Skip to main content
सन्त क्रुपा झाली इमारत फळा आली
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया
नामा तयाचा किन्कर तेणे विस्तरिले आवार
जनी जनार्दन एकनाथ स्तम्भ दिला भागवत
तुका झालासे कळस भजन करा सावकाश
बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा.


या अभन्गाच्या कर्त्या संत बहिणाबाई यान्चे चरित्र तसे अज्ञातच!

 स्त्री सन्त मालिकेतील अग्रेसर मुक्ताई, कान्होपात्रा, जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, मिराबाई यान्चेसह बहिणाबाईन्चे स्थान मानावे लागेल.

गोदावरीच्या उत्तरेस घ्रुश्णेश्वराच्या पश्चिमेस बारापाड्याचे जवळ 'शेऊर' या गावी या साध्वीचा जन्म झाला. त्याच गावातील पाठक कुटुम्बात त्यान्चा विवाह झाला. घरची गरीबी, शि़क्शणाचा अभाव, तरीही समाधानी वॄत्ती. सन्तव्रुत्तीला साजेशी पाण्डुरन्गाची ओढ मनात होतीच.
अखन्ड नामस्मरण चालू असे. शेतात काम करित असतानाही हा भक्तिभाव अभन्गान्चे रूपाने त्यान्च्या मुखातून बाहेर पडे.
पूर्वीच्या जन्मात त्यान्चे हातून उच्च कोटीची साधना घडली असली पाहीजे. म्हणूनच या जन्मी कोणाचाही ताद्रूश उपदेश लाभलेला नसतानाही त्या श्रेश्ट भक्त झाल्या.

त्यान्चे वर्णन करताना (गेल्या शतकातील एक श्रेश्ट सन्त, सन्तचरित्रकार आणि 'श्री गजानन विजय'कर्ते) सन्तकवी दासगणू महाराज लिहितात ..
पहा केवढा अधिकार .. रुणि तिचा परमेश्वर ...

असे सान्गतात की त्याना त्यान्च्या पूर्वीच्या तेरा जन्मान्चे स्मरण होते. या साध्वीच्या चरित्रातील एकच प्रसन्ग ज्ञात आहे तो असा:
नेमाप्रमाणे एकादशीच्या वारीकरिता पन्ढरीला निघालेल्या असताना त्याना अचानक थन्डी वाजून ताप भरला.परन्तू पाण्डुरन्गाच्या भेटीची केवधी तळमळ ! त्यानी अन्गावरच्या फाटक्या घोन्गडीला विनन्ती केली, " ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव. एवधी वारी करून येईन आणि मग माझा भोग भोगिन." ही घोन्गडी त्यानी एका झाडावर थेवली व त्या वारीस निघून गेल्या.
त्या सुखरूप परत येईपर्यन्त ते झाड हीव भरल्यामुळे थड्थड हालत होते. सन्त सन्कटे थोपवीतात पण (आपले) भोग चुकविण्यासाठि नव्हे.

या साध्वीची समाधी त्यान्च्या 'शेऊर' या गावी आहे.
तुकोबारायान्चे स्वप्नोपदिश्ट शिश्य निळोबाराय - त्यान्चे शिश्य शन्करस्वामी या महात्म्याचे वास्तव्य व समाधी याच गावी. हे पुण्यक्शेत्र साध्वी बहिणाबाईन्च्यामुळे अधिकच पावन झाले आहे.


मराठी संत

महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा आहे. या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे.

 सामान्य माणसाला त्यांनी विनाकारण शांतताभंग न करता मंदिरात सावकाश भजन करण्यास सांगितले आहे. ( शांतता भंग करणारी, भजन करणारी, मंदिरातली, विशेष महत्व नसलेली सामान्य माणसे कोण?)

(विटाळांच्या आणि नाटाळांच्या हाती टाळ दिला.)

👉पूर्वी महाराष्ट्रावर मुगलांचे राज्य होते त्या काळात सामान्य माणूस आपले कामे सोडून देवाच्या नावाचा जप करत बसे. 

🔴मराठी संतांनी त्याला वारकरी संप्रदायाचे महत्त्व पटवून दिले व संप्रदायाला जगभर पसरवले.

पंढरपूर येथे यमाई तुकाई तलावाच्या काठावर

 ‘नमामि चंद्रभागा योजने’अंतर्गत येणाऱ्या तुळशी उद्यानाच्या भिंतीवर चित्रमय संतमेळा साकारला आहे. अडीच एकर क्षेत्रातील काही भागावर हे उद्यान वसले असून, त्याच्या संरक्षण भिंतीवर २१ संतांच्या चरित्राची चित्रमालिका मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या विद्यार्थ्यांनी साकारली आहे.

महाराष्ट्रातील संत

  • एकनाथ

एकनाथ

महाराष्ट्रातील एक संत

संत एकनाथ मंदिर, पैठण

जीवन

सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ (१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत.

एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मुळचे चाळीसगावचेरहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले; द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या.

नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.

कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत.

संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारूडजोगवागवळणीगोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.

एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत१२ स्कंदांचे आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हेही काव्य त्यांनींच लिहिले आहे. दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) त्यांची अरती घणपतीसमोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२६ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.

गुरुपरंपरा 

एकनाथांची गुरुपरंपरा :

  1. नारायण (विष्णू)
  2. ब्रह्मदेव
  3. अत्री ऋषी
  4. दत्तात्रेय
  5. जनार्दनस्वामी
  6. एकनाथ

एकनाथांचे कार्य व लेखन 

एकनाथांवरील मराठी पुस्तके 

  • संत एकनाथ (बालवाङ्‌मय, रवींद्र भट)
  • संत एकनाथ (विजय यंगलवार)
  • संत एकनाथ (विनायक मुरकुटे)
  • श्री एकनाथ : परंपरा आणि प्रभाव (डॉ. रत्नाकर बापूराव मंचरकर)
  • संतश्रेष्ठ एकनाथ (दीपक भागवत)
  • एकनाथ गाथा (संपादक - साखरे महाराज (नानामाहाराज साखरे))
  • एकनाथ चरित्र (ल.रा. पांगारकर)
  • संत एकनाथ दर्शन (ललित लेखसंग्रह, लेखक -हे.वि. इनामदार)
  • संत एकनाथांचा धर्मविचार (डॉ. सुरेखा आडगावकर)
  • एकनाथांची निवडक भारुडे (डॉ. वसंत जोशी)
  • एकनाथी भागवत सार्थ (सदाशिव आठवले)
  • एकनाथी भागवत (शोधून, विपुल व सुबोध टीपा आणि अल्पचरित्र यांसह लिहिलेला ग्रंथ, लेखक/संपादक गोविंद नारायण शास्त्री दातार)
  • एकनाथी भागवताचा अभ्यास (दा.वि. कुलकर्णी)
  • एका जनार्दनी (एकनाथांवरील दीर्घ कादंबरी, लेखक - अशोक देशपांडे)
  • एका जनार्दनी (डॉ. कल्याणी नामजोशी, डॉ. वि.रा. करंदीकर
  • एका जनार्दनी ! (कादंबरी, लेखक - रवींद्र भट
  • एका जनार्दनी (बालसाहित्य, लेखिका - लीला गोळे)
  • एकोबा (एकनाथांचे चरित्र, लेखिला - डॉ. कुमुद गोसावी)
  • भागवतोत्तम संत एकनाथ (डाॅ. शं. दा. पेंडसे)
  • लोकनाथ (कादंबरी, लेखक - राजीव पुरुषोत्तम पटेल)


गावबा हे संत एकनाथांचे शिष्य होते. एकनाथांचा भावार्थ रामायण हा ग्रंथ यानी पूर्ण केला.

बाह्य दुवे

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
  • कबीर

कबीर - विकिपीडिया

कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत.[१]संत कबीर यांचा जन्म इ.स. ११४९ साली झाला असे काहीजण मानतात तर, कुणी ते १३९९ मध्ये जन्माला आले असे म्हणतात(एवढा फरक??).[२] महान संत कबीर म्हणजे काळाच्या पुढे असलेले कवी संत समाज सुधारक होते. संत कबीर भारतीय भूमी मध्ये जन्म घेतलेल्या श्रेष्ठ संत यापैकी एक गुरु होत. धार्मिक थोतांडावर कडक आसूड ओढणारे आणि हजारो ग्रंथांचे पांडित्य खुजे करणाऱ्या प्रेमाच्या अडीच अक्षराचा मंत्र सांगणारे पुरोगामी संत म्हणजे कबीर. त्यांनी तत्कालीन प्रचलित असणाऱ्या धर्मातील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा यावर दोह्या च्या माध्यमातून टीका केली. त्यांच्या लिखाणामुळे तत्कालीन अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा पसरवणारे भोंदू बाबा व बुवा सनातनी यांचे धाबे दणाणले होते. संत कबीर यांनी लिहिलेले बहुतांश दोहे यावर विज्ञानवादी बुद्ध धम्माचा प्रभाव दिसतो. संत कबीर हे सत्य, विज्ञान व कर्मसिद्धान्त यांवर लिहीत. त्यांचा लिखाणामुळे संत कबीर संपूर्ण जगाममध्ये प्रसिद्ध झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर यांना गुरू मानले. एवढ्या शतकानंतरही महान संत कबीर यांनी लिहिलेले दोहे आजही समर्पक वाटतात. असे हे 'कबीर के दोहे' युगानुयुगे विज्ञानवादी शिकवण देऊन सतत जगाला प्रेरणा देत राहतील, असे वाटते. [३]

जीवन परिचय

खेमराज श्रीकृष्णदास यांनी प्रकाशित केलेल्या हस्तलिखित "कबीर सागर" ग्रंथातील मजकूर :-

ज्येष्ठ पौर्णिमेस काशीमधील लहरतारा नावाच्या सरोवरात एक प्रखर तेजस्वी प्रकाशामध्ये कबीर साहेब एका कमळाच्या फुलावर प्रकट झाले. हा सर्व प्रसंग तेथे असलेल्या अष्टानंदऋषींनी पाहिला होता. कर्मधर्म संयोगाने काशीतले एक मुस्लिम जोडपे त्यांचे नाव निरू व नीमा होते तेथून जात असताना नीमा पाणी पिण्यासाठी त्या सरोवरकडे गेली. तेव्हा तिची नजर त्या तेजस्वी बालकावर पडली, आणि ते जोडपे त्या बालकाला आपल्या सोबत घेऊन गेले. त्या मुलाचे नाम ठेवण्यासाठी निरूने मौलवीना बोलवले, तेव्हा ज्या ज्या वेळेस कुराण शरीफ उघडू पहिले त्या त्या वेळेस कुराण शरीफ मध्ये सर्वत्र फक्त कबीर कबीर नावच वाचण्यास मिळाले. कबीरचा अर्थ होतो सर्वज्ञ/सबसे बडा. पण हे नाव ठेवण्याची मौलवीची मुळीच इच्छा नव्हती. पण इच्छा नसतांनाही त्यांचे नाव कबीर ठेवण्यात आले, आणि पुढे ते बालक महान कवी व संत कबीर नावाने प्रसिद्ध झाले

कबीर जरी मुस्लिम कुटुंबात रहात होते तरी ते आदिरामाचे उपासक होते. संत कबीर यांनी विवाह केलेला नव्हता. कमाल नावाचा मुलगा आणि कमाली नावाची मुलगी त्यांची मानलेली मुले होती. कबीर हे काशीत विणकर म्हणून काम करत होते. ते आयुष्यभर काशीमध्येच राहिले पण मगहर येथून ते सशरीर हा मृ्त्युलोक सोडून निजधामाला गेले [२]

"सकल जनम शिवपुरी गंवाया।

मरती बार मगहर उठि आया।"

त्यांचा मृत्यू इ.स. १५९८ साली झाला असे मानले जाते.

हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमेला कबीर जयंती असते.[४][५]

भारत सरकारने १९५२ साली कबीर यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले होते.[६]

पोस्ट तिकीट

कबीरांविषयी मराठीतील पुस्तके

  • आदि श्री गुरुग्रंथसाहेबातील कबीर (संजय एस. बर्वे)
  • कबीर (कबीराच्या दोह्यांचा अनुवाद, मंगेश पाडगावकर)
  • कबीर उपदेश (गजानन बुक डेपो प्रकाशन)
  • संत कबीर रामदास : एक तुलनात्मक अभ्यास (डॉ. ज्योत्स्ना खळदकर) (प्रकाशन दिनांक ११-६-२०१७)
  • कबीरवाणी (संत कबीरांच्या ५०० दोह्यांचा अर्थ, प्रा. रतनलाल सोनग्रा)
  • कबीरवाणी (संत कबीरांच्या दोह्यांचा अर्थ, डॉ. नलिनी हर्षे)
  • कबीर ज्ञानामृत : संत कबीरांचे १००८ दोहे ( स.ह. जोशी; गजानन बुक डेपो प्रकाशन)
  • कबीरायन (कादंबरी, डॉ. भारती सुदामे)
  • कहत कबीर (डॉ. मोहन विष्णू खडसे)
  • कहत कबीर (डॉ. ज्योत्स्ना खळदकर) (प्रकाशन दिनांक २-११-२०१५)
  • कहै कबीर दीवाना (ओशो)
  • कहै कबीर मैं पूरा पाया (ओशो)
  • भक्त कबीराच्या गोष्टी (शंकर पां. गुणाजी)
  • भक्तीत भिजला कबीर (मूळ लेखक - ओशो, मराठी अनुवाद - भारती पांडे)
  • भारतीय परंपरा आणि कबीर (पद्मजाराजे पटवर्धन)
  • भारतीय साहित्याचे निर्माते - कबीर (प्रभाकर माचवे)
  • माझे माझ्यापाशी काही नाही (मूळ लेखक - ओशो, मराठी अनुवाद - भारती पांडे)
  • मृत्यु अमृताचे द्वार (मूळ लेखक - ओशो, मराठी अनुवाद - मीना टाकळकर)
  • म्हणे कबीर दिवाणा (मूळ लेखक - ओशो, मराठी अनुवाद - भारती पांडे)
  • संत कबीर (मूळ लेखक प्रेमचंद ‘महेश’, मराठी अनुवाद - विद्याधर सदावर्ते)
  • संत कबीर - एक दृष्टा समाजसुधारक (डाॅ. मानसी विजय लाटकर)
  • संत कबीर यांची अमृतवाणी (गजानन बुक डेपो प्रकाशन)

संदर्भ

  1. ^ The Editors of Encyclopaedia Britannica. "Kabir INDIAN MYSTIC AND POET"https://www.britannica.com. 28.12.2019 रोजी पाहिले.line feed character in |title= at position 6 (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  2. ↑ a b जोशी ,होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२००९ पुनर्मुद्रण). भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा. पुणे: भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन. pp. ८०. |year=मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ Das, Subhamoy. "Mystical Saint-Poet Sant Kabir (1440 to 1518)"https://www.learnreligions.com. 28.12.2019 रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  4. ^ "कबीर जयंती"https://www.bharatdarshan.co.nz. २८.१२.२०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  5. ^ "कबीर जयंती"भारत कोश. २८.१२.२०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक=मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ "Indian Saints & poets 1952"http://www.istampgallery.com. 28.12.2019 रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
  • गोरा कुंभार

१२६७-१० एप्रिल १३१७
संत गोरा कुंभार यांचे तेर येथील समाधी मंदिर

गोरा कुंभार (इ.स. १२६७ - २० एप्रिल १३१७) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते नामदेव व ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात व तज्ज्ञांच्या मते शा.श. ११८९ (इ.स. १२६७) साली त्यांचा जन्म झाला असावा[१].संत गोरा कुंभार यांनी अनेक अंभग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे (पांडुरंग) मोठे भक्त होते.

त्यांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (२०एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली. गोरा कुंभार यांना गोरोबा काका म्हणत. त्यांची समाधी समजले जाणारे संत गोरोबा काका मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात तेर नावाच्या गावी आहे. याशिवाय ऐनपूर (जिल्हा - जळगाव), राहू (जिल्हा - पुणे), दौलताबाद (जिल्हा - औरंगाबाद), काटे पिंपळगाव (जिल्हा - औरंगाबाद), कोकिसरे (जिल्हा - सातारा) , कुंभार्ली (जिल्हा - रत्नागिरी), सेलू (जिल्हा - परभणी), कर्जत (जिल्हा - रायगड) येथे आणखी संत गोरोबा काका मंदिरे आहेत.

गोरा कुंभार यांनी रचलेल्या काही अभंगांची पहिली ोळ

  • १. अंतरीचे गुज बोलू ऐसे काही वण
  • २. एकमेकामाजी भाव एकविध
  • ३. कवण स्तुति कवणिया वाचे
  • ४. काया वाचा मन एकविथ करी
  • ५. कासयासी बहू घालसी मळण
  • ६. केशवाच्या भेटी लागलेसे पीस
  • ७. कैसे बोलणे कैसे चालणे
  • ८. जो आवडी निर्गुणाचा संग धरिला
  • ९. जोहरियाचे पुढे ठेवियले रत्‍न
  • १०. देवा तुझा मी कुंभार
  • ११. नामा ऐसे नाम तुझिया स्वरूपा
  • १२. निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी
  • १३. निर्गुणांचे भेटी आलो सगुणासंगे
  • १४. ब्रह्म मूर्तिमंत जगी अवतरले
  • १५. मुकिया साखर चाखाया दिधल
  • १६. रोहिदासा शिवराईसाठी
  • १७. वंदावे कवानासी निंदावे कवनासी
  • १८. श्रवणे नयन जिव्हा शुद्ध करी
  • १९. सरितेचा ओघ सागरी आटला
  • २०. स्थूळ होते ते सूक्ष्म पै जहाल

गोराकुंभार यांची चरित्रे व जीवनकार्यावरील ग्रंथ

  • संत गोरा कुंभार (लेखक - अशोकजी परांजपे)
  • श्री विठ्ठलाच्या संत मेळाव्यात श्रीसंत गोरा कुंभार (लेखक - धोंडीराम दौलतराव कुंभार).
  • संत गोरा कुंभार (लेखक - निवृत्ती वडगांवकर)
  • संत गोरा कुंभार वाङमय दर्शन (लेखक - बाबुराव उपाध्ये)
  • गोरा कुंभार (लेखक - प्रा. बाळकृष्ण लळीत)
  • संत गोरा कुंभार (लेखक - महादेव कुंभार)
  • संत गोरा कुंभार (लेखक - मा.दा. देवकाते)
  • श्री गोरा कुंभार चरित्र (लेखक - वीणा र. गोसावी)
  • विलास राजे यांनी लिहिलेला संत गोरा कुंभार यांच्या जीवनकार्यावर आधारित ग्रंथ, ’जीवनमुक्त’ हा २५-५-२०१३ रोजी, डॉ. रामकृष्णदास लहिवतकर यांच्या हस्ते चिंचवडमध्ये प्रकाशित झाला.
  • म्हणे गोरा कुंभार (लेखक - वेदकुमार वेदालंकार)
  • गोरा कुंभार (लेखक - स.अ. शुक्ल)

चित्रपट

  • ’भगत गोरा कुंभार’ नावाचा हिंदी चित्रपट १९७८मध्ये निघाला होता. दिग्दर्शन दिनेश रावल यांनी केले होते.
  • संत गोरा कुंभार नावाचे मराठी नाटक होते. त्यात प्रसाद सावकार यांनी गोरोबांची भूमिका केली होती. लेखन अशोकजी परांजपे यांचे होते.
  • 'संत गोरा कुंभार' मराठी चित्रपट (दिग्दर्शक - राजा ठाकूर)
  • संगीत संत गोरा कुंभार (मराठी नाटक, लेखक:- अशोकजी परांजपे; दिग्दर्शक - मिलिंद टिकेकर) : रत्नागिरीच्या राधाकृष्ण कलामंचाने अहमदनगर येथे भरलेल्या ५८व्या नाट्य संमेलनात सादर केलेल्या या नाटकाला 'हौशी संगीत नाटका'साठीचा प्रथम पुरस्कार मिळाला.

हेही पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "संत गोरा कुंभार" (इंग्रजी भाषेत). १८ ऑगस्ट, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

[१] 2. संत गोरोबा कुुंभार इतिहास

बाह्य दुवे


  1. ^ "संत गोरोबा कुंभार इतिहास लेख"Marathi Infopedia.
  • चोखामेळा

चोखामेळा - विकिपीडिया

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या द्वाराजवळ असलेली चोखामेळा यांची समाधी तथा मंदिर

संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म : अज्ञात वर्ष; मृत्यू : इ.स. १३३८) हे यादव काळातीलनामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते. चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणाजिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला. संत चोखामेळांचे कुटुंब हे जातीने महार होते. (चोखोबांचा जन्म पंढरपूरला झाल्याचे संत महिपती सांगतात.

चोखोबा मूळ वऱ्हाडातील आहेत असेही म्हटले जाते. त्यांची पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते. त्यांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात.

संत चोखोबा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.

संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्‌र्‍य, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.

चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ ... असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्र्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला.

संत चोखोबांचे भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्‍न केला असता, एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो. संस्कारसंपन्न, संवेदनक्षम

चोखोबांबद्दल संत बंका, संत नामदेव आणि संत तुकाराम यांची वचने

संत बंका (चोखोबांचे मेव्हणे), संत नामदेव आणि संत तुकाराम यांनी त्यांच्या रचनांमध्ये संत चोखोबांबद्दल आपले भाव व्यक्त केले आहेत -
‘चोखा चोखट निर्मळ। तया अंगी नाही मळ।।
चोखा प्रेमाचा सागर। चोखा भक्तिचा आगर।।
चोखा प्रेमाची माउली। चोखा कृपेची साऊली।।
चोखा मनाचे मोहन। बंका घाली लोटांगण।।’
(- संत बंका)

‘चोखा माझा जीव चोखा माझा भाव। कुलधर्म देव चोखा माझा।।
काय त्याची भक्ति काय त्याची शक्ति। मोही आलो व्यक्ति तयासाठी।।
माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान। तया कधी विघ्न पडो नदी।।
नामदेवे अस्थि आणिल्या पारखोनी। घेत चक्रपाणी पितांबर।।
(-संत नामदेव)

‘तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ। तारिले पतित तेणे किती।।’
-संत तुकाराम
खुद्द तुकोबाराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची र्कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत म्हणजे चोखा मेळा होय.

अन्य पुस्तके

  • चोखोबाचा विद्रोह (शंकरराव खरात)
  • वारकरी संप्रदाय (शंकर वासुदेव अभ्यंकर)
  • संत चोखामेळा (लीला पाटील)
  • श्री संत चोखामेळा चरित्र (बाळकृष्ण लळीत)
  • श्री संत चोखामेळा चरित्र आणि अभंग (सोयराबाई, कर्ममेळा, बंका व निर्मलाबाई यांच्या अभंगांसह) : शब्दालय प्रकाशन.
  • श्री संत चोखामेळा व परिवार चरित्र व समग्र अभंगगाथा (प्राचार्य डाॅ. आप्पासाहेब पुजारी)
  • संत चोखामेळा : विविध दर्शन (ॲलिनॉर झेलियट, वा.ल. मंजूळ)
  • श्री संत चोखामेळा : समग्र अभंगगाथा व चरित्र (प्राचार्य डाॅ. आप्पासाहेब पुजारी)

चित्रपट

  • सुमीत कॅसेट्स नावाच्या कंपनीने ’संत चोखामेळा’ नावाची दृक्‌श्राव्य सीडी काढली आहे. त्यातील चित्रपटाचे दिग्दर्शन मानसिंग पवार यांनी केले आहे.
  • फाउंटन म्युझिक कंपनीनेही संत चोखामेळा नावाची सीडी कढली आहे. तिच्यातील चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश लिमकर आहेत.
  • याच विषयावरचा पूर्ण लांबीच मराठी कृष्णधवल चित्रपट ‘जोहार मायबाप (संत चोखामेळा)’ या नावने सन १९५०मध्ये निघाला. राम गबाले यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. कथा-पटकथा-संवाद ग.दि. माडगूळकर यांचे तर संगीत सुधीर फडके यांचे होते. हाच चित्रपट १९७३ साली ‘‘ही वाट पंढरीची” या नावानेही सेन्सॉर झाला होता. इंदू कुलकर्णी, गोपीनाथ सावकार, ग्रामोपाध्ये, परशुराम भोसले, पु.ल. देशपांडेविवेकसुलोचना यांनी त्या चित्रपटात कामे केली होती. चित्रपटातील सुमधुर गाणी आजही लोकप्रिय आहेत.

अभंग

चंदनाच्या संगेें बोरिया बाभळी

हेकळी टाकळी चंदनाची||१||

संतांचिया संगें अभाविक जन

तयाच्या दर्शनें तेचि होती||२||

चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा

नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा||३||

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

  • जनाबाई

विकिपीडिया
Imbox content.pngह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोतजोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेलतर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या.

संत जनाबाई
जन्मअंदाजे इ.स. १२५८
गंगाखेड
मृत्यूअंदाजे इ.स. १३५०
राष्ट्रीयत्वभारतीय
नागरिकत्वभारतीय
वडीलदमा
आईकरुंड


जीवन

जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्यागातात.

बालपण

परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. तिच्या वडिलांनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेत असत.

आयुष्य

संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.

‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’ असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे. गवऱ्या-शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.[१]

संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंगसकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक आख्यानरचनापण त्यांच्या नावावर आहे. संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्र्वरांना (संत एकनाथांचे नातू) स्फूर्ति मिळाली होती.

संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. ‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात,’ असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे हे जनाबाईच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात. तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदि सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या. (इ.स. १३५०)

जनाबाईंवरील पुस्तके/व्हीडिओ/चित्रपट

  • ओंकाराची रेख जना (चरित्रवजा कादंबरी; लेखिका - मंजुश्री गोखले)
  • संत जनाबाई (लेखन - संत जनाबाई शिक्षण संस्था; प्रकाशन - डायमंड पब्लिकेशन्स)
  • संत जनाबाई (सुहासिनी इर्लेकर|डाॅ. सुहासिनी यशवंत इर्लेकर]]; पुस्तक आणि त्याची पीडीएफ आवृत्ती; महाराष्ट्र सरकार प्रकाशन)
  • संत जनाबाई चरित्र (बालसाहित्य; लेखक - प्रा. बाळकृष्ण लळीत)
  • संत जनाबाई जीवन चरित्र (व्हीडिओ; दिग्विजय बाबर)
  • संत जनाबाई (मराठी/हिंदी चित्रपट; लेखन, दिगदर्शन - राजू फुलकर)
  • संत जनाबाई (मराठी/हिंदी चित्रपट (१९४९); दिग्दर्शक - गोविंद बी. घाणेकर; प्रमुख भूमिका - हंसा वाडकर)
  • संत जनाबाई अभंग गाथा (संपादक - नितीन सावंत)
  • संत जनाबाई - अभंग संग्रह १ ([१])
  • संत जनाबाई - अभंग संग्रह २ ([२])

हे ही पहा

बाह्य दुवे

संदर्भ


Wiki letter w.svgकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यासमदत करा. 


  1. ^ कर्वे, स्वाती (२०१२). १०१ कर्तृत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. २२. ISBN 978-81-7425-310-1.
  • तुकाराम

संंत तुकाराम - विकिपीडिया

हा लेख वारकरी संत तुकाराम याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, तुकाराम (निःसंदिग्धीकरण).

संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा! अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम असा मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख करावा लागेल. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळामध्ये संत तुकारामांनी समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून केले.

