धर्म
(धर्म या शब्दाचा मूळ अर्थ : , वस्तू, विश्व, इत्यादी गोष्टींशी निगडित विचार आणि तत्त्वज्ञानाची शिकवण देणे म्हणजेच धर्म होय)
धर्म हे विद्यापिठ आहे. आणि त्या अंतर्गत महाविद्यालये येतात.
महाविद्यालयांचा उद्देश काय तर पदवी आणि पदवीतर अभ्यासक्रम देणे देणे.
शेती, तंत्र, कला,विज्ञान, वाणिज्य यांवर आधारित हे अभ्यासक्रम असतात.
शेती :उदरनिर्वाहासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल.
- शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधनप्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत.
- सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्घा अस्तित्वात आले आहेत.
- मानवी जीवनात शेती हा खूप महत्त्वाचा हिस्सा आहे. भारतामधील. नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक हे वर्षावर्षाला बदलत नाहीत. त्यांच्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हवामान, जमीन आणि भूरचना हे होत. एखाद्या विवक्षित विभागात कोणते पीक येऊ शकेल हे या घटकांवर अवलंबून असते. कमी पावसाच्या प्रदेशात जर सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले तर बागायीत कपाशी आणि तीळ व उसासारखी दीर्घमुदतीची पिके उत्तमरीतीने येऊ शकतात
तंत्र :प्रागैतिहासिक काळापासून मानव तंत्रज्ञानाचा वापर व अभ्यास करत आहेत.
अगदी प्राचीन काळी नियंत्रित पद्धतीने आग चेतवण्याचे तंत्र मानवांनी शोधून काढले.
- चाकाचा शोध लावल्यामुळे मानवांना अधिक पल्ल्याचे अंतर कापण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान लाभले.
- तेथून पुढे अगदी आधुनिक काळात छपाईचे तंत्रज्ञान, टेलिफोन, इंटरनेट या तंत्रांपर्यंत मानवाने तंत्रज्ञान विकसवले आहे. तंत्रज्ञान विकसनामुळे मानवाचे जीवन अधिक सोयीस्कर बनत चालले आहे.
थोडक्यात, अवजारे, यंत्रे, त्यांपासून बनलेल्या प्रणाल्या यांचे संकल्पना, निर्मिती आणि उपयोजन अभ्यासणारी, तसेच त्यांत सुधारणा घडवून आणण्यासंबंधीची विद्याशाखा म्हणजेच तंत्रज्ञान होय.
कला : एखाद्या कलाकारास त्याचे विचार जगासमोर आणायचे असतील तर कलेच्या विविध माध्यमातून तो कलाविष्कार घडवून आणतो. कांही वेळा या कलाविष्कारालाच चमत्कार म्हणतो.कलाकाराच्या अंगातील सुप्त गुणांमुळेच त्याची कलाक्षेत्रात लोकप्रियता वाढते. माणसांना बंधनात अडकविण्याचे शास्त्र म्हणजेच कला होय. सगळं संपलं तरी कलाच साथ देईल असा विश्वास निर्माण करणारं शास्त्र.कले व्दारे स्वर्गाची अनुभूती करुन घेता आणि देताही येते.
मनुष्याचा कल नेमका कोणता हे ओळखूण , त्याची आवड, रूची, निवड यांद्वारे तो प्राविण्य मिळू शकतो.(यांमध्ये १५६ कलांचा अभ्यास शिकवला जातो )
विज्ञान: ज्ञानाधिष्टित आणि कार्यकारणाधिष्टित विश्वातील घटना आणि घडामोडींचा व्यवस्थित Systematicallyकेलेला अभ्यास म्हणजेच विज्ञान. विज्ञानात ज्ञानाला सर्वात महत्वाचे स्थान आहे.परंतू सर्व प्रकारच्या ज्ञानाला विज्ञान म्हणता येत नाही.
अध्यात्म हा विज्ञानाचा भाग नाही.
विशुद्ध ज्ञानाला विज्ञानाची प्रेरणा मानलं जातं. जिज्ञासातून वस्तूनिष्ठ सत्याचाशोध घेणं हे विज्ञानाला अभिप्रेत असते.
