कावीळ म्हणजे काय
कावीळ म्हणजे काय?
Maharashtra Times | Updated: 16 Nov 2016, 12:57:00 AM
रक्तातील बिलिरुबीनचं प्रमाण वाढलं, की डोळ्यांमध्ये पिवळेपणा येतो किंवा दिसतो, याला कावीळ असं म्हणतात. काही रुग्ण पांढरी कावीळ झाली आहे, असं सांगतात. याचा अर्थ रक्ताच्या तपासणीत बहुतांशी हिपेटायटिस 'बी' निदर्शनास आला आहे, असा होतो.
रक्तातील बिलिरुबीनचं प्रमाण वाढलं, की डोळ्यांमध्ये पिवळेपणा येतो किंवा दिसतो, याला कावीळ असं म्हणतात. काही रुग्ण पांढरी कावीळ झाली आहे, असं सांगतात. याचा अर्थ रक्ताच्या तपासणीत बहुतांशी हिपेटायटिस 'बी' निदर्शनास आला आहे, असा होतो. भारतामध्ये ०.५ टक्के लोकांमध्ये हिपेटायटिस 'बी'चं इन्फेक्शन आढळून येतं. अर्थात, यातील खूपच कमी लोकांच्या यकृतावर (लिव्हर) यामुळे परिणाम होतो. अशा रुग्णांबाबत हिपेटायटिस 'बी'च्या पुढील तपासण्या करुन त्यावर उपाय करण्याची गरज आहे किंवा नाही, हे ठरवलं जातं.
व्हिटॅमिन 'बी' १२ची कमतरता, गिल्बर्ट सिंड्रोम आणि लाळ पेशीतील काही दोषांमध्ये यकृत ठणठणीत असतानादेखील डोळ्यांत पिवळेपणा दिसून येतो.
निदान
कावीळीचं निदान करण्यासाठी लिव्हर फन्फशन टेस्ट ही प्राथमिक चाचणी केली जाते. यामध्ये काही चाचण्या असतात. वरील तीन कारणांमध्ये फक्त बिलिरुबीनचं प्रमाण वाढलेलं असतं. बाकी सर्व घटक नियमित असतात. याचं महत्त्व असं, की तीन कारणांपैकी व्हिटॅमिन १२ची कमतरता असल्यास, ते दिल्यास बरे होतात. गिल्बर्ट सिंड्रोम हा आजार नसून यामध्ये यकृतात बिलिरुबीनची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया मंदावलेली असते. हिमोलिटिक आजारांमध्ये यकृतात दोष नसून रक्तातील लाल पेशींत दोष असतो. यावरील उपाय रक्त तज्ज्ञांकडे असतो. असे बरेच रुग्ण गैरसमजामुळे पथ्य पाळतात आणि नको ती औषधे घेत असतात.
हिपेटायटिस म्हणजे काय?
व्हायरस, मद्य, औषधे, वन्य औषधे आणि इतर असंख्य कारणांमुळे यकृताच्या पेशींना अपाय होतो. अशा बाधित पेशी मरण पावतात. या मृत पेशींमधील काही घटक (एएलटी आणि एएसटी) रक्तात जाऊन त्यांचं प्रमाण वाढतं. असं झाल्यास बिलिरुबीन आणि एएलएटी, एएसटी हे सर्वच वाढलेले असतात. वर लिहिल्याप्रमाणे रुग्णास व्हिटॅमिन बी १२ची कमतरता, लाल पेशींतील दोष किंवा गिल्बर्ट सिंड्रोममुळे कावीळ असेल, तर रक्तातील एएलएटी आणि एएसटीचं प्रमाण पूर्णपणे सामान्य असतं. फक्त बिलिरुबीन वाढलेलं आढळतं.
कारणं काय?
व्हायरस हिपेटायटिसचे प्रकार
पाच प्रकारच्या विषाणूंमुळे हा हिपेटायटिस होतो. या व्हायरसना 'ए', 'बी', 'सी', 'डी', 'इ' अशी नावे आहेत. यांच्यामुळे यकृत सोडून इतर कुठल्याही अवयवावर परिणाम होत नाही, हे त्यांना हिपेटायटिस व्हायरस असे म्हणण्याचं कारण आहे. 'ए' आणि 'इ' हे आजार दूषित पाणी आणि अन्न पदार्थांतून पसरतात. 'ए' हा साधारणपणे १५ वर्षांखालील मुलांना होतो. १५-२० वर्षांवरील लोकांना 'इ' होतो. 'बी' आणि 'सी' हे दूषित रक्त किंवा ड्रग्ज घेणाऱ्यांमध्ये दिसतात. याशिवाय टॅटू करताना दूषित सुया वापरल्या गेल्यासही तो होऊ शकतो. हिपेटायटिस 'बी' हा लैंगिक क्रीयांमधूनही होऊ शकतो. मातेला तो असल्यास, नवजात शिशूलादेखील त्याची लागण होण्याची शक्यता असते. वैद्यकीय व्यावसायिक, डेंटिस्ट यांना रुग्णापासून हिपेटायटिस 'बी' होऊ शकतो.
हिपेटायटिसशिवाय काविळीची लक्षणं
यकृतामध्ये पित्त तयार होऊन एका नलिकेद्वारे आतड्यात सोडले जाते. या मार्गात अडथळा आल्यास एका प्रकारची कावीळ होते. या प्रकारच्या काविळीमुळे सुरुवातीपासून अंगाला खाज येणं, थंडीताप, पोटात दुखणं ही लक्षणं दिसून येतात. या प्रकारच्या काविळीत शस्त्रक्रिया किंवा एंडोस्कोपीद्वारे उपचार करावे लागतात.
0000
Comments
Post a Comment