तुकाराम बोल्होबा अंबिले {मोरे} चित्र = Tukryam by Raja Ravi Varma.jpg
मूळ नावतुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
जन्ममाघ शुद्ध ५, शके १५२८, (२२ जानेवारी १६०८ )
देहूमहाराष्ट्र
निर्वाणफाल्गुन कृ.२yovud , शके १५७०, (१९ मार्च १६५०)
देहूमहाराष्ट्र
संप्रदायवारकरी संप्रदाय
गुरूबाबाजी चैतन्य
शिष्यसंत निळोबा संत बहिणाबाई, शिवूर, ता.वैजापूर, जिल्हा. औरंगाबाद भगवानबाबा
भाषामराठी
साहित्यरचनातुकारामाची गाथा (पाच हजारांवर अभंग)[१]
कार्यसमाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक
संबंधित तीर्थक्षेत्रेदेहू
व्यवसायवाणी (ते शेती दुकानदारी व सावकारी

करत )

वडीलबोल्होबा अंबिले
आईकनकाई बोल्होबा आंबिले
पत्नीआवली
अपत्येमहादेव, विठोबा, नारायण, भागूबाई
विठठ्ल्...

तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच' एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत.

भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते.त् यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.

संत तुकारामाच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही. तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. देव धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत लौकिक अर्थाने संत तुकाराम हे आठव्या पिढीतील नायक होते. वि. का. राजवाडे यांनी संत चळवळीवर काही प्रमाणात टीका केलेली आहे. संत चळवळीच्या संदर्भामध्ये ते लिहितात, "संतांच्या संत चळवळीने महाराष्ट्र तीन शतके अपंग होऊन राहिला मात्र याला अपवाद संत रामदास हे होय" ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केलेला आहे.

जीवन

तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातली चार संभाव्य वर्षे इ.स. १५६८इ.स. १५७७इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ ही आहेत. इ.स. १६५० मध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले असे मानले जाते.

त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले (की आंबिले?) आहे. त्यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. तुकारामांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवली) हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला होता.

तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दु:खे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते..

तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीचीकागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांचीरचना स्फुरू लागली.

सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंगकागदावर उतरवून घेण्याचे काम केले.
देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केलाव मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले.

पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचाअर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली.

फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो. तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती. गरिबांविषयी त्यांना कळवळा होता. त्यांचे अंतकरण महासागरासारखे होते माणुसकीची त्यांना जाणीव होती. ते व्यापारी होते. त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते त्यांनी लोकांना दिले. कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होय. जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती. संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते. महात्मा गौतम बुद्धाने जसे राजऐश्वर्याचा त्याग केला. तसा संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला. जगाचा संसार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अभंगांद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले.. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले.

समाजातील काही विकृत विकारांच्या लोकांनी संत तुकारामांना वेडा ठरविण्याचा प्रयत्न केला. अनेक कट कारस्थाने रचली, त्यांतून तुकाराम सहीसलामत सुटले.

संत तुकारामांना चार मुले होती. कन्या भागीरथी व काशी तर मुलगे नारायण आणि महादेव. यापैकी दोन आजाराने मरण पावले. पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई ऊर्फ जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. ती स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती. संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला, त्यांची विरक्ती सांभाळली. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले. ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले, त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली.

संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली, लौकिकार्थाने मायाजालात गुंतले नाहीत.

वंशावळ

  • विश्वंभर आणि आमाई अंबिले यांना दोन मुले - हरि व मुकुंद
  • यांतील एकाचा मुलगा विठ्ठल
  • दुसऱ्याची मुले - पदाजी अंबिले, शंकर अंबिले, कान्हया अंबिले
संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान आणि वसतीस्थान, देहूगाव
  • बोल्होबा आणि कनकाई अंबिले यांना तीन मुले - सावजी (थोरला). याने तीर्थयात्रेला जाण्यासाठी घर सोडले. मधला तुकाराम व धाकटा कान्होबा

जीवनोत्तर प्रभाव

संत बहिणाबाई शिवुर ता.वैजापूर ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनी तिला स्वप्नात गुरूपदेश दिला होता. तुकाराममहाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिले होते, असे म्हणतात. तुकारामांनी बहिणाबाईला बौद्धांच्या ’वज्रसूची’ या बंडखोर ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला सांगितले होते.संदर्भ हवा ]

तुकारामांनी लिहिलेली पुस्तके

  • गीतगाथा (संपादक प्रभाकर जोगदंड) : संत ज्ञानेश्वरांप्रमाणे संत तुकाराम यांनीही भगवद्गीतेवर टीका केली आहे. तुकारामांच्या भगवद्गीतेवरील भाष्याचा "गीतगाथा" हा ग्रंथ आहे. पोथीच्या आकारातील हा ग्रंथ, भगवद्गीतेचे श्लोक, आणि त्या श्लोकांचा अर्थ सांगणारे जे अभंग तुकारामांनी लिहिले, त्याविषयी आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभाकर जोगदंड यांनी स्वत:च्या सुंदर हस्ताक्षरात या ग्रंथाचा शब्दन्‌ शब्द लिहिला आहे. तसेच पुस्तकाची मांडणीही त्यांनी स्वतःच केलेली आहे. हा ग्रंथ, एखादी हस्तलिखित पोथी हाताळत आहोत की काय असे वाटायला लावणारा आहे. गीतेचे ७०० श्लोक आणि तुकारामाचे ७०० अभंग लेखकाने टाकाने लिहिलेले आहेत.

संत तुकाराम गाथा म्हणजे बहुजनांची गीता आहे. महाराष्ट्राच्या पावन भूमीत गेली चारशे वर्ष मुक्तीची ज्ञानगंगा या गाथेच्या रूपाने वाहत आहे. ज्ञानोबा, तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची संस्कृतिक विद्यापीठे आहेत. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे. अभंग आणि ओवी हे तळागाळातील समाजात ठाण मांडून बसलेले आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जीवनाची बाग बहरली. ती ज्ञानोबा-तुकारामांच्या या अभंगाची भाषा सरळ आणि सोपी आहे. मुखामध्ये रुळणाऱ्या, कानामध्ये गुंज घालणारे शब्द आहेत.

महाराष्ट्रातील देवगिरीच्या यादवांचा अस्त झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र अंदाधुंदीचा कारभार सुरू झाला. बहुजन समाजाचे आर्थिक, धार्मिक शोषण सुरू झाले. गुलामगिरीचे ज्यू बहुजनांच्या मानेवर लटकत होते. धर्मसत्ता प्रबळ झालेली होती. हिंदू धर्माला कर्मकांडाची जळमटे चिकटलेली होती. देव-धर्म प्रथेपुढे समाज गांजलेला होता. अंधश्रद्धेने सारा समाज पोखरला होता. परकीय सत्ता बळकट झाली होती. समाजातील सत्त्व आणि स्वाभिमान हरवलेला होता. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाहीचा विळखा समाजावर घट्ट झाला होता. महाराष्ट्रातील मराठा सरदार वतनांसाठी आपसांमध्ये लढत होते स्वकीय कोण आणि परकीय कोण याची ओळख उरलेली नव्हती. हिंदू धर्मातील सनातनी लोकांनी चातुर्वर्ण्याची चौकट बळकट केली होती. त्यामुळे समाजात एकता अस्तित्वात नव्हती. अशा या काळामध्ये एक दिव्य ज्योत उदयाला आली ती म्हणजे धर्म क्रांतीचा पहिला संत - ज्ञानेश्वर - या काळामध्ये पुढे आला. मराठी भाषेतील आध्यात्मिक क्रांतीची पहिली ज्ञानज्योत त्यांनी प्रज्वलित केली. तत्कालीन सनातनी धर्ममार्तंडांनी ज्ञानेश्वरांचा अतोनात छळ केला. परंतु ज्ञानेश्वरांनी धर्मशास्त्रानुसार त्यांना सडेतोड उत्तर दिली. सात शतकांहून अधिक वर्षे ही ज्ञानज्योत तेवत राहिली यातच तिचे थोरपण आहे.

ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. भागवत धर्माचा कळस म्हणजे संत तुकाराम,त्यांनी बहुजन समाजामध्ये पसरलेली धर्म कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली. अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसली. अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला संत तुकाराम यांनी दिली. सामाजिक परिवर्तनाची वादळ सर्वत्र पसरले. या वादळाला थोपविण्यासाठी सनातनी धर्ममार्तंडांनी कल्लोळ केला, कटकारस्थाने रचली अशा अनेक संकटातून नव्हे तर अग्निदिव्यातून जात असताना अभंग सतत गर्जत राहिला. जाती-धर्माची उतरंड त्यांनी मोडून काढली. गुलामगिरीची चौकट मोडली. बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला.

संत तुकाराम हे अभंग वाणी कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र धर्माची शिकवण देणारे या काळातील महत्त्वाचे संत ठरले. संत तुकाराम यांनी बहुजन समाजाला जागृत करून देव आणि धर्म यासंबंधी ठोस मते पटवून देण्याचा प्रयत्न केला. देवभोळेपणा धर्मातील चुकीच्या समजुती त्यांनी प्रयत्नपूर्वक दूर सारण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन धर्ममार्तंडांनी त्यांना खूप विरोध केला विरोधक नमले परंतु अभंग, अभंग राहिले संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही मार्गदर्शनपर ठरलेले आहे. त्यांची वंशावळ पाहिली तर त्यांच्या घराण्यात वारकरी संप्रदायाची परंपरा अखंड दिसते.त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुष विश्वंभर त्यांची पत्नी रमाबाई हरी आणि मुकुंद अशी त्यांची दोन मुले ही दोन मुले लढाईत मारली गेली. तत्कालीन रूढीप्रमाणे मुकुंदाची पत्नी सती गेली. हरीची पत्नी गरोदर असल्याने सती गेली नाही. हरीला विठोबा नावाचा मुलगा झाला. विठोबाचा दाजी व दाजीचा शंकर, शंकर चा कान्होबा, कान्होबाचा बोल्होबा आणि बोल्होबाचा संत तुकाराम असा हा वंश आहे. संत तुकारामांचे उपनाव मोरे असे होते. वंशपरंपरेने घरी वाण्याच्या दुकानाचा व्यवसाय होता. सावकारी होती. पुण्यापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीकाठी देहू गाव वसले आहे. संत तुकाराम यांचे मूळ पुरुष विश्वंभर यांनी गावांमध्ये विठोबाचे देऊळ बांधलेले होते. घराण्यात वारकरी संप्रदाय अखंड चालत आलेला होता. असा उल्लेख महिपतीकृत संत तुकाराम चरित्रात सापडतो. संत तुकाराम यांच्या घराण्यात आठ पिढ्या सावकारी होती, ते महाजन होते. घरात श्रीमंती नांदत होती. कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती घरी नोकर-चाकर यांची मांदियाळी होती, असे असूनसुद्धा संत तुकाराम या गोष्टींपासून विरक्तच राहिले. संसार असूनसुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थासाठी वाहिले.

  • तुकारामाच्या अभंगांची गाथा महाराष्ट्र सरकारने आणि शिवाय अनेक प्रकाशकांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे. गाथेचे तेलुगू भाषेत भाषांतर (भाषांतरकार - कर्णे गजेंद्र भारती महाराज)
  • तुकाराम गाथा (संपादक नानामहाराज साखरे)
  • दैनंदिन तुकाराम गाथा (संपादक माधव कानिटकर)
  • श्री तुकाराम गाथा (संपादक स.के. नेऊरगावकर)
  • श्री संत तुकाराम महाराजांची गाथा (संपादक ह. भ. प. श्री. पांडुरंग अनाजी घुल)[२]

चित्रपट

  • इ.स.१९३६ मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या विष्णुपंत दामले आणि फत्तेलाल शेख यांनी मराठीत 'संत तुकाराम' या नावाने चित्रपट बनवला. या चित्रपटाला अपूर्व यश प्राप्त झाले. १२ डिसेंबर १९३६ रोजी मुंबईच्या सेंट्रल सिनेमा येथे प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकाराम यांचे काम केले होते. ५व्या व्हेनिस चित्रपट उत्सवामध्ये या चित्रपटाला पुरस्कार मिळाला होता. हा मराठी चित्रपट एकाच चित्रपटगृहात वर्षभर चालू होता. हा त्या काळचा उच्चांक होता. त्यानंतर भारतातील अनेक भाषांमध्ये संत तुकाराम यांच्यावर चित्रपट निघाले.
  • हा १९३६ सालचा मराठी चित्रपट येण्याआधी तुकारामांवर तीन चित्रपट बनले होते. पहिला मूकपटांच्या जमान्यात कोहिनूर फिल्म कंपनीने निर्माण केलेला 'संत तुकाराम'. त्यानंतरचे दोन तुकाराम आले ते बोलपटांच्या जमान्यात १९३२ मध्येच. यांपैकी एक तुकाराम निर्माण केला होता 'शारदा फिल्म कंपनी'ने आणि दुसरा 'मास्टर ॲन्ड कंपनी'ने 'संत तुकाराम' अर्थात 'जय विठ्ठल' या नावाने. शुक्ल नावाच्या नटाने यात तुकारामांची भूमिका केली होती. यापलीकडे या चित्रपटाची काहीच माहिती उपलब्ध नाही. हा चित्रपट म्हणजे एका नाटकाचे चित्रण होते. शारदा फिल्म कंपनीचा 'तुकाराम' मात्र चित्रपट म्हणूनच तयार करण्यात आला होता. या 'तुकारामा'चीही काही माहिती आज उपलब्ध नाही.
  • १९६३ मध्ये संत तुकाराम नावाचा कानडी चित्रपट आला होता. दिग्दर्शक - सुंदराराव नाडकर्णी
  • तुका झालासे कळस (मराठी चित्रपट, १९६४) - दिग्दर्शक राजा नेने. या चित्रपटात तुकारामाची भूमिका कुमार दिघे यांनी केली होती.
  • १९६५ मध्ये तुकारामांवर हिंदी चित्रपट आला. त्याचे नाव होते 'संत तुकाराम'. राजेश नंदा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अशोक फिल्म्सने निर्माण केला होता. शाहू मोडकांनी यात तुकारामाची भूमिका केली होती. तर अनिता गुहा 'आवडी' बनल्या होत्या.
  • त्यानंतर १९७४ मध्ये 'महाभक्त तुकाराम' आला. हा मूळ तामिळ चित्रपट होता,आणि मराठीत डब करण्यात आला होता. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीदेवी यात बालतारका म्हणून पडद्यावर दिसली होती.
  • यानंतर २००२ मध्ये आणखी एक तुकारामांवरचा चित्रपट आला. कृष्णकला फिल्म्सचा 'श्री जगत्गुरू तुकाराम'.
  • इ.स. २०१२सालचा 'तुकाराम' हा चित्रपट या सर्व संतपटांपेक्षा वेगळा आणि आधुनिक विचारसणी मांडलेला चित्रपट आहे. हा चित्रपट चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केला होता.
  • तुकारामाच्या आयुष्यावर कलर्स मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर ‘तू माझा सांगाती’ नावाची मालिका ११-७-२०१४पासून सुरू झाली. ११ ऑगस्ट २०१८ रोजी तिचा शेवटचा एपिसोड झाला.
  • 'तुका आकाशा एवढा' हा मराठी चित्रपट ???? साली आला होता. दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक - जितेंद्र वाईकर

तुकारामाचे चरित्र, अभंग आणि त्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके

तुकारामांचे ’तुकारामबाबांचे चरित्र’ नावाचे मराठीतले पहिले चरित्र कृष्णाजी अर्जुन केळूसकर यांनी इ.स. १८९६ साली लिहिले. ’आध्यात्मिक ज्ञान रत्‍नावली’ नावाच्या मासिकात हे चरित्र क्रमश: प्रसिद्ध झाले होते. न्यायमूर्ती रानडे यांनी या चरित्राचे कौतुक केले होते. दक्षिणा प्राईज कमिटीने या पुस्तकाला पहिले बक्षीस दिले होते. चमत्कारांवर भर न देता संत तुकारामांचे थोरपण या पुस्तकात सांगितले आहे. २०१५ साली औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाने या पुस्तकाची ’संत तुकाराम’ या नावाची नवी आवृत्ती काढली आहे. अन्य पुस्तके -

  • अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची (ग.बा. सरदार)
  • अभंगवाणी श्री तुकयाची (प्रा. डाॅ. गणेश मालधुरे)
  • आनंदओवरी (कादंबरी - लेखक दि.बा. मोकाशी)
  • आनंड डोह (२०१४). नाटक - लेखक : योगेश्वर
  • आनंदाचे डोही आनंद तरंग (कादंबरी, लेखिका मृणालिनी जोशी)
  • ’A complete collection of the poems of Tukáráma, the Poet of Maharashtra (दोन खंड-इ.स.१८६९) मराठीतून इंग्रजीत भाषांतर करणारे : विष्णु परशुरामशास्त्री पंडित, शंकर पांडुरंग पंडित आणि जनार्दन सखाराम गाडगीळ
  • तुका झाला पांडुरंग (कादंबरी, भा.द. खेर)
  • तुका आकाशाएवढा : लेखक गो.नी. दांडेकर
  • तुका म्हणे : लेखक डॉ. सदानंद मोरे
  • तुका म्हणे भाग १, २ : लेखक डॉ. दिलीप धोंगडे
  • तुका म्हणे सोपी केली पायवाट (डॉ. अविनाश वाचासुंदर - दैनंदिन उपयोगाच्या तुकारामांच्या निवडक १५० अभंगांचे निरूपण)
  • तुका झाले कळस (डाॅ. व.दि. कुलकर्णी)
  • तुका झालासे कळस : लेखक डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी
  • तुका झालासे कळस : लेखक स.कृ. जोशी
  • तुका झालासे कळस : लेखक डॉ. रामचंद्र देखणे
  • तुका झालासे कळस: लेखक अर्जुन जयराम परब
  • तुका झालासे विठ्ठल : (ढवळे प्रकाशन)
  • संत तुकाराम (बाबाजीराव राणे)
  • तुकाराम - अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे (म.सु. पाटील)
  • तुकाराम दर्शन (डॉ. सदानंद मोरे)
  • समग्र तुकाराम दर्शन (किशोर सानप)
  • तुकाराम (हिंदी बालनाट्य, लेखिका - धनश्री हेबळीकर, दिग्दर्शन अभिजित चौधरी, निर्माता युवराज शहा)
  • तुकाराम गाथा (भालचंद्र नेमाडे)
  • तुकाराम नावाचा संत माणूस (विश्वास सुतार)
  • श्री तुकाराम महाराज चरित्र - (प्रा. र.रा. गोसावी, वीणा गोसावी)
  • तुकाराम महाराजांची जीवनसूत्रे : लेखक डॉ. यादव अढाऊ
  • तुकाराम व्यक्तित्व आणि कवित्व : लेखक किशोर सानप आणि मनोज तायडे
  • तुकारामांचा शेतकरी : लेखक डॉ. आ.ह. साळुंखे
  • तुकारामांची अभंगवाणी : लेखक पंडित कृष्णकांत नाईक
  • तुकारामाचे निवडक १०० अभंग : लेखक डॉ. दिलीप चित्रे
  • तुकारामाचे निवडक १००० अभंग (व्हीनस प्रकाशन)
  • तुकारामाच्या अभंगांची चर्चा (खंड १, २) (वासुदेव पटवर्धन)
  • तुका, विठू आणि मी : लेखिका यशश्री भवाळकर
  • तुकोबा : लेखक शंकर पांडुरंग गुणाजी
  • तुकोबाचे वैकुंठगमन दिलीप चित्रे
  • धन्य तुकाराम समर्थ (एकपात्री नाट्यप्रयोग), लेखक व सादरकर्ते नामदेव तळपे
  • निवडक तुकाराम (वामन देशपांडे)
  • ’The poems of Tukārāma’ : translated and re-arranged, with notes and an introduction. लेखक : जे. नेल्सन फ्रेझर आणि के. बी. मराठे.
  • पुन्हा तुकाराम : दिलीप चित्रे
  • प्रसादाची वाणी अर्थात तुका म्हणे (डॉ.सदानंद मोरे)
  • मुलांसाठी तुकाराम (वामन देशपांडे)
  • रोखठोक संत तुकाराम (डाॅ. यशवंतराव पाटीलसर)
  • One Hundred Poems of Tukaram (चंद्रकांत म्हात्रे)
  • वारीच्या वाटेवर महाकादंबरी (दशरथ यादव)
  • विद्रोही तुकाराम : लेखक आ.ह. साळुंखे
  • विद्रोही तुकाराम - समीक्षेची समीक्षा : लेखक आ.ह. साळुंखे
  • संत तुकाराम आणि रेव्ह. टिळक : एक भावानुबंध (लेखक : सुभाष पाटील):
  • श्री संत तुकाराम चरित्र (अनंत पैठणकर)
  • संत तुकाराम (चरित्र) (कृ.अ. केळूसकर, १८९५)
  • संत तुकाराम (बालवाङ्‌मय, रवींद्र भट)
  • संत तुकाराम - व्यक्ती व वाङ्मय (प्रा. डाॅ. शोभा गायकवाड)
  • संत तुकारामांचे अप्रकाशित अभंग (वा.सी. बेंद्रे)
  • तुकारामबावांंच्या गाथेचे ‍‍निरूपण (संपादक : मारुती भाऊसाहेब जाधवगुरुजी; प्रकाशक : संत तुकाराम अध्यासन, ‍कोल्हापूर शिवाजी ‍विद्यापीठ)
  • संतसूर्य तुकाराम (कादंबरी, लेखक : आनंद यादव)
  • साक्षात्कारी संत तुकाराम (शं.दा. पेंडसे)
  • 'Says Tuka (चार खंड) : लेखक दिलीप चित्रे
  • द सेंट पोएट्स ऑफ महाराष्ट्र : देअर इम्पॅक्ट ऑन सोसायटी (इंग्रजी) (१९६९) (गं.बा. सरदार)

तुकाराम महाराजांचे नाव दिलेली ठिकाणे

  • तुकाराम उद्यान (निगडी-पुणे)
  • तुकारामनगर (खराडी-पुणे)
  • तुकारामनगर (तळेगाव दाभाडे-पुणे)
  • तुकारामनगर (पिंपरी-पुणे)
  • तुकारामवाडी (जळगांव)
  • तुकारामवाडी (डोंबिवली पूर्व)
  • तुकारामवाडी (पेण-कोंकण)

चित्रकला-शिल्पकला व मुद्राचित्र

विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात हॉलंडमध्ये वास्तव्य असलेल्या चित्रकार, शिल्पकार व कवी भास्कर हांडे यांनी तुकारामाच्या गाथेतील अभंगावरून स्फुरलेल्या चित्रांची शिल्पांची व मुद्रा चित्रांची मालिका तयार केली. तिला 'तुझे रूप माझे देणे' असे नाव दिले आहे. त्या चित्रांची कायमस्वरूपी मांडणी वैश्विक कला पर्यावरण औंध (पुणे) येथे केली आहे. लोकांसाठी हे कलादालन उघडे आहे. गाथेतील अभंगांवर चित्र काढण्याचा हा पहिलाच प्रयोग होता.

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

  • दामाजी

त दामाजी पंत - संत साहित्य संत दामाजी पंत

मंगळवेढ्यात अनेक संत होऊन गेले. त्यांपैकी संत दामाजी पंत, चोखामेळा व कान्होपात्रा ही संत मंडळी अधिक प्रसिद्ध आहेत. संत दामाजी पंत यांच्या अस्तित्वाचा काल शालिवाहन शके 1300 ते 1382 हा आहे. ते बिदर येथील महंमदशहाच्या दरबारात सैन्याचे सेनापती होते. त्यांनी अब्दुलशहाशी झालेल्या लढाईत विजय मिळवल्यामुळे त्यांना खजिनदार पद देण्यात आले. त्यात हुशारी दाखवल्यामुळे त्यांची मंगळवेढ्याच्या मामलेदारपदी नेमणूक झाली. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील, पण अंगच्या हुशारीमुळे त्यांना ती पदे मिळाली. शके 1376 मध्ये भयंकर दुष्काळ पडला. पुन्हा 1377 सालीही पाऊस पडला नाही. त्या पुढच्या 1378 सालीपण भीषण दुष्काळ पडला. जनता हवालदिल झाली. दामाजीपंतांनी धान्याची दोन कोठारे बांधली होती. त्यांनी धान्याने भरलेली ती कोठारे लोकांसाठी खुली केली. बादशहाने त्यांना अटक करण्यासाठी सैन्य पाठवले व बिदर येथे येण्यास फर्मावले. दंतकथा अशी आहे, की त्या प्रवासादरम्यान पांडुरंगाने दामाजीपंतांच्या विठू महार या नोकराचे रूप घेऊन बादशहाला सव्वा लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या मोहरा देऊन त्याची पावती घेतली व दामाजीपंतांच्या गीतेच्या पोथीत ठेवली. दामाजीपंतांची सुटका होऊन त्यांचा सत्कारही झाला. दामाजीपंत शके 1382 मध्ये मरण पावले. त्यांची समाधी साध्या स्वरूपात होती. नंतर शिवाजी महाराजांचा धाकटा पूत्र राजाराम याने तेथे घुमटवजा छोटे मंदिर बांधले. त्यात विठ्ठल, रुखमाई व दामाजीपंतांची मूर्ती स्थापली.

पेशवाईच्या काळात मंगळवेढा हे सांगली संस्थानचे राजे पटवर्धन यांच्या अंमलाखाली गेले. ‘संत दामाजी संस्था’ एक एकर एकोणीस गुंठे जागेवर आहे. मंदिराला मोठा सभामंडप आहे. तेथे दररोज दोनशे-अडीचशे लोकांना जेवण दिले जाते. चैत्री, आषाढी, कार्तिकी व माघ वारीला तेथे येणाऱ्या वारकऱ्यांना निवासासाठी दोन मजली इमारत बांधली आहे. वारकऱ्यांना भात व साराचे जेवण दिले जाते. एका वारीसाठी (पंधरा दिवसांसाठी) तीस-पस्तीस क्विंटल तांदूळ लागतात. दरम्यान तेथे अनेक धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. तो खर्च भक्त व दानशूर लोकांच्या देणग्यांतून भागवला जातो.

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

  • नरहरी सोनार

नरहरी सोनार

संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैवपंथी होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. रामचंद्रदास- कृष्णदास-हरिप्रसाद-मुकुंदराज-मुरारी-अच्युत आणि नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. त्यांचा जन्म इ.स.१३१३च्या आसपास पंढरपूर येथे झाला. संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुद्ध/शुक्ल त्रयोदशी या दिवशी, आणि पुण्यतिथी माघ वद्य तृतीयेला असते. नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती.[१]


महाराजांच्या शिव-भक्ती विषयी थोडक्यातसंपादन करा

विविध अठरापगड जाती जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता. संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्ध होती. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगला जम बसविला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव-आराधना करीत असे. रोज पहाटे जोतिर्लिंगावर ते बेलपत्र वाहीत. ते कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती, यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत असे.[२]

एकदा एका विठ्ठलभक्त सावकारासाठी त्यांनी सोन्याची साखळी बनवली. मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या कमरेला सोनसाखळी घातली पण ती एक वीतभर जास्त झाली होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार याच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सागितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले. परंतु विठ्ठलाला साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले शेवटी स्वतः मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व जेव्हा सोनसाखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात गळयापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. बघतात तर काय समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच. यामुळे ते खूपच गोधळून गेले. शेवटी प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले की पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. शिव आणि विष्णू भिन्न नाहीत एकच आहेत, हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगला म्हणाले,

देवा तुझा मी सोनार । तुझ्या नामाचा व्यवहार ।।

नरहरी महाराजांचा जन्मच हरि-हराचा वाद मिटविण्यासाठी झाला. नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव सोनार (महामुनी) होते असे असे म्हटले आहे. संत नरहरी सोनार यांचे मुळ आडनावं महामुनी, गोत्र सनातन, शाखा यजुर्वेद विश्वब्राम्हण असून त्यांची समाधी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरा समोर आहे, समाधी ची पूजा अर्चना वंशज श्री महामुनी यांचे तर्फे केली जाते.संत नरहरी सोनार हे वडिलोपार्जित सुवर्णकाम करीत असल्याने त्यांचे आडनाव पुढे सोनार असे झाले.पंढरपूर येथे त्यांचे वंशज श्री प्रमोद दिगंबरराव महामुनी यांचे वडिलोपार्जित विश्वकर्मा निवास म्हणून जुने घर आहे, नरहरी महाराजांच्या पादुका आणि देव पूजेतील पितळी विठ्ठल मूर्ती त्यांचे कडे असून षोडशोपचारे पूजा केली जाते. वंशज श्री प्रमोद महामुनी हे पौरोहित्य करतात.

