पांढरी
सर्वसखा विठ्ठल!
Gajanan Zilu Sawant | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 28 Jun 2020, 04:00:00 AM
शेकडो वर्षं उलटली, तरी पंढरपूरच्या विठोबाची मराठी मनाला पडलेली भूल कमी व्हायला तयार नाही; कारण विठोबा महाराष्ट्राच्या मातीत अगदी विरघळून गेला आहे. साध्या नाम संकीर्तनाने भक्तांच्या हृदयात विठोबा विसावला आहे...
खरेतर श्रीविठ्ठलाच्या शोधार्थ जायचेच असेल, तर
पंढरपूरला स्थलमाहात्म्यांतही पौंड्रिक क्षेत्र म्हटले गेलेले आहे.
स्थलपुराणात पंढरपूरचा निर्देश पौन्ड्रिक क्षेत्र म्हणून येतो.
विश्वामित्रांच्या १०० मुलांपैकी मधुच्छंदापेक्षा लहान पौंड्र, औंड्र, शबर, मुतीब इत्यादी ५० मुलांनी विश्वामित्राने दिलेल्या शापामुळे दक्षिणेत येऊन राज्ये वसवली, असे ही ऐतरेय ब्राह्मणातील मिथककथा सांगते.
दक्षिणेतील तिरुवारुर, चिदंबरम या शहरांची पर्यायनामे पुंड्रपूर अशी आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या शहरांत विठ्ठल मंदिरेही आहेत. बंगालमधील पौंड्रांनी तेथील पुंड्रपूर नावाच्या शहरातूनच राज्यकारभार चालवला होता, असे ह्यु-एन-त्संगने नोंदवून ठेवले आहे. महास्थानगढ येथे या नगराचे आता अवशेषही सापडले आहेत. महाभारतात विदर्भाबरोबरच पांडुराष्ट्राचाही उल्लेख आहे. हे पांडुराष्ट्र पौंड्रांशी निगडित असण्याची शक्यता आहे. अन्यथा हे नाव प्रदेशनाम म्हणून दक्षिणेत येण्याची शक्यता नाही. पौंड्र समाजाने महाराष्ट्रातही वसाहती केल्या, हे यावरून सिद्ध होते. हा काळ नेमका कोणता याचा आज अंदाज करता येणे शक्य नसले, तरी किमान इसवीसन पूर्व एक हजार एवढा तरी असावा, हे या समाजांच्या प्राचीनतेवरून दिसते. म्हणजे महाराष्ट्रातील पंढरपूर (मूळ पंडरपूर, सं. पौंड्रपूर वा पुंड्रपूर) ही प्राचीन काळातील पौंड्रांची म्हणजेच मूळच्या पंडर समाजाची राजधानी होती व या समाजाचे वास्तव्य या भूभागात असल्याने ते पंडरक्षेत्र (पौंड्रिक क्षेत्र) म्हटले गेले असावे, हे आता सहज लक्षात येईल. पौंड्रांच्या स्वामित्वाखालील प्रदेश ते पौंड्रिकक्षेत्र आणि ही पुरातन आठवण स्थलमाहात्म्यांनी स्पष्टपणे जपलेली आहे. मूळ प्राकृत शब्दांचे संस्कृतकरण करण्याच्या नंतरच्या काळातील प्रवृत्तीमुळे आपल्या इतिहासाबाबत अनेक विक्षेप निर्माण झालेले आहेत, हेही येथे लक्षात घ्यावे लागते. श्रीविठ्ठलाची विशेष उपाधी आहे-पांडुरंग. तिचाही अर्थ आता सहज उलगडतो. पांडुरंग हे नाव मुळात विठ्ठलाची शिव-निदर्शक उपाधी आहे, असाच समज जोपासला गेला असला, तरी ते तसे नसून ते त्याचे कुळनाम आहे, हे आता स्पष्ट आहे. पंडरंगे या कानडी उपाधीत मूळ स्वरूप जपले गेले आहे. महाभारतात पौंड्रवंशीय वासुदेव म्हणून राजा होता. तो ‘पौंड्रक वासुदेव’ या नावाने ओळखला जात होता. म्हणजे पौंड्रवंशीय राजे स्वत:ला ‘पौंड्रंक’ (पंडरंग) अशी उपाधी लावत होते, हे यावरून स्पष्ट होते. ते मराठीत कालौघात पांडुरंग झाले असणार, असा प्रबळ तर्क बांधता येतो.
Comments
Post a Comment