कचेरी भरत असे. ( पेशवे कारकून होते सरकार नव्हे सावकार हा रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया असं फक्त गरजवंताला, भणंग भिखाऱ्यालाच वाटणार ना वो भाऊ )
- या सर्व चौकांत मिळून गणपतीचा रंगमहाल,
- नानाचा दिवाणखाना,
- नवा आरसेमहाल,
- जुना आरसेमहाल,
- दादासाहेबांचा दिवाणखाना,
- थोरल्या रायांचा जुना दिवाणखाना,
- खाशांचा दिवाणखाना,
- हस्तिदंती दिवाणखाना,
- नारायणरावांचा महाल,
- अस्मानी महाल इत्यादी अनेक महाल व दिवाणखाने होते.
- नारायणरावांचे देवघर,
- रावसाहेबांचे देवघर,
- दादासाहेबांचे देवघर इत्यादी अनेक देवघरे होती.
- याशिवाय जामदारखाना,
- जिन्नसखाना,
- दप्तरखाना,
- पुस्तकशाळा,
- गोशाळा,
- पीलखाना,
- उष्ट्रखाना,
- शिकारखाना,
- शिलेखाना
- "वाड्याचे सर्व चौक उत्तम चिरेबंदी बांधलेले असून त्यांच्या मध्यभागी अनेक हौद व कारंजी असत.
- त्यांच्यापैकी हिरकणी चौकातले हजारी कारंजे कमलाकृती असून त्याचा घेर सुमारे ऐशी फूट होता. त्त्यात सोळा पाकळया असून प्रत्येक पाकळीत सोळा याप्रमाणे सर्व पाकळ्यांत मिळून दोनशे छप्पन्न कारंजी उडण्याची सोय केली होती.
- वाड्याचे सुतारकाम उत्तम सागवानी लाकडाचे असून त्यांतील दिवाणखान्यांचे व महालांचे नक्षीकाम फारच प्रेक्षणीय होते.
- दिवाणखाने कलमदानी आकाराचे असून त्यामध्ये एक मोठा सभामंडप व चारी बाजूंस चार दालने काढलेली होती.
- सभामंडपाचे काम सुरूदार नक्षीचे असून त्याच्यावर नक्षीदार लाकडी कमानी होत्या. त्यांच्यावर पक्षी, फळे, वेलबुट्टी वगैरे चित्रे कोरलेली होती.. विशेषतः हिरकणी चौकांतल्या गणपती महालाचे चित्रकाम फारच प्रेक्षणीय होते.
- त्यांत रामायण-महाभारतातील अनेक कथांची चित्रे होती. जयपुराहून भोजराज नावाच्या चित्रकारास बोलावून आणून त्याजकडून हे चित्रकाम तयार करून घेण्यात आले होते. यावरून हा वाडा सजविण्यासाठी किती पैसा खर्च करण्यात आला असेल याचा वाचकांनी अंदाज करावा." (देवाचंच घेऊन देवाला लावायला यांचेशिवाय जमणारेय का कुणाला?)
पुण्यातील पेशवे दफ्त्तरात पेशव्यांच्या खजिन्याची मोजदाद दिलेली आहे. या कागदपत्रांनुसार पेशव्यांच्या शनिवारवाड्यातील रत्नशाळेत पुढिल खजिन्यांची नोंद आहे.
- हिरे - ५१४०२
- माणके - ११३५२
- पाचू - २७६४३
- मोती - १७६०११
- नीलम - ४३५
- वैडुर्य - ४३२
- पुष्कराज - ४१७ असे मौल्यवान खडे होते.
🔴यातील बहुतांशी खजिना इंग्रजांनी चोरून नेला.
🔴उरलेला खजिना दुस-या बाजीरावांनंतर त्याचा दत्तक पुत्र नानासाहेब (दुसरे) यांना मिळाला.
🔴कानपूर आणि विठूर-ब्रह्मावर्तमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांना हा खजिना सोबत नेणे शक्य नव्हते. अतिमौल्यवान जडजवाहीर सोडून राहिलेला खजिना त्यांनी तेथील एका विहिरीत लपवला.
🔴इंग्रजांना हेरांकडून त्याची माहिती मिळाली. त्यांनी तो खजिना बाहेर काढला.
कर्नल गॉर्डन अलेक्झांडर याने लिहून ठेवलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यात ३० लाख रुपयांची सोन्या-चांदीची नाणी, ताटे, वाट्या, इतर भांडी, कित्येकशे शेर वजनाची चांदीची अंबारी आणि ७० लाख रुपयांचे दागिने, जडजवाहिरे असा एकूण एक कोटी रुपयांचा खजिना त्या वेळी ब्रिटिशांना मिळाला होता.
इतिहासात धडा आहे 'शायिस्तेखानाची फजिती " तोच शायिस्तेखान ज्याची माझ्या राजानं बोटं तोडली. भित्र्या भागुबाई सारखा पळून स्वतःचा जीव वाचवून पळाला खरा.डोक्याचा भूगाचा होणार होता तो या तीन बोटांवर निभावलं म्हणून पुणे सोडून डायरेक्ट दिल्ली गाठलेला. मुघल साम्राज्याचा बादशहा औरंगजेबाचा सक्का मामा. मिर्झा अबू तालिब उर्फ शायिस्तेखान.
