भारतीय संविधान इंग्रजांनी बनविलेल्या इंडिया अधिनियमाची नक्कल (कॉपी) आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नक्की कोणती राज्यघटना लिहिली?

असा प्रश्न विचारणारे भारतीय ( सॉरी हिंदूस्थानी ) स्वतः देशभक्त आणि या हिंदूस्थानाचा राजा जरी समजण्याचा अतातायीपणा करत असले तरी असा प्रश्न पर्यायाने रडगाणं गाणाऱ्या प्रत्येकात मला राजा हिंदूस्थानी दिसतो. या राजा हिंदूस्थानीच्या अशा रडगाण्याला प्रत्येक वेळी लहान मुलाचं सांत्वन करावं ना तसं सांत्वन करावं लागतं. पण यावेळी रोजचंच मडं आणि त्याला कोण रडं म्हणत विद्वानांनी दुर्लक्ष केलं. आणि या रडगाण्याचा आस्वाद घ्यायला लागले?

वाह ! क्या दर्द है तेरी आवाज मे छोरें?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदेपंडित होते. नुकतंच स्वतंत्र मिळालेल्या भारताचे कायदामंत्री आणि भारतीय राज्यघटना निर्माण समितीच्या मसुदा समितीचे सन्माननिय अध्यक्षही.

या गोष्टी तुम्हा लोकांच्या स्मरणात नसतीलही कदाचित, पण तुम्ही श्रेष्ट ठरविलेल्या घटनेला म्हणजेच मनुस्मृतीला दहन करणारे हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.

भारतात प्राचिन काळापासून ( तुमच्या देवांच्या काळात बी बरं का ) गणराज्यपध्दती म्हणजेच लोकशाही पद्धतीच आस्तित्वात आहे. भारत हा विविधतेने नटलेला आहे. बहुभाषिक, बहुप्रांतिय अखंड भारत कोणत्याच परकिय राजसत्तेच्या एकछत्री अंमलात राहिलेलाच नाही आणि भविष्यातही राहणार नाही.

जेंव्हा जेंव्हा गणांच्या, जेंव्हा जेंव्हा लोकांच्या, जेंव्हा जेंव्हा रयतेच्या, जेंव्हा जेंव्हा भक्तांच्या (🤫) आणि जेंव्हा भारतीय देशबांधवांच्या अधिकारांचे हिसकाविण्याचे धोरण अवलंबिले गेले तेंव्हा तेंव्हा अशी विनाशकाली विपरितबुद्धी मातीत गाडली गेल्याचा इतिहास आहे.

अहो इथे आपलंच लुबाडायचं आणि उपकार केल्यागत थोडं थोडं द्यायचं राजकारण चालूय( देवाचंच घ्यायचं आणि देवाला ओवाळायचं)

भारतीयांच्या रक्तातच शौर्य आहे, अलौकिक बुद्धीमता, सम्यक -सजग ज्ञान अद्ययन अवलोकन करण्याचे सामर्थ्य आहे.विद्रोहाचं आगर म्हणजेच भारत असं माझं स्पष्ट मत आहे.

शीतावरून भाताची आणि पर्यायाने सीतावरून भारताचीही चिकित्सा करणारे डोळस चिकित्सकही इथेच आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कॉपी केली म्हणणाऱ्यांची खरी तर कीव येते. तरीही मुळात परीक्षेत कॉपी करतात असं आम्हाला वाटतंय. मग या परीक्षेत बसलेले बाकीचे बॅरिस्टर लोक, तुमचे कायदेपंडित रेस्टिकेट झाले की काय बरं.

कॉपी पकणारे स्कॉड झोपले होते की काय बरं.

जगाचा अभ्यास केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना (भिमरायांना) या देशाचा या मातीचा इतिहास माहीत नसणारेय का?

श्रीमंताला श्रीमंत गरिबांना अधिक गरिब बनवून आपण आणि जगाच्या पाठीवर कोणताच देश महासत्ता बनत नाही. आणि बनणार पण नाही.

लोकशाहीत राज्यकारभार करताना 80% समाजकारण 20% राजकारण अपेक्षेत आहे असं म्हणतात. मात्र राज्यकर्त्यांनी ही टक्केवारी आपल्या आपल्या पध्दतीने वाढवून स्व विकास करून घेतल्याचे दिसतेच आहे.

त्यांमुळे राज्यघटना प्रामाणिकपणे आणि सचोटीने लिहिणाऱ्या विश्वरत्नाने जगातील सर्वांत महान घटनेची पावित्र्य जपणाचे काम हे त्या अनुसरण, अनुकरण करणाऱ्या भारतीयांबरोबरच भारतीय लोकशाहीचे वतीने मुखत्यार केलेल्या लोकसेवकाच्या अनुशासन करणाऱ्यांचेही आहे.

