वाल्मिकी रामायणातील रामाने बालीची लपून केलेली हत्या, शूद्र शंबूकाचा केलेला शिरच्छेद, सीतेचे केलेले अग्निदिव्य आणि न सांगता सीतेला जंगलात नेऊन सोडणे हे तुम्हाला पटते का?
१. ह्यामुळेच तर रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात.
२. हे सर्व नियतीने त्याच्याकडून करवून घेतले.
३. त्याने स्वतः आपण होऊन कांहीच केले नाही.
४. त्यामुळेच राम पूजनीय आहे.
५. रामाच्या नावाने काय वाया गेले, पाषाण तरंगले समुद्रात.
६. आपल्या देशात एकच कायदा आहे आणि तो म्हणजे ' बळी तो कान पिळी '. ह्याचा अर्थ असा कि जो समर्थ आहे त्याला सर्वच माफ असते.
७. गोस्वामी तुलसीदास पण म्हणतो ' समरथ को दोष न होय गोसाईं '. राम म्हणो कि अजून कुणी म्हणो ज्याच्या हाती दंडुका असतो त्याचे म्हणणे ऐकून घ्यायचे असते. त्याची चिकित्सा करायची नसते.
८. रामायण हि एक उत्तम साहित्यिक कृती आहे. आपण कथानकाचा आस्वाद घ्यावा. मात्र त्यातील घटनांना सत्य मानून त्याची चिकित्सा करीत बसलो तर हाती कांहीच पडणार नाही.
९. परदेशात पण बऱ्याच साहित्यीक कृत्या आहेत पण त्यांच्या सत्यतेचि कुणीच फडताळ करीत नाही कारण ते त्यांना साहित्य म्हणून ग्रहण करतात.
१०. आजकाल रोज बातम्या येतात राम जन्मभूमीबद्दल. आता न्यायालय त्याची सत्यता सिद्ध करेल. आपण ते मान्य करायचे.
Comments
Post a Comment