हिंदू पुराणांमध्ये वर्णिलेला 'शरभ' हा प्राचीन प्राणी कोणता? त्याचे भारतीय इतिहासात काय महत्व आहे?

महाराष्ट्रातील किल्ल्यावर सर्वात मोठय़ा प्रमाणावर आढळणारं द्वारशिल्प म्हणजे शरभ. सिंह आणि व्याल यांच्यासारखे विक्राळ तोंड, चार पाय आणि लांब शेपटी असणारा काल्पनिक प्राणी म्हणजे शरभ. हा शंकराचा अवतार मानला जातो. ‘कामिकागम’, ‘उत्तरकामिकागम’, ‘श्रीतत्वनिधी’ आणि‘शरभोपनिषद’ या ग्रंथांत शरभाचे वर्णन आणि त्याची उपासना केल्याने होणारे फायदे दिलेले आहेत. शरभाच्या कथेनुसार हिरण्यकश्यपूचा वध केल्यावरही नरसिंहाचा उग्रपणा काही केल्या कमी होत नव्हता. त्यामुळे त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी भक्तांनी शंकराकडे धाव घेतली. शंकराने सिंहासारखी दोन डोकी, तीक्ष्ण नख्या, दोन पंख, आठ पाय आणि लांब शेपूट असलेल्या प्राण्याचं रूप घेतलं. त्याने नरसिंहाला ठार मारून त्याच्या मुंडक्याने आपला जटमुकुट सुशोभित केला आणि त्याचं कातडे स्वत: पांघरलं. शिवाच्या या कृत्यामुळे त्याला ‘शरभेशमूर्ती’ किंवा ‘सिंहघ्नमूर्ती’ असं संबोधण्यात येऊ लागलं. हत्ती हे अतिशय बुद्धिमान व सामर्थ्यशाली प्राणी म्हणून ओळखले जातात. याच हत्ती प्रमाणे सामर्थ्यवान व हुशार शत्रूला पराजीत करण्याची ताकद बाळगणारे राज्यकर्ते स्वतःला शरभ (अती शक्तिशाली) दर्शवत, स्वताचे व राज्याचा शक्तिचे प्रदर्शन करण्याचे शरभ शिल्प हे एक उत्तम साधन समजत असावे. म्हणुनच शरभ शिल्प गड, किल्ले, मंदिरे तसेच इतर पुरातन वास्तूंच्या दर्शनी भागावर लावले जात असावे.

या शरभशिल्पांमधे खूप विविधता आढळते. त्यावरून शरभशिल्पांचे काहि प्रकार करता येतिल ते पुढीलप्रमाणे-
*जेता शरभ- हत्ती वाघ किंवा गंडभेरुंड याना पायाखाली दाबून धरलेला शरभ.
*जित शरभ- एखाद्या गंडभेरुंडाने आपल्या पायाच्या नखांमधे किंवा चोचीमधे एक किंवा अनेक शरभांना पकडून ठेवलेले असते तेव्हा त्या शिल्पातील पराजित झालेला शरभ जो जित/पराभूत शिल्प
*केवळ शरभ- द्वारशिल्पामधे अनेक वेळा फक्त शरभ दर्शवितात जो जेता नसतो आणि जितही नसतो तो पंख नसलेला केवळ शरभ असतो.
*द्विपंखधारी केवळ शरभ- दोन पंख असलेला केवळ शरभ
*पंचगज विजयी द्विपंखधारी शरभ- दोन पंख असलेल्या शरभाने आपल्या चार पायांमधे चार व शेपटित एक असे पाच हत्ती दाबून धरलेले आहेत तो 
*चतुपंखधारी केवळ शरभ- चार पंख असलेला केवल शरभ
*गजजेता पंखधारी शरभ- शरभाच्या एका बाजुवर पंख असून त्याने आपल्या पुढच्या पायाखाली एका हतीला दाबून धरलेले आहे किंवा दाबून धरण्याच्या पवित्र्यात आहे तो
*पंचगज विजयी शरभ- पंखविहीन शरभाने आपल्या चार पायांमधे चार व शेपटिमधे एक असे एकूण पाच हत्ती दाबून धरलेले आहेत तो
*व्याघ्रजेता शरभ- शरभाने आपल्या पुढच्या पायाखाली एका वाघाला दाबून धरलेले आहे किंवा त्याला दाबण्याच्या पवित्र्यात आहे तो
*गजजेता शरभ- शरभाने आपल्या पुढच्या पायाखाली एका हत्तीला दाबून धरलेले आहे किंवा दाबण्याच्या पवित्र्यात आहे तो 
* गजसह शरभ- कोणत्याही प्रकारचा संघर्ष न करता हत्ती व शरभ यांच्या आकारमानातील फरक दर्शविणारे द्वारशिल्प असते. त्यात हत्ती शरभासमोर एका नक्षिदार चौथऱ्यावर उभा असतो.
*गजभक्षक शरभ- शरभ आपल्या जबड्यात हत्तीला पकडून त्याला गीळण्याच्या प्रयत्नात आहे .
*द्विगज तथा गंडभेरुंड विजयी शरभ- दोन हत्ती व गंडभेरुंड याना आपल्या पुढच्या पायाखाली दाबून धरणारा शरभ तो द्विगज तथा गंडभेरुंड विजयी शरभ 
*त्रिगज तथा गंडभेरुंड विजयी शरभ- तिन हत्ती व गंडभेरुंड याना आपल्या पायाखाली दाबून धरणारा शरभ
*चतुर्गज विजयी तथा विशाल गज युद्धरत पंखधारी शरभ- चार हत्तिना आपल्या चार पायात दाबून धरुन विशालकाय हत्तिसोबत झुंज देणारा शरभ