थोडक्यात भारतीय राज्यघटना तोपर्यंत चांगली अगर वाईट ठरवता येणार नाही, जोपर्यंत त्यामार्फत राज्यकारभार चालवणारे नेतृत्व चांगले अगर वाईट बनत नाही.

हे पहा, कितीही मोठा वैद्य झाला तरी विशिष्ट रोगाला रामबाण म्हणजेच समुळ नष्ट करणारे औषध द्यायचे, की अजूनही रोगावर लस निघाली तरी चिकित्साच करत बसणार. बरं.

हां आजचे महाभाग सेम कंटेन्टस, सेम मेडिसिन्स वेगवेगळ्या कंपन्यांच्या कमिशन्सपोटी देऊन गोरखधंदा चालवतात तो भाग वेगळा.

पण लोककल्याणाचा, मानवी जीवणाच्या उद्धाराचा वसा घेतलेला आणि याच महान मातीतून स्वाभिमान मिळवलेला डॉक्टर माणुसकीतून कधीही समुळ नष्ट करणाऱ्या आणि पेशंटच्या खिशालाही परवडणाऱ्या औषधांचीच चिट्ठी देणार ना भौ.

कायदा हा फायद्यासाठीच असतो. अथवा कायद्यात पळवाटा भरपूर आहे, शहाण्यनं कोर्टाची पायरी चढू नये असल्या बिनबुडांच्या भ्रांमक कल्पनांच लोण येतं तरी कुठून याचंच संशोधन होणं गरजेचं आहे.

बाबासाहेबांनी कोणाच्याच अधिकारांवर गदा येणार नाही याची काळजी घेतली. विशेषतः तळागाळातल्या हजारो वर्षे अजूनही गुलामीतच जन्मले आणि गुलामीतच मेले.विकास म्हणजे काय रे भौ?आत्मनिर्भर काय रे भौ? आणि स्वाभिमान म्हणजे काय रे भौ? भारतात किती राजे झाले. आले किती गेले किती पण कोणीच नाही केली या बहुजनांची उन्नती, मागासवर्गियांची उन्नती. अस्पृश्य, दलित, आदिवासी, स्त्रीया , सोशित- पिडीतांची उन्नती.

यांना पिढयानपिढयांच्या अदृश्य बेडया तोडल्या त्या फक्त नि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच.

फक्त धार्मिक आणि जातियव्देषभावनेतून, सुडापोटी घटना लिहीली असती ना तर आज चित्र वेगळेच दिसले असते.

प्रत्येकजण ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र या चातुर्ववर्णालाच श्रेष्ट मानतो का? बाबासाहेबांच्या मते चातूवर्णाची उतरंड जणू एक मनोराच आहे. शिडी नसलेला मनोरा. हा चार मजल्यांचा मनोरा बाबासाहेबांनी ढासळला असं बरेचजण म्हणतात. खुद्द बाबासाहेबांचे अंधभक्तही ( अनुयायी नव्हे).

माझ्या वैयक्तिक मतांनुसार:-

तुम्हाला Hourglass माहिती असेलच ना ! अहो तेच हो, वाळूचे घडयाळ... !

हे पुर्वीच्या काळीचे वेळ दाखविणारे वाळूचे घडयाळ. 
या उपकरणात मोठ्या नासपतीच्या आकाराचे काचेचे दोन पोकळ गोळे असून त्यांपैकी एकात अगदी बारीक कोरडी वाळू किंवा रेती अर्धवट भरलेली असते. गोळ्यांची निमुळती टोके नळीसारखी पोकळीराखून एकमेकांस जोडलेली असतात. वाळू ऐवजी पाराही वापरता येत असला, तरी सामान्यपणे सहज उपलब्ध असणाऱ्या वाळूचाच उपयोग केला जातो. हे उपकरण एका लाकडी चौकटीत बसविलेले असते. वाळू असलेला गोळा वर करून उपकरण ठेवले म्हणजे वरच्या गोळ्यातील वाळू निमुळत्या नळीसदृश टोकाच्या पोकळीतून हळूहळू घरंगळत खालच्या गोळ्यात उतरते. वरच्या गोळ्यातील वाळू संपूर्ण संपण्यास एक तास लागत असेल, तर उपकरण तासाचा कालावधी दाखविणारे घड्याळ होते. अशी १५ सेकंदापासून ४ तासापर्यंत अवधी दाखविणारी निरनिराळी घड्याळे असतात. पोकळीची रुंदी व वाळूचे प्रमाण अशा रीतीने ठरविलेले असते की, तेवढ्या अवधीत सर्व वाळू खाली यावी. यातील मुख्य अडचण अशी की, तासाच्या घड्याळावर अर्धातास, पावतास असे तासाचे विभाग सहज मिळविता येत नाहीत आणि घड्याळ उलटून ठेवण्यासाठी माणसाची उपस्थिती आवश्यक असते.