चित्रपटसंपादन करा

  • नरहरी सोनार यांच्या जीवनावर कटिबंध नावाचा मराठी चित्रपट आहे. त्याचे लेखन नवनाथ पवार यांनी केले असून, दिग्दर्शन मुकुंद भुजबळ यांचे आहे. निर्मिती संजय जाधव यांची आहे. हा चित्रपट २६ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित झाला
  • नरहरी-नरहरी ( चित्रपट ) (निर्माते - वासुदेव शाश्वत अभियान) (२०१६)
  • संत नरहरि सोनार - मराठी भक्तिपूर्ण फिल्म (निर्माते - समीर देशमुख, किरण रोंडे) (२०१५)

पुस्तकेसंपादन करा

  • श्री संत नरहरी सोनार चरित्र (लेखक - प्रा.बाळकृष्ण लळीत) [३]
  • संत नरहरी सोनार (डाॅ. मनोहर रोकडे)
  • संत शिरोमणि 'श्री नरहरि सोनार' (एक जीवन परिचय) - श्री राजु साह

पुण्यतिथीसंपादन करा

परळी वैजनाथ येथे आणि अन्य ठिकाणी माघ कृष्ण तृतीयेला श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी महोत्सव होतो.

अभंगसंपादन करा

नरहरी सोनारांच्या नावावर फार थोडे अभंग उपलब्ध आहेत. 'सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई', 'शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा', माझे प्रेम तुझे पायी', आणि देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार' हे अभंग विशेष प्रसिद्ध आहेत.[४]

नरहरी सोनारांचे अभंग**

                  **१ देवा तुझा मी सोनार I तुझे नामाचा व्यवहार I  
                     देह बागेसरी जाणे I अंतरात्मा नामसोने I      
                     त्रिगुणाची करून मूस I आत ओतिला ब्रम्हरस I  
                     जीव शिव करुनी फुंकी I रात्रन्‌दिवस ठोकाठाकी I  
                     विवेक हातवडा घेऊन I कामक्रोध केला चूर्ण I 
                     मन बुद्धीची कातरी  I  रामनाम सोने चोरी I 
                     ज्ञान ताजवा घेऊन हाती I  दोन्ही अक्षरे जोखिती I 
                     खांद्या वाहोनी पोतडी I उतरला पेंल थंडी I 
        https://www.youtube.com/watch?v=fWNh0b36DPM&feature=youtu.be&fbclid=IwAR3YYvQM5xi5NGO0uCBrZ2yu3H6snv-eWAuTIswCMrWYYHyZxTVDmQDi71c             नरहरी सोनार हरीचा दास I भजन करा रात्रन्‌दिवस ॥             
                 **२ काय तुझी थोरी वर्णू मी पामर I
                      होसी दयाकर कृपानिधी 
                      तुझ सरशी दया नाही आणिकासी I 
                      असे हृषीकेशी नवल एक I 
                      जन हो जोडी करा नाम कंठी धरा I 
                      जणे चुके फेरा गर्भवासी  I 
                      नरदेही साधन समता भवभक्ती I  
                      निजध्यास चित्ती संतसेवा I  
                      गरुपदी निश्चळ परब्रह्म पाहे I 
                      नरहरी राहे एक चित्ते ॥   
                   **३ पापांचे पर्वत मोठे मोठे झाले I 
                       शरीर नासले अधोगती ॥    
                       जन्मांतरी केले अवघे व्यर्थ गेले I 
                       देह नासले हो क्षणामाजी ॥
                       जिणे अशाश्वत देह नाशवंत I 
                       अवघे सारे व्यर्थ असे देखा ॥
                       काही नाही दान काही नाही पुण्य I 
                       जन्मासी येऊनी व्यर्थ जाय ॥
                       परोपकार काहीनाही केला देवा I 
                       सद्गुरु केशवा ह्रदयी घ्यावा ॥
                       सारामध्ये सार नाम असे थोर I 
                       ह्रदयी निरंतर नरहरीच्या ॥

संदर्भसंपादन करा

  • नामदेव

नामदेव - विकिपीडिया

विष्णुदास नामा याच्याशी गल्लत करू नका.
Disambig-dark.svg
हा लेख संत ज्ञानेश्वर समकालीन संत नामदेव (नामदेव दामाशेटी रेळेकर) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नामदेव (निःसंदिग्धीकरण).

संत शिरोमणी नामदेव महाराज (जन्म : २६ ऑक्टोबर १२७०; संजीवन समाधी : ३ जुलै १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रजभाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातहिले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा,नरसी नामदेवयागावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. नरसी नामदेव हे गांव महाराष्ट्रातील मराठवाडा मधील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार २०१९ ला झाला.

भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.

दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. म्हणजे ते शिंपी होते. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी(नरसी नामदेव) हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०) मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.

संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथज्ञानेश्वर महाराज, सोपानदेवमुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळाविसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.

पत्‍नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणार्‍या संत जनाबाई या त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.

संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथंतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.

कीर्तनांत अनेक चांगल्या  ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.

भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी' असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.

भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. नक्की दिनांकाविषयी एकवाक्यता दिसून येत नाही. कालनिर्णय या दिनदर्शिकेत पुण्यतिथी दिनांक २४ जुलै असा दिलेला आढळतो. संत नामदेव हे कीर्तने करत करत भारतभर फिरले.

नामदेवांसंबंधी आख्यायिका

  • नामदेव महाराज खूप लहान असताना, त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले `आज देवाला प्रसाद तू दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नेवैद्य दाखविला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा हा खाईल. त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्यासमोर प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी भक्षण केला.
  • कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज, तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे लागले.
  • एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव औंढा येथे नागनाथाच्या दर्शनासाठी गेले असता मंदिरात भजन/कीर्तन न करण्यास पुजाऱ्यांनी त्यांना विनवले. त्यांच्या विनंतीस मान ठेवून, नामदेव मंदिराच्या मागील बाजूस बसून दर्शनासाठी नागनाथाची आळवणी करू लागले. नामदेवाची भक्ती बघून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वाभिमुख असलेले मंदिर फिरवून पश्चिमाभिमुख केले, ते आजतागायत तसेच आहे.

नामदेवांचे साहित्य आणि नामदेवांसंबंधी लिहिले गेलेले साहित्य

  • घास घेई पांडुरंगा (कादंबरी, लेखक -रवींद्र भट)
  • चिरंतनाचा ज्ञानदीप : संत नामदेव (सुभाष कि. देशपांडे)
  • आद्य मराठी आत्मचरित्रकार-संत नामदेव (डॉ.सौ. सुहासिनी इर्लेकर)
  • नामदेव गाथा (संपादक : नाना महाराज साखरे)
  • नामदेव गाथा (संपादक: ह.श्री. शेणोलीकर)
  • संत नामदेव-तुकारामांचे सांस्कृतिक संचित (डॉ. श्रीपाल सबनीस)
  • नामदेवांची गाथा (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन -एकूण २३३७ अभंग)
  • संत नामदेव गाथा (कानडे / नगरकर)
  • श्री नामदेव : चरित्र, काव्य आणि कार्य (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)
  • श्री नामदेव चरित्र (वि.स. सुखटणकर गुरुजी-आळंदी)
  • श्री संत नामदेव महाराज चरित्र (प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत)
  • श्री नामदेव चरित्र ग्रंथ तत्त्वज्ञान (शंकर वामन दांडेकर)
  • श्री नामदेव चरित्र (वि.ग. कानिटकर) (सरकारी प्रकाशन)
  • संत नामदेव (बालवाङ्‌मय, रवींद्र भट)
  • संत नामदेव चरित्र (बालवाङ्‌मय, शैलजा वसेकर)
  • संत नामदेवांचे कवित्व आणि संतत्व (डॉ. श्रीपाल सबनीस)
  • संत शिरोमणी बाबा नामदेव (दीपक बिचे)

नामदेवांची स्मारके

  • महाराष्ट्रातील शिंप्यांच्या एका पोटजातीला नामदेव शिंपी म्हणतात.
  • पुण्यात महर्षीनगर येथील एका शाळेला संत नामदेव शाळा असे नाव दिले आहे.
  • पुणे विद्यापीठात एक संत नामदेव अध्यासन आहे, आणि संत नामदेव सभागृह आहे.
  • पंजाबमधील घुमान येथे बाबा नामदेव नावाचे एक पदवी महाविद्यालय आहे. (स्थापना १७-७-२०१६). घुमान गावी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते.
  • हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव या गावी त्यांचे एक मोठे स्मारक आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. 

संदर्भ

अग्निमाजी पडे बाळू माता धावे कनवाळू

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

  • निर्मला (??)

संत निर्मळा ह्या १४ व्या शतकातील भारताच्या महाराष्ट्रामधील एक संत व कवयित्री होत्या. संत चोखामेळायांच्या त्या धाकट्या बहीण होत्या व त्यांनाही आपल्या भावाप्रमाणे पवित्र मानण्यात आले.[१] निर्मला यांनी संत बंका यांच्याशी विवाह केला होता.[२] त्यांच्या लेखनमध्ये मुख्यत्वे अभंगांचा समावेश आहे जे जातीव्यवस्थेच्या परिणामी आलेल्या अन्याय आणि असमानतांचे वर्णन करतात.[३]

निर्मलांनी संसारिक विवाहित जीवन पश्चात्ताप केला आणि पंढरपूरच्या देवामध्ये आनंद मानला. त्यांनी आपल्या पती बंकांचा उल्लेख कधीही त्यांच्या कवितांमध्ये केला नाही.[४]

संदर्भसंपादन करा

  1. ^ Kher, B.G. (1979). "Maharashtra Women Saints". In Swami Ganananda; Steward-Wallace, John (eds.). Women Saints, East & West. Hollywood, Calif.: Vedanta. pp. 61–62. ISBN 0874810361.
  2. ^ Zelliot, Eleanor (2000). "Sant Sahitya and its Effect on Dalit Movements". In Kosambi, Meera (ed.). Intersections: Socio-cultural Trends in Maharashtra. New Delhi: Orient Longman. p. 190. ISBN 8125018786.
  3. ^ Ghokale-Turner, Jayashree B. (1981). "Bakhti or Vidroha: Continuity and Change in Dalit Sahitya". In Lele, Jayant (ed.). Tradition and modernity in Bhakti movements. Leiden: Brill. p. 29. ISBN 9004063706.
  4. ^ Zelliot, Eleanor (2008). "Chokhamela, His Family and the Marathi Tradition". In Aktor, Mikael; Deliège, Robert (eds.). From Stigma to Assertion: Untouchability, Identity and Politics in Early and Modern India. Copenhagen: Museum Tusculanum Press. pp. 76–86. ISBN 8763507757.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
  • निवृत्तिनाथ

निवृत्तिनाथ

निवृत्तिनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली.

निवृ​त्तिनाथांचे जन्मवर्ष १२७३ ​किंवा १२६८ असे सां​गितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृ​त्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.

गैनीनाथ वा ग​हिनीनाथ हे ​निवृत्तिनाथांचे गुरू होते. ‘निवृत्तिचे ध्येय कृष्ण हा​चि होय । ग​यिनीनाथे सोय दाख​विली ॥’, असे निवृत्तिनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हणून ठे​विले आहे सुमारे तीन-चारशे अभंग आ​णि एक ह​रिपाठ एवढी रचना, ​निश्चितपणे निवृत्तिनाथांची आहे असे म्हणता येईल.. योगपर, अद्वैतपर आ​णि कृष्णभ​क्तिपर असे हे अभंग आहेत. रसवत्तेच्या दृष्टीने ते काहीसे उणे वाटतात; तथा​पि निवृ​त्तिनाथांची ख्याती आ​णि महत्त्व कवी म्हणून नाही, तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक ‌म्हणून आहे. त्यांनी ‘आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश ​दिले व आपण त्या यशापासूनही ​निवृत्त झाले’ असे निवृ​त्तिनाथांबद्दल म्हटले जाते. ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वरांनी संतंमंडळींसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही निवृत्तिनाथ ‌‌‌त्यांच्या सोबत होतेच. निवृत्तिदेवी, निवृ​त्तिसार आ​णि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथही निवृ​त्तिनाथांनी ​लिहिल्याचे म्हटले जाते; तथापि ते अनुपलब्ध आहेत. रा. म. आठवले यांनी निवृत्तेश्वरी असा एक ग्रंथ संबोधिला आहे. ज्ञानेश्वरीप्रमाणेच हेही गीतेवरील एक भाष्य आहे. तथापि हा ग्रंथ निवृत्तिनाथांचाच आहे, असे अद्याप सिद्ध झालेले नाही. धुळ्याच्या श्रीसमर्थवाग्देवतामंदिरात ‘सटीक भगवद्‌गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते निवृत्तिनाथांची म्हणून ठेविली आहेत.

ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्थ झाल्यानंतर मुक्ताई ‘अन्नपाणी सकळ’ त्यागूनी परलोकवासी झाली, व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेविला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आली आहे. निवृत्तिनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला असते.

निवृत्तिनाथांवरील मराठी पुस्तके 

बाह्य दुवे 

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
  • बंका

संत बंका हे १४ व्या शतकातील भारताच्या महाराष्ट्रामधीलएक संत व कवी होते.[१] वंका म्हणूनही ते ओळखले जातात.[२] ते निर्मळेचे पती आणि संत चोखामेळा यांचे मेहूणा होते. बंका यांचा जन्म मेहेनपुरी मध्ये एका जन्मलेल्या, बंकांचा अस्पृश्य असलेल्या महार जातीचा कुटुंबात झाला होता.[३] त्यांच्या बहुतांश अभंगांत त्यांनी विठ्ठलाची प्रशंसा केली. वारंवार, त्यांनी त्यांच्या निम्न जातीच्या जन्माचे वर्णन केले.[४]

अस्पृश्यांच्या महारूपासून भक्ती कवी संत म्हणून, बंकाने अस्पृश्यतेबद्दल आवाज उठवला जो सध्याच्या दलित साहित्याशी अतिशय संबंधित आहे.[१]

संदर्भसंपादन करा

  1. ↑ a b Ghokale-Turner, Jayashree B. (1981). "Bakhti or Vidroha: Continuity and Change in Dalit Sahitya". In Lele, Jayant (ed.). Tradition and modernity in Bhakti movements. Leiden: Brill. p. 29. ISBN 9004063706.
  2. ^ Zelliot, Eleanor (1976). "A Historical Introduction to the Warakari Movement". In Harrison, Tom (ed.). Living Through the Blitz. Cambridge University Press. p. 40. ISBN 9780002160094.
  3. ^ Zelliot, Eleanor (2000). "Sant Sahitya and its Effect on Dalit Movements". In Kosambi, Meera (ed.). Intersections: Socio-cultural Trends in Maharashtra. New Delhi: Orient Longman. p. 190. ISBN 8125018786.
  4. ^ Zelliot, Eleanor (2008). "Chokhamela, His Family and the Marathi Tradition". In Aktor, Mikael; Deliège, Robert (eds.). From Stigma to Assertion: Untouchability, Identity and Politics in Early and Modern India. Copenhagen: Museum Tusculanum Press. pp. 76–86. ISBN 8763507757.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
  • भागू (??)

भागू ह्या भक्ती संप्रदायातील संत व कवयित्री होत्या. त्या महार जातीच्या होत्या. त्यांच्याबद्दल थोडी माहिती उपलब्ध आहे. श्रीसकलसंतगाथा मध्ये हिला "भागू महारीन" असे म्हटले जाते.[१]


Wiki letter w.svgकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यासमदत करा. 

संदर्भसंपादन करा

  1. ^ Zelliot, Eleanor (2008). "Cokhamela, His Family and the Marathi Tradition". In Aktor, Mikael (ed.). From Stigma to Assertion: Untouchability, Identity & Politics in Early & Modern India. Copenhagen: Museum Tusculanum Press. p. 86. ISBN 9788763507752.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
  • मुक्ताबाई

मुक्ताबाई

संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानेश्वर याने दरवाज्याची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे.

योगी चांगदेवांचा अहंकार छोट्याश्या मुक्ताबाईचे अलौकिक ज्ञान बघून गळून गेला होता. त्यांनी मुक्ताबाईना आपले गुरू मानले. मुक्ताबाईंनी 'ज्ञानबोध' या ग्रंथाचेही लेखन केले आहे असे संशोधनान्ती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.

जीवनपट 


जन्म - आश्विन शुद्ध प्रतिपदा (घटस्थापना) (शके ११९९ किंवा शके १२०१)
ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा - मातापित्यांचा देहत्याग - ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली सनद - विसोबा खेचर शरण आले - शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठण गावी आले. - ताटीच्या अभंगाद्वारे ज्ञानेश्वरांना विनवणी - ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरीची निर्मिती - मुक्ताबाईने चांगदेवाना 'पासष्टी'चा अर्थ सांगितला. - मुक्ताबाईचा पहिला शिष्य - चांगदेव - नामदेवांची भेट - गोरक्षनाथ कृपेचा वर्षाव - अमृत संजीवनीची प्राप्ती - चिरकाल अभंग शरीराचे मिळालेले वरदान - निवडक शिष्यांसमवेत अज्ञातवास - तीर्थयात्रेवरून परतलेल्या ज्ञानदेवादींची भेट - ज्ञानेश्वरांची समाधी (आळंदी) - सोपान व वटेश्वरांची समाधी (सासवड) - चांगदेवांची समाधी (पुणतांबे) - आपेगावी मुक्काम - वेरूळ, घृष्णेश्वर येथे मुक्काम - 'ज्ञानबोध' ग्रंथाची निर्मिती - तापीतीरी स्वरूपाकार झाली. (वैशाख वद्य दशमी){संदर्भ हवा}
}

साहित्य 

मुक्ताबाईचे स्वतःचे साहित्य :-

मुक्ताबाईंचे कल्याण-पत्रिका, मनन, हरिपाठ, ताटीचे अभंग हे साहित्य आहे. त्यांची ‘निवृत्तीप्रसादे मुक्ताबाई’ ही अभंगरूपी कविता अद्याप अप्रसिद्ध आहे.

मुक्ताईंवरील पुस्तके 

  • मुक्ताई जाहली प्रकाश(संशोधन) - स्वामी प्रा.डॉ तुळशीराम महाराज गुट्टे ( संत साहित्यिक )
  • आदिशक्ती मुक्ताई -प्र. न. पित्रे (धार्मिक)
  • कडकडोनी वीज निमाली ठायींचे ठायीं (संत मुक्ताबाई : व्यक्ती आणि वाङ्‌मय) - ललितेतर संशोधन अभ्यासग्रंथ - लेखिका केतकी मोडक
  • धन्य ती मुक्ताई - सुमति क्षेत्रमाडे (कादंबरी)
  • मी बोलतेय मुक्ताई - नीता पुल्लीवार (ललित)
  • मुक्ताई - मंदा खापरे (कादंबरी)
  • मुक्ताई - मृणालिनी जोशी (ललित)
  • मुक्ताई - शांता परांजपे (ललित)
  • श्री संत मुक्ताबाई चरित्र - प्रा. बाळकृष्ण लळीत
  • मुक्ताबाई क्रांतिदर्शी - नंदन हेर्लेकर
  • मुक्तीकडून मुक्तीकडे (संत मुक्ताबाईंचे व्यक्तिचित्रण, लेखिका - सुहासिनी इर्लेकर)


[१][२]

  1. ^ "संत मुक्ताबाई — विकासपीडिया"mr.vikaspedia.in2018-07-02 रोजी पाहिले.
  2. ^ मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री


स्मृतिप्रीत्यर्थ 

  • जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद तालुक्याचे नाव बदलून संत मुक्ताईच्या नावावरून मुक्ताईनगर केले आहे.
  • पुण्यातील येरवडा येथे मेंटल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी हॉस्पिटलच्या आवारातच मुक्ताई निवास नावाची धर्मशाळा स्थापन करण्यात आली आहे.[१]

हेही पहा 

बाह्य दुवे 

संदर्भ 

  1. ^ कडकडोनी वीज निमाली ठायीचे ठायी- डॉ. केतकी मोडक


  • राका कुंभार

संतचरित्रे - राका कुंभार

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. 



राका कुंभार
कुंभार तो राक कांता त्याची बंका । कन्या नाम रंका तिघे जण ॥१॥
पंढरीक्षेत्रांत राहतां आनंदें । वाचे गोविंद आळविती ॥२॥
करिती आपुला स्वकर्म व्यवहार । वाचे निरंतर रामनाम ॥३॥
घडोनि भाजणें ठेविली घरांत । व्याली डेरियांत मांजर ते ॥४॥
न देखितां त्यानें आवा तो रचिला । अग्नि तो लाविला तेचि वेळां ॥५॥
फिरूनि मांजर घरासि ते आली । नाहींत तीं पिल्लीं डेरा तोही ॥६॥
आव्यापाशीं तेव्हां आली ती धांवत । ओरडत फिरत भउताली ॥७॥
पाहूनि राका समजला मनीं । आहा चक्रपाणी काय केलें ॥८॥
जळो जळो माझा प्रपंच व्यवहार । नाहीं म्यां विचार केला देवा ॥९॥
करावया गेलों प्रपंचाचें हित । पापाचे पर्वत झाले माथां ॥१०॥
अज्ञान हीं बाळें जळतील आतां । धांव पंढरीनाथा येचि वेळां ॥११॥
पांडव ते रक्षिले लाक्षातें जोहरी । तैसी करी परि पिल्लियांसी ॥१२॥
आगीमाजी तुवां प्रल्हाद रक्षिला । अगाध हें तुला काय झालें ॥१३॥
रक्षीं यासी आतां येऊनियां अंगें । घेईन वैराग्य नवस हाचि ॥१४॥
तिघांजईं तेव्हां त्यजिलें अन्नपाणी । धांव चक्रपाणी लवलाहीं ॥१५॥
तीन रोज झाले शांत झाला अग्नि । पाहाती उकलूनि आवा तेव्हां ॥१६॥
सर्वस्व भाजणें भाभूनियां गेलीं । खेळताती पिल्लीं डेरियांत ॥१७॥
कच्च असे डेरा नसे आंच त्याला । माझें नवसास पावला पांडुरंग ॥१८॥
पाहती सकळ पंढरीचे लोक । अगाध कवतुक देवाजीचे ॥१९॥
आनंदोनी राका बोलवी ब्राम्हण । दिलें तें लुटून घर तेव्हां ॥२०॥
वेंचूनियां चिंध्या लाविती ढुंगासी । भावें ह्रषिकेशी आळविती ॥२१॥
जाऊनियां वनीं वेंचिताती काष्ठें । उदरापुरतें विकिताती ॥२२॥
अखंड करिती नामाचा गजर । ध्यानीं मनीं वर रखुबाईचा ॥२३॥
बंका गेली असे चंद्रभागे स्नाना । नामयाचि कन्या धुया आली ॥२४॥
बंका बोले बाई सिंतोडे येतील । ऐकूनियां बोले येरी तिसी ॥२५॥
जातीची कुंभार कामीक वैराग्य । घेतलेंसे सोंग कासीयासी ॥२६॥
ऐकूनियां बंका करीत उत्तर  । बौद्ध अवतार पांडुरंग ॥२७॥
रडका हा नामा घॆतलीसे आळी । त्यानें वनमाळी बोलविला ॥२८॥
अबोल हा देव बोलविला यानें । काय थोरपण आलें यासी ॥२९॥
वाढविली कीर्ति जगांत डांगोरा । बोलविला खरा पांडुरंग ॥३०॥
चंद्रभागे तीरीं झाला वृत्तांत । श्रुत झाली मात नामयासी ॥३१॥
नामदेव तेव्हां आले राउळासी । विनंति देवासी करुनी बोले ॥३२॥
राकाकुंभारानें घेतलेंसे वैराग्य । कांहो केला त्याग संसारींचा ॥३३॥
बोले पांडुरंग निष्काम हे भक्ती । दावितों प्रचिती तुजलागी ॥३४॥
विठ्ठल रखुमाई नामा असे संगें । आलीं तेव्हां तिघें बनाप्राती ॥३५॥
रुक्मिणीनें तेव्हां काढुनी कंकण । ठेविलें झांकून काष्ठामाजी ॥३६॥
राका बंका वंका वेंचिताती काष्ठ । आली अव्चित तया ठायां ॥३७॥
उचलितां काष्ठ देखिलें कंकण । दिलें तें ढाकून तेचि वेळां ॥३८॥
म्हणती याजलागीं विटाळ जाहला । न घेती तयाला म्हणोनियां ॥३९॥
पाहुनी रुक्मिणी विस्मय करीत । निष्काम हे भक्त देखीयेले ॥४०॥
बोले रखुमबाई अहो पांडुरंगा । भेटावें श्रीरंगा याज लागीं ॥४१॥
नामा म्हणे देवा वंदितों मी चरण । धरा आलिंगून तिघांजणा ॥४२॥
होती हे आवडी देवाजीचे चित्तीं । आलिंगिलीं प्रीतीं तिघेजण ॥४३॥
राका बंका वंदिती चरण । कांहो येणें केलें देवराया ॥४४॥
उष्णकाळ दिन श्रमली माझी आई । बैसा रसुमाबाई छायेखालीं ॥४५॥
ऐसी असे ज्याची देवावरी माया । करी त्यासी दया पांडुरंग ॥४६॥
नामदेव बोले त्यचा मी हा दास । शरण तयास वारंवार ॥४७॥
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

समर्थ रामदास

समर्थ रामदास स्वामी

महाराष्ट्रातील आध्यात्मिक संत


समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (२४ मार्च . १६०८जांबमहाराष्ट्र - १३ जानेवारी. १६८१ , सज्जनगडमहाराष्ट्र), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते.[१] रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले.[२] ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते.[३] पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही त्यांनी केले आहे.

रामदास स्वामी
Samarth ramdas swami original.jpg
मूळ नावनारायण सूर्याजीपंत ठोसर
जन्मचैत्र शु. ९, शके १५३० [२४ मार्च १६०८]
जांबजालना जिल्हा, महाराष्ट्र
निर्वाणमाघ कृ. ९ ,शके १६०३ [१३ जानेवारी १६८१]
सज्जनगडसातारा जिल्हा, महाराष्ट्र
संप्रदायसमर्थ संप्रदाय
गुरूप्रभू श्रीरामचंद्र
भाषामराठी
साहित्यरचनादासबोध, मनाचे श्लोक
कार्यभक्ति-शक्तीचा प्रसार, जनजागृती, समर्थ-संप्रदाय व मठांची स्थापना
प्रसिद्ध वचनजय जय रघुवीर समर्थ
संबंधित तीर्थक्षेत्रेसज्जनगडशिवथर घळ, चाफळ
वडीलसूर्याजीपंत ठोसर
आईराणूबाई सूर्याजीपंत ठोसर.


पूर्वाश्रमीचा परिवारसंपादन करा

समर्थ रामदास स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर असे होते. ते ऋग्वेदी असून जमदग्नी हे त्यांचे गोत्र होते. ते सूर्योपासक होते. त्यांच्या पत्‍नीचे, म्हणजे गंगाधर-नारायणांच्या आईचे नाव 'राणूबाई ' होते.[४]

सूर्याजीपंत आणि सरकारी अधिकारी

बालपणसंपादन करा

समर्थ रामदासस्वामी(नारायण) यांचा जन्म श्रीक्षेत्र जांबसमर्थ या गावी (जालना जिल्हा) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. ठोसरांचे घराणेच सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकर होता. . लहानपणी नारायण साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होता. त्याचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंड्याचा. एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला. एकदा नारायण लपून बसला, काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडला. "काय करीत होतास" असे विचारल्यावर "आई, चिंता करितो विश्वाची" असे उत्तर त्याने दिले होते.या मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येईल या कल्पनेने त्याचे वयाच्या १२व्या वर्षी लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी "सावधान" हा शब्द उच्चारताच तो ऐकून, नेसलेले एक व अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रांनिशी नारायण लग्नमंडपातून पळाले. लोकांनी पाठलाग केला. पण त्यांनी तातडी करून गांवाबाहेरची नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली.[४]

तपश्चर्या आणि साधनासंपादन करा

पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन रामदासांनी रामाचे दर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली.वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला असे मानले जाते.

नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकाडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. या तपःसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास श्री राम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत.रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभु श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले असे मानले जाते. समर्थ दुपारी केवळ ५ घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत. त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग ग्रहण करत असत. समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर दोन तास ग्रंथांचा अभ्यास करीत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच 'करुणाष्टके' होत. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात महत्वाचे स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात.[४]त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते.

समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा यामागे विचार होता.

तीर्थयात्रा आणि भारतभ्रमणसंपादन करा

तुम्हास जगोद्धार करणे आहे /तुमची तनु ते आमुची तनु पाहे /दोनी तपे तुमची रक्षिली काय हे /धर्मस्थापनेकारणे //

समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे, ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. आपल्याला प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले, आत्मसाक्षात्कार झाला. ‘


शिखांचे सहावे धर्मगुरू हरगोविंद आणि समर्थ रामदास

भारत-भ्रमण करीत असता श्रीनगरमध्ये शीखांचे सहावे गुरु हरगोविंद यांची व समर्थांची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा/बातचीतही झाली होती. हरगोविंदसिंगांबरोबर १००० सैनिक असायचे. त्यांच्या कमरेला दोन तलवारी असत. त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले. समर्थांनी हरगोविंदांना विचारले - " आपण धर्मगुरू आहात. या दोन-दोन तलवारी आपण का बाळगता ?" तेव्हा गुरु हरगोविंद म्हणाले - " एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शीलरक्षणासाठी". समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले - "आणि हा सारा फौजफाटा ?" त्यावर हरगोविंद म्हणाले - " धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहे , केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्रसज्ज झाले पाहिजे. या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते. आपण बलशाली झाले पाहिजे.'समान-शीले-व्यसनेषु सख्यम्' या न्यायाने दोघांत सख्य झाले. समर्थ गुरु हरगोविंद यांच्या बरोबर सुवर्ण मंदिरात आले. तिथे ते दोन महिने राहिले.तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले.... त्याला ते गुप्ती म्हणत. बाहेरून दिसायला कुबडी. जप करतांना या कुबडीवर बगल ठेवून चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांचे संचालन करता येत असे. कुबडीच्या दांड्याला आटे असत, त्यात छोटी तलवार असे.समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सज्जनगडावर पहायला मिळते. भारत प्रवास करीत असतांना ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्यांचा आणि स्वाभिमानाचा संदेश देत."समर्थांना हिमालयात प्रभू रामचंद्रांकडून धर्मसंस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती. त्यापाठोपाठ गुरु हरगोविंद यांनीही त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली.

समर्थ रामदासांनी स्थापन केलेले मारुतीसंपादन करा

समर्थांनी ११ मारुतींची स्थापना केली. गावोगाव मारुतीची देवळे बांधली. मारुती ही शक्तीची देवता असल्याने मारुतीच्या मंदिराच्या परिसरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत. साताराचाफळसज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि अकरा मारुतींचीदेवळे याच परिसरात आहेत. ती पुढीलप्रमाणे: 
(१) दास मारुती, चाफळ (राम मंदिरासमोर)
(२) वीर मारुती, चाफळ (राम मंदिरामागे)
(३) खडीचा मारुती, शिंगणवाडीचाफळ (डोंगरावर)
(४) प्रताप मारुती, माजगांवचाफळ
(५) उंब्रज मारुती (ता. कराड)
(६) शहापूर मारुती (उंब्रज जवळ)
(७) मसूर मारुती (ता. कराड)
(८)बहे-बोरगांव (कृष्णामाई) मारुती (जि. सांगली)
(९) शिराळा मारुती (बत्तीस शिराळा, जि. सांगली)
(१०) मनपाडळे मारुती (जि. कोल्हापूर)
(११) पारगांव मारुती (जि.कोल्हापूर).[४] ही ती गावे होत.

समर्थ स्थापित मठसंपादन करा

१. जांब

२. चाफळ

३. सज्जनगड

४. डोमगाव

५. शिरगाव

६. कन्हेरी

७. दादेगाव [४]


जीवनसंपादन करा

वयाच्या ३६व्या वर्षी रामदासस्वामी महाराष्ट्रात परत आले.

भारत प्रवास करतांना शेवटी समर्थ पैठणला आले. पैठणला ते एकनाथांच्या वाड्यातच उतरले. नाथ आणि त्यांची पत्‍नी या दोघांनी देह ठेवलेला होता. नाथांची पत्‍नी समर्थांची मावशी होती. पण समर्थांनी कुणालाच ओळख दिली नाही. एक फिरता साधू म्हणून ते त्या घरात राहिले.

मात्र तिथे त्यांना जांब गावातील सगळ्या बातम्या समजल्या. लग्नमंडपातून पलायन केल्यावर २४ वर्षे जांबशी त्यांचा कोणताच संपर्क नव्हता. त्यांच्या वहिनीला दोन मुले झाल्याचे व आई राणूबाई अंध झाल्याचेही त्यांना तेथे कळले.त्यांच्या मनात जांबला जाऊन आईला भेटावे, असे येऊन गेले. समर्थ जांबला पोहोचले, पण तेथेही त्यांनी कोणाला आपली ओळख दिली नाही. आपल्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली. त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली. तिची राम आणि शाम ही दोन्ही मुले भिक्षा मागणाऱ्याया गोसाव्याकडे पाहत होती. त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत. २४ वर्षात दाढी, जटा वाढविल्याने आणि व्यायामाद्वारे शरीर बलदंड झाल्याने पार्वतीबाईदेखील दीराला ओळखू शकल्या नाहीत. अखेर समर्थांनी आपले खरे रूप प्रकट केले. नारायण आल्याने राणूबाईंना खूप आनंद झाला. २४ वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या. त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच राणूबाईंना दिसू लागले, असे मानले जाते.


समर्थ निसर्गप्रेमी होते. नद्यांचा उगम अथवा संगम ही त्यांची आवडीची ठिकाणे होती.

जीवनकार्यसंपादन करा

समर्थांच्या शिष्य मंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होत.समर्थांचे एक वैशिष्ट्य होते - समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजावून सांगत. समर्थांची उपदेशाची भाषा अत्यंत साधी सोपी होती.

आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर प्रथमत: सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे, अशी इच्छा रामदासस्वामींना साहजिकच झाली. पण पुढील १२ वर्षाच्या प्रवासांत त्यांनी जे पाहिले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्यांनी त्यांच्या चारित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळी भारतांतील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, आयाबहिणी, देव, धर्म, संस्कृती, काहीच सुरक्षित नव्हते. जनतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ व उद्विग्न झाले.

सर्वस्वी नि:सत्त्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे, समाजाला प्रथम संघटित आणि शक्तिसंपन्न बनविले पाहिजे, समाजाचा लुप्त झालेला आत्मविश्वास पुन: जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली.

केल्याने होत आहे रे ।
आज आपल्या जीवनात अपयश आणि दु:ख दिसत असेल, तर त्याला आपले अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे. बहुसंख्य लोक आज सुख, आंनद, यश, कीर्ती, ऐश्वर्य, अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावीळ झाले आहेत. परंतु त्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागणाऱ्या परिश्रमाचा अभाव दिसून येत आहे. आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत विद्या, कला अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी बारा वर्षाचे परिश्रम आवश्यक मानले आहेत. या सतत केलेल्या प्रयत्नांनाच ‘तप’ असे म्हटले जाते. आपला प्राचीन इतिहास वाचला म्हणजे खर्‍या धैर्याची कल्पना येऊ शकेल. जगातील सर्व देशात आणि सर्व काळात जे विद्वान, ज्ञानी, ध्येयवादी, यशस्वी संत, महंत, कलाकार वीर पुरुष होऊन गेले त्यांनी जीवनातील धैर्याची पुंजी कधीही संपू दिली नाही. म्हणूनच परिस्थितीवर मात करुन ते यशस्वी झाले. अंत:करणात श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र कर्तव्य, ध्येय, उपासना या गोष्टी जगात सर्वश्रेष्ठ आहेत. तनाने, मनाने, धनाने आणि प्राणपणाने मला त्या पूर्ण केल्या पाहिजेत, अशी ज्याची दृढ श्रद्धा असेल त्याच्याच अंत:करणात धैर्य उत्पन्न होईल. साडेतीनशे वर्षापूर्वी, राजकीय राजवटीत जेव्हा हिंदुस्थानी जनता भयभीत झाली होती, तेव्हा श्री समर्थांनी आपले बाहू उभारून खणखणीत वाणीने लोकांना सांगितले -

धिर्धरा धिर्धरा तकवा । हडबडूं गडबडूं नका ।
केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ॥

मसूर या गावी रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोद्धाराच्या कार्याचा पाया घातला. शके १५७० मध्ये त्यांनी चाफळास राममंदिराची स्थापना केली. काही वेगवेगळ्या गांवी त्यांनी सुरुवातीला मारुतीच्या अकरा मंदिरांची स्थापना केली आणि नंतर गावोगावी. समर्थ रामदास यांनी देशभरात स्थापन केलेले एकूण अकराशे मठ आहेत. ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी’ संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी ठरवलेले कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार लोकसंग्रहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला. 
समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दर्‍याखोर्‍यातून, डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगायमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठमहंत निर्माण करून, निःस्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभु श्रीरामचंद्र, आदिशक्ति तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. अक्षरश: शेकडो मारुती मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वतः डोंगरदऱ्यांत, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. समर्थावर संत एकनाथाच्या वाङ्‌मयाचा प्रभाव असल्याने प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.

‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे। भगवंताचे।’ या त्यांच्याच सूत्रानुसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला. विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणाऱ्या समर्थांचे हे मुख्य उद्दिष्ट होते छत्रपती शिवाजीमहाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन रामदास स्वामी भारावून गेले.

शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना दिलेली सनदसंपादन करा

छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास यांचे शिष्य होते. स्वराज्य रक्षणासाठी रामदासांनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले आहे.[४] छत्रपती शिवाजी महाराजांनी १५ सप्टेंबर १६७८ मध्ये समर्थ रामदास स्वामींना एक विस्तृत सनद लिहून काही गावे इनाम म्हणून दिली होती. याबाबतचे एक पत्र इ. स. १९०६ मध्ये धुळ्याच्या शंकरराव देवांनी ‘समर्थांची दोन जुनी चरित्रे’ या ग्रंथात प्रकाशित केले होते; पण या वेळेस देवांना या पत्राची मूळ प्रत न मिळता एक नक्कल सापडली होती.

यानंतर इतिहासाचार्य राजवाड्यांनाही या पत्राच्या काही नकला सापडल्या. शिवाय, अनेक नकला पुणे पुराभिलेखागारात इनाम कमिशनच्या दफ्तरातही सापडतात; पण या सगळ्या नकला अथवा मूळ पत्राच्या कॉपी असून मूळ पत्र हे अनेक वर्षे कोणाच्याही पाहण्यास आले नव्हते. अखेरीस मे २०१७ मध्ये लंडनच्या ‘ब्रिटिश लायब्ररी’त या मूळ पत्राची फोटोझिंकोग्राफ तंत्रज्ञानाने बनवलेली एक प्रत इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना सापडली असून, महाराष्ट्रात आजवर सापडलेल्या नकलांवर जे शेरे आहेत, त्याबरहुकूम ही प्रत असल्याचे सिद्ध होत आहे. सदर सनदेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेली ‘मर्यादेयं विराजते’ अशी अक्षरे आहेत. पत्राच्या मुख्य बाजूवरचे अक्षर आवजी चिटणिसांच्या हस्ताक्षराशी मिळतेजुळते आहे.

‘श्रीसद्‌गुरुवर्य, श्रीसकळतीर्थरूप, श्रीकैवल्यधाम, श्रीमहाराज श्रीस्वामी, स्वामींचे सेवेसी चरणरज सिवाजीराजे चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापनाजे’’, अशा मायन्याने हे पत्र सुरू होते. त्यापुढे शिवाजी महाराजांनी स्वत:च्या शब्दात पूर्वी समर्थांनी त्यांना काय उपदेश केला, त्याबद्दल थोडक्‍यात लिहिले आहे.

या पत्राची मूळ प्रत येथे आहे.

तत्त्वज्ञानसंपादन करा

रामदासस्वामी अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. केवळ ब्रह्म हेच सत्य आहे हा विचार त्यांच्या साहित्यात सर्वत्र दिसतो. त्यांच्या तत्त्वज्ञानास संत एकनाथांच्या वाङ्‌मयाची बैठक होती. दासबोधाच्या बहुतेक सर्व दशकांमध्ये ब्रह्म%, माया, जीव, जगत्‌, परमेश्वर इत्यादी गोष्टींची चर्चा आहे. पंचीकरण हा विषय समर्थांनी अतिशय सखोलपणे सांगितला आहे. परब्रह्म, मूळमाया, गुणमाया, त्रिगुण, पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, विश्वाची उभारणी व संहार, पिंड-ब्रह्मांड रचना व त्यांचे संबंध अशा अनेक विषयांचे चिंतन समर्थांच्या साहित्यात आहे. सर्व कर्मांचा कर्ता हा राम असून, आपण मिथ्या अहंकारामुळे स्वतःकडे कर्तेपण घेतो असे ते सांगतात. समर्थ रामदास स्वामी स्वतः सदैव विदेही अवस्थेमध्ये असल्याने त्यांचे हे अनुभवज्ञान त्यांनी ग्रंथरूपाने मांडले.

त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. भक्ती केल्यामुळे देव निश्चितपणे प्राप्त होतो असे त्यांनी दासबोधाच्या सुरुवातीलाच सांगितले आहे. त्यांनी स्वतः १२ वर्षे नामस्मरण भक्ती केली व त्याचा प्रसार केला. परमार्थाशिवाय केलेला प्रपंच 'भिकारी' आहे. ज्या घरामध्ये रामनाम नाही ते घर सोडून खुशाल अरण्यात निघून जावे असे समर्थ निक्षून सांगतात. देवाचे वैभव वाढवावे, नाना उत्सव करावे असे त्यांचे मत होते. समर्थांनी प्रत्ययाचे ज्ञान सर्वश्रेष्ठ मानले. अनुभवाशिवाय असलेल्या केवळ शब्दज्ञानाची त्यांनी तिखट शब्दात हजेरी घेतली आहे. भोंदू गुरू व बावळट शिष्य हे परस्परांचे नुकसान करतात असे त्यांनी सांगितले आहे

परमात्मा हा चराचरांत भरलेला असून, त्याची प्राप्ती करून घेण्यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे हे समर्थांनी अनेक स्थळी सांगितले आहे. अनेक उपनिषदांचा संदर्भ देऊन समर्थांनी या जगाचे अनित्यत्व, मिथ्यत्व प्रतिपादन केले आहे. कर्म,भक्ती, ज्ञान या मार्गांचे अनुसरण करून मुक्त होण्याचे सर्वोच्च लक्ष्य त्यांनी त्यांच्या शिष्यांपुढे ठेवले. सतत ईश्वरचिंतन करावे, सद्गुरूंची सेवा करावी, उपासनेला प्राणपणाने चालवावे, सतत परमार्थ ग्रंथांचे परिशीलन करावे असे अनेक दंडक समर्थांनी घालून दिले आहेत.

पहा : % चौदा ब्रह्म

व्यक्तिमत्त्वसंपादन करा

मध्यम उंची, मजबूत बांधा, गौर वर्ण, तेजस्वी कांति, कपाळावर लहानसे टेंगूळ, असे समर्थांचे स्वरूप होते. कमरेस लंगोटी, किंवा कधी कफनी, पायांत खडावा. लांब दाढी, जटा, गळ्यांत जपाची माळ, यज्ञोपवीत, हातांत कुबडी, काखेस झोळी, अशा थाटात समर्थांची रुबाबदार आणि दुसऱ्यावर छाप पाडणारी मूर्ती संचार करीत असे. “शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठापरी ज्ञान योगेश्र्वराचे। कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।” हा श्लोक वामन पंडितांनी समर्थ रामदासांना उद्देशून लिहिला आहे.

साहित्य व काव्यनिर्मितीसंपादन करा

समर्थ रामदास हे निसर्गप्रेमी होते. त्यांनी आपल्या निवासाच्या ज्या जागा निवडल्या त्या सर्व निसर्गरम्य जागा होत्या.[४] आजही चाफळ, शिवथरघळ, सज्जनगड आणि समर्थांच्या वेगवेगळ्या घळी पाहण्यासाठी तरुण गिर्यारोहक गर्दी करतात. काही साहसी तरुण मुले मुद्दाम पावसाळ्यात मोहीम म्हणून समर्थांची तीर्थक्षेत्रे पाहतात. समर्थांना अंगापूरच्या डोहात दोन मूर्ती सापडल्या; एक श्रीरामचंद्रांची आणि दुसरी तुळजाभवानीची. त्यांतील श्रीरामाची मूर्ती त्यांनी चाफळला स्थापन केली. श्री तुळजा भवानीची मूर्ती स्थापन करण्यासाठी ते सज्जनगडावर आले. सज्जनगडावरील प्रसिद्ध अंग्लाई देवीचे मंदिर आजही याची साक्ष देत आहे. सज्जनगडाच्या पायथ्याला समर्थांना एक बाग तयार करायची होती. या बागेत कोणकोणती झाडे लावावयाची आणि ती कशी लावावीत या संबंधीचे समर्थांचे स्वतंत्र प्रकरण आहे. यावरून त्यांचा वनस्पतीशास्त्राचा किती अभ्यास होता याची कल्पना येते. बाग प्रकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कवितेत समर्थांनी सुमारे ३५० वनस्पतींची नवे दिली आहेत. आश्चर्य म्हणजे यादी देताना पालेभाज्या, फळभाज्या, फळ, फूल, औषधी वनस्पती यांची व्यवस्थित वर्गवारी आहे. सज्जनगडावर दोन वर्षे राहून समर्थ शिवथरघळीत आले. तिथे त्यांनी समर्थ संप्रदायाचा श्रीमद दासबोध हा प्रधान ग्रंथ लिहिला. या ग्रंथात समर्थांनी प्रपंच, राजकारण, संघटन, व्यवस्थापन, व्यवहारचातुर्य, व्यक्तिमत्त्व विकास, सभ्यता आणि शिष्टाचार या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. दासबोधातील मूर्खलक्षणे वाचत असताना तर अनेकांना वाटते की, समर्थांनी आपला स्वभाव अचूकपणे कसा ओळखला? जगातील अनेक भाषांमध्ये दासबोधाचा अनुवाद झाला आहे.

समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाङ्‌मय निर्मिती केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. दासबोध[५]मनाचे श्लोक[६]करुणाष्टके[७]भीमरूपी स्तोत्र[८],अनेक आरत्या उदाहरणार्थ 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती, 'लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा' ही शंकराची आरती, कांही पदे इत्यादि त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. समर्थ रामदास स्वामींच्या आरत्यांनी घरांघरांत स्थान मिळवले आहे 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा' ही संत नामदेवांनी लिहिलेली आरती प्रसिद्ध आहे. याचा अर्थ नामदेवांच्या काळात देवांच्या आरत्या मंदिरात म्हटल्या जात होत्या. पुढे मोगलांच्या आक्रमणामुळे देवांचे उत्सव बंद पडले, अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे आरती वाङ्‌मय जनमानसाच्या स्मृतीतून नाहीसे झाले.... समर्थांनी या वाङ्‌मयाचे पुनरुज्जीवन केले. आपण ज्या विविध आरत्या म्हणतो, त्यांपैकी अनेक समर्थ रामदासांनी लिहिल्या आहेत. मोरगावला गणपतीच्या दर्शनाला गेले असताना तेथील पुजार्‍याला आरती येत नाही हे पाहून त्यांनी 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती केली. तुळजापूरची भवानी माता ही तर समर्थांची कुलस्वामिनी. तिचे दर्शन घेतांना समर्थांना 'दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी' ही आरती स्फुरली. 'सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी' ही मारुतीची आरती म्हणताना तर अंगात वीरश्रीचा संचार होतो.

समर्थांनी शंकराची आरती लिहिली, त्याची कथा मोठी गमतीशीर आहे. तीर्थयात्रा करताना समर्थ जेजुरीला आले. तिथे खंडेरायाचे दर्शन घेऊन ते लवथेश्वराला आले.जो कोणी मंदिरात झोपतो तो रात्रीच मरण पावतो, अशी या मंदिराची ख्याती होती.हे कळल्यावर समर्थांनी मुद्दाम मंदिरातच झोपायचे ठरवले. ग्रामस्थांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण समर्थ तसे जिद्दी होते. सकाळी ग्रामस्थांनी मंदिरात भीत भीतच प्रवेश केला. पाहतात तर काय ! समर्थ भगवान लवथेश्वराची पूजा करीत होते. त्याच वेळी 'लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा' या प्रसिद्ध आरतीची निर्मिती झाली. समर्थांनी खंडेराया, दत्तात्रय, विठ्ठल, श्रीकृष्ण, दशावतार अशा विविध देवांच्या आरत्या केल्या आहेत.

रामदासस्वामींनी श्रीमत्‌ ग्रंथराज दासबोध’ या पारमार्थिक ग्रंथाची रचना (महाडजवळील) शिवथरघळ येथे केली.[९]

दासबोधाशिवाय रामायणांतील किष्किंधा, सुंदर व युद्ध ही कांडे, कित्येक अभंगआरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राज-धर्म, क्षात्र-धर्म, शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज यांस पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यांतील उत्सव यांसंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय-व्यतिरेक, वैराग्य-शतक, ज्ञान-शतक, उपदेश-शतक, षड्‌रिपु-विवेक इत्यादी विषयांवरील विपुल लेखन समर्थांनी केले आहे.

समर्थांची शिकवण कशी व्यावहारिक शहाणपणाची, सावधानतेची, आत्मविश्वास उत्पन्न करणारी, रोखठोक आणि राजकारणी स्वरूपाचीही होती.

एका दृष्टीने समर्थांच्या शिकवणुकीचे सार केवळ काही शव्दांत सांगता येते - कर्म ,उपासना, ज्ञान, विवेक. भक्ती, प्रयत्‍न व सावधानता.

समर्थांनी राष्ट्रउभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही भर दिला; कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची, वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनांत ते म्हणतात- ‘दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे’ त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले -
जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।

प्रपंच सोडून जर परमार्थ केला, तर केवळ आत्मोन्नती होईल परंतु प्रपंच करून परमार्थ केला, तर राष्ट्रोन्नती होईल म्हणून ते म्हणतात की -
प्रपंची जे सावधान। तोचि परमार्थ करील जाण।
प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।।

याशिवाय गाणे कसे असावे हे सांगताना समर्थ लिहितात,
बाळके श्वापदे पक्षी। लोभती वेधती मनी।
चित्त निश्चिंत होतही। धन्य ते गायनी कळा।।
मराठी (प्राकृत) भाषेचा अभिमानही समर्थ व्यक्त करतात. समर्थ लिहितात,

‘येक म्हणजी मर्‍हाठी काय। हे तो भल्यासी ऐको नये।
ती मूर्ख नेणती सोय। अर्थान्वयाची।।
लोहाची मांदूस केली। नाना रत्‍ने साठविली।
ती अभाग्याने त्यागिली। लोखंड म्हणोनी।
तैसी भाषा प्राकृत।।’

लेखनसंपादन करा

रामदासस्वामींची वाङ्‌मय संपदा अफाट आहे. मानवी जीवन सर्वांगाने समृद्ध व्हावे म्हणून समर्थांनी विविध विषयांवर चिंतनपर रचना केल्या. दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, करुणाष्टके, शेकडो अभंग, स्तोत्रे, स्फुट रचना, रुबाया, सवाया, भारुडे, कविता, अनेक ओवीबद्ध पत्रे तसेच आरत्या त्यांनी रचलेल्या आहेत. समर्थांच्या वाङमयाचे मूल्यमापन भिन्न प्रकारे, अनेक दृष्टिकोनातून, अनेक विचारवंतांनी केले आहे. त्यांच्या एक एक वाङ्‌मय प्रकाराचा ऊहापोह करून त्या प्रकारच्या वाङ्‌मयातून समर्थ काय सांगतात, हे पहातानाही त्यांच्या भक्तीचे, शैलीचे, बुद्धिमत्तेचे कुणालाही कौतुक वाटावे. त्यांचा भाषावैभव स्वयंभू होता. त्यांना शब्दांची कधी वाणच पडली नाही.

समर्थांनी साहित्य, कला, आरोग्य, जीवनशैली, निसर्ग, बांधकाम, उद्योग या विषयांवरही लिहिले आहे. जीवनाचे कोणतेही अंग समर्थांनी सोडलेले नाही. सर्वच क्षेत्रांत उच्च ध्येय गाठण्यासाठी, यश मिळवण्यासाठी काय करावे, याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करतात. असे अनेक विषय त्यांच्या साहित्यात आहेत. समर्थांची मराठी भाषा ही मोजक्याच पण ठसठशीत शब्दांत सर्व काही सांगणारी भाषा आहे. समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव, नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण (अन्‌ त्याचे प्रकटीकरण) ही समर्थांच्या साहित्याची आणखी काही वैशिष्ट्ये. विशिष्ट लय, गेयता हीदेखील त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत. समर्थांची काव्यरचना आणि तिचे साहित्यगुण हा स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे.

परळी येथे मठस्थापना करताना मठाच्या परिसरात बाग करण्यात येत होती त्या वेळी त्यांनी बागेवरती एक अखंड प्रकरणच लिहिले. तसेच सामानगडावर किल्ले बांधताना लिहिलेल्या ‘कारखाने’ या प्रकरणाच्या पहिल्या समासात विटा कशा कराव्यात, बांधकाम या प्रकरणात मजुरांना कशी, किती कामे द्यावीत यासारखी सर्व माहिती त्यांनी दिली आहे.