शरभ हा हिंदू पुराणांमध्ये वर्णिलेला, अंशतः सिंह व अंशतः पक्षी अशा रूपातला एक काल्पनिक प्राणी आहे. संस्कृत साहित्यातल्या वर्णनांनुसार आठ पाय असणारा हा प्राणी हत्ती व सिंह यांपेक्षा सामर्थ्यवान असून सिंहास मारू शकतो.

बौद्ध जातककथांनुसार शरभ हा बुद्धाच्या पूर्वावतारांपैकी एक आहे.तर, चार पाय , विक्राळ मुख आणि लांब शेपूट असणारा हा काल्पनिक पशु म्हणजे " शरभ " . हिंदू पुरातना नुसार शरभ हा शंकराचा अवतार. शंकराचा भक्त राक्षस हिरण्यकश्यपु याचा वध करण्यासाठी विष्णुने नरसिहांचा अवतार घेतला .पुढे हिरण्यकशपु वधानंतर नरसिहांचा क्रोद काही केल्या आवरेना , तो सर्वांना त्रास देऊ लागला मग सर्व देवदेवतांनी सृष्टीच्या निर्मात्या महादेवांचा धावा केला मग शंकरानी सिंहासारखं विक्राळ तोंड , तीक्ष्ण नख , दोन पंख , चार पाय आणी लांब शेपूट असलेल्या शरभाच रूप घेतल आणि नरसिहांचा वध केला आणि त्याची मुंडकीने आपलं मुकुट सुशोभित केल आणि कातडीने आपलं आसन म्हणून परिधान केलं . तेच हे शंकराचे शरभ अवतार .

कामिकागम’, ‘उत्तरकामिकागम’, ‘श्रीतत्वनिधी’ आणि ‘शरभोपनिषद’ या ग्रंथांत शरभाचे वर्णन आणि त्याची उपासना केल्याने होणारे फायदे दिलेले आहेत.सुप्रसिद्ध महाकवी कालिदास याने लिहलेल्या " मेघदूत" या काव्यात शरभा विषयी बरच लेखन केलं आहे .

हिंदू पुरातन मधल्या ह्याच शरभाची मुसलमान राजांनी आपलं द्वारशिल्प म्हणून वापर केला .मुस्लिम राजवटींनी या शरभ शिल्पाला सिंह ' जंगलाचा राजा ' म्हणून आपल्या किल्यांच्या द्वारावर स्थान दिलेलं असावा ..

महाराष्ट्रातील बऱ्याच किल्यांवर शरभ शिल्प कोरलेलं दिसून येत . हे शिल्प वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळत कधी एकटाच शरभ कोरलेला असतो तर कधी त्याचा मुखात गरुडभेद , हत्ती असं दिसून येतात .आपलं सामर्थ्य दाखवण्यासाठी त्याकाळच्या राजवटींनी याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केलेला दिसून येतो .

शिवनेरी किल्ला कित्येक वर्ष निजामशाही ,मुघल यांच्या राजवटी खाली असलेल्या शिवनेरीच्या पाचही द्वारांवर शरभ शिल्प दिसून येत. किल्ले जंजिऱ्यावर चार पायामध्ये एक तोंडात आणि एक आपल्या शेपटीत हत्ती पकडलेला शरभाच शिल्प भिंतीवर कोरलेलं आहे .याचा अर्थ हत्ती प्रमाणे बळकट असणाऱ्या शत्रूला आम्ही मात देऊ शकतो असा होतो

१५६५ च्या तालिकोटच्या लढाई नंतर मुसलमान राजवटींनी अनेक छोटीराज्य जिंकून घेतली याचंच प्रतीक म्हणून पायामध्ये हत्ती दाखवण्याची हि प्रथा पडली असावी ...असा उल्लेख इतिहासात आहे .