आता जिथे जिथे यात गडद ठस्याने मी ( सुमीतने ) लिहीलेल्या वरून काही तर्क लावता येतो की नाही. कारण हीच स्थितीचं तंत्राचं आपल्या नुकतंच स्वातंत्र मिळालेल्या भारताच्या राज्यघटना निर्मितीत माझ्या मते थोडया फार फरकाने लागू पडते. कसे ते पहा.

या घडयाळातीलमोठ्या नासपतीच्या आकाराचे काचेचे दोन पोकळ गोळे म्हणजेच स्पृश्य-अस्पृश्य,गरिब-श्रीमंत, उच्च- निच, विकास -भकास🤭शिक्षित- अशिक्षित, राजा- प्रजा, सुख- दुःख, आकाश - पाताळ, सूर- असूर, स्वप्न- वास्तव, उन्नती- अवनती, धिक्कार -अधिकार, भाषण-राशन, यक्षाम-रक्षाम, पाप- पुण्य, कायदा- फायदा, म्हणजेच परस्परविरोधी दोन गट. (धन्यवाद क्वोरा लईच शब्दसंग्रह वाढवला राव😜)

म्हणतात ना एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत. मान्य आहे. पण असाध्य ते साध्य करितो जो नर| तोचि शुरवीर | बा आंबेडकर (या माझ्या वैयक्तिक ओळी आहेत. बाबांच्या आकारांच्या जाणिवेतून निघालेल्या प्रामाणिक ओळी. अंधभक्तीने नव्हे. )

आता या दोन गोळ्यांना जोडणारी पोकळ नळी म्हणजे थोडक्यात स्वराज्य संस्था समजू. नेमून दिलेले लोकसेवक समजू. आणि बारिक वाळू म्हणजे विकास, समता, समानता, न्याय, बंधुता, एकता, एकात्मता यांचे सर्वसमावेश असणारी आपली राज्यघटना.

ही लाकडी चौकट अर्थात आपली न्यायव्यवस्था. ही वाळू हळूहळू घरंगळत येणे म्हणजे थोडक्यात आपला विकास ( उपलब्ध,नीधीतून, मंत्री-संत्री,आमदार - खासदार यांचे फंडातून) करणे.

कालावधी म्हणजे सत्तेचा कार्यकाळ ( इथं तुमच्या चवीनुसार काहीही अॅड करा)

पोकळीची रुंदी व वाळूचे प्रमाण अशा रीतीने ठरविलेले असते की, तेवढ्या अवधीत सर्व वाळू खाली यावी. म्हणजेच हा रॉयल कारभार कसा खरंच लॉयल चालतो की नाही यासाठी ही प्रमाण ठरविलेले आहेत. कायदेकानून बनवलेले आहे म्हणा.

आता एवढं सगळं कांही आलबेल असताना, नेमकं घोडं अडतंय कुठं रे बाबा?

मुख्य अडचण अडचण काय आहे?

घड्याळ उलटून ठेवण्यासाठी माणसाची उपस्थिती आवश्यक असते.

पण याचाही कुटिल कौटल्य अर्थ घेऊ नये. घडयाळ उलटून ठेवणे म्हणजे सर्व सुरळीत डाव पालटणे नव्हे, उधळणे नव्हे.

तर ही घडयाळ रुपी आपली सामाजिक, शैक्षणिक, नैतिक,राजनैनिक अधिकार व कर्तृत्व यांच बरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्यांचे सत्कार्यात चांगल्या पद्धतीने, सुयोग्य वापर करणे, हे सर्वस्वी आवश्यक अशा राज्यकर्त्या सरकारवर अवलंबून आहे.

जशी दृष्टी तशी सृष्टी

बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय,

जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय।

महापुरुषांत, महामानवात चुका काढणारे स्वतःला खुपच मोठ्ठे तत्ववेते ( काय शब्द आहे रे क्वेरा भौ अशा लोकांना)

माझी तर बोटं दुखायलीत टायपून टायपून. पण महत्प्रयत्नांनी नाटाळांच्या माथी काठी मारणाऱ्यांचा वारसा मी अव्याहतपणे चालवीन. कोनाच्या नावाने बोटं मोडण्यापेक्षा त्यांना योग्य मत पटवून देता देता टायपून ( टंकून) हे बोटे झिजली तरी बेहत्तर.

जागतिकस्तरावर बहुजनांचे श्रेष्ठत्व डोळ्यात सलणारच ना?

नीच संहितेला, कायद्यालाच राजधर्म मानणाऱ्यांच्या अवलादींना भारतीय राज्यघटनेतील कॉपी दिसते. पण तकलादू, हीन, आणि यांच्यांच वर्गातले सगळ्यांशब्दांचा मारा करुनही नीच अशा मनूस्मृतीला श्रेष्टत्व का देताय.