रामदासांच्या काही साहित्यरचना :-

समर्थांचा अंतिम प्रवास : साहित्यातील वर्णन

संवत्सरी दुर्मती । सज्जनगडी हो इमारती । दोन सहस्र निष्क प्रीती ।वेचिली राये ।।
घर बांधिले विशाले । गृह प्रवेश करतीये वेले । वैशाख मासी भक्तपाले । प्रवेशले ।।
तेव्हा बोलिले वचन । आम्हास राहाणे स्वल्प जाण ।। 
सांप्रत ज्यास मठ म्हणतात ती इमारत जीर्ण झालेली असल्याने अंगलाई देवालय व शेजारच्या तटातील ओवऱ्यांत समर्थांच्या राहण्याची व्यवस्था केली .१६०३ च्या रामनवमीनंतर चाफळहून समर्थ परत येईपर्यंत इमारत तयार झाली आणि समर्थ आल्यावर वैशाखापासून तेथेच राहू लागले. गृहप्रवेश करतेवेळेसच समर्थ उद्गारले 'येथे आता स्वल्प काळ राहणे आहे; खोलीचे बाहेर येणे किंवा कोणाशी बोलणे बहुतेक कमीच केले. उद्धवस्वामी व आक्काबाई यांशिवाय खोलीत कोणास येऊ देत नसत. कोणी काही कार्यभाग विचारले तर 'राम बुद्धी देईल तसे करा' म्हणून उत्तर देत. 
'कोण्ही विचार पुसले काही । पूर्वीच सांगितले पाही । सांगावया आता काही । उरेचिना ।।' 
पितळेच्या खुराचा पलंग होता, त्यावर नित्य बसून असत. अन्नाचा आहार अगदी टाकला होता. पाच चार महिने तर केवळ दुधावरच होते. जवळ कोणास येऊ देत नसत. एखाद्यास प्रसंगोपात बोलाविले तर त्याने तेवढे येऊन काय आज्ञा आहे ते विचारून जावे. उद्धव अथवा आक्का हे मात्र न विचारता खोलीत ये-जा करत व काय हवे नको ते पाहत. निजले असले तर उठवून दूध देत. पण ते दूधही स्वामींनी मर्जी असली तर घ्यावे नाही तर अपेक्षा नाही म्हणून सांगावे. उद्धव एके दिवशी म्हणाले की व्याधिनिरसनार्थ अनुष्ठान बसवितो व उत्तम वैद्य आणवितो; त्यावर हसून समर्थ म्हणाले आतापर्यंत देहाची ममता टाकण्याचा उपदेश दुसऱ्यास केला त्याचे हे सार्थक की काय? प्रारब्धाने देहाचे जे व्हायचे जेथे व्हायचे ते होत राहील. तेव्हा आक्का म्हणाल्या 'आपली इच्छा नसेल तर राहिला औषधोपचार; पण आता थंडीचे दिवस आले येथे डोंगरावर तर फार थंडी असते. तेव्हा चार दिवस खाली चाफळला किंवा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी चलावे. 'समर्थांनी उत्तर दिले - 
जेथे होईल हे प्रांत (शेवट) । तेथे भजतील हो भक्त । उत्साह चाफळी अद्भुत । राहील तेव्हा ।। 
'आम्ही चाफळास जाण्याने श्री रघुवीराच्या उपासनेकडे लोकांचे दुर्लक्ष होऊ लागेल यासाठी कोठेही आता जाणे नको; 
'म्हणौनी सज्जनगडी वास । आम्हास करणे सावकास । जे होईल देहास । ते येथे घडे ।।' 
अशाही स्थितीत पौषमासी ( मार्गशीर्षाचा क्षयमास होता ) डोमगावहून कल्याण स्वामी आले. त्यांनी लिहिलेली दासबोधाची प्रत तपासून दिली. 
आमची प्रतिज्ञा ऐसी । काही न मागावे शिष्यासी । आपणामागे जगदीशासी । भजत जावे ।।' 
ही शेवटची ओवी करून ती १२-१० मध्ये घातली. 
'मध्यरात्री साहावे तासी । समर्थ पाहती त्या मूर्तीसी । मेण होते जे नयनासी । ते काढविले ।। 
श्रीचे मुखावलोकन केले । परम समाधान झाले । याउपरी आले । राहणे न घडे ।। 
अवकाश पांच दिवस । उरला आहे आम्हास । कोण पुजील त्यास । यश घडो ।। 
करणाऱ्याच्या करविल्या । आणि त्याच्या श्रमाचा । प्रसाद झाला सर्वांचा । मनोरथ ।। अर्थात हे बोलणे बहुतेक स्वगतच झाले. दुसरे दिवशी सकाळी मूर्ती पाहण्यासाठी खोलीत मंडळी आली असता समर्थांच्या मुखातून एक श्लोकार्ध निघाला - 
रविकुळटिळकाचा वेळ संनिध आला । तदुपरी भजनाशी पाहिजे संग केला ।।समर्थांचे मनोगत जाणून -
अनुदिनी नवमी हे मानसी आठवावी । बहुत लगबगीने कार्यसिद्धी करावी ।। 
हे दोन चरण उद्धवांनी म्हणून समर्थांचा श्लोक पूर्ण केला. ते पाहून समर्थ फार संतुष्ट होऊन म्हणाले 'उद्धवा शाबास भले शाबास!' आणि नंतर श्रीरामापुढे अखंड नामघोष सुरू केला.
माघ कृ.८ रोजी दोन प्रहरी निद्रा करून उठले, ते समयी वचने दोनी प्रत्येकी येकादशाक्षरे-- 
देवद्रोहीयांचा नाशची आहे ।। समुद्रातीरस्थांचा नाश आहे ।। बोलिले, असे लेखांक ४३ मध्ये म्हटले आहे. त्यातच शेवटी लिहिले आहे की, 
नवमी दो प्रहरा दर्शनासी बहुत लोक आले । त्यांस स्वमुखे आज्ञा दिली । ते लोक द्वारापासी उभेच आहेत । संनिध कोन्हासही येऊ दिल्हे नाही । तेच समयी पलंगावरून उतरून पादुकावरी उत्तराभिमुखी बैसले । श्रींचे स्मरण केले ।। 
"पलंगाखाली उतरले । पादुका पायी लेइले । उत्तर दिशेकडे केले । मुख बरवे ।।
भक्तजन विनविती । पलंगावरी बैसावे म्हणती । तेव्हा बोलिले हो प्रीती । बैसाणे नाही ।।
तुम्ही बैसवाल तरी पहा । म्हणोन उचलती जन दहा । शक्तिवंत करिती अहा । नुचलती आमुते ।।
करिता बहुतची यत्न । नुचले अनुमात्र आसन । तेव्हा आज्ञापिले वचन । बाहेर बैसां ।। 
आक्का व उद्धव यांखेरीज बाकीचे सगळे बाहेर दाराशीच बसले, आणि समर्थांनी रघुपतीकडे दृष्टी लावून ध्यान धरले; त्याबरोबर आक्का व शिष्य मंडळी घाबरी होऊ लागली. ते पाहून समर्थ म्हणाले ,'इतके दिवस सेवेत राहून वेदान्त श्रवण केल्याचे व अध्यात्माच्या अभ्यासाचे फळ हेच काय? त्यावर आक्कांनी हात जोडून विनंती केली, घाबरे होणे किंवा ममतेत गुंतणे हे काहीच समर्थांनी ठेवले नाही, पण प्रत्यक्ष सेवा व सगुणदर्शन अंतरेल याचे वाईट वाटते'; त्या वेळी त्यांच्या (व आज आपल्याही) समाधानासाठी समर्थांच्या मुखातून पुढील अभंग प्रकटला - 
माझी काया गेली खरे । परी मी आहे जगदाकारे । ऐका स्वहित उत्तरे । सांगेन ती ।।
नका करू खटपट । पहा माझा ग्रंथ नीट । तेणे सायुज्याची वाट । ठाई पडे ।।
राहा देहाच्या विसरे । वर्तो नका वाईट बरे । तेणे मुक्तीची द्वारे । चोजविती ।।
रामीरामदास म्हणे । सदा स्वरूपी अनुसंधान । करा श्री रामाचे ध्यान । निरंतर ।।

या अभंगाचा आशय भीमस्वामींनी दोन ओव्यांत सांगितला तो असा -
माझी काया आणि वाणी ।गेली म्हणाल अंतःकरणी । परी मी आहे जग्जीवनी । निरंतर ।।
आत्माराम दासबोध । माझे स्वरूप स्वतःसिद्ध । असता न करावा खेद । भक्त जनी ।।

नंतर श्रीसमर्थांनी रामनामाचा गजर तीन वेळा एवढ्या मोठ्याने केला कI त्या घोषाने मुहूर्तभरपर्यंत गडावरील सर्व आकाश दुमदुमून गेले.
तीन वेळा स्मरण केले । अंबर अवघे गर्जिनले । रामनामे कोंदाटले । जिकडे तिकडे ।।
मुहूर्त एक हो गर्जना । गगनी कोंदाटली जाणा । विस्मय पावलो निजजना । प्रेम आले ।।
ध्वनी जाली संपूर्ण । जाहला अवतार हो पूर्ण । देशोदेशी भक्तजन । जाते जाले ।।
या प्रकारे श्रीसमर्थांनी 'माघ वद्य नवमी । दिवसा दोन प्रहर नेमी । शनिवारी परंधामी । योग केला ।।संदर्भ हवा ]

अंतिम पाच दिवसांमध्ये समर्थांनी अन्नपाणी वर्ज्य केले. त्याच काळात सज्जनगडावर तंजावर येथून श्रीराम पंचायतनाच्या मूर्ती आल्या. समर्थांनी स्वहस्ते त्यांचे पूजन केले. पूर्णपणे एकांतवास स्वीकारला. त्यावेळी त्यांच्याजवळ फक्त उद्धव स्वामी व आक्का बाई होते. कल्याण स्वामीडोमगाव येथे होते. अंतिम दिनी समर्थ पद्मासन घालून उत्तराभिमुख बसले. तीन वेळा 'जय जय रघुवीर समर्थ ' हा घोष करून आत्मा पंचत्वात विलीन केला. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार उद्धव स्वामी यांनी केले. समर्थांनी पूर्वसूचना देऊन माघ वद्य नवमी शके सोळाशे तीन सन १६८१ रोजी देह ठेवला. हीच दासनवमी होय.

समर्थसंप्रदायसंपादन करा

समर्थसंप्रदाय हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा संप्रदाय आहे.[१०] समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवाजीच्या काळात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या कवींनी व कवयित्रींनी विपुल लेखन केले आहे. या संप्रदायाची बहुतेक हस्तलिखिते धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात ठेवली आहेत. त्यांचा शोध घेऊन संग्रह करण्यासाठी समर्थ भक्त शंकरराव देव यांनी अपार परिश्रम केले. त्यामुळे हा मौलिक संग्रह आजवर टिकून राहिला.

शिष्यमंडळसंपादन करा

समर्थांना शिष्याकडून कठोर साधनेची आणि अभ्यासाची अपेक्षा होती.

समर्थांनी त्या काळी ११०० मठ स्थापन केले आणि सुमारे १४०० तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यांचे काही शिष्य गृहस्थाश्रमी होते, तर काही शिष्य ब्रम्हचारी होते. कल्याणस्वामी रामदासांचे पट्टशिष्य होते. ज्या वेळी एखाद्या शिष्याची महंतपदी नियुक्ती होत असे त्या वेळी त्या शिष्याची कसून परीक्षा घेतली जाई. समर्थांना शिष्याकडून कठोर साधनेची आणि अभ्यासाची अपेक्षा असे. दासबोधाचे नुसते पारायण करून भागत नव्हते, दासबोध समजावून घेण्यावर समर्थांचा भर होता. अनेक महंतांचा दासबोध कंठस्थ होता. शिष्याची परीक्षा घेण्याची समर्थांची पद्धत मोठी विलक्षण होती. त्यावेळी ग्रंथ छापले जात नसत. हाताने लिहून ग्रंथांचा नकला केल्या जात. छापील नसल्यामुळे ग्रंथ बांधलेले (बाइंडिंग केलेले) नसत. पानांवर पृष्ठांक देखील नसायचे. अशा वेळी समर्थ त्या शिष्याकडून त्याने लिहिलेली दासबोधाची पोथी मागवून घेत. पत्त्याप्रमाणे पिसून पोथीची सर्व पाने विस्कळीत करत आणि मग शिष्याला सगळा दासबोध पुन्हा व्यवस्थित लावून ठेवायला सांगत. ज्या शिष्यांचा दासबोध कंठस्थ नसे त्यांना पोथी जुळवायला फार वेळ लागे. अशा शिष्याला महंत म्हणून किंवा मठपती पदी नियुक्त केले जात नसे. ज्याला पोथी लावायला विलंब झाला त्यांची निर्भत्सना करताना समर्थ म्हणत," याने दासबोध वाचला नाही केवळ गंधफुले वाहून पूजला."त्या वेळी समर्थांचे शिष्यांना सांगणे होते की, जो कोणी दासबोध ग्रंथाचे वाचन करील, तो ग्रंथ नीट समजावून घेईल आणि त्यानुसार आचरण करेल, अशा माणसाला मोक्ष मिळेल. त्यासाठी वेगळा गुरू करण्याची गरज नाही. ग्रंथ हेच गुरू होत.

रामदासस्वामींची मराठीतील चरित्रे आणि त्यांच्यासंबंधी इतर ग्रंथसंपादन करा

  • आनंदवनभुवनी (कादंबरी, लेखिका : शुभांगी भडभडे)
  • ऐसी हे समर्थ पदवी (अशोक प्रभाकर कामत)
  • संत कबीर रामदास : एक तुलनात्मक अभ्यास (डॉ. ज्योत्स्ना खळदकर) (प्रकाशन दिनांक ११-६-२०१७)
  • कल्याणा, छाटी उडाली (सुनील चिंचोलकर)
  • ग्रंथराज दासबोध खंड १ (सुनील चिंचोलकर)
  • तोचि येक रामदास (जनार्दन ओक)
  • पत्र समर्थांची (सुनील चिंचोलकर)
  • प्राचीन मराठी वाङ्‌मयाचा इतिहास : तुकाराम-रामदास (अच्युत नारायण देशपांडे, १९६६)
  • मनाच्या श्‍लोकातून मन:शांती (सुनील चिंचोलकर)
  • मला दासबोधीच लाभेल बोध (सुनील चिंचोलकर)
  • राजगुरु समर्थ रामदास (शं.दा. पेंडसे)
  • राजवाड्यांचा रामदास : (राजवाडे लेखसंग्रहाअंतर्गत, संपादन द.वा. पोतदार)
  • रामदास (श.श्री. पुराणिक)
  • रामदास : वाङ्मय आणि कार्य (न.र. फाटक) (१९५३)
  • श्री रामदास स्वामींचे प्रपंचविज्ञान (श्री.म. माटे)
  • विद्यार्थ्यांचे श्रीरामदास (पुस्तक आणि ऑडिओ बुक) (सुनील चिंचोलकर)
  • शिवाजी आणि रामदास (सुनील चिंचोलकर)
  • शिष्य समर्थांचे (सुनील चिंचोलकर)
  • श्रीसमर्थ चरित्र (ज.स. करंदीकर, १९५३)
  • श्रीसमर्थ चरित्र (न.र. फाटक) (१९५१)
  • श्रीसमर्थ चरित्र (सदाशिव खंडो आळतेकर) (दुसरी आवृत्ती, सन १९७४)
  • श्रीसमर्थचरित्र (सदाशिव खंडो आळतेकर) (शके १८५५)
  • श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन (सुनील चिंचोलकर)
  • श्रीसमर्थ चरित्र (अनेक खंड) : खंड १. -श्रीसमर्थावतार (बा.सी. बेंद्रे)
  • श्री समर्थ चरित्र (अनेक खंड) : तृतीय खंड -श्री समर्थ संप्रदाय (शंकरराव देव)
  • समर्थदर्शन (संपादित लेख संग्रह; लेखक - श्री.र. कावळे, अनिरुद्ध कुलकर्णी, श्या.गो. मुद्गल. प्रस्तावना - के.वि. बेलसरे, नवीन आवृत्ती - १९८२
  • श्रीसमर्थप्रताप (समर्थांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले गिरिधरस्वामी)
  • समर्थविचार (कॅप्टन आनंद जयराम बोडस)
  • समर्थ व्यवस्थापन (दासबोध) लेखक - रमेश कुलकर्णी)
  • श्रीसमर्थ रामदास वाङ्मय शब्दार्थ संदर्भकोश (दासबोध वगळून) (संपादक : रा.शं. नगरकर आणि डॉ. मु.श्री. कानडे)
  • सद्‌गुरू समर्थ रामदास और छत्रपति शिवाजी महाराज (हिंदी, लेखक सुरेश तोफखानेवाले)
  • समर्थ रामदास आणि स्वामी विवेकानंद (सुनील चिंचोलकर)
  • समर्थ रामदास विवेक दर्शन (संत रामदास, साहित्य अकादमी प्रकाशन)
  • समर्थ रामदासांचा भक्तियोग (डाॅ. शंकर अभ्यंकर)
  • श्रीरामदासस्वामि-चरितम् (संस्कृत, श्रीपादशास्त्री हसुरकर, शके १८४४)
  • समर्थ शिकवण (आनंद जयराम बोडस)
  • श्रीसमर्थ रामदास : जीवन व तत्त्वज्ञान (?)
  • समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज (कौस्तुभ सतीश कस्तुरे)
  • श्री रामदास स्वामींचे प्रपंचविज्ञान (श्री.म. माटे)
  • समर्थ रामदासांचे व्यवस्थापन (सुनील चिंचोलकर)
  • समर्थ संदेश (कॅप्टन आनंद जयराम बोडस)
  • समर्थ साहित्य (उषा जोशी)
  • श्रीसमर्थांचा गाथा (संपादक अनंतदास रामदासी, १९२८)
  • समर्थ रामदासांची साहित्‍य सृष्‍टी (लेखक : सुनील चिंचोलकर; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)
  • श्रीसमर्थांची लघुकाव्ये (संपादक - डॉ. सुनीती सहस्रबुद्धे)
  • श्री समर्थाचें पुण्य स्मरण (शंकर धोंडो क्षीरसागर)
  • साक्षेप समर्थांचा (डॉ. वि. रा करंदीकर)

समर्थ रामदासांच्या जीवनावरील नाटके/चित्रपटसंपादन करा

  • जय जय रघुवीर समर्थ (मराठी लघुपट, दिग्दर्शक जितेंद्र वाईकर)
  • समर्थ रामदास स्वामी (मराठी चित्रपट, दिग्दर्शक राजू सावंत)
  • श्रीशिवसमर्थ (नाटक, लेखक : जयवंत पंदिरकर)
  • श्री राम समर्थ (चित्रपट, दिग्दर्शक संतोष तोडणकर)

विसाव्या शतकातील श्रेष्ठ रामदासीसंपादन करा

संस्थासंपादन करा

स्वामी समर्थ रामदास यांचे नाव दिलेल्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही या :-

  • स्वामी समर्थ रामदास महापालिका मंडई, वांद्रे (मुंबई)

रामदास स्वामींनी वास्तव्य केलेल्या ‘घळी’संपादन करा

तारळेघळ, मोरघळ, रामघळ, शिवथरघळ, हेळवाक घळ, वगैरे

हेसुद्धा पहासंपादन करा

चित्रदालनसंपादन करा

संदर्भसंपादन करा

[श्री नानासाहेब धर्माधिकारी ]

संदर्भसंपादन करा

  1. ^ Sankalit. Samarth Guru Ramdas (हिंदी भाषेत). Suruchi Prakashan. ISBN 978-93-86199-33-1.
  2. ^ Tiwari, Vijay Shankar (2015-10-01). Prernaprad Jeewan Charitra: For Students (हिंदी भाषेत). Suruchi Prakashan. ISBN 978-93-84414-48-1.
  3. ^ जोशी, लक्ष्मणशास्त्री मराठी विश्वकोश खंड १४, पृष्ठ ७९४
  4. ↑ a b c d e f g जोशी , होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२००० (पुनर्मुद्रण)). भारतीय संस्कृती कोश खंड आठवा. पुणे: भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन. pp. ११४-१२३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "दासबोध".
  6. ^ "मनाचे श्लोक".
  7. ^ "करुणाष्टके".
  8. ^ "भीमरूपी स्तोत्रे".
  9. ^ Dasbodh prakrut-marathi. Mrs Manasi s. vaidya.
  10. ^ Jogalekar, N. C. (1968). Hindī evaṃ Marāṭhī ke Vaishṇava sāhitya kā tulanātmaka adhyayana (हिंदी भाषेत). Javāhara Pustakālaya.


विकिक्वोट
समर्थ रामदास स्वामी हा शब्द/शब्दसमूह 
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.
Wikisource-logo.svg
यांचे अथवा यांच्याशी संबंधित लेखन मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.:

बाह्य दुवेसंपादन करा


  • रोहिदास

रोहिदास

संत रोहिदास (इ.स. १३७६ - इ.स. १५२७) हे मध्ययुगीन भारतातील हिंदू संत होते. यांच्या गुरूंचे नाव रामानंद स्वामीहोते. कबीर यांचे समकालीन होत; तर मीराबाई यांच्या शिष्या होत्या.

जीवन

रोहिदासांचा जन्म काशीजवळ गोवर्धनपूर येथे इ.स. १३७६च्या सुमारास झालासंदर्भ हवा ]. त्यांच्या वडिलांचे नाव रघु होते, तर आईचे नाव कालसी होते.

रोहिदासांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला. त्यांच्या पत्नीचे नाव लोना होते. रोहिदासाच्या भक्तिवेडामुळे धंदा व संसाराचे नुकसान होऊ लागले म्हणून त्याच्या वडिलांनी वडिलोपार्जित संपत्तीचा कुठलाही हिस्सा न देता रोहिदासाला वेगळे काढले. घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत तो झोपडी बांधून पत्नी बरोबर राहू लागला. गुरू रामानंदांच्या संपर्कामुळे रोहिदासाचे ज्ञानभांडार वाढले. तो प्रत्येक विषयावर प्रवचन देऊ लागला आणि आपल्या प्रवचनातून वेदउपनिषदे आणि दर्शनशास्त्राच्या व्याख्या सांगू लागला.

सतं रोहिदास प्रसन्न मी साळुंके शंकर

मृत्यू 

संत रोहिदासांचा मृत्यू चितोडगड येथे इ.स. १५२७ मध्ये झाला. चितोडगडातील कुंभश्याम मंदिरात स्वरचित आरती म्हणून ते मंदिराबाहेर पडले, आणि त्याच वेळी संतप्‍त पुरोहितांनी त्यांच्यावर घातक प्रहार करून त्यांचे प्रेत गंभीरी नदीत फेकून दिले असावे. त्यांची पादत्राणे जिथे मिळाली, त्याच ठिकाणी त्यांची समाधी व छत्री बांधलेली आहे [१]

संदर्भ आणि नोंदी 

  1. ^ सोनवणे मनोरमा शिवाजी. महाराष्ट्र साहित्य पत्रिका, अंक ३३१. p. ४५.
  • विसोबा खेचर

विसोबा खेचर

विसोबा खेचर हे संत नामदेवांचे गुरु होते.'षट्स्थल' हा ग्रंथ विसोबा खेचर यांनी लिहिला आहे

महान संत विसोबा खेचर यांनी शिष्य नामदेवाला शिकवणे

पंढरपूर तालुक्यात असलेल्या कोर्टी येथील श्री सप्तकोटेश्‍वर मंदिरातील शिवपिंडी ! येथेच संत विसोबा खेचर आणि नामदेव महाराज यांची भेट झाली.

संत विसोबा खेचर हे महाराष्ट्रातील मोठे संत होऊन गेले. संत ज्ञानेश्‍वर हे त्यांचे गुरु, तर संत नामदेवांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. संत विसोबा खेचर हे शैव पंथीय होते; परंतु त्यांचा वारकरी आणि नाथ संप्रदाय यांच्याशीही जवळचा संपर्क आला. विसोबा खेचर हे खरेतर संत ज्ञानेश्‍वर आणि त्यांच्या भावंडांचा द्वेष करत असत; परंतु एकदा संत ज्ञानेश्‍वर यांच्या पाठीवर संत मुक्ताबाई यांनी मांडे भाजले. त्या वेळी तेथे उपस्थित असलेले संत विसोबा खेचर संत ज्ञानेश्‍वरांना शरण गेले.

बार्शी, जिल्हा सोलापूर येथील उत्तरेश्‍वर मंदिराच्या बाजूला असलेली संत विसोबा खेचर यांची समाधी ! तिचे भावपूर्ण दर्शन घेऊया.
श्री सप्तकोटेश्‍वर मंदिराच्या परिसरात असलेल्या या शिवपिंड्या म्हणजे नामदेव महाराजांना संत विसोबा खेचर यांनी ईश्‍वर सर्वत्र असल्याची अनुभूती दिल्याचे पवित्र स्थान !

एकदा संत नामदेव महाराजांना पांडुरंग म्हणाला, तुझ्या जीवनात सद्गुरु नाहीत. जोपर्यंत तुझ्यावर सद्गुरूंची कृपा होत नाही, तोपर्यंत तुला माझ्या निर्गुण निराकार सत्य स्वरूपाची ओळख पटणार नाही. तू विसोबा खेचर यांना भेट. ते मोठे सत्पुरुष आहेत. ते तुला दीक्षा देतील.

पांडुरंगाच्या आज्ञेनुसार नामदेव महाराज विसोबा खेचर यांना भेटण्यासाठी गेले. एका ज्योर्तिलिंग मंदिरात त्यांचे सद्गुरु विसोबा खेचर पाय पसरून बसले होते. त्यांची अवस्था पुढीलप्रमाणे होती : एका वृद्ध पुरुषाप्रमाणे त्यांच्या अंगाला ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या आणि त्यातून पू वहात होता. त्यांच्या अंगावर असलेल्या सर्व जखमांवरून माशा फिरत होत्या. अंगाला दुर्गंधी सुटली होती. पायात तेलाने लडबडलेल्या वहाणा घालून शंकराच्या पिंडीवर त्यांनी आपले चरण ठेवले होते. आपल्या भावी सद्गुरूंची अशी दुरावस्था पाहून नामदेव महाराजांना खूप दु:ख झाले; पण संत विसोबा खेचर नाटकच करत होते. हे नामदेव महाराजांना ज्ञात नव्हते.

नामदेव महाराज संत विसोबा खेचर यांच्यापाशी गेले आणि म्हणाले, अहो, तुम्ही शंकराच्या पिंडीवर आपले पाय ठेवून बसला आहात ? चला, उठून नीट बसा. त्यावर संत विसोबा खेचर नामदेव महाराजांना म्हणाले, बाबा रे, काय करू ? इतका देह क्षीण झाला आहे की, मी हलू शकत नाही. ती वात्रट मुलं आली, त्यांनी माझे पाय धरले आणि पिडींवर नेऊन ठेवले. पाय हलवायचेसुद्धा त्राण उरले नाहीत. त्यामुळे तूच आता माझ्यावर कृपा कर आणि जिथे पिंडी नाही, तिथे माझे पाय उचलून ठेव. नामदेव महाराजांना त्यांचे बोलणे स्वाभाविक वाटले आणि त्यांनी त्यांचे चरण उचलून बाजूला केले, तर तिथे पुन्हा पिंडी तयार झाली. ज्या दिशेने पाय हलवावेत, त्या दिशेने पिंड ! हा सर्व चमत्कार पाहून नामदेव महाराज आश्‍चर्यचकित झाले.

जेव्हा नामदेव महाराजांनी आश्‍चर्याने विसोबांकडे पाहिले, तेव्हा त्यांच्या शरिराची सर्व दुर्गंधी नाहीशी झाली होती. अगदी तप्त मुद्रांकित ब्राह्मण, असे एकदम तेजस्वी शरीर नामदेव महाराजांना दिसले. संत विसोबा खेचर यांनी नामदेव महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला, त्या क्षणी नामदेव महाराजांना सगळीकडे पांडुरंग दिसायला लागले.

पांडुरंगाने सांगितल्याप्रमाणे खरोखर हे अधिकारी पुरुष आहेत, याची खात्री पटताच नामदेव महाराजांनी ताबडतोब संत विसोबा खेचर यांचे चरण धरले आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले.

(संदर्भ : संत नामदेव, लेखक : प्रा. विजय यंगलवार, नचिकेत प्रकाशन)

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

  • सखू

भोळी-भाबडी संत सखू

भोळी-भाबडी संत सखू

बा रे पांडुरंगा, केव्हा भेट देसी !!
झाले मी परदेसी, तुजविण !!


कृष्णा नदीच्या तीरावर करवीर नावाचे तीर्थक्षेत्र आहे. फार वर्षांपूर्वी तेथे सखूचे सासर होते. तिच्या पतीचे नाव दिगंबर. तीची सासू सखूला फार त्रास देत असे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिची सासू तिला कामाला जुंपून ठेवी. सारे काम करूनही सासूची बोलणी ही नित्याचीच असत. सखू मात्र हे सारे निमूटपणे सहन करी. भोळी-भाबडी सखू काम करताना नेहमी विठ्ठलाचे स्मरण करी. तिच्या मुखी सारखे पांडुरंगाचेच नाम असे.
एकदा आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीला जाणारी दिंडी तिच्या गावी आली. दिंडी कृष्णेच्या तिरावर थांबली. 

