मला नविन रेशनकार्डासाठी अर्ज करायचा आहे, पण ते वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला मागत आहेत. वडीलांचे निधन झाल्यामुळे शाळेतुन दाखला देण्यास नकार दिला आहे मला, काय करायला हवे?

पण मला एक कळत नाहीय. रेशनकार्ड काढणेसाठी शाळेचा दाखला लागतोय असं कोण म्हणालं तुम्हाला? नविन युनिट म्हणजे नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी लहान मुलांचे, अथवा पत्नीचे शाळा सोडल्याचा दाखला लागतो.

कोणत्याही सरकारी कामासाठी सरकारी कार्यालयात गेल्यानंतर रेशनकार्ड आहे का? अशी विचारणा केली जाते. काही कारणाने स्वतःचे रेशनकार्ड नसणे, रेशनकार्ड हरवणे किंवा खराब झालेले रेशनकार्ड बदलून घेण्याची प्रक्रिया किचकट असल्याचे समजले जाते, पण, योग्य कागदपत्रे योग्य ठिकाणी सादर केली तर ही प्रक्रिया अधिक सोपी होऊ शकते. सध्या रेशनकार्ड महिलांच्या नावावरच मिळते.

रेशनकार्ड विभक्त करायचंय की नविनच काढायचे आहे?

१. अर्ज कुटुंबातील ज्येष्ट स्त्री हिचा कुटुंबप्रमुख म्हणून तिच्या नावे अर्ज

२.अर्जदार कुटुंब प्रमुख स्त्रिचे २ फोटो, त्यावर अर्जदाराची सही करुन जोडावे

३.अर्जासोबत बँक जॉईंट अकाऊंट (पती व पत्नीचे नावे) काढलेबाबतचे बँक पासबुकची प्रत

४.आधार कार्डची प्रत अथवा आधार कार्ड नोंदणी केलेबाबतची पावतीची साक्षांकित छायांकित प्रत

५.नवीन शिधापत्रिका अर्जासोबत पूर्वीच्या ठिकाणचा शिधापत्रिकेतील नाव कमी केल्याबाबतचा दाखला जोडणे आवश्यक आहे, नसेलतर मूळ ठिकाणचे तहसीलदार यांचा नाव नसलेबाबतचा दाखला

६.राहत्या जागेचा पुरावा म्हणून स्वत:चे घर असल्यास विज बिल किंवा चालू वर्षाचे मिळकत कर पावती, तसेच घर भाड्याचे असल्यास घर मालकाचे संमतीपत्र व त्यांचे नावे विज बिल किंवा चालू वर्षाची मिळकत कर पावती

दुबार रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळण्यासाठी अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे :

१.रेशन कार्ड (शिधापत्रिका) हरविले असल्यास कार्ड हरविलेबाबत पोलिसांचा दाखला

२.दुकानदारांकडील रेशन कार्ड (शिधापत्रिका) चालू असल्याबाबत सही व शिक्का दाखला

३.रेशन कार्ड (शिधापत्रिका) जीर्ण झाली असल्यास मूळ कार्ड व दुकानदाराचा सही व शिक्का असणे आवश्यक आहे.

४.जीर्ण कार्डवरील अक्षर पुसट असेलतर साध्या कागदावरील स्वघोषणापत्र करणे आवश्यक आहे

५.अर्जासोबत ओळखपत्र पुरावा

रेशन कार्ड (शिधापत्रिका) मध्ये युनिट वाढ करणेसाठी अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे

१.लहान मुलांचे नाव वाढविण्यासाठी मुलांचे जन्म दाखले, शाळेतील बोनाफाईड दाखल्याची सांक्षाकित प्रत
२.पत्नीचे नाव वाढविण्यासाठी माहेरच्या कार्डातून नाव कमी केलेबाबतचा तहसीलदार किंवा परिमंडळ अधिकारी यांचा दाखला दाखल व लग्न पत्रिका किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र
३.मोठ्या व्यक्तींचे नाव वाढविण्यासाठी पूर्वीच्या कार्डातून नाव कमी केलेबाबतचा दाखला

रेशन कार्ड (शिधापत्रिका) मधील युनिट कमी करणेसाठी अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे

१.मुलीचे लग्न झाले असल्यास लग्नपत्रिका जोडून नाव कमी करण्याचा भरलेला अर्ज
२.मयत असल्यास मयत दाखला 
३.परगावी जात असल्यास मूळ कार्ड व नाव कमी करण्याचा अर्ज 
४.अर्जासोबत ओळखपत्र पुरावा.

अंत्योदय योजनेतील लोकांना सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा प्राधान्याने लाभ दिला जातो.

प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांमध्ये दारिद्र्य रेषेखालील १०० टक्के लोकांचा सहभाग असतो. तर ४४ हजार रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्या गावातील एकूण लोकसंख्येच्या ७६ टक्के लोकांना याचा लाभ मिळतो. ग्रामीण भागातील प्रमाण हे ७६ टक्के आहे तर शहरी भागातील प्रमाण ४५ टक्के आहे.

प्राधान्य गटातील रेशनकार्डधारकांना २ रुपये किलो दराने गहू देण्यात येतो. तर ३ रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. त्याबरोबरच १५ रुपये ८१ पैसे दराने रॉकेल दिले जाते. पांढरे कार्ड व दोन गॅस असलेल्या

रेशनकार्डधारकांना रॉकेल दिले जात नाही तर एक गॅस असलेल्या रेशनकार्डधारकाला उपलब्धतेनुसार रॉकेल दिले जाते.

ग्रामीण भागात ७६ टक्के लोकांना योजनेचा फायदा द्यायचा असल्याने त्याचे लाभार्थी कोण असतील हे ठरविण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. ग्रामसभा जे सांगेल त्याच व्यक्ती सरकार यादीत असतील.

रेशनकार्डचे प्रकार

  • अंत्योदय रेशनकार्ड – अंत्योदय योजनेतील लाभधारक
  • प्राधान्य गट रेशनकार्ड – वार्षिक ४४ हजारांच्या आतील उत्पन्न असलेले
  • केशरी रेशनकार्ड – १ लाखाच्या आता आणि ४४ हजारांपेक्षा अधिक
  • पांढरे रेशनकार्ड – १ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेले व्यक्ती

वडिलांचा मृत्यूचा दाखलाही जोडा बरं.

Comments

Popular posts from this blog

क्यों असरदार होते हैं बीज मंत्र?

इतिहास लेखन पद्धति

अनुसूचित जाती व जमाती