पीतांबर

रेशमापासुन तयार केलेले पिवळ्या रंगाचे वस्त्र.

श्वेतांबर


जैन धर्माला मानणारे प्रामुख्याने दोन पंथ आहेत – दिगंबरआणि श्वेतांबर. मूळ धर्म हा दिगंबर जैन धर्मच आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात श्वेतांबर पंथ उदयाला आला. सर्व तीर्थंकर दिगंबर दीक्षा धारण केले आहेत. त्यांचे मुनी हे अरिहंत बनून दिगंबरवृत्तीने धर्मोपदेश देतात. दिगंबर जैन परंपरेत मुनी पूर्णतः दिगंबर असतात, आणि साध्वी पूर्ण श्वेत सुती साडी परिधान करतात. सर्व श्वेतांबर पंथाचे मुनी शुभ्र वस्त्रे धारण करतात. श्वेतांबर पंथात तीन उपपंथ आहेत - मूर्तिपूजक, स्थानकवासी, आणि तेरापंथी स्थानकवासी. मूर्तिपूजक मूर्तीची पूजा करतात; स्थानकवासी व तेरापंथी श्वेतांबर मूर्तिपूजा करीत नाहीत. सर्वच जैन पंथीयांचा हिंसेला विरोध असल्याने ते संपूर्ण शाकाहारी असतात.

Comments

Popular posts from this blog

क्यों असरदार होते हैं बीज मंत्र?

इतिहास लेखन पद्धति

अनुसूचित जाती व जमाती