तेथे वारकऱ्यांचे भजन चालू झाले. महाराज कीर्तन करायला उभे राहिले. नेमकी त्याच वेळी सखू नदीवर पाणी भरण्यासाठी आली होती. कीर्तनकार पंढरीचा महिमा वर्णू लागले. पांडुरंगाची थोरवी गाऊ लागले. विठ्ठलनाम कानावर पडताच सखूचे लक्ष तिकडे गेले. महाराजांचे कीर्तन ऐकण्यात ती तल्लीन झाली. सर्व वारकऱ्यांना पाहून तिलाही पंढरीला जावेसे वाटू लागले. तिला विठ्ठलदर्शनाची अनिवार ओढ लागली. त्या निश्चयाच्या भरात सखूने आपली घागर शेजारणीजवळ दिली आणि घरी नेऊन देण्यास सांगितले. ती दिंडीसमवेतच पुढे निघाली. विठ्ठलनामाच्या जयघोषात सखू अगदी दंग झाली.
इकडे शेजारणीने सखूच्या घरी घागर नेऊन दिली. सासूने शेजारणीला विचारले, सखू कुठे गेली ? शेजारणीने सारे वृत्त कथन केले. ते ऐकून सासूला फारच राग आला. संतापाने ती लाल झाली. तिने लगेच आपल्या मुलाला बोलावून घेतले आणि ताबडतोब सखूला घेऊन येण्यास सांगितले. दिगंबराने भराभर चालत जाऊन दिंडी गाठली आणि सखूला मारझोड करतच घरी घेऊन आला. दोघांनी मिळून तिला एका खोलीत कोंडून ठेवले. तिला अन्नपाणीही द्यायचे नाही, असे त्यांनी ठरवले. सखूला वाईट वाटले ते या गोष्टीचे की, आता पांडुरंगाचे दर्शन होणार नाही. तिने पांडुरंगाचा धावा चालू केला. व्याकुळ होऊन ती पांडुरंगाला आळवू लागली.

सखूची निस्सीम भक्ती आणि भोळया भावामुळे पांडुरंग तिच्यावर प्रसन्न झाला. पांडुरंगाचे रूप बघून धन्य धन्य झाली. तिला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले आणि तिथेच तिने आपले प्राण ठेवले. दिंडीस आलेल्या तिच्या गावकऱ्यांनी तिचे अंत्यसंस्कार केले. पंठरीत ज्या गावकऱ्यांनी सखूचे अंत्यसंस्कार केले होते, ते सखूच्या घरी आले, तर सखू त्यांना घरकाम करतांना दिसली. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी सखूच्या नवऱ्याला आणि सासूला सारा वृत्तांत सांगितला. तो ऐकून त्यांनी सखूला खरा प्रकार काय आहे, ते विचारले. सखूने सारी घटना कथन केली. ती ऐकून गावकरी स्तब्ध झाले. तिच्या नवऱ्याला आणि सासूला पश्चात्ताप झाला. अस्या या महान संताची समाधी कराड नगरीत कृष्णा कोयनेच्या पवित्र संगमावर आहे. आजही पंढरपूरला निघालेले वारकरी आवर्जून सखूबाईच्या समाधीचे दर्शन घेतात.

तुजविण सखा, मज कोणी नाही !!
वाटते चरणी, घालावी मिठी !!
ओवाळावी काया, चरणावरोनी !!
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
  • सावता माळी

सावता माळी

हिंदू संत

सावता माळी (जन्म : इ.स. १२५०; समाधी : इ.स. १२९५) हे एक मराठी संतकवी होते. अरण (तालुका-माढा; जिल्हा-सोलापूर) हे सावतोबांचे गाव होय. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होते. ते पंढरीचे वारकरी होते. त्यांना दोन मुले होती. पुरसोबा आणि डोंगरोबा. पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत. पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला. या दांपत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय. दैवू माळी (आजोबा) अरण या गावी स्थायिक झाले. भेंड हे गाव जवळच दोन मैलांवर आहे.

संत सावता माळी यांच्या बद्दल संत नामदेव म्हणतात:-
धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो।।
सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी।।

सावता माळी यांनी भेंड गावचे ‘भानवसे रूपमाळी’ हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. सावता माळी यांनी सेना न्हावीनरहरी सोनारयांच्याप्रमाणेच त्यांनीही आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगांत वापरले आहेत. तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची, नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली. सावता माळ्याचे अभंग काशीबा गुरव हा लिहून ठेवत असे.

अन्य माहितीसंपादन करा

संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते. यांचा काळ इ.स. १२५० ते १२९५ चा आहे. (संत ज्ञानेश्वरांचा काळ इ.स. १२७५ ते १२९६ आहे.) ‘साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात.

ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. यांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे केवळ ३७ अभंग उपलब्ध आहेत. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.

अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले असे मानले जाते. परंतु या दिनांकाविषयी मतभेद आहेत असे कळते. कालनिर्णय दिनदर्शिकेत सावता माळी यांची पुण्यतिथी २५ जुलै (साल?) अशी दर्शवली आहे.

सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे सत आहेत. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्ममार्गी संत होते. ‘कर्मे ईशु भजावा’ हीच त्यांची वृत्ती होती. पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखीवर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.

त्यांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड घातली. धर्माचरणातील अंध:श्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. अन्त:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्र्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग-याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्र्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन हवे आहे.

गाजलेले अभंग 

‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’

'कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी’'

’'लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||’

अनासक्त वृत्तीने ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती. ‘वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी’ ही त्यांची प्रतिज्ञा होती

‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।’
‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’
या ओळींतून त्यांची जीवननिष्ठाच स्पष्ट होते. त्यांच्या अभंगांत नवरसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्य-भक्ती हे रस आढळतात. सावतोबांची अभंगरचना रससिद्ध आहे.

‘योग-याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।।
तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।।

हाच विचार त्यांनी आग्रहाने मांडला. नामसंकीर्तनावर त्यांनी जास्त भर दिला. सर्वसंगपरित्याग करण्याची जरुरी नाही. प्रपंच करता करता ईश्वर भेटतो.
‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग
मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’

चित्रपटसंपादन करा

  • फाउंटन एंटरटेनमेंटने ’संत सावतामाळी’ नावाची दक्‌श्राव्य सीडी काढली आहे.
  • सुमीत कॅसेट्‌स या कंपनीची ’संत सावता माळी कथा’ नावाची दृक्‌श्राव्य सीडी आहे.
  • संत सावता माळी हा एक प्रसिद्ध मराठी चित्रपट आहे. (पटकथालेखक-दिग्दर्शक राजू फुलकर; संगीत सुरेश वाडकरअजित कडकडे)
  • झी टाॅकीजचा 'ही वाट पंढरीची' हा दूरचित्रवाणीपट
  • भक्तीचा मळा (प्रमुख भूमिका : केशवराव दातेमास्टर विनायक, दिग्दर्शन - केशवराव दाते) (१९४४)

बाह्य दुवेसंप

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
  • महाराज
  • सोपानदेव

सोपानदेव

संत ज्ञानेश्वरांचे कनिष्ठ बंधू. सोपानदेवी या ग्रंथांचे लेखक. १२९७ साली ‌सासवड येथे समाधी घेतली.

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

  • सोयरा

संत सोयराबाई या १४व्या शतकातील मराठी कवयित्री असून संत चोखामेळा यांच्या पत्नी होत्या.

सोयराबाईंनी बरेच अभंग लिहिले पण केवळ ९२ उपलब्ध आहेत. तिच्या अभंगांमध्ये ती स्वत:ला चोखामेळ्याची महारी म्हणते. चोखोबाची बायको असे अभिमानाने म्हणवून घेत असली तरी तिने स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. अत्यंत साधी, सोपी आणि रसाळ भाषा हे सोयराबाईंच्या अभंगांचे वैशिष्ट्य होय. त्या काळी सवर्ण लोक शूद्राच्या सावलीचाही विटाळ मानीत असताना, संत सोयराबाई बंड करून उठतात व देवाशी वाद घालतात आणि देवाला विचारतात, देहात विटाळ वसतो मग देह कोणी निर्माण केला?,

सोयराबाईंना असा विश्वास होता की "केवळ शरीर अपवित्र किंवा प्रदूषित असू शकते परंतु आत्मा कधीही अशुद्ध नसतो. ज्ञानार्जन हे शुद्धच असते. "

देहासी विटाळ म्हणती सकळ |

आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध ||

देहीचा विटाळ देहीच जन्मला |

सोवळा तो झाला कवण धर्म ||

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

  • संत ज्ञानेश्वर

ज्ञानेश्वर

भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, महाराष्ट्रातील संंत

संत ज्ञानेश्वर (जन्म : आपेगाव-पैठण, श्रावण कृष्ण अष्टमी, इ.स. १२७५; संंजीवन समाधी : आळंदी, इ.स. १२९६) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवीभागवतसंप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी), अमृतानुभवचांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंगह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातूननिर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली.

ज्ञानेश्वर
मूळ नावज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
समाधिमंदिरआळंदी
संप्रदायनाथ संप्रदाय, वारकरी, वैष्णव संप्रदाय
गुरूनिवृत्तिनाथ
भाषामराठी
साहित्यरचनाज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), अमृतानुभव, हरिपाठ, अभंग भक्ति कविता
व्यवसायसंत, समाजजागृती
वडीलविठ्ठलपंत कुलकर्णी
आईरुक्मिणीबाई

ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यरचना करताना बापविठ्ठलसुत, बाप रखुमाईवर, ज्ञाना, ज्ञानाबाई, आणि ज्ञानदेव ही नावेही वापरली आहेत. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी : आदिनाथ > मत्स्येंद्रनाथ > गोरक्षनाथ > गहिनीनाथ > निवृत्तिनाथ > ज्ञानेश्वर

ज्ञानेश्वरांचे बालपणसंपादन करा

ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे अकराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. निवृत्ती हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.)

आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.

विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यास्याची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले. [१]

आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.

संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे.

भावार्थदीपिका हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.

ज्ञानेश्वरांचे कार्यसंपादन करा

संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा मराठी संस्कृतीवरअसलेला प्रभाव आजही अबाधित आहे.

निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.

माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४)

असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते.

त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.

चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण त्‍यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. यात अद्वैतसिद्धान्ताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.

चांगदेवांचे गर्वहरण

अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर ज्ञानेश्वरमाउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दुःख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह - या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.

‘जो जे वांछील, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरीसंप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्‍न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचापाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारिक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्‍न केला.ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद् गीता मराठीतून लिहिली.

संजीवन समाधीसंपादन करा

संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदीयेथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्तीसोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपआपली इहलोकीची यात्रा संपवली.

ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथसंपादन करा

ज्ञानेश्वरांवरील आणि ज्ञानेश्वरांच्या ग्रंथांवरील पुस्तकेसंपादन करा

  • अमृतानुभव (रा.ब. रानडे)
  • अमृतानुभव (पंडित सातवळेकर)
  • अमृतानुभव अधिक सार्थ सान्वय चांगदेवपासष्टी (विष्णुबुवा जोगमहाराज)
  • अमृताचा अनुभव : ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचा छंदानुवाद (हेमंत राजाराम)
  • आजची ज्ञानेश्वरी - मूळ सांप्रदायिक ज्ञानेश्वरीसहित (कर्मकांडासह अनुवाद - त्र्यंबक मगनराव चव्हाण)
  • संत ज्ञानेश्‍वर : समाधी रहस्य आणि जीवन चरित्र (प्रवचन संग्रह, प्रवचनकार आणि लेखक - तत्त्वदर्शक सरश्री)
  • संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव (सोप्या पद्यमय मराठीत अमृतानुभव - (विंदा करंदीकर)
  • अलौकिकतावाद ज्ञानेश्वरांचा (लेखिका : डॉ. श्यामला मुजुमदार) - ढवळे प्रकाशन २०१४ (दुसरी आवृत्ती)
  • The Eternal Wisdom of Dnyaneshwari (इंग्रजी, डॉ. वसंत शिरवळकर)
  • इंद्रायणीकाठी (कादंबरी, रवींद्र भट)
  • गीतादर्शन : श्री ज्ञानेश्वर आणि श्री रमण महर्षी (डॉ. सुधाकर नायगावकर)
  • The Genius of Dnyaneshvar (रविन थत्ते)
  • ताटी उघडा ज्ञानेश्वरा (स.कृ. जोशी)
  • दैनंदिन ज्ञानेश्वरी (माधव कानिटकर)
  • नाथसंप्रदाय आणि ज्ञानेश्वर (डॉ. कृ.ज्ञा. भिंगारकर)
  • ज्ञानदेवांचे पसायदान (अरविंद मंगरूळकर, व विनायक मोरेश्वर केळकर)
  • भावार्थ ज्ञानेश्वरी (प्रा.शं.वा. दांडेकर)
  • महाराष्ट्राचा भागवतधर्म - ज्ञानदेव आणि नामदेव (डॉ. शं.दा. पेंडसे)
  • माऊलीचा सार्थ हरिपाठ (वामन देशपांडे)
  • माणूस नावाचे जगणे (रविन लक्ष्मण थत्ते)
  • मी हिंदू झालो (रविन थत्ते)
  • मुलांसाठी संत ज्ञानेश्वर (वामन देशपांडे)
  • येणें वाग्यज्ञें तोषावें (लेखक : डॉ. अविनाश स. पितळे) - प्रकाशक ऋजुता पितळे (पुणे) : ज्ञानेश्वरांच्या सर्वच वाङ्‌मय कृतींचा परिचय
  • विश्व माऊली ज्ञानेश्वर (डॉ. शैलजा काळे)
  • श्रीज्ञानेश्वर - अलौकिक व्यक्तिमत्त्व (कोंकणी, हरदत्त खांडेपारकर)
  • संजीवन (ज्ञानेश्वरांच्या भावविश्वावरील कादंबरी, लेखक - भा.द. खेर)
  • संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (गोविंद गोवंडे)
  • संत ज्ञानेश्वर (बालवाङ्मय, ल.गो. परांजपे)
  • संत ज्ञानेश्वर महाराज (चरित्र, बालवाङ्मय, लेखक - अरुण गोखले)
  • संत ज्ञानेश्वरांची 'घोंगडी' (शंकर अभ्यंकर)
  • सार्थ श्री ज्ञानेश्वरी (श्री गुरु साखरे सांप्रदायिक शुद्ध) (संपादक - विनायक नारायण जोशी आणि रामचंद्र तुकाराम यादव; अक्षर दालन प्रकाशन)
  • सार्थ श्रीज्ञानेश्वरी (दिवाकर अनंत घैसास)
  • ज्ञानदेव आणि ज्ञानदेवी (अनेक विद्वानांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)
  • श्री ज्ञानदेव गाथा (साखरे महाराज)
  • श्रीज्ञानदेवांचा हरिपाठ (सार्थ, प्रा. के.वि. बेलसरे)
  • ज्ञानाचा उद्‍गार (ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर)
  • ज्ञानदेव व ज्ञानेश्वर (भारद्वाज)
  • श्रीज्ञानदेव विजय (मामा देशपांडे, रा.नी. कवीश्वर)
  • ज्ञानराज माउली (लीला गोळे)
  • (वि)ज्ञानेश्वरी (रविन थत्तेमृणालिनी चितळे)
  • ज्ञानदेवांची भजने आणि चांगदेव चाळीशी (विनोबा भावे)
  • ज्ञानदेवांची वाणी (डॉ. अशोक देशमाने, डॉ. विद्यासागर पाटंगणकर)
  • ज्ञानदेवांचे निवडक अभंग ((डॉ. प्रमोद पडवळ)
  • श्रीज्ञानेश्वर चरित्र (ल.रा. पांगारकर)
  • श्रीज्ञानेश्वर : तत्त्वज्ञ, संत आणि कवी (व्याख्यानसंग्रह, व्याख्याते लेखक : डॉ. व.दि. कुलकर्णी) - ढवळे प्रकाशन
  • ज्ञानेश्वर ते आंबेडकर (डॉ. श्रीपाल सबनीस)
  • ज्ञानेश्वर जीवननिष्ठा (१९७१) (गं.बा. सरदार)
  • ज्ञानेश्वर नीति कथा (वि.का. राजवाडे)
  • श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र आणि ग्रंथ विवेचन (ल. रा. पांगारकर)
  • श्री ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी (पंडित कृष्णकांत नाईक)
  • श्री ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र (तात्या नेमिनाथ पांगळ)
  • ज्ञानेश्वर माऊली (दत्ता ससे)
  • संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव (समीक्षा, विंदा करंदीकर)
  • ज्ञानेश्वरांचा खरंच छळ झाला का? (गुरुदेव डॉ. नारायणानंदनाथ काटेस्वामीजी)
  • श्रीज्ञानेश्वरांचा वाङ्मयीन वारसा (:डॉ. जुल्फी शेख)
  • ज्ञानेश्वरांचे चमत्कार (विश्वनाथ खैरे)
  • ज्ञानदेवांचे पसायदान (अरविंद मंगरूळकर, व विनायक मोरेश्वर केळकर)
  • ज्ञानेश्वरांचे विचारदर्शन (डॉ. शं.रा. तळघट्टी)
  • ज्ञानेश्वरी - अध्याय (अनेक पुस्तके, अच्युत सिद्धनाथ पोटभरे)
  • सार्थ ज्ञानेश्वरी प्रस्तावना (सोनोपंत दांडेकर)
  • सुबोध अनुष्टुप ज्ञानेश्वरी (प्र.सि. मराठे)
  • सोपी ज्ञानेश्वरी (वामन देशपांडे)
  • ज्ञानेश्वरी (राजवाडे संहिता); अध्याय १, ४ व १२
  • ज्ञानेश्वरी (साखरेमहाराज)
  • ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा - एक अभ्यास (प्रा. भावे, प्रा. दाते; मेहता प्रकाशन)
  • श्रीज्ञानेश्वरी अमृतगंगा (प्रा. ह.शे. टेकाळे)
  • ज्ञानेश्वरी - एक अपूर्व शांतिकथा (लेखक : डॉ. व.दि. कुलकर्णी) - मॅजेस्टिक प्रकाशन २०१४ (दुसरी आवृत्ती)
  • श्री ज्ञानेश्वरी : एक अवलोकन (डॉ. ह.य. कुलकर्णी)
  • ज्ञानेश्वरी (ओबड-धोबड), भाग १, २; संच - रविन मायदेव थत्ते
  • ज्ञानेश्वरी निरूपण (सेतुमाधव संगोराम)
  • ज्ञानेश्वरीचे भावविश्व (डॉ. मो.रा. गुण्ये)
  • ज्ञानेश्वरीचे शब्दभांडार (रामचंद्र नारायण वेलिंगकर)
  • ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान (डॉ. शं.दा. पेंडसे)
  • ज्ञानेश्वरीतील भावगंध (कि.द. शिंदे)
  • ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण (वि.का. राजवाडे)
  • ज्ञानेश्वरीतील माणिक मोती (वामन गो. नातू)
  • ज्ञानेश्वरीतील विदग्ध रसवृत्ती डॉ. (रा.शं. वाळिंबे)
  • ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी (म.वा. धोंड)
  • ज्ञानेश्वरी दर्शन (प्रा. रा.श्री. जोग)
  • ज्ञानेश्वरी सर्वस्व (न.चिं.केळकर)

चित्रपटसंपादन करा

  • ज्ञानेश्वरांच्या जीवनावर ’संत ज्ञानेश्वर’ नावाचा मराठी चित्रपट प्रभात फिल्म कंपनीने काढला होता. तो १८ मे १९४० रोजी एकाच वेळी मुंबईत आणि पुण्यात प्रकाशित झाला. पुण्यात तो ३६ आठवडे चालला. या चित्रपटामुळे प्रभातची कीर्ती जगभर पसरली. आजही हा चित्रपट गर्दी खेचतो.
  • संत ज्ञानेश्वर नावाचा हिंदी चित्रपट सन १९६४मध्ये बनला होता.

स्मारकेसंपादन करा

  • अहमदनगर जिल्ह्यात नेवासा येथे संत ज्ञानेश्वर नावाची शाळा आहे.
  • आळंदीला ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आणि तिने चालविलेले ज्ञानेश्वर विद्यालय आहे. ही प्रशाला भावी कीर्तनकार, प्रवचनकार घडविणारी प्रबोधन शाळा आहे.
  • औरंगाबाद जिल्ह्यातील हर्सूल गावी ’श्री संत ज्ञानेश्वर वेदविद्या प्रतिष्ठान’ची वेद शाळा आहे.
  • गोंदिया जिल्ह्यात पांढराबोडी येथे संत ज्ञानेश्वर आदिवासी निवासी आश्रमशाळा होती।
  • संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा, तळेगांव
  • श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय, महर्षीनगर, पुणे
  • संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, इस्लामपूर (सांगली जिल्हा)
  • एम‌आयटी संस्थेचे श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय (पुणे)
  • संत ज्ञानेश्वर उद्यान, निगडी (पुणे)

हेही पहासंपादन करा

विकिस्रोत
ज्ञानेश्वर हा शब्द/शब्दसमूह 
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

संदर्भसंपादन करा

  1. ^ "संत ज्ञानेश्वर परिचय". जुलै १२,२०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)


बाह्य दुवेसंपादन करा




आधुनिक संत


गजानन महाराज

महाराष्ट्रातील संत

गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संतहोते.[१]महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यामुळे नावारूपाला आले आहे.[२]

गजानन महाराज
जन्मजन्मदिनांक
अज्ञात
मृत्यु८ सप्टेंबर १९१० (संजीवन समाधी)
शेगावभारत
मृत्युचे कारण
कालावधी१९ वे शतक(फेब्रुवारी १८७८-सप्टेंबर १९१०

शेगाव (बुलढाणा जिल्हा), महाराष्ट्र, भारत येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरा (संप्रदाय) चे भारतीय गुरू होते. त्यांना भगवान दत्तात्रेय आणि भगवान गणेश यांचा अवतार मानला जातो. त्यांचा जन्म कधी झाला हे माहित नाही परंतु त्याचे 20 वर्षांचे एक तरुण म्हणून शेगाव येथे त्याचे प्रथम परिचित स्वरूप फेब्रुवारी 1878 रोजी आहे. तिथी त्याच्या शिष्यांनी समाधी दिन म्हणून दर्शविली (ऋषी पंचमी) ज्या दिवशी शिष्य श्री पुण्यतिथी उत्सवाचे अनुसरण करतात. त्याच्या पहिल्या हजेरीची तारीख देखील 'प्रगट दिन सोहला' म्हणून ओळखल्या जाणार्‍या शुभ दिवसा म्हणून चिन्हांकित केली जाते.

गजानन विजय ग्रंथ

गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री. दासगणू महाराज यांनी लिहिला असून त्याचे नाव "श्री गजानन विजय असे आहे. या ग्रंथातील उल्लेखानुसार महाराजांच्या आयुष्यातील अनेक आख्यायिका आणि इतिहास वाचायला मिळतो.[३]

इतिहास 

श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते अशी एक वदंता होती.[४] त्याचे कारण म्हणजे श्री बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने "आंध्रा योगुलु" नावाच्या पुस्तकात श्री महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे. माघ वद्य ७ शके १८००, (२३ फेब्रुवारी १८७८) या दिवशी १८ वर्षाचे गजानन महाराज शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले असे मानले जाते.[५] त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, "कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती | आलीसे प्रचिती बहुतांना ||"

महाराजांच्या प्रकटदिनाच्या निमित्ताने शेगाव येथे मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा होतो.[६]

शरीरयष्टी

सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती.[४] पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी (कपडा) गुंडाळलेली असे..[७]

अन्नसेवन

महाराजांची अशी मूर्ती एखाद्याच्या घरात लगबगीने घुसत असे, किंवा अंगणात, ओसरीवर मुक्काम ठोकीत असे. मग घरधन्याने भाकरतुकडा दिला तर खावा अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशी त्यांची बालसुलभ वृत्ती होती. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी, असे त्यांचे वर्तन असे.

महाराजांना झुणका भाकरीसोबतच [मुळा|मुळ्याच्या]] शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही ते सेवन करीत. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वान्नांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात.

मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहानलहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात. महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते . चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत.[८]

उपदेश

महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे व्यवस्थित सांगितले. त्यांनी गोविंदपंत टाकळीकर ह्या कीर्तनकारास उपदेश दिला की त्याने पोटभऱ्या कीर्तनकार होऊ नये.

विरक्ती

देवीदास पातुरकरांच्या अंगणात पक्वान्नाचे ताट समोर आल्यावर महाराजांनी सर्व पदार्थ एकत्र करून खाल्ले, आणि दाखवून दिले की ज्याने ब्रह्मरसाची माधुरी चाखली आहे त्याला पक्वान्नाची काय चव? ह्याच ठिकाणी महाराजांनी सांगितले की शुद्ध ब्रह्म हे निर्गुण असते आणि त्याच्यापासूनच हे जग निर्माण झालेले आहे.

भक्तांकडून साग्रसंगीत षोडशोपचारे पूजा करून घ्यावी तर कधी आंघोळीशिवाय कित्येक दिवस राहावे , तर कधी गळ्यात पडणारे हारही भिरकावून द्यावेत, अशी बालोन्मतपिशाच्च वृत्ती होती.

महाराज हे शुद्ध ब्रह्म होते, एक परमहंस संन्यासी होते. ज्याला ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले आहे, जेथे जीव-शिवाचे मिलन झालेले आहे अशा जीवनमुक्तांना देहाचे भान राहात नाही असे असताना तो देह कपड्यात गुंडाळण्याकडे लक्ष त‍री कुठे असणार? महाराज अशा पराकोटीचे जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते बहुश: दिगंब‍र अवस्थेतच असत. नग्न राहतात अशा आरोपाखाली जेव्हा जठारसाहेबांनी त्यांना त्यांच्या दिगंबर अवस्थेबद्दल विचारताच महाराज म्हणाले, "तुला काय करणे यासी|चिलिम भरावी वेगेसी|नसत्या गोष्टीशी|महत्त्व न यावे निरर्थक||." महाराजांना कपड्याचे आकर्षण वा सोस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी अंगावर शाल पांघरली तर मनात असेल तोपर्यंत ठेवीत, नाहीतर ती फेकून. पादुका, पादत्राणे त्यांनी कधी वापरलीच नाहीत. बरेचसे भक्त विकत आणलेल्या पादुका महाराजांच्या पायाला लावीत आणि मग घरी त्यांची स्थापना करीत. मात्र महाराजांच्या नित्य वापरातल्या वस्तूंमध्ये पादुका नव्हत्या. इतकेच काय, त्यांना चिलीम ओढण्याचीही फारशी सवय नव्हती. क्वचितच ते चिलीम ओढीत. पण त्यांच्या फोटोत-मूर्तीत मात्र त्यांच्या हातात चिलीम दिलेली आढळते. या चिलिमीवरूनच ते ओळखले जातात. असत.[४]

भ्रमंती

आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे {शेगाव|शेगांवात]] व्यतीत केला असला तरी कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती 

अकोला :महाराष्‍ट्रातील अकोला जिल्‍हयातील ... बाळापूर हे शहर प्राचिन काळी त्‍यांच्‍या ... येथे फार प्राचिन बौध्‍द विहार सुध्‍दा आहे.

मलकापूर :

, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश: धावावे लागे.

महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. त्याचप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात. नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील निलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मागिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत. ब्रह्मागिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी दहावेळा विचार करावा लागतो. शे-सव्वाशे वर्षांपूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती. महाराजमात्र हा पूर्ण पर्वत चढून जात असत. ब्रह्मागिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुंफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तेथे काही क्षण घालवत. नाथसंप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले, त्यांतलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले दिसतात.[७]

समाधिसंपादन करा

शेगाव येथील आनंद सागर उद्यान

जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतारसमाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे, त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हणाले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्याआज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविलासंदर्भ हवा ].

समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, "आम्ही आहोत येथे स्थित | तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||"

लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नानघालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती.

महाराजांचे भक्त समाधीच्या मिरवणुकीत सहभागी झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर अबीरगुलालफुलेतुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून मिरवणूक पहाटे मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला.

त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला, "जय गजानना |ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||" आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली.

