तुम्हाला कोणी सांगितलं की सनातन हिंदू धर्म फक्त भारतात आढळतो?

माफ करा, पण तुमचा अभ्यास कमी पडतोय.

फिजी, सुरिनाम, गयाना, त्रिनिदाद अँड टोबॅगो, मॉरिशस, बाली, थायलंड, नेपाळ, भूतान इथे सनातन हिंदू धर्म गेली अनेक वर्षे आहे. फक्त सुरिनाम आणि गयाना मध्ये ५५०,००० हिंदू आहेत. सुरिनामचा उपराष्ट्रपती अश्विन अधीन हा हिंदू आहे.

Credit: Aarya Dewaker Temple in Suriname.

१९ व्या शतकात आर्थर शोपेनहौजर, फ्रिड्रिच मॅक्सम्युलर सारख्या तत्ववेत्त्यांनी सनातन धर्म पाश्चात्त्य जगात नेला. त्याचा प्रभाव स्थानिक धर्मांवर पडला. पाश्चात्त्य विश्वात योगासने, प्राणायाम, शाकाहारी जीवनशैली ही तत्वे हळूहळू मुरली. परमहंस योगानंदांची योगदा सत्संग सोसायटी ख्रिश्चनिटी आणि सनातन धर्म ह्यांना एकत्र सांधायचा प्रयत्न करते. ते येशू आणि कृष्ण दोघांना मानतात.

Credit: SRF, Yogoda Satsang Society

ह्याव्यतिरिक्त इस्कॉन, चिन्मय मिशन ह्या संस्था पाश्चात्य विश्वात, खास करून अमेरिका आणि रशियामध्ये किती लोकप्रिय आहेत हे वेगळा सांगायला नको. स्टीव्ह जॉब्ज, मार्क झुकरबर्ग सारखे लोक उत्तराखंड मधील नीम करोली बाबांच्या आश्रमात दर्शनासाठी येऊन गेले होते हे तुम्ही ऐकले असेल, नसेल तर ही बातमी वाचा. Mark Zuckerberg’s temple run, courtesy Steve Jobs

अब्राहमीक धर्म जसे धर्मप्रसार (प्रोसेलटाईझ) करतात, तसा सनातन हिंदू धर्म करत नाही. त्यामुळे अर्थातच सनातन हिंदू धर्म तितक्या वेगाने पसरु शकत नाही जितक्या वेगाने इस्लाम आणि ख्रिश्चनिटी पसरतात.

परंतु, सनातन हिंदू धर्मात इतर धर्मांच्या तुलनेत येणाऱ्यांचे प्रमाण जसे कमी आहे तसेच सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण देखील कमीच आहे. प्यू रिसर्च सेंटर च्या माहितीप्रमाणे कुठल्या धर्मात धर्मपरिवर्तनामुळे २०१०-२०५० दरम्यान किती फरक पडेल ही माहिती खालीलप्रमाणे.

वरील माहितीप्रमाणे ख्रिश्चनिटी आणि बौद्ध धर्म सोडणाऱ्यांची संख्या ही इतरांच्या तुलनेत अधिक असेल. हिंदू धर्मात अंदाजे १०,००० जणांची भरच पडेल जी अगदी नगण्य आहे. इस्लाम सोडणाऱ्यांची संख्या पण भरपूर आहे, परंतु अपोस्टेसीला अनेक मुस्लिम देशांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा असल्याने बहुतेक लोक त्यांचे धर्म सोडणे अथवा धर्मपरिवर्तन जाहीर करत नाहीत.

ही माहिती एवढ्यासाठी महत्वाची आहे कारण तात्पुरत्या आकड्यानी हुरळून जाण्याची अथवा चुकीचे निष्कर्ष काढण्याची काहीच गरज नाही.

हिंदू धर्म पसरला नाही, ह्याचा अर्थ त्याचा प्रभाव कोणावर पडला नाही असा होत नाही. जगातील अनेक थोर विचारवंत, तत्ववेत्ते ह्यांना सनातन धर्माने, वेदांनी, गीतेनी भुरळ पाडली आहे. लाखो लोकांच्या आयुष्यावर योगासारख्या माध्यमांतून सनातन धर्म अनेक वर्षे प्रभाव टाकत आला आहे आणि ह्यापुढेही टाकत राहील.

Credits: Bali Wisnu Garuda Statue

Comments

Popular posts from this blog

क्यों असरदार होते हैं बीज मंत्र?

इतिहास लेखन पद्धति

अनुसूचित जाती व जमाती