रायगड,,सिह्गड,सुतोंडा,पेठ, अवचितगड , राजगड इत्यादि अनेख किल्यांवर शरभ शिल्प वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळत. वेताळवाडी किल्यावर दोन बाजूनं दोन शरभ असून एकाच धडाला दोन तोंड असलेलं शरभाच दुर्मिळ शिल्प आहे .

रायगडावर एक दोन न्हवे तर तब्बल सात शरभ शिल्प पहावयास मिळतात. रायगडाच्या अतिभव्य महाद्वारात उभे राहिले असता आपल्या उजव्या व डाव्या दोन्हीही अंगाला दोन शरभ शिल्प सुस्थितीत पहावयास मिळतात.

गडांवरची हि शिल्प म्हणजे अभ्यास करण्याचा स्वतंत्र विषय .याच शिल्पांचा आधार घेऊन आपण इतिहासाची बरीच पाने उलगडू शकतो .किल्यानं भेट देतांना अशाच ऐतिहासिक वस्तुंना आपण कुठे इजा पोचवणारा नाही याची जरूर काळजी घ्या.

संदर्भ : विकिपीडिया आणि लोकसत्ता.कॉम.

हिंदू पुराणांमध्ये वर्णिलेला 'शरभ' हा अंशतः सिंह व अंशतः पक्षी अशा रूपातला एक काल्पनिक प्राणी आहे. संस्कृत साहित्यातल्या वर्णनांनुसार आठ पाय असणारा हा प्राणी हत्ती व सिंह यांपेक्षा सामर्थ्यवान असून सिंहास मारू शकतो.

इतिहासात 'शरभ' हा प्राणी विजयाचं प्रतीक म्हणून ओळखला जायचा. 'तू हत्ती तर मी सिंह(शरभ)' या अर्थी सत्ताधीश विजायचं स्मरण करायचे. जेवढ्या सत्त्यांशी सामना केलेला असतो तेवढे हत्ती शरभाने पायाखाली पकडलेले दिसतात.

हा महाराष्ट्रामधल्या किल्ले शिवनेरी वरील शरभ.

शरभाची शिल्पे महाराष्ट्रात शिवनेरी, रायगड, सिंहगड, कुडाळ इत्यादी ठिकाणी शरभाची शिल्पे आपल्याला पहावयास मिळतील.

धन्यवाद।

फारच सुरेख माहिती. मुद्दाम वेगळे उत्तर न लिहिता तुमच्याच उत्तरात थोडी भर टाकतो.

शरभाचा एक डोळा लाल-पिवळा आणि एक डोळा निळा दाखवण्यात येतो ज्याचा अर्थ एक डोळा सूर्य आणि दुसरा डोळा चंद्र आहे असे मानले जाते. शाक्त संप्रदायातील तांत्रिक वाममार्गात शरभ देवतेची उपासना केली जाते. बहुतांशी जारण-मारण, स्थंभन, उच्चाटन यासारख्या अधोर कर्मांसाठी या मंत्रांचा वापर केला जातो. हा मार्ग बहुतांशी गुप्त असल्यामुळे याची फारशी चर्चा कुठे केलेली दिसत नाही.

अच्छा… असं आहे तर.. Illuminati सारखंच आहे म्हणजे हे..

मला माहित नव्हतं.. धन्यवाद :)

Tantra shashtrat tyacha pudcha varnan ahe. Sarabh ani Gandbherund yancha yudh sampat nhawta tar devi ni ugr Pratyangira rup ghewun doghancha gras kela. File:Pratyangira 2014-02-25 09-47.JPG - Wikipedia

" खुप नाविन्यपूर्ण माहीती👌


हा प्राणी पण त्याच प्रकारचा आहे का

होय. शरभ च हा.. ज्या कोणी हे शिल्प कोरलं असेल त्याने ५ शाह्या जिंकल्या असतील म्हणून ५ हत्ती आहेत बघा

अणि हा

sharabh ha mahadevacha swarup aahe ani kaahi thikaani tyancha ha avtaar narsimha avataarachi ugrate nash karnyasaathi hoti

Narayanane devi cha adhar ghewun na4rasimha searupt harinyakapisu ya aduracha vadh kela. Pan to prachand ugr swarup thanchyakadun soswat nhawta. Tenhwa sankara ne sarabha cha swarup ghetla ani narashimha la shant karnyachs prayatna kela pan te kahi shant Hoye na . Tyancha bhayankar yudh Jhala. Tya yudhat Gandaberunda ha rup ghetla to don mulhancha garuda cha swarup hota . Sarabh swarupa cha doka garuda cha ahe, deh simha cha and shepti naga chi. File:Munneswaram Sharabha.jpg - Wikipedia


Comments

Popular posts from this blog

क्यों असरदार होते हैं बीज मंत्र?

इतिहास लेखन पद्धति

अनुसूचित जाती व जमाती