८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगावयेथे समाधी घेतली. [४]

श्री गजानन महाराजांच्या पश्चातसंपादन करा

संत गजानन महाराज समाधी सोहळा २०१०मध्ये साजरा झाला.[९]. १९६७ पासून् श्री गजानन महाराज पालखी माध्यमातून श्री गजानन महाराज खेड्या पाड्यापर्यंत पोहोचले[१०] श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्यादिशेने रवाना होते.देहूआळंदीनंतर याच पालखीला सर्वाधिक महत्त्व आहे. शेगावची पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालखीसोबत विदर्भ , खानदेश , मराठवाड्याचे असंख्य वारकरी वारीला निघतात. दरवर्षी हे वारकरी परंपरेनुसार, नामस्मरण करत भगव्या पताका खांद्यावर घेऊन वारीमध्ये सहभागी होतात. पालखी अश्व, गज, अंबारीसह निघते [११]

मंदिरेसंपादन करा

महाराष्ट्रात सर्वत्र गजानन महाराजांची मंदिरे स्थापन झालेली आहेत. महाराष्ट्राबाहेरही अशी मंदिरे स्थापन झाली असून महाराजांचे उत्सव तेथे साजरे होतात.[१२]

पुणे येथील मंदिर
श्री गजानन महाराजांचे मंदिर, ओंकारेश्वर

श्री गजानन महाराज संस्थान मठसंपादन करा

महाराजांची कीर्ती वाढत गेल्यानंतर त्यांनी स्वतःच आपल्या शिष्यांना ट्रस्ट स्थापन करायला सांगितला. त्यानंतर मग गजानन महाराज संस्थान या नावाने १९०८ मध्ये ट्रस्ट स्थापन झाला. शेगावात नवीन मठ स्थापित झाला आणि महाराजांच्या श्रेष्ठतेचा आणि संतत्वाचा महिमा सर्वदूर पसरला. भौतिक आणि आध्यात्मिक ग‍रजा पूर्ण क‍रुन घेण्याकरिता लोक शेगावला अमाप गर्दी करू लागले. महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, सेंट्रल रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावर आहे. गीतांजली एक्सप्रेस सोडून इतर सर्व रेल्वेगाड्या येथे थांबतात. स्टेशनच्या बाहेरून मंदिरापर्यंत पायी गेल्यास फक्त १५ मिनिटांचा रस्ता आहे. स्टेशनपासून मंदिरापर्यंत येण्या-जाण्यास मोफत बससेवा उपलब्ध आहे. महाराष्ट्रातून येथे १७२ बसेस येतात. त्या व्यतिरिक्त देवास-उज्जैन, पैठण, पंढरपूर या स्थानकांहूनही बसेस चालतात.

श्री गजानन महाराजांचे मंदिर शेगाव गावाच्या मधोमध आहे.हे मंदिर काळ्या पाषाणाचे आहे. श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. वरच्याबाजूला राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीची स्थापल्या आहेत.[१३] मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते. रोज सकाळी पाच वाजेपासून रात्री ९.३० पर्यंत पूजा-अर्चना विधिवत चालते. काकडआरती ते शयनआरतीपर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात. या मठाचे तसेच मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे असलेली स्वचछता, शांतता, शिस्त आणि कर्मचाऱ्यांची तसेच सेवेकऱ्यांची भक्तांशी उत्तम तसेच प्रेमळ वर्तणूक.. दर्शनाची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे केलेली असून, दुपारच्या वेळी सर्व भक्तांना भोजन प्रसाद वाटतात. भोजनस्थळ देखील अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटके असून सेवेकरी प्रेमाने भक्तांना जेवायला वाढतात.[१४]

पंढरपूर येथे प्रतिवर्षी शेगावहून आषाढी वारीला गजानन महाराजांची पालखी जाते.[१५]


संदर्भसंपादन करा

  1. ^ Marāṭhī viśvakośa. Mahārāshṭra Rājya Sāhitya Sāskr̥ti Maṇḍaḷa. 1973.
  2. ^ Sāṭhe, Śarada Keśava (2001). Marāṭhī granthasūcī: 1951-1962. Rājya Marāṭhī Vikāsa Sãsthā.
  3. ^ Patukale, Pro Kshitij (2014-10-12). Shri Datt Parikrama. Kardaliwan Seva Sangh. ISBN 978-93-5196-148-2.
  4. ↑ a b c d जोशी, महादेवशास्त्री (२००० (पुनर्मुद्रण)). भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा. पुणे: भारतीय संस्कृती कोश मंडळ प्रकाशन. pp. ६९८. |year=मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ Patukale, Pro Kshitij (2014-10-12). Shri Datt Parikrama. Kardaliwan Seva Sangh. ISBN 978-93-5196-148-2.
  6. ^ "भाविकांच्या गर्दीने फुलली संतनगरी"महाराष्ट्र टाईम्स. २६. २. २०१९. १४. २. २०२० रोजी पाहिले.|access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ↑ a b "अवलिया-Maharashtra Times"Maharashtra Times (हिंदी भाषेत)2018-09-06 रोजी पाहिले.
  8. ^ "अवलिया-Maharashtra Times"Maharashtra Times (हिंदी भाषेत)2018-09-06 रोजी पाहिले.
  9. ^http://beta.esakal.com/2009/03/16232106/vidarbha-nagpur-shevgaon-devel.html[मृत दुवा]
  10. ^ "loksatta.com"www.loksatta.com.2018-09-06 रोजी पाहिले.
  11. ^ "९ जूनला निघणार गजानन महाराज पालखी-Maharashtra Times"Maharashtra Times (हिंदी भाषेत)2018-09-06 रोजी पाहिले.
  12. ^ परदेशी, रणजीत कुमार (१५.२.२०२०). "https://www.patrika.com/burhanpur-news/gajanan-maharaj-s-prasad-will-be-prepared-for-15-thousand-devotees-on-5772804/"पत्रिका. १७.२.२०२० रोजी पाहिले.|access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |title= (सहाय्य)
  13. ^ Yangalwar, Pro Vijay (2013-09-18). Shree Kshetra Shegaon Darshan / Nachiket Prakashan: श्री क्षेत्र शेगाव दर्शन. Nachiket Prakashan.
  14. ^ Pinkney, Andrea Marion; Whalen-Bridge, John (2018-08-20). Religious Journeys in India: Pilgrims, Tourists, and Travelers(इंग्रजी भाषेत). SUNY Press. ISBN 978-1-4384-6603-3.
  15. ^ "गजानन महाराजांची पालखी सोलापूर मुक्कामी"महाराष्ट्र टाईम्स. ६.७.२०१९. १५.२.२०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

नोंदीसंपादन करा

श्री गजानन विजय या ग्रंथामधे त्यांचे चरित्र दासगणू महाराजयांनी लिहून ठेवले आहे.[१] हा ग्रंथ महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. त्याचे भक्तिभावाने पारायण केल्यास इच्छीत मनोरथ पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे.

साहित्य संमेलनसंपादन करा

संत गजानन महाराज साहित्य संघाच्यावतीने ’गजानन महाराज साहित्य संमेलन’ भरते.

  • रिसोड येथे असे तिसरे गजानन महाराज साहित्य संमेलन१५ नोव्हेंबर २००९ रोजी भरले होते. अध्यक्षस्थानी डॉ. बलभीमराज गोरे होते.
  • गजानन महाराज भक्त संमेलन नावाचेही एक संमेलन खर्डी (शहापूर-ठाणे जिल्हा) येथे ६ (की १०?) नोव्हेंबर २०१९ रोजी भरले होते.

गजाजन महाराजांवरील मराठी पुस्तकेसंपादन करा

  • Gajanan Jeevani (इंग्रजी, सावनी विभास)
  • श्री गजानन महाराज चित्रदर्शन, एकूण १२ भाग (ई-बुक, नचिकेत प्रकाशन)
  • संतकवी दासगणू महाराज आशिर्वादित श्री गजानन महाराज भक्तिविजय (मनोहर मिसार)
  • गजानन महाराजांच्या गोष्टीपासून काय बोध घ्याल? (वसंत गोगटे)
  • श्री गजानन विजय : कथासार आणि उपासना (चिंतामणी देशपांडे)
  • गणीं गण गणांत बोते (नचिकेत प्रकाशन)
  • गणीं गण गणांत बोते (ल.ह. पाठक, पद्मगंधा प्रकाशन)
  • परब्रम्ह आले घरा ! (जितेंद्र ठाकूर)
  • राणा शेगावीचा (जनार्दन ओक)
  • शेगावीचा योगीराणा (कादंबरी, लेखिका - लीला गोळे)
  • शेगावीचा राणा (विवेक दिगंबर वैद्य)


बाह्य दुवेसंपादन करा

  1. ^ Chawla, Deepak (2015-03-02). Business as Usual (इंग्रजी भाषेत). The Write Place. ISBN 978-93-83952-22-9.
  • गाडगे महाराज

विकिपीडिया

गाडगे महाराज

समाज सुधारक

गाडगे बाबा

गाडगे बाबा 
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावगाडगे बाबा
जन्म तारीखफेब्रुवारी २३, इ.स. १८७६, फेब्रुवारी १३, इ.स. १८७६
महाराष्ट्र
मृत्यू तारीखडिसेंबर २०, इ.स. १९५६
अमरावती
नागरिकत्व
मातृभाषा
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q21738196
no fallback page found for autotranslate (base=Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext, lang=mr)

(जन्म: २३ फेब्रुवारी १८७६;जन्म कोतेगाव(शेंडगाव); मृत्यू: २० डिसेंबर १९५६ अमरावती) हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे [[महाराtu Huggष्ट्र]] राज्यातील एक कीर्तनकारसंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्यायदेण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.[संदर्भ हवा ]

संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.

गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. संत गाडगे महाराजविषयी माहिती . गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे. . बालपण : गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. . सामाजिक सुधारणा : १८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्‍यांना शिकविला. दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले. . समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. . त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली. . महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. . अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे. "संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश " गाडगेबाबा प्रबोधन काव्य भुकेलेल्यांना = अन्न तहानलेल्यांना = पाणी उघड्यानागड्यांना = वस्त्र गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत बेघरांना = आसरा अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार बेकारांना = रोजगार पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय गरीब तरुण-तरुणींचे = लग्न दुःखी व निराशांना = हिंमत गोरगरिबांना = शिक्षण हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !! . संक्षिप्त चरित्र :- गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले. ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले. १९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला. १९२५- मुर्तिजापूर येथे गोरक्षण कार्य केले आणि धर्मशाळा व विद्यालय बांधले. १९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली. "मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले. फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या. गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते. १९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.. . गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला. "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले. आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात' १९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली. १९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली. गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती. डॉ आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत. २० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू. गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे. . गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. . गाडगेबाबा आणि बाबासाहेब आंबेडकर : १४ जुलै १९४१ ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्‍या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे." तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते. . गाडगेबाबांचे विचार : एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना...समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, " बिचार्‍या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता ? त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून ?" पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते.. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले "टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू? महाराज काय बी करा पण आम्हालाबी ब्राह्मण करा."



संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांत होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून् सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाजथरातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहात आहे, असे दिसते. [१]

गाडगे महाराजांची चरित्रेसंपादन करा

  • असे होते गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
  • ओळख गाडगेबाबांची (प्राचार्य रा.तु. भगत)
  • कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे)
  • गाडगेबाबा (चरित्र, प्रबोधनकार ठाकरे)
  • गाडगे बाबांचा पदस्पर्श (केशव बा. वसेकर)
  • श्री गाडगेबाबांचे शेवटचें कीर्तन (गो.नी. दांडेकर)
  • Shri Gadge Maharaj (इंग्रजी, गो.नी. दांडेकर)
  • गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी)
  • गाडगे माहात्म्य (काव्यात्मक चरित्र, नारायण वासुदेव गोखले)
  • गोष्टीरूप गाडगेबाबा (विजया ब्राम्हणकर)
  • निवडक गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
  • मुलांचे गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
  • लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत)
  • लोकोत्तर : गाडगेबाबा जीवन आणि कार्य (डॉ. द.ता. भोसले)
  • The Wandering Saint (इंग्रजी, वसंत शिरवाडकर)
  • संत गाडगेबाबा (गिरिजा कीर)
  • संत गाडगेबाबा (दिलीप सुरवाडे)
  • संत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
  • Sant Gadagebaba (इंग्रजी, प्राचार्य रा.तु. भगत)
  • संत गाडगेबाबांची भ्रमणगाथा (प्राचार्य रा.तु. भगत)
  • श्रीसंत गाडगे महाराज (मधुकर केचे)
  • श्री संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पां.बा. कवडे, पंढरपूर)
  • संत श्री गाडगे महाराज (डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर)
  • गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार)
  • समतासूर्य गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत )
  • स्वच्छतासंत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

गाडगेबाबांच्या जीवनावरील चित्रपटसंपादन करा

  • डेबू : हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - नीलेश जलमकर
  • देवकीनंदन गोपाळा : हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - राजदत्त

साहित्य संमेलनसंपादन करा

महाराष्ट्रात गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरते.

पुरस्कारसंपादन करा

गाडगे महाराजांच्या नावाने महाराष्ट्रातील काही स्वच्छ गावांच्या ग्रामपंचायतींना गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कारदिला जात असे. हा पुरस्कार तूर्त स्थगित केला गेला आहे. (२०१८ची बातमी).

पहा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान

बाह्य दुवेसंपादन करा

  1. ^ चव्हाण, रा. ना. (२०१३). संत-सुधारक व त्यांचे धर्मविचार एक अभ्यास. पुणे: रा. ना. चव्हाण जन्मशताब्दी वर्ष प्रकाशन. pp. १२९.

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

विकिपीडिया

[१]गुलाबराव महाराज (जन्म : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडे, तालुका लोणी टाकळी, ६ जुलै १८८१; मृत्यू : पुणे, २० सप्टेंबर १९१५) हे महाराष्ट्रात होऊन गेलेले एक संत व मराठी लेखक होते.

गुलाबराव महाराज
जन्म६ जुलै १८८१]]
लोणी टाकळी, जिल्हा अमरावतीमहाराष्ट्रभारत
मृत्यू२० सप्टेंबर १९१५]]
पुणे, महाराष्ट्रभारत
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारसूत्रग्रंथ, भाष्य, प्रकरण, निबंध, प्रश्नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण, कोश

श्री गुलाबराव महाराज हे विसाव्या शतकातील एक असामान्य अलौकिक संत होते. त्यांना वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व आले होते. त्यांचा जन्म तथाकथित निम्न जातीत झाला होता. सर्य आयुष्य ग्रामीण भागात गेले. तेही फक्त चौतीस वर्षांचे. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यानी १३४ ग्रंथ लिहिले.दुजोरा हवा]


जीवनसंपादन करा

गुलाबराव महाराज यांनी बालपणीच ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला होता. "भगवद्देह अनध्यस्त-विवर्त आहे, म्हणजे ज्ञानानंतर नाश पावत नाही" हा भक्तिसिद्धान्त शांकरतत्त्वज्ञानाच्या आधारावर मांडून त्यांनी मधुराद्वैत दर्शनाचा पुरस्कार केला. सांख्य-योगादी षड्दर्शने परस्परविरोधी नसून पूरक आहेत, असे त्यांनी वेळोवेळी सांगितले. 'भारतातील नानाविध धार्मिक संप्रदाय हिंदू, बौद्ध, जैनादी भारतीय धर्म आणि ख्रिस्ती, मुसलमानादी सर्व अभारतीय धर्म, वैदिक धर्माच्याच एकेका अंशावर स्थित आहेत' असे विचार ते मांडत असत. डार्विनचा उत्क्रांतिवाद, स्पेन्सरचे तत्त्वज्ञान इ. पाश्चात्त्य विचारसरणी त्यांना मान्य नव्हती. शंकराचार्यज्ञानेश्वरनामदेवएकनाथतुकाराम व रामदास या संतांच्या ग्रंथांचे सार एकत्रित करुन गुलाबराव महाराजांनी आपल्या अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात ग्रंथनिर्मिती केली.

आर्य हा वंश असून तो बाहेरून भारतात आला, हे मॅक्समुल्लरचे व लोकमान्य टिळकांचे मत गुलाबराव महाराजांना मान्य नव्हते. प्राचीन ग्रंथांतील गणित, रेडियम, ध्वनी, ईथर, इलेक्ट्रॉन्स, उष्णता-गति-प्रकाश, विमानविद्या, अणुविज्ञान वगैरेंचे अनेक मौलिक संदर्भ त्यांनी दाखविले. वेदान्त, उपनिषदे, आत्मज्ञान, प्राचीन संत साहित्य, ध्यान-योग-मधुराभक्ती, आयुर्वेद, डार्विन-स्पेन्सर आदी शास्त्रज्ञांचे सिद्धान्त - हे त्यांच्या अभ्यासाचे, चिंतनाचे व लेखनाचे विषय होत. 'मधुराद्वैत' (मधुरा भक्ती व अद्वैत विचार यांचा समन्वय) हा नवा विचार त्यांनी भक्तांना दिला.

गुलाबराव स्‍वतःला संत ज्ञानेश्वरांची कन्या मानत असत. कृष्णपत्‍नी मानून मंगळसूत्रादी स्त्रीचिन्हेही ते धारण करीत. महाराजांच्या नंतर त्यांचा संप्रदाय बाबाजी महाराज पंडितयांनी इ.स. १९६४ पर्यंत चालविला.

गुलाबराव महाराज यांचे इ.स. १९१५ मध्ये वयाच्या ३४ व्या वर्षी निधन झाले.

साहित्यसंपादन करा

मराठी, हिंदी व संस्कृत भाषेवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. गुलाबराव महाराज यांनी काव्यशास्त्र, आयुर्वेद, संगीत इत्यादी अनेक विषयांवर लेखन केले. संस्कृत, हिंदी, मराठी या भाषांतून व वर्‍हाडी बोलीतून त्यांनी १३३ ग्रंथ लिहिले. सूत्रग्रंथ, भाष्य, प्रकरण, निबंध, प्रश्नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण, कोश वगैरे वाङ्‌मयप्रकार त्यांनी हाताळले. २७,००० ओव्या, २,५०० अभंग, २,५०० पदे, ३,००० श्लोकादी रचना इत्यादींचा त्यांत समावेश आहे.

गुलाबराव महाराजांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

  • अलौकिक व्याख्याने (इ.स. १९१२)
  • धर्म समन्वय
  • प्रेमनिकुंज (इ.स. १९१८)
  • योगप्रभाव
  • संप्रदाय सुरतरु (इ.स. १९१९)
  • साधुबोध (इ.स. १९१५)

गुलाबराव महाराज यांच्यावरील पुस्तकेसंपादन करा

  • प्रज्ञाचक्षू दीपस्तंभ (बाळ राणे)[२]
  • संत गुलाबराव महाराज (सुनीति आफळे)
  • संत श्री गुलाबराव महाराज (प्रा. विजय यंगलवार)
  • ज्ञानेश्वर कन्या-गुलाबराव महाराज (चरित्र, डॉ. सच्चिदानंद शेवडे)[३]

मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज एकदा ख्यातनाम मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररीत गेले. ग्रंथालयात विशिष्ट विषयांवरील कुठले ग्रंथ आहेत, या जिज्ञासेपायी त्यांनी ग्रंथपालांना विचारणा केली. ग्रंथपाल महाराजांना ओळखत नव्हता. एक अंध व्यक्ती ग्रंथांची विचारपूस करते म्हणून त्या सर्वच लोकांना कुतूहल वाटले. ग्रंथपालाच्या सहकाऱ्याने महाराजांना ग्रंथांची नावे सांगणे सुरू केले. बहुतांश ग्रंथ महाराजांना माहीत होते. या ग्रंथांचा क्रम कसा लावावयास हवा, हे महाराज त्या-त्या ग्रंथातील सारांशाच्या आधारे त्या ग्रंथालयकर्मीला सांगत होते. ग्रंथपाल व आजूबाजूचे लोक महाराजांचे ज्ञान पाहून थक्क झाले. चौकशीअंती त्यांना समजले की अत्यंत सामान्य दिसणारी ही अंध व्यक्ती म्हणजे मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज आहेत...

१८८१ ते १९१५ या इंग्रजांच्या गुलामगिरीच्या काळात सुशिक्षित भारतीयांना पाश्‍चात्त्य विचारांनी जखडले होते. भारतातील शास्त्रे, कला, साहित्य, जीवनपद्धती अशा सर्वच बाबी त्या लोकांना अर्थहीन वाटत होत्या. भारतीय संस्कृतीविषयी त्यांच्यात न्यूनगंड निर्माण झाला होता. याच काळात पाश्‍चात्त्य विचारसरणीतील उथळपणा आणि भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व केवळ बुद्धिवादाच्या आधारे विचारवंतांना पटवून देण्याचे आत्यंतिक मोलाचे कार्य अर्भकावस्थेतच अंधत्व प्राप्त झालेल्या गुलाबराव महाराजांनी केले. गुलाबराव महाराजांचा जीवनपट विलक्षण आहे. अमरावती जिल्ह्यात नांदगाव (खंडे)ता. लोणी ला महाराजांचा जन्म झाला. मातृवियोगानंतर सहा वर्षे बडनेराजवळ असलेल्या लोणी टाकळी येथे गुलाबराव महाराजांचे वास्तव्य होते. घरातील वातावरण पूर्णपणे प्रतिकूल. आठव्या महिन्यातच आजाराने डोळे गेले म्हणून आंधळेपणा आलेला. अशा स्थितीत महाराजांनी सर्व ज्ञान कसे प्राप्त केले, हा प्रश्‍न सामान्य माणसाला निश्‍चित पडतो. इंग्रजीतील आधुनिक विज्ञानावरचे, धर्म आणि अध्यात्म शास्त्र, संस्कृतातील गायनशास्त्रावरचे, वैद्यक शास्त्रावरचे, विविध कला विषयांचे, वेद-उपनिषदांसह सर्व ग्रंथांचे वाचन त्यांनी वयाच्या १२ ते १६ वर्षांच्या काळातच करून घेतले. प्रपंच किंवा परमार्थ असा एकही विषय राहिला नाही की ज्यावर गुलाबराव महाराजांनी आपले स्वतंत्र विचार प्रगट केले नाहीत. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर उत्तरेकडचे व बंगालकडचेही जे मोठे विद्वान त्यांच्या संपर्कात आले ते सर्व त्यांची अलौकिक प्रतिभा पाहून थक्क झाले. त्यांच्या शुद्ध आचरणाला व अगाध ज्ञानाला भुलून लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले.

मानभाव मत, डार्विन मत, स्पेन्सर, मायर्स यांच्या मतांवर आणि ग्रंथांवर महाराजांनी समीक्षा केली. जगदीशचंद्र बोसांच्या ग्रंथांची समीक्षा केली. विविध विषयांवरच्या १३४ ग्रंथांचे लेखन महाराजांनी केले. मराठी, हिंदी, ब्रज, संस्कृत भाषेत लेखन केले. काव्य, योग, संगीत, धर्म, सांख्यशास्त्र, वेदान्त, छंदशास्त्र असे सर्व विषय हाताळले. हे अगाध ज्ञान महाराजांनी केव्हा व कसे प्राप्‍त केले असेल हा विषय आजही आपल्या विचारक्षमतेच्या बाहेरचाच आहे.

महाराज जवळच्या लोकांकडून पुस्तके वाचून घेत असत. अगाध स्मरणशक्तीच्या आधारे एकदा ऐकताच त्यांच्या स्मरणात राहत असे. त्यांच्यासाठी पुस्तक वाचणारा कधीच रिकाम्या हाताने परत गेला नाही. प्रत्येकाला दक्षिणा द्यायचे. ज्वारी, गहू, हातातील चांदीचे कडे, घरातील मौल्यवान वस्तू... ग्रंथ वाचून दाखविणाऱ्याला गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी काय काय वस्तू दिल्या असतील ते त्यांना किंवा घेणाऱ्यालाच माहिती. महाराजांनी आपल्या आयुष्यात कशाचा मोह बाळगला असेल तर तो केवळ ज्ञानलालसेचा, अर्थातच ग्रंथांचा आणि पुस्तकांचा! पत्‍नीचे एक लुगडे व स्वतःच्या अंगावर बंडी आणि धोतर या शिवाय महाराजांजवळ कुठलीच संपत्ती नव्हती. जवळच्या मंडळींकडे त्यांनी कशाचा आग्रह धरला असेल तर तो म्हणजे फक्त पुस्तकांचा. गुलाबराव महाराजांनी दोन हजारहून अधिक ग्रंथ जवळ बाळगले. पुस्तकांच्या पेट्या डोक्यावर घेऊन कितीही मैलांचा प्रवास ते पती-पत्‍नी करीत.. ती दुर्मिळ अशी ग्रंथसंपदा आजही अमरावतीत सुरक्षित आहे. या ग्रंथसंपदेवर महाराजांचा जीव होता. ‘ज्ञानेश्वरी-गूढार्थदीपिका’ ग्रंथाचे कर्ते वेदान्तकेसरी बाबाजी महाराज पंडित या आपल्या शिष्योत्तमावर महाराजांचे प्रचंड प्रेम होते. बाबाजी महाराजांची गुरुभक्ती निःसीम होती. स्वतः गुलाबराव महाराजांनीच ‘मी पंडिताला वश झालो आहे’, असे उद्‌गार काढले होते. त्या बाबाजी महाराज पंडितांना गुलाबराव महाराजांनी आपल्या शेवटच्या काळात काही मोलाच्या सूचना केल्या होत्या. त्यात ग्रंथालयाची व्यवस्था चांगली ठेवावी, ही पण एक सूचना होती. बाबाजी महाराज पंडितांनी महाराजांच्या अन्य सूचनांप्रमाणेच याही सूचनेचे अत्यंत तंतोतंत पालन केले. परिणामी महाराजांचा हा धनसंग्रह आजही अमरावतीच्या परकोटाच्या आत दहिसाथीत असलेल्या ज्ञानेश्वर महाराज मंदिरात सुस्थितीत, सुरक्षितपणे जपून ठेवला आहे.

अंध असलेल्या गुलाबराव महाराजांनी अकोल्याच्या एका चित्रकाराकरवी ज्ञानेश्वर माउलीचे एक चित्र तयार करून घेतले होते. याच चित्राच्या आधारे नंतर ज्ञानेश्वर माउलींचा फेट्यातील समाधिस्थ बसलेले चित्र विविध चित्रकारांनी साकारले. ते चित्र आजही या ज्ञानेश्वर मंदिरात अग्रभागी लावण्यात आले आहे. गुलाबराव महाराजांच्या ग्रंथ संपदेत आज अत्यंत दुर्मिळ असलेल्या ग्रंथांचाही समावेश आहे. या ग्रंथसंपदेची संख्या दोन हजाराहून अधिक आहे. शांकर मताचे मंडण असलेला भामती, चित्‌सुखी, अद्वैतसिद्धी, खंडण खंड खाद्यम, बायबल, कुराण, प्लेटो, हेगेल, मायर्स, डार्विन, स्पेन्सर अशी मोठी ग्रंथसंपदा आहे. दर्शनशास्त्र, संगीत, काव्य, योग, षड्‌दर्शन, सांख्य, न्याय, धर्म अशा असंख्य विषयांवरचे ग्रंथ गुलाबराव महाराजांनी अभ्यासले. आत्मसात केले आणि त्यावर आपले अभ्यासपूर्ण मत मांडले. गुलाबराव महाराजांच्या अलौकिक बुद्धिमत्तेची साक्ष देणारी ही ग्रंथसंपदा याच मंदिरात आज कपाटबंद आहे. या ग्रंथांना हात लागणार नाही, याची पुरेपूर काळजी या मंदिराच्या व्यवस्थापनाने घेतली आहे, हे विशेष! चौतीस वर्षांच्या अल्पायुष्यकाळात गुलाबराव महाराजांनी एवढे ज्ञान कसे प्राप्‍त केले, या प्रश्‍नाचे पूर्ण समाधानकारक नसले तरी अल्पसे उत्तर या ग्रंथांच्या दर्शनातूनच आपल्याला मिळते.

