माझी बायको कार्यालयात जाताना साडी बेंबीच्या खाली नेसून जाते, पण मला तिचं बेंबी दाखवणं नाही आवडत, तिला कसा समजवू?

माझी बायको कार्यालयात जाताना साडी बेंबीच्या खाली नेसून जाते, पण मला तिचं बेंबी दाखवणं नाही आवडत, तिला कसा समजवू?

प्रथमतः असा विचार करणं म्हणजे स्त्रीयांविषयी तुमच्याकडे किती आत्मियता आणि आदर आहे असं समजतं? आणि हा व्यक्तिगत प्रश्न सार्वजनिक केल्याने तुमचे तुमच्या पत्नी बद्दल काय आणि कसे विचार आहेत हे दिसून येते. खरंतर या प्रकारचे प्रश्न येतातच कसे आणि सुचतातच कसे असं मी म्हणत तुमच्या प्रश्नाचं उत्तर न देता स्वाईप करू शकत होतो.

जगात एकसारखी दिसणारी सात माणसे असतात असं म्हटलं जातं. तर एकसारखी विचारांची नक्कीच लाखो करोडो असतील. अशा लाखो करोडोंमध्ये तुम्ही असा विचार करतात. ज्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साऱ्यांनीच फॉलो केलेलं असू शकतं.

शंका आणि शिंका या नैसर्गिक येण्याला कोणीच रोखू शकत नाही. पण कांही ना खाजून अवदानं आणायची भारी खोड असते.तपकीर ओढू ओढू डोकं हलकं करण्यात अघोरी आवड असणाऱ्यांपासून मी सहसा लांबच असतो. साऱ्यांनाच साऱ्या गोष्टी पचत नसतात रुचत नसतात. आणि रुचल्या तरी मनापर्यंत पोहचत नसतात.

असो मुद्दयाचं बोलू तुमचा प्रश्न : -

बायको कार्यालयात जाताना साडी बेंबीच्या खाली नेसून जाते, पण तिचं बेंबी दाखवणं नाही आवडत, तिला कसा समजवू?

यावर मी तुम्हाला एक सल्ला देतो.१०० % गुणाकारी. तुमच्या प्रश्नातून मी कांही निष्कर्ष काढले.

बायको कार्यालयात जाते

  • म्हणजे त्या सुशिक्षीत आहेत !
  • तुमच्यापेक्षा उच्च विचारांच्या आहेत.
  • संकुचित वृत्तीच्या नाहीत
  • रिकामटेकडया नवऱ्यापेक्षा काम केलेलं बरं म्हणणाऱ्या स्वयंसिद्धा आहेत

साडी बेंबीच्या खाली नेसतात.

  • चौकशी करा कदाचित कार्यालयाचा ड्रेसकोड बुरखा आहे काय?
  • तुम्हाला बुरखा घातला तरी प्रॉब्लेम
  • ड्रेस घातला तरी प्रॉब्लेम
  • साडी घातली तरी प्रॉब्लेम.
  • तुमच्यासारख्याच विचारांचे तुम्ही या प्रश्नाव्दारे प्रतिनिधीत्व करता आहात म्हणून विचारतो.
  • साडी नेसण्याचे, नेसविण्याचे तंत्रशुद्ध शास्त्रशुद्ध जगाच्या पाठीवर जिथे कुठे प्रशिक्षण वर्ग असेल पटकन त्यांना प्रवेश घ्यायला सांगा.
  • अथवा स्वतः साडी घालून त्यांना ती कशी नेसावी हे शिकवा.

तिचं बेंबी दाखवणं आवडत नाही?

  • बेंबी तुम्हाला पाहायला आवडत नाही का?
  • आणि बेंबीत एवढं काय आहे? असं म्हणतात ( म्हणतात म्हणलंय मी स्वतः नाही पाहिलं) विष्णूंच्या बेंबीमधून कमळ आले ज्यातून ब्रम्ह जन्मले .
  • दोन जीव ( आई आणि भ्रूण) यांना जोडणारी नाळ याच बेंबीतून निर्माण होते. भ्रुणाचे अर्भकाचे पोषण याच नाळेव्दारे केले जाते.
  • तुमच्या बायकोवर तुमचे प्रेम ऊतु जाते तेंव्हा बऱ्याचदा तुम्ही बेबी म्हटला असालच. मग त्याच बेबीची बेंबी का बरं आवडत नाही.

शेवटी तुम्ही म्हणता तिला कसे समजावू?