व्यक्तिगत नव्हे तर वैचारिक स्वरूपातूनच हे सत्य संशोधन प्रयत्नशील असल्याने या विज्ञानाला विशेष महत्व प्राप्त होते.
एखादी व्यक्ती कितीही महान असली आणि धर्म, राजकारण, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रांतील तिचा अधिकार कितीही मोठा असला तरी त्या व्यक्तीला प्रत्ययाला आलेल्या सत्यावर, स्वत:च्या अनुभूतीवर किंवा साक्षात्कारावर विज्ञान विश्वास ठेवू शकत नाही. विज्ञान हे प्रयोगातून सिद्ध करून दाखविते. विज्ञान हा प्रगतीचा स्रोत आहे.
वाणिज्य :वस्तू व सेवा यांच्या उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या साखळीतील सर्व प्रकारांच्या देवघेवीला उद्देशून योजिली जाते.
यात वस्तू, सेवा, पैसा, माहिती या व अश्या अर्थशास्त्रीय मूल्य असलेल्या कोणत्याही गोष्टीचा दोन व्यक्ती किंवा संस्थांमधील व्यापार अभिप्रेत असतो. वाणिज्य भांडवलवादी व अन्य काही अर्थशास्त्रीय व्यवस्थांचा मूलाधार आहे.
मुळात -विद्यापीठ ही उच्च शिक्षण व संशोधनासाठीची संस्था असते. विद्यार्थ्यांना विविध विषयातील पदवी प्रदान करण्याचे अधिकार विद्यापीठाकडे असताना या विद्यापिठाचा कुलपती, आणि कुलुगुरू, निर्माता होणेसाठी राजकारण अनुसले आणि शिक्षण, सत्य संशोधन सारख्या उदात्त हेतूंचे बाजारीकरण झाले.
- विद्यालंकार (Doctor of Literature or Doctor Of Letters)
- विद्यावाचस्पती (Ph. D.)
- विद्यानिष्णात (M. Phil.)
- विद्यापारंगत (Master Of Arts)
- विद्याप्रवीण (Bachelor Of Arts)
भारतातले नालंदा (बिहार) हे जगातल्या अतिप्राचीन विद्यापीठांपैकी एक आहे.
भारतातील विदयापीठांचे प्रकार
- राज्य विदयापीठ
- केंद्रीय विदयापीठ
- अभिमत विदयापीठ
- खाजगी विदयापीठ
- मुक्त विद्यापिठ- सोईनुसार पदवी शिक्षण घेण्याची सुविधा असलेले विद्यापीठ.
- स्वायत्त विद्यापीठ -स्वतःची घटना, अभ्यासक्रम व नियमावली असणाऱ्या, तसेच राज्य वा केंद्र सरकारच्या अधिकार कक्षेबाहेरील विद्यापीठांना स्वायत्त विद्यापीठ म्हटले जाते
( म्हणून हिंदू, बौद्ध, जैन, मुस्लिम, शीख,ईसाई हे धर्म नाही तर स्वायत्त विद्यापिठे ( धर्मपिठे) आहेत.)
आता असा धर्मं त्याच्या ठराविक पॅटर्ननुसार शिक्षण देण्याचं काम करतात. अज्ञानाचं समर्थन करणारा कोणताही धर्म बुडणारच. ज्ञान तंत्रज्ञान याबरोबरच हा धर्म ही असणं गरजेचं आहे. धर्मात आपला इतिहास असतो. भविष्य त्यातून आपण कसा बोध घेतो हे ज्याच्या त्याच्या दृष्टोकोनांवर अवलंबून असते.ज्ञानाने समज येते जी समाज घडवायला उपयोगी ठरते. तर तंत्रज्ञानांतून कौशल्ये प्राप्त होतात.
धर्म नसल्यावर अंधकार होणार अजून दुसरं काय होणार. म्हणून तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजेच अत्त दीप भव स्वतःचा विकास स्वयंप्रकाशित होण्यासाठी प्रज्ञा शील आणि करुणा यांची गरज आहे..
अर्थात नेहमीप्रमाणेच हे माझं वैयक्तिक मत आहे.
Comments
Post a Comment