मला लहानपणांपसून चित्रकलेची आवड. चित्रकलेचे बारकावे समजत नाही त्या कलेचं शास्त्र ही फारसं ठाऊक नाही. भरपूर चित्रे रेखाटायचो पुर्वी मी . मी माझ्या चित्रकलेची सुरुवात केली ती माझे आराध्यदैवत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पासूनच, तेही इयत्ता २री३रीमध्ये.
माझी चित्रकला चांगली नाहीय. मात्र सुमारही नाहीय. पहिल्यांदाच स्वयंपाक करत असताना चपातीचा नकाशा बनावा असंच कांहीस व्हायचं पुर्वी. त्यातून सांत्वनासाठी माझे चित्राचे शिर्षक वाचून पाहणारे जणून माझ्याबरोबरच स्वतःचीही समजूत घालत आहेत की काय असंच बऱ्याचदा वाटायचं.
मी तुमच्याशी शेअर करतोय ती माझी रिकाम्या वेळेतल्या कांही आडव्या तिडव्या रेघोट्या आवडल्या की नाही सांगा हं नक्कीच.
माझ्या जुन्या डायरीत मी काढलेली चित्रे आजच सापडलेली. आणि तुमच्याशी शेअर करण्याचा मोह आवरूच शकलो नाही. अगदीच ओळखा पाहू प्रकारातले नाहीत हं माझी चित्रे आवडल्यास नक्कीच
Comments
Post a Comment