म्यानमार देशाचे नाव ब्रह्मदेश असे होते का? याचा ब्रह्मदेवाशी काही संबंध आहे का?
हो संबंध आहे (आणि नाही पण!). ब्रम्हदेश नावाच्या उगमाबद्दल इतिहासकारांमध्ये भिन्न भिन्न मतप्रवाह दिसून येतात. भारतामध्ये म्यानमार ह्या देशाला ब्रम्हदेश म्हणून ओळखले जाते. अन्यत्र ह्या देशाला बर्मा म्हणून ओळखले जायचे (अजून पण काही देशांत हेच नाव प्रचलित आहे).
- ब्रम्हदेश नावाचा एक अर्थ असा निघतो की ब्राम्हणांचा प्रदेश (लँड ऑफ ब्राम्हण)
- दुसरा अर्थ असा पण निघतो की ब्रम्हदेवाचा प्रदेश (लँड ऑफ ब्रम्हा)
अनेक भारतीय इतिहासकार जसे की निहार रंजन रे, कालिदास नाग, इ. ह्या मताचे आहेत की ब्रम्हदेश ह्या नावाचा संस्कृत भाषेशी संबंध आहे. रे ह्यांनी त्यांच्या 'ब्राह्मणीकल गॉड्स इन बर्मा' ह्या पुस्तकामध्ये असे नमुद केले आहे की ब्रम्हदेशातील अनेक जागांची नावे ही संस्कृत मधून घेतलेली आहेत. तसेच स्थानिक मोन लोकांच्या शिलालेखांत ब्रम्हदेशातील ब्राम्हण आणि ब्राम्हण संस्कृतीबद्दल उल्लेख केलेला आढळतो असे पण त्यांचे म्हणणे आहे.
तसेच महाभारतामध्ये पण आपल्याला बर्माक आणि शर्माक ह्या दोन देशांच्या नावाचा संदर्भ आढळतो. ही दोन्ही नावे म्हणजे ब्रम्हदेश आणि श्यामदेश (आताचा थायलंड) ह्यांची जुनी नावे असावीत असा समज आहे. जेव्हा भीम पूर्वेकडील राज्ये काबीज करण्याच्या मोहिमेवर निघालेला तेव्हा त्याने हे दोन्ही प्रदेश काबीज केलेले.
फोटो स्रोत - गूगल
असे जरी असले तरी ह्या देशाचा जुना इतिहास सापडत नाही. साधारणतः १२ व्या शतकापासूनचा इतिहास उपलब्ध आहे.
म्यानमारमधील बहुतेक इतिहासकार हे ब्रम्हदेश नाव आणि संस्कृत ह्यांचे कनेक्शन असल्याचे मान्य करतात.
ह्या देशाला सुवर्णभूमी म्हणून पण ओळखले जायचे.
मे १९८९ मध्ये ह्या देशातील लष्करी अधिपत्याखाली असणाऱ्या सरकारने प्रचलित असलेले बर्मा हे नाव बदलून म्यानमार असे केले. तसेच अनेक शहरांची नावे पण बदलली जसे की रंगूनचे नवीन नाव यांगून करण्यात आले.
तळटीपा
Comments
Post a Comment