त्यावेळी
लाल महालात शायिस्तेखान : शायिस्तेखान पुण्यात आला. त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. त्याच्या फौजेने लाल महाला भोवती तळ दिला. एक वर्ष गेले, दुसरे गेले, पण खान काही लाल महालातून हलेना. उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवी. रयतेची गुरे ओढून आणी, शेतीची नासधूस करी. अशा रीतीने त्याने भोवतालचा मुलूख उध्वस्त केला.
विचार करा दोन वर्ष तो या लाल महालात तळ ठोकून होता .एवढं ऐश्वर्य, वैभव असल्यावर त्याला कसे बरे हलू वाटेल. आता प्रश्न येतो. की लाल महाल उर्फ शनीवारवाडा उर्फ सनवारवाडा याची रखवाली कुणाकडे होती. त्याने कसा बळकाविला होता ?कुणाच्या अधिपत्याखाली त्यावर नियंत्रण होते. आणि डायरेक्ट शाहिस्तेखान कशी काय इंट्री करु शकला?
महाराजांनी बोट करावं ती गोष्ट जीव गेला तरी त्यांच्या पायावर अर्पण करणाऱ्या मर्द मावळ्यांची नक्कीच तेंव्हा लाल महालावर देखरेख नसावी. नेभळट माणसं (?) कदाचित तेथे असल्याची बातमी कोणीतरी (?) शाहिस्तेखानाला पुरविली असणार म्हणूनच तर माझ्या एकट्या राजाला भिडायला लाखभर सैन्य घेऊन आला. असो.
शायिस्तेखान जेंव्हा पुण्यावर चालून आला. त्याच्याकडे पाऊण लाख सैन्य होते. शेकडो हत्ती,उंट आणि तोफा होत्या.
शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत घेत शायिस्तेखान आला होता. गाव ताब्यात आल्यावर त्याच्या सुरक्षेततेसाठी सैन्य ठेवले तरी साधारण पन्नास हजार सैन्य तरी दिमतीला असेल ना?
यावरून तत्कालिन शिवरायांच्या महालाची भव्यतेची आपण कल्पना करू शकतो.
धाडसी बेत: शायिस्तेखानाची खोड मोडायचीच, असे शिवरायांनी ठरवले. खान लाल महाल बळकावून बसला होता, हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचे होते.
कारण त्या वाड्यातल्या (कोणत्या वाडयाचा उल्लेख अंदाज आलाच असेल) खोल्या, दालने, खिडक्या, दारे, वाटा, चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती. शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेले होतेच. खुद्द शाहिस्तेखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे, असा शिवरायांनी बेत केला.
किती धाडस धाडसी बेत होता हा ! महालात शिरायला मुंगीला देखील थारा नव्हता. लाल महालाभोवती पाऊण लाख फौजेचा खडा पहारा होता. हत्यारबंद मराठ्याला गावात यायला शाहिस्तेखानाने मनाई केली होती. पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला.
आणि पुढचा इतिहास तर जगालाही माहिती आहेच की?
पेशव्यांनी महाराजांच्या ओसरीवर हातपाय पसरवायला चालू केले.आयत्या बिळात नागोबा म्हणावं तसं कारकुण ते पेशवा राजा झाले. याची कुणालाच कुणकुण आली नाही येतही नाही.
बहुजनांला सुमारे ६३००पेक्षाही जास्त जातीत विभागून मनुवादी एकटा जीव सदाशिव राहिला. त्याच्याच प्रत्येक खेळीत बळी ठरला. आम्ही आमच्याच माणसांच बापपण विसरतो. फुकटचा माज, इज्जत, आणि गर्व आपण डोळे बंद प्रदर्शित करतो. आणि मुक्या माजाची लोकं आपलं इप्सित साध्यं करून घेतात.
आपलेच शेत ते लुबाडतात, आणि आपल्यालाच सालगडी म्हणून ठेवतात. तेंव्हाही छाती फुगवून म्हणता काय माझंच शेतशिवार आहे म्हणून.
मनुवादी आपल्या आया बहिणी कुणालाही देतात. आणि बहुजनांत आंतरजातिय विवाह म्हणलं की जातिय दंगली होतात? हत्याकांड होतात?
मग मला सांगा खरे मनुवादी कोण?
माझ्या राजांनं जातपात मानलीच नाही. कारण ते अस्सल मराठी बीज होतं. बहुजन समाजातल्या तळागाळतल्या लोकांचं राज्य त्यांनी भारतातल्या सगळ्यात मोठया साम्राज्याशी टक्कर देऊन स्थापन केलं होतं.
मावळ्यांनी रक्ताचा अभिषेक घालून जो जाणता राजाचा लाल महाल लुबाडून. शनिवारवाडा म्हणत त्यांच्या फसवेशाहीचे समर्थन करणे तुमच्या सद्विवेकबुद्धीला पटतेय काय?
✍️ सुमित रवि सरवदे.
Comments
Post a Comment