  • यावरून एक तर तिच्यावर प्रेम असल्याने तिला दुखवू वाटत नसावं. असा अर्थ घेतला तर प्रेमात समर्पण नावाची एक चिज आहे. ते तुम्ही करावं?
  • तिला कसं समजावू या रोखातून तुमच्या मताला बायकोकडून प्रतिसाद मिळत नाही. किंवा किंमतच नाही. हे समजते.
  • रिकाम्या विहीरीत चोर बोंबलला अशी आमच्या खेडयात म्हण आहे. ज्याला अजून एक समानानार्थी तुम्हाला समजेल अशी म्हण म्हणजे रोजचंच मढं त्याला कोण रडं असं म्हणतात?
  • रिकामं मन पापाचं आगार वाटण्या जोगं तुम्ही विकलांग आहात काय?शारीरिक विकलांग व्यक्ती मनोधैर्याने माऊंट एव्हरेस्ट चढू शकते . मनोविकलांगावर इलाज नाही.
  • मनोविकलांगातून शंका, संशय बळावतो, परिणामी दुष्कृत्य घडण्याची शक्यता नाकारता नक्कीच येत नाही. याची परिनिती येरवडा मनोरुग्णालय, अथवा येरवडा काराग्रह हीच असू शकते.
  • कामधंदा करा कांहीतरी बायकोच्या जीवावर खालल्यानं तिचा स्वाभिमान दुखत असेल कदाचित तुमची जिरविण्यासाठी ती असं वागत असेल.

शेवटी एवढेच सांगू इच्छितो, बायकोने काम करावे असं वाटणं ही कुणाची तुमची की तिची इच्छा आहे. तिनं काम करणं गरजेचंच आहे काय? जरी तिची आवड इच्छा असेल तर तुम्हाला एवढा प्रश्न सुचायला वेळ नक्कीच आहे. मग तुम्ही होपलेसमुळेच जॉबेलेस आहात तर...

  • तुम्ही जॉब करत असता तर रिकाम्या बातां मारायला वेळच मिळाला नसता?
  • पत्नी कार्यालयात काम करते गावंढळ नक्कीच नाहीय.
  • कार्यालयात चापून चोपून गोवऱ्या थापायचं काम करतेय का ती?

🤫 बायकां बेंबी खाली साडी घालतात? 🤪 का ? 🤔 ( माझ्यामते)

  • सुरक्षित, सुटसुटीत, मोकळं मोकळं वाटण्यासाठी
  • दडपण येत नाही.
  • अवघडल्यासारखं वाटत नाही.
  • चपळता हा गुण सर्रास शारीरिकेतेशीच निगडीत असतो. आपण स्लिम म्हणजेच चपळ हा नियम बनविल्याने स्लिम असल्याचे दर्शविण्यासाठी.
  • जिसका बढ़ा पेट वोही है सेठ हे विधान स्त्रियांना लागू पडत नाही.
  • वजनदार स्त्रियांना कार्यालयाचे दार बंद असते. असा समज करून घेतल्याने.
  • आपले सुखवैभव फक्त शरीरावरुनच दिसत नसते. मनही तेवढंच मोठ्ठं असावं लागतं.
  • कदाचित जाडूबाईपेक्षा गोडूबाईचंच कौतुक केले जाते याचा तुमच्या बायकोला तुमच्यापेक्षा जास्त प्रत्यय आलेला असू शकतो.
  • साडी ही बाई स्लिम असेल तर कंबरेच्या (हाडाच्या) साह्याने फिट्ट बसते.
  • पोटाचा नगारा दाखवण्यापेक्षा पोट झाकावं म्हणून साडी पोट भर नाही तर ओटीवर नेसली जाते. याच ओटीत तुम्हीही होतात बरं.
  • तुम्ही बेल्ट कसा घालता. कमरेच्या वरी की खाली. अर्थात आपण कमरेचा बेल्ट पट्टा म्हणतो. आणि तो कमरेला घातला जातो. आता स्त्रीयांनी बेल्ट घालणं म्हणजे धोतरावर ईनशर्ट करण्यासारखं ना?
  • मुळात कंबर म्हणजे काय कळते का, बेंबीच्या चार इंच खाली कंबर असते. बेंबीच्या वितभर खाली जननेंद्रिये असतात.
  • साडी हा स्त्रियांचा व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. आणि जगात कोणी कोणाच्या स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही.
  • आणि कमेरेचं काढून डोक्याला गुंडाळायला त्या वेडया आहेत काय? त्यांना तुमच्यासारखा शहाण्या नवऱ्यालाही सांभाळायचं आहेच की.स्त्रीयांना एवढी समज आहे.

हवं तर तिची पगार चेक करा ( अर्थात तुम्हाला तो नक्कीच अधिकार नसेलच असं वाटतंय) सॅलरी स्लिप चेक करा कदाचित बेंबी बोनस तर मिळत नाहीय याची खात्री करा.

स्वतःच तुमचं आणि तुमच्या परिवाराचं उदर भरणाऱ्या माऊलीला पदर पसरायची वेळ आणू देऊ नका म्हणजे मिळवलं.

-आशा करितो प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल कांही शंका असतील तर कमेंट करा. नक्की निरसन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन.

धन्य ती सबला... जी सांभाळतेय 'हयो' दादला.🤦🤦🤦

✍️ सुमित रवि सरवदे.

Comments

Popular posts from this blog

क्यों असरदार होते हैं बीज मंत्र?

इतिहास लेखन पद्धति

अनुसूचित जाती व जमाती