छत्रपती शिवाजी महाराज आणि वैश्य वाणी समाज
छत्रपती शिवाजी महाराज आणि वैश्य वाणी समाज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी स्वराज्यात म्हणजे शिवशाहीत जीवनोपयोगी वस्तू व इतर साहित्याचा वापर वैश्य समाजातील व्यापारी करीत या व्यापाऱ्यांनी तत्कालीन राज्यव्यवस्थेला (चौथाई) देऊन राज्याचे उत्पन्न वाढवले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा व्यापार व्यवसायाला उत्तेजन देण्याचे धोरण होते लोक कल्याणाच्या दृष्टीने आवश्यक होती तेवढी स्वराज्याच्या वृद्धीसाठी आवश्यक होती. स्वराज्य व्यवहारात व्यापाराचे असलेले हे महत्व लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या आज्ञा पत्रातील धोरण हे व्यापारास उत्तेजन आणि प्रोत्साहन देणारे असे होते व्यापाराला उत्तेजन देण्यासाठी छत्रपतींनी बाजारपेठा उभारल्या.

त्याकाळात आपल्या देशात इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, आफ्रिकन हबशी व्यापार करण्यासाठी येत असत या व्यापार यांसारखा व्यापार करण्यासाठी आपल्या स्वराज्यातील व्यापाऱ्यांनी परदेशात जाऊन व्यापार करावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिले मालवणला मोठी बाजारपेठ उभारली जहाज बांधण्याची उभारली मालवाहू जहाज बांधणी असलेल्या पोर्तुगीज सुतारांकडून वीस मालवाहू जहाजे बांधून घेतली. समुद्र मार्गाने प्रवास आणि व्यापार करण्यास हिंदू धर्मातील मनुस्मृती या ग्रंथाने घातलेली बंदी उठवली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी दुबईच्या इमामाबरोबर व्यापारी करार केला. औरंगजेबाचे आरमार गुजरातच्या समुद्रात उभे होते मोगलांच्या आरमाराकडून आपल्या व्यापाऱ्यांना उपद्रव होऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब राजकारण करून व्यापारी करार केला आणि मस्कत आणि अरब राष्ट्रांशी थेट व्यापार चालू केला शिवकाळात मसाल्याचे पदार्थ, तांदूळ, नारळ, सुपाऱ्या इत्यादी माल घेऊन वैश्य वाणी व्यापारी मस्कत, इराण, अरबस्तानापर्यंत व्यापार करण्यासाठी जात होते हा खरा इतिहास आहे.
शिवाजी महाराजांचे आरमार समुद्रावर स्वैर संचार करीत होते एवढेच नव्हे तर शिवाजी महाराजांची गलबते मस्कतपर्यंत जात होती संदर्भ अद्वितीय छत्रपती श्री संभाजी महाराज खंड चौथा असा उल्लेख इतिहासात आढळतो सोळाव्या शतकात इसवी सन १६६५ समाजातील व्यापाऱ्यांनी इसवीसनाच्या साडेतीनशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या मनुस्मृतीने समुद्र मार्गाने प्रवास आणि व्यापार करण्यास घातलेली बंदी मोडली आणि समुद्र मार्गाने प्रवास करून परदेशात जाऊन वापर करून एक नवा इतिहास घडवला होता.
भारताच्या इतिहासातील ही एक क्रांतिकारक घटना होती अर्थात हा इतिहास ही क्रांती घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज या द्रष्ट्या युगपुरुषाने वैश्य व्यापाऱ्यांना प्रेरणा व स्फूर्ती दिली होती.
ऑक्टोबर १६६९ मध्ये पोर्तुगीजांनी काही गलबते शिवाजी महाराजांनी राजापूरच्या बंद करून ठेवली होती त्यानंतर पोर्तुगीजांनी एडनवरून माल घेऊन आलेले शिवाजी महाराजांचे एक गलबत पकडून मुंबई बंदरात आणले. मालाने भरलेली आपल्या व्यापाऱ्यांची गलबते पकडत असल्याचे लक्षात येताच शिवाजी महाराजांनी एक शक्कल लढवली त्यांनी आपली मालवाहू गलबते भरण्यासाठी इंग्रजांच्या ताब्यात दिली त्याचबरोबर गलबतांचे आणि त्यांच्यापासून रक्षण व्हावे म्हणून प्रत्येक दोन-तीन इंग्रज ठेवावे अशी मागणी त्यांनी मुंबईकर इंग्रजाकडे केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मागणीने इंग्रज हुरळून गेले इंग्रज शिवाजी महाराजांबरोबर चांगले संबंध करण्याकरिता उत्सुक होते त्यांनी शिवाजी महाराजांची ही मागणी ताबडतोब मान्य केली.
शेतकरी आपल्या शेतावरील उभ्या पिकांवर पक्षांचे थवे आक्रमण करू नयेत म्हणून जसे बुजगावणे उभे करतो तसे शिवाजी महाराजांनी आपल्या मालवाहू गलबतांवर इंग्रजांना बुजगावण्या सारखे उभे केले इंग्रजांची मैत्री होती त्यामुळे शिवाजी महाराजांच्या मालवाहू गलबतांवर उभ्या असलेल्या इंग्रजांना पाहून फोटो कसे वाटले इंग्रजी आहेत त्यांनी शिवाजी महाराजांची सोडून दिले शिवाजी महाराजांनी लढवलेली शक्कल कमालीचे यशस्वी झाली.मनुस्मृती या धार्मिक ग्रंथ आणि समुद्र पवसाला घातलेली बंदी मोडण्यासाठी छत्रपती
शिवाजी महाराज स्वत: इसवी सन १६६५ मालवण बंदरातून समुद्रमार्गाने जहाजातून सहा दिवसांचा प्रवास करून कर्नाटकातील बसरुर गेले आपल्या सैन्यासह त्यांनी बसरुर या शहरावर पहाटे हल्ला केला आणि बसरुर त्यांनी जिंकले. छत्रपतीच्या नेतृत्वाखाली ही पहिली लढाई कल्पनेबाहेर यशस्वी झाली आणि छत्रपतीच्या मराठी आरमाराची इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच सत्ताधीशांवर दहशत बसली. छत्रपती शिवाजी महाराज झाले होते समुद्रातील भारताच्या सागरी व्यापाराचे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने जनक होते.
संदर्भ :- (अद्वितीय छत्रपती श्री संभाजी महाराज, खंड ४ था, लेखक -: अॅड. अनंत दारवटकर)

सुधाकार लाड - पत्रकार, इतिहास अभ्यासक आणि लेखक
Tags: Chatrapati Shivaji Maharajshivaji maharajvaishya wani samaj
Comments
Post a Comment