छोट्या-मोठ्या प्रतिकूलतेमुळे आत्महत्येचा विचार मनात आणणाऱ्या तरुणांसाठी गुलाबराव महाराजांचे जीवन आणि त्यांची ग्रंथसंपदा अत्यंत प्रेरणादायी आहे. खरे पाहता हे ज्ञानेश्वर मंदिर बुद्धिवान तरुणांच्या वर्दळीचे स्थान असायला हवे. मात्र, स्थिती तशी नाही!

बाबाजी महाराज पंडितांच्या नंतर त्यांचे चिरंजीव पदनामकोष किंवा घटनेच्या मराठी अनुवाद निर्मितीत ज्यांचा सिंहाचा वाटा होता, असे डॉ. वा.ना. पंडित आणि त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव - गुलाबराव महाराजांच्या साहित्याचे, सोबतच उर्दू साहित्य व प्रामुख्याने गजलचे अभ्यासक - डॉ. राम पंडित यांनी महाराजांचे वैचारिक धन जपण्याचा प्रामाणिक प्रयत्‍न केला आहे. डॉ. राम पंडित यांनी पुढाकार घेऊन स्कंददास स्मारक न्यास व पंचलतिका ग्रंथ न्यास या प्रकाशन संस्था स्थापन केल्या आणि सातत्याने गुलाबराव महाराजांचे ग्रंथ प्रकाशित केले. महाराजांच्या अनेक ग्रंथांचे त्यांनी हिंदी भाषेत अनुवाद करून प्रकाशन केले. बबनराव पंडित, डॉ. पुरुषोत्तम पंडित, अनिल पंडित, प्रमोद पंडित, सुधाकर फणसाळकर, वसंत चिपळूणकर, राम लिमये, भालचंद्र बुरसे, केसरे ही मंडळी गुलाबराव महाराजांच्या ग्रंथ प्रकाशनामध्ये आपले योगदान देत असतात. आज गुलाबराव महाराजांनी लिहिलेले सर्वच ग्रंथ उपलब्ध आहेत. प्राचीन काळात भारतात सगळेच शास्त्र विकसित होते. त्यासाठी संस्कृतचे अध्ययन आणि आकलन आवश्यक आहे. ते आकलन महाराजांना झालेले होते. त्यातूनच त्यांनी जगाला थक्क करून सोडणारा विचार मांडला.

माझे ग्रंथ सांभाळून ठेवा, मी पुन्हा येईन!संपादन करा

महाराजांच्या ग्रंथसंपदेचे जतन करण्यासाठी कष्टणाऱ्या डॉ. राम पंडित यांच्या कवितेच्या ओळी महाराजांच्या ग्रंथसंपदेविषयी समर्पक वाटतात. डॉ. राम पंडित लिहितात,

एक चक्षुहीन

अनेक चक्षुहीन लोकांना चक्षु देऊन

चक्षुंच्या पलीकडे गेला......

नंतर कळले

तो तर चक्षुहीन नव्हता

खरे म्हणजे

मोठ्या डोळ्याचे, साक्षर

आम्हीच आंधळे होतो

आता आमच्या सारख्यांचे डोळे

त्या चक्षुहीनाची वाट बघतात

त्यांच्या मार्गाने जाता जाता

आम्ही पडतो, उठतो

परत चालतो

काय करावे... आम्हीच तर आंधळे!

आमच्या नेत्रात अश्रू आहेत

नजर कदाचित धोका खाईल, पण हृदय नव्हे

गीता, वेद, पुराणांच्या प्रमाणे

त्यांच्या त्या वाक्यावर आमचा अटळ विश्‍वास आहे

जे त्यांनी आपले जीर्ण वस्त्र त्यागताना उच्चारले

‘माझे ग्रंथ सांभाळून ठेवा, मी पुन्हा येईन’

होळी नंतर...


Wiki letter w.svgकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यासमदत करा. 
  1. ^ विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश. मुंबई: साप्तहिक विवेक. २०१४.
  2. ^ "मराठी पुस्तक प्रज्ञाचक्षू दीपस्तंभ, marathi book pradnyAchakShU dIpastaMbha pradnyAchakShU dIpastanbha"www.rasik.com2019-02-09 रोजी पाहिले.
  3. ^ "Suyash Book gallery: Buy ज्ञानेश्र्वरकन्या गुलाबराव महाराज Dnyaneshwar Kanya Gulabrao Maharaj By Dr.Sachidanand Shevade Book Online at Low Prices in India | ज्ञानेश्र्वरकन्या गुलाबराव महाराज Dnyaneshwar Kanya Gulabrao Maharaj Reviews & Ratings"suyashbookgallery.com2019-02-09 रोजी पाहिले.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
महाराष्ट्रातील समाजसुधारक, स्वातंत्र्यसेनानी, कवी, गायक
Imbox content.pngह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोतजोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेलतर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.


तुकडोजी महाराज (पूर्ण नाव - माणिक बंडोजी इंगळे, (१९०९-१९६८) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी इ.स. १९३५मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
Tukdoji.jpg
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
मूळ नावमाणिक बंडोजी इंगळे
जन्म३० एप्रिल१९०९
यावली, जि. अमरावती
निर्वाण११ ऑक्टोबर१९६८
मोझरी, जि. अमरावती
गुरूआडकोजी महाराज
भाषामराठीहिंदी
साहित्यरचनाग्रामगीता, अनुभव सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली
कार्यअंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन
वडीलबंडोजी
आईमंजुळाबाई
तुकडोजी महाराज यांचे टपाल तिकीट

तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२च्या भारत छोडोआंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.

गाडगे महाराज सोबत तुकडोजी महाराज (उजवीकडे)

भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.

अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वतःला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.

खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले.

सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.

तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.

महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.

देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.

ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.

तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (३१ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते.

ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेले लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता या ग्रंथामधील विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे.

साहित्य संमेलनेसंपादन करा

तुकडोजी महाराज यांच्या नावाने (१) तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आणि (२) तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अशी दोन संमेलने भरतात.

तुकडीजी महाराज यांची आणि त्यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तकेसंपादन करा

  • अनुभव सागर भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)
  • आठवणी (सचित्र) : राष्ट्रसंत जन्मशताब्दीच्या (गंगाधर श्रीखंडे)
  • ग्रामगीता (कवी - तुकडोजी महाराज)
  • डंका तुकडोजींचा (राजाराम कानतोडे)
  • राष्ट्रसंत तुकडोजी (बालसाहित्य, लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे)
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (चरित्र, लेखक - डॉ. भास्कर गिरधारी)
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मौलिक विचार (संकलन - लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे). (लोकवाङ्मय प्रकाशन)
  • राष्ट्रसंताची अमृतधारा : भाग १, २, ३ (तुकडोजी महाराज)
  • राष्ट्रीय भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)
  • लहरकी बरखा (हिंदी, कवी - तुकडोजी महाराज)
  • सेवास्वधर्म (कवी - तुकडोजी महाराज)

ग्रामगीतासंपादन करा

ग्रामगीता या ग्रंथात तुकडोजी महाराज म्हणतात :

संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती। 
साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।

 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुतळा, नागपूर

संत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक :

या झोपडीत माझ्या
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन. हे भजन जपान येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेत म्हटले होते.

हे भजन दिल्ली येथील राजघाटावर नियमित ऐकविले जाते. :-

हर देश में तू ...
हर देश में तू , हर भेष में तू , तेरे नाम अनेक, तू एकही है ।
तेरी रंगभुमि यह विश्वंभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥धृ॥
सागर से उठा बादल बनके, बादल से फ़टा जल हो कर के ।
फ़िर नहर बनी नदियॉं गहरी,तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥
चींटी से भी अणु-परमाणुबना,सब जीव जगत् का रूप लिया ।
कहिं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा,तू एकही है ॥२॥
यह दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेवकी पूर्ण दया ।
तुकड्या कहे कोई न और दिखा, बस! मै और तू सब एकही है ॥३॥

बाह्य दुवेसंपादन करा

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

बसवेश्वर

१२व्या शतकातील हिंदू तत्त्वज्ञ,

साचा:महात्मा बसेश्वर

संपादन करा

तत्कालीन मंगळवेढा राज्यावर कलचुर्य राजा बिज्जल राज्य करीत होता. त्याच्या मंगळवेढा राज्यातील बागेवाडी या छोट्या गावात मंडगी मादिराज आणि मादलांबिका या पाशुपत शैव कम्मे कुळातील दांपत्याच्या पोटी २५ एप्रिल ११०५, वैशाख शुद्ध तृतीया, अक्षय्य तृतीया दिवशी महात्मा बसवण्णांचा जन्म झाला. बसवण्णा हे मादिराज आणि मादलंबिका यांचे तिसरे संतान होते. त्यांच्यापूर्वी देवराज आणि अक्कनागाई ही दोन रत्ने त्यांना प्राप्त झाली होती.

संपादन करा

बसवण्णा बाराव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११०५ साली प्रतिष्ठित पशुपात शैव कम्मेकुलातील एका कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला. काहींच्या मते तो इंगळेश्र्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते. त्यांचे वडील मादिराज आणि आईचे नाव मादलांबिका बसवेश्वरांच्या भावाचे नाव देवराज व बहिणीचे नाव नागम्मा होते.वयाच्या आठव्या वर्षी ज्ञान मिळविण्यासाठी ते कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम येथे गेले, ते पशुपात शैवांचे प्राचीन अध्ययन केंद्र होते. तेथे बसवेश्वरांनी बारा वर्षे वास्तव्य केले. कूडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला. त्यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला. तेव्हा ते सोलापुरातील मंगळवेढा येथे आले. तेथे ते एकतीस वर्षे राहिले.

महात्मा बसवण्णा आणि शरण चळवळसंपादन करा

अग्रजापासून अंत्यजापर्यंत सर्वजण बसवण्णांच्या शरण चळवळीत सामील झाले. त्या चळवळीत झालेल्या सहभागी पुरुषांना आणि स्त्रियांना अनुक्रमे शरण-शरणी अशी नावे मिळाली. शरण चळवळीचे रूपांतर पुढे स्वतंत्र लिंगायत धर्मामध्ये झाले. लिंगायत धर्माची धर्मांतही झालेल्या शरणांची पूर्वाश्रमीची जात नष्ट झाली. अग्रज-अंत्यज यांच्यात रोजी बेटी व्यवहार सुरू झाले जातीच्या भिंती तुटून पडल्या बसवाच्या शरणचळवळरूपी झाडाला समता, समानता, बंधुता, विवेक, कायक, दासोह याची फळे आली. समाजाच्या प्रत्येक थरातून स्त्री-पुरुष बसवण्णांच्या लिंगायत चळवळीत सामील झाले, ते शरण झाले. शरण म्हणजे शरण परिवारात राहणारा, वचनांवर विश्वास ठेवणारा, नित्य, सत्य-शुद्घ दासोह करणारा, चर्चा-अनुभाव-अनुभव करणारा, लिंग-जाती इ. भेद न मानणारा, मुक्त व्यक्ती म्हणजे शरणी-शरण पण हीच व्याख्या २१ व्या शतकाला अनुसरुन करावी लागेल, ती अशी होईल- निजमुक्त, निर्मोही, जाती-लिंग-वर्ण-वर्ग इ. भेद विरहित, कायकनिरत, दासोही, अनुभवी म्हणजेच शरण

मातंग चेन्नय्या, डोहर कक्कय्या, हडपद अप्पाण्णा, नुलीय चंदय्या, कुंभार गुंडय्या, चांभार हरळय्या, अंबिगर चौडय्या, मेदार बुरुड केतय्या, तुरुंगाहि रामण्णा, मादार धूळय्या, वैद्य संगण्णा, कन्नप्पा तेली, किन्नरी बोमय्या, अल्लमप्रभु, बहुरूपी चौडय्या, शरण सुरय्या, शरण उरलिंगदेव हे शरण शुद्रातिशूद्र समजल्या जाणाऱ्या जातीतून बसवांच्या चळवळीत सहभागी झाले. सुळे सक्कव्वे, सुळे पद्मलदेवी, सुळे चामलदेवी यांसारख्या वेश्या बसवाच्या विचाराला प्रभावित होऊन शरणी झाल्या. वेश्या आपला पूर्वाश्रमीचा व्यवसाय आणि पूर्वाश्रम सोडून पुण्यांगना झाल्या. चोर, लुटारू, दरोडेखोर यांनी आपले दुष्कृत्य सोडून दिले. ते शरण बनले. दारू विकणारा हेडद मारय्या वाटसरूंच्या सेवेसाठी पाणी, दूध आणि ताक विकायला लागला.

सर्वजण दुष्कर्मे सोडून सदाचारी बनले,शरण बनले. बसवण्णांनी ऐतखाऊ लोकांचे मनपरिवर्तन केले. त्यांना कष्टाचे महत्त्व समजावून सांगितले. कायकाकवे कैलास, श्रम हाच ईश्वर हा मूलमंत्र बसवण्णांनी भारतीय अर्थव्यवस्थेला दिला. श्रमाला व्यवसायाला कायकाला मानाचे, सन्मानाचे स्थान प्राप्त करून दिले. दिवसभर कष्ट करून शरण संध्याकाळी अनुभवमंटपात एकत्र येत. विचारविनिमय, चर्चा करत. शरणांच्या स्वानुभवातून वचने जन्माला आली. तीच वचने म्हणजेच भारतीय संविधानाचा गाभा आहे. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता ही मूल्ये शरणांच्या समताधिष्ठित वचनात दडली आहेत.

समाजातील प्रत्येक घटकाने सदाचाराने आचरण करावे. नितिनियमांचे पालन करावे. अनाचार करू नये. चोरी, क्रोध, राग, स्तुती, मत्सर, आत्मस्तुती करू नये असे बसवण्णा एका वचनात सांगतात. बसवण्णा म्हणतात, "चोरी करू नको, हत्या करू नको, खोटे बोलू नको, रागावू नको, इतरांचा तिरस्कार करू नको, दुसऱ्याची निंदा करू नको, हीच अंतरंगशुद्धी, हीच बहिरंगशुद्धी, हेच कुडलसंगमदेवाला प्रसन्न करण्याची रीत आहे.

आयुष्यभर मला शरणांची सेवा करण्याची संधी मिळावी, असे बसवण्णा वचनात सांगतात, "मंदिराचा कळस बनून कावळ्याच्या विष्टेने अपवित्र होण्यापेक्षा शरणांच्या पायातील पादुका करा, मज कूडलसंगमदेवा.

सदाचारी कायकनिष्ठ शरणांची तुकडी बसवण्णांनी उभी केली. कष्टानेच शिवाची पूजा केली. कल्याणच नव्हे तर कल्याणच्या आसपास, संपूर्ण दक्षिण भारतात, संपूर्ण उत्तर भारतात, इराक-इराण अफगाणिस्तानपर्यंत बसवण्णांचा विचार जाऊन पोहोचला. त्या विचाराने प्रभावित होऊन शरण कल्याणच्या अनुभवमंटपाकडे येऊ लागले. कल्याण म्हणजे सध्याचे बसवकल्याण. हे क्रांतीचे केंद्र बनले. अफगाणिस्तानपर्यत बसवण्णांचा विचार जाऊन पोहचला. मरूळशंकरदेव नावाचे शरण कल्याणला आले. पूर्वाश्रमी मुसलमान असणारे मरूळशंकरदेव कल्याणमध्ये येवून लिंगधारी झाले, लिंगायत झाले. त्यांना शरणांनी " मरूळशंकरदेव " असे नाव दिले. राजदरबारात भांडी धुण्याचा कायक करून ते आपली उपजीविका करू लागले. काश्मीर होऊन राजा भूपाल महादेव आपल्या पत्नीसह कल्याणला आला. त्याने काश्मीरचे राज्य आपल्या मुलाला देऊन तो शरण झाला, लिंगधारी झाला. मोळीगे मारय्या आणि महादेवी ही नावे धारण करून काश्मीरचे राजा राणी कल्याणमध्ये मोळी विकण्याचा कायक करू लागले. कष्ट करून जगू लागले. मोळीगे मारय्यांविषयी बसवण्णा एका वचनात म्हणतात,

" भक्तासाठी दहा बोटाची मेहनत, गणना महाभक्त होण्यासाठी, परी तुझे पोट भरणार नाही, भार होणार तू भूमंडळी, त्यात दोन्ही हाताने परिश्रम तू करी, मिळेल भाकरी सर्वालागी, मोळीगे मारय्या असुनी राजा थोर, श्रम भरपूर केले त्याने, कूडलसंगमदेवा कायक जो करील, त्याला तारील देव माझा.

काश्मीरहून चिक्कय्या नावाचा हत्यारी कल्याणला बसवाला मारण्यासाठी आला. शरणांचा सदाचार कायकनिष्ठा वर्तन पाहून हत्यारी चिक्कय्याने आपला हत्या करण्याचा व्यवसाय सोडून दिला. त्यांनी बसवांनी घालून दिलेल्या लिंगायत धर्माचा स्वीकार केला. तो शरण झाला. जंगलातून आणलेली ताडपत्रे शरणांना विकून त्यावर तो उदरनिर्वाह करू लागला. चिक्कय्या शरणांमध्ये कायकनिष्ठ, सदाचारी शरण म्हणून मान्यता पावले.

काश्मीरची राजकन्या बोंतादेवी कल्याणमध्ये येऊन शरणी झाली. राजवैभवात वाढलेली बोंतादेवी कल्याणमध्ये गुहेत राहू लागली. वैद्यकीय शास्त्राचे उत्तम ज्ञान असणारी बोंतादेवी रोग्यांची सेवा करू लागली. त्याचबरोबर गोधडी शिवून विक्री करू लागली. त्यावरून तिला बोंतादेवी असे नाव पडले.

महात्मा बसवण्णांनी बाराव्या शतकात श्रमजीवी समाजाची निर्मिती केली. कल्याणच्या अनुभवमंटपात निर्माण झालेल्या वचन साहित्याने कन्नड भाषेला समृद्ध केले. माणसाची जीवन जगण्याची शैली बदलून टाकली.

एके दिवशी बसवण्णा कल्याण नगराचा हालहवाल पाहण्यासाठी फेरफटका मारत असताना हरळय्या नावाच्या चांभाराच्या शरणांच्या आग्रहाला मान देऊन त्याच्या घरी जाऊन दासोह करतात. जेवण करून निघताना बसवण्णा हरळय्यांना विनयपूर्वक हात जोडून " शरणूशरणार्थी शरण हरळय्या " म्हणून नमस्कार करतात. हरळय्याही विनयपूर्वक हात जोडून नमस्कार करतात. बसवण्णा घरातून बाहेर गेल्यावर हरळय्यांच्या लक्षात येते की बसवण्णांनी आपल्याला हात जोडून नमस्कार केला. त्याचे ओझे आपल्यावर झाले. ते कमी करण्यासाठी ते आपल्या पत्नीशी चर्चा करतात. ते दोघेही निर्णय घेतात. आपण बसवेश्वरांना आपल्या कातडीचे जोडे भेट द्यायचे. हरळय्या डाव्या मांडीचे, कल्याणीम्मा उजव्या मांडीचे कातडे काढून बसवासाठी सुंदर जोडे बनवतात. ते जोडे बसवांना भेट देतात. बसवण्णा जोडी पाहून म्हणतात, अरेरे हरळय्या ! , हे जोडे खूप सुंदर आहेत. पण हे जोडे कोणत्याही प्राण्याच्या कातडीचे नाहीत तर माझ्या शरणांच्या कातड्याचे आहेत. त्याक्षणी हरळय्या बसवण्णांचे चरणस्पर्श करतात. चरणस्पर्श करणाऱ्या हरळय्याला बसवण्णा आपल्या ह्रदयाशी लावतात आणि म्हणतात,

माझ्यापेक्षा लहान कोणी नाही,
शिवभक्तापेक्षा महान कोणी नाही,
याला माझे मन साक्षी, तुमचे चरण साक्षी
कूडलसंगमदेवा.

हरळय्यांनी बनवलेले जोडे त्यांना परत करतात. त्या जोड्याची मधुवरस नावाचा ब्राह्मण मंत्री विटंबना करतो. कालांतराने तो मधुवरस बसवण्णा यांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित होतो आणि शरण बनतो

एके दिवशी सायंकाळी भरलेल्या अनुभव मंटपात ब्राम्हण मधुवरसाची कन्या कलावती आणि चांभार हरळय्याचा मुलगा शीलवंत यांच्या विवाहाचा निर्णय शरण एकमुखाने घेतात. मधुवरस आणि हरळय्या दोघेही लिंगधारी असल्याने त्यांच्यात रोजी-बेटी व्यवहार होत होता. शरण कलावती आणि शीलवंतचा विवाह करून देतात. हा विवाह कोणताही धर्म बुडवणारा नव्हता कारण दोघेही लिंगधारी शरण होते पण प्रस्थापित वैदिक व्यवस्थेने हा विवाह अमान्य केला. बिज्जल राजाचे कान भरले. बिज्जल राजाने बसवण्णांना हद्दपार केले. वचनसाहित्य जाळले. शीलवंत हरळय्या आणि मधुवरस यांना हत्तीच्या पायाला बांधून देहदंडाची शिक्षा दिली. शिल्लक राहिलेले वचन साहित्य घेऊन शरण बैलहोंगलमार्गे उळवीला गेले. या प्रवासात शरण दोन ठिकाणी मारले गेले. बिज्जलाचे सैन्य आणि शरण यांच्यात युद्ध झाले. हरळय्याची पत्नी कल्याणीम्मा, मडिवाळ माचीदेव, किन्नरी ब्रम्हय्या आणि शरण या उळवीच्या प्रवासात गतप्राण झाले. माता नागाई, चेन्नबसवण्णा, मडिवाळ माचीदेव, डोहर कक्कय्या या गणाचारी शरणांच्या नेतृत्वाखाली वचन सुरक्षित उलवीला पोहचले. उळवीच्या महामनेत, आकाळगवीत, विभूतीकनज, रुद्राक्षमंटप या गुहेत वचन सुरक्षित लपवून ठेवले. जंगलात काही काळ गुहेत, पावसाळ्यात झाडाला झोके बांधुन शरण उळवीत राहिले. गोव्याच्या कदंब राजाने शरणांना आश्रय दिला. ही सर्व क्रांतिकारी घटना कल्याण क्रांती म्हणून नावारूपाला आली शरण संस्कृतीचा इतिहास समृद्ध करणारी ही घटना आजही अंगावर शहारे उत्पन्न केल्याशिवाय राहत नाही कल्याण सोडून बसवन्ना कुडल संगम ला गेले तेथेच ते लिंगाशी एकरूप झाले,लिंगैक्य पावले. त्याच्याबरोबर त्याचे सहकारी हडपद अप्पण्णा आणि बसवपत्नी निलंबिका मृत्यू पावले. कल्याणक्रांतीत सहभागी मडिवाळ माचीदेव वृद्धवस्था आणि युद्धातील जखमांमुळे मुरगोडला मरण पावले. वयाने जेष्ठ असणारे कक्कय्या युद्धात निष्णात होते. वचनसाहित्य रक्षणासाठी गेलेले कक्कय्या बिज्जलाच्या सैन्यांशी झालेल्या युद्धात कक्केरीला मृत्यू पावले. उळवीला चेन्नबसवण्णांनी, उळवीच्या महामनेजवळ किन्नरी बोमय्यांनी, तडीकेरेला गेलेल्या, वृद्धवस्थामुळे थकलेल्या माता नागाईनी तेथेच आपला देह ठेवला. शरण शून्यात विलीन झाले. ह्या घटनेचे दुःख सोलापूरच्या सिद्धरामेश्वरांना झाले ते एका वचनात म्हणतात,

बसवा बसवा हे शब्द लोपले, सर्वांचा आधार बसवरूपी खांब मोडला, बसवायच्या कार्याची हानी झाली कपिलसिद्ध मल्लिकार्जुना.( व. क्र. ५९७.)

लिंगायत धर्मग्रंथ - वचन साहित्यसंपादन करा

सुंदर आचरण असणाऱ्या व्यक्तीची सुंदर रचना म्हणजे वचने आहेत. वचने हे एक अनुभवजन्य साहित्य आहे. अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, पुरोहितशाही, काल्पनिक धर्मग्रंथ, जातिभेद, स्त्रीदास्य, श्रम इ. अनेक विषयांवर प्रहार करणारे क्रांतिकारक विचार वचनांत आहेत. वचन हा लिंगायतांचा धर्मग्रंथ आहे.

बसवेश्वर वचनांचे महत्त्व सांगताना म्हणतात-

आद्यांचे वचन परीस माने मी,
परि ते परीस कैसे गवसे मज ?
तन-मन-धन वर्जून सांगे मी,
परि त्याचा स्पर्श सहन न होई मज
अंत्यजाच्या ढोलकीसम बोलणारा दांभिक मी,
कुडलसंगमदेवा.

आद्यांचे वचन परिसासम असे पहा :

तेच सदाशिवलिंग, असा विश्वास ठेवावा,
विश्वास ठेवताच तू विजयी पहा.
अधरास कडू, उदरास गोड,
कुडलसंगाच्या शरणांचे वचन
कडूलिंब चाखल्यागत.

लिंगायत शब्दाचा अर्थसंपादन करा

लिंग + आयत = लिंगायत. याचा अर्थ इष्टलिंग म्हणजे विश्वाच्या आकाराचे माणसाच्या डाव्या हाताच्या उंची इतके शिवाचे प्रतिक, आयत म्हणजे धारण करणे किंवा स्वीकारणे होय. लिंग धारण करणारा तो लिंगायत असा लिंगायत शब्दाचा अर्थ आहे. वर्ण, वंश, लिंग (स्त्री - पुरूष), जात, जन्म ठिकाण असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येक स्त्री - पुरुषाला लिंग धारण करुन लिंगायत होता येते. इष्टलिंग हे समतेचे व विज्ञानाचे प्रतिक आहे. महात्मा बसवेश्वरांनी इष्टलिंगाची निर्मिती करून समतावादी लिंगायत धर्म १२ व्या शतकात स्थापन केला.[१]

लिंगायत धर्म संस्कारसंपादन करा

लिंगायत धर्मातले सर्व संस्कार हे अब्राम्हणी आणि अवैदिक पद्धतीने करतात. जंगमक्रियामूर्ती बोलावून विश्वगुरु बसवण्णांच्या साक्षीने हे संस्कार करतात.

गर्भधारणा संस्कार

नामकरण सोहळा

इष्टलिंग दीक्षा संस्कार

कल्याण महोत्सव (विवाह)

वाढदिवस

अंतिम संस्कार.

लिंगायत धर्म: मुख्य तत्वेसंपादन करा

वेदशास्त्र, होम-हवन, मूर्तिपूजा नाकारून बसवण्णांनी 'लिंगायत धर्म' स्थापन केला. मानव सर्व एकच आहोत हे सांगताना बसवण्णा आपल्या वचनात म्हणतात (वचन कन्नड भाषेत) : - 
"इवनारव, इवनारव, इवनारवनेंदनिसदिरयया इस नम्मव,
इव नम्मव, नम्मवनेंदनिसयया, कुडलसंगमदेवा, निम्म मनेय मगनैदानिय्या." वरील वचन मराठीत :-
हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा ऐसे नच म्हणवावे;
हा आमुचा, हा आमुचा, हा आमुचा ऐसेचि वदवावे.
कुडलसंगमदेवा, तुमचा घरचा पुत्र म्हणवावे.

'वेद शास्त्र धर्म जे काही सांगतील मी त्यांना मानणार नाही.' आपल्या वचनात बसवण्णा म्हणतात,
"वेदक्के ओरेय कट्टवे,शास्त्रक्के निगळवनिक्कु वे,
तर्कद बेन्न बारनेत्तुव, आगमद मूग कोयिवे, नोडखा,
महादानी कुडलसंगमदेवा, मादार चेन्नय्यन, मनेय मग नामय्या."

वचन मराठीत :-
वेदावर खडग प्रहार करेन
शास्त्राला बेड्या लावीन
तर्कशास्त्राच्या पाठीवर आसूड ओढेन
आगमशास्त्राचे नाक कापेन
मातंग चेन्नयाचा प्रिय आहे मी,
कुडलसंगमदेवा.

मंदिर म्हणजे बहुजनाचे अंधश्रद्धा