भारतीयराज्यघटना लवचिक स्वरूपाची आहे. यातून कोणावरच अन्याय अत्याचार, व्देष रोष होण्याचा प्रश्न येतोच कुठे आणि येणार तरी कसा?

आणि बाबासाहेबांनी कॉपी केली म्हणजे नवं काय केलं हो शासन प्रशासन बाबतीतले अनुशासनास जनतेने अनुसरण करणे, अनुकरण करणे ही अपेक्षाही त्या कॉपी प्रकारातीलच की हो !

टिकटॉक, व्टिटर, फेसबुक, इंटाग्राम, युटूब वर मला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा म्हणणे तरी काय हो? इथे क्वोरावर अपवोट करा म्हणजे तरी काय कॉपीच ना ! कोण किती शहाणे आहे?हे माहित असूनही आमच्या सारखे करतातच की फॉलो, सबस्क्राइब, अपवोट, अनुकरण, अनुसरण, कॉपी म्हणजे हुबेहुब नक्कल ? मुळ रचनेची दुय्यम प्रत.

अनुसरण करणारे, अनुकरण करणारे, विद्यार्थी, अपवोट करणारे, फॉलो करणारे ते त्या विचारवंताच्या विचारांशी कांही प्रमाणात ( हे प्रमाण मुळ निर्मात्याच्या वय, अनुभव, भाषा, पाश्र्वभूमी, पुर्वग्रह, आणि सर्वात महत्वाचे धर्म आणि जात) समरस असतात, सहमत असतात.

तुज आहे तुजपाशी परि जागा चुकलाशी- मग हे शोध कार्यात आपण आपला करावा उद्धार तरावया पार भव सिंधू म्हणत अत्त:दीप भव- स्वयंप्रकाशीत होत हे विश्वची माझे घर या जागतिक संकल्पनांचे निर्मिक, सत्यशोधक, उद्वोबोधक, विचारवंत, बहुजनहिताय -बहुजन सुखाय, हे श्रींचे स्वराज्य या जाणिवेतून सर्वसमावेशक, सर्वधर्मिय सर्वगुणसंपन्नतेसाठी सर्वोतोपरी सर्वोत्तम विचारांची जुळवणी करणे म्हणजेच कॉपी काय?

परिक्षेपुरती कॉपी करायला ती राज्यघटना एका दिवसात लिहीली काय?

दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस रात्र, आपल्या प्रकृतीची तमा न करता अव्याहतपणे जगाच्या लोककल्याणार्थ , मानवजातीच्या उद्धारार्थ ज्यांनी ज्यांनी अलौकिक कार्य केले, जे जे वांछिल तो ते लावो प्राणीजात, सत्यमेव जयते, भवतू सब्बमंगलम् , एकंदरीत विश्वातल्या मानव कल्याणाच्या साऱ्या चांगल्यातल्याही चांगल्या सर्वोत्तम, सर्वज्ञ गोष्टी, संकल्पना,विचार, कायदे ज्यांतून अलौकिक लोकशाहीचाच साऱ्या जगाने आदर्श घ्यावा अशी जगातली सर्वात मोठी राज्यघटना लिहीणाऱ्याच्या अगाद बुद्धीमतेला कमी लेखणे योग्य आहे काय?

घटनाकारास तुच्छ लेखनाऱ्याचा निषेध नव्हे तर अशा अवलांदींच्या उत्पत्तीसच निरोध करायला हवे.

मी प्रथमत: आणि अंतिमतः भारतीयच म्हणणाऱ्या भारतरत्नाच्या कार्यकर्तृत्वावर अंगुलीनिर्देष करण्याचे धारिष्टयामागचा बोलवता धनी कोण हे आम्ही जाणतो आहोत. कारण आम्ही त्या जाणत्या राजाचे वारसदार आहोत.

ज्यांना मनटानेही धड शेंबुडही पुसता येत नाही. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात अक्कलेचे तारे तोडणे म्हणजे कोरोनाच्या भीतीपोटी मास्क लावण्याने आपला शेंबुड दिसत नाही. असेच म्हणल्यासारखे आहे.

🤣😂😅🤧😷😤

बोला काय म्हणता?

लेखक- सुमित रवि सरवदे.

( धन्यवाद क्वोरावरिल सर्व थोरामोठयांची कांही चुकलं असल्यास माफी मागतो. पण जातीवादीचोरांच्या मात्र हात धुऊन मागे लागतो.)

कारण.

ना वादळ- ना वारं आहे नावातंच सारं आहे.

बनलीय भिमाची लेखनी छत्रपतींची तलवार आहे.

Comments

Popular posts from this blog

क्यों असरदार होते हैं बीज मंत्र?

इतिहास लेखन पद्धति

अनुसूचित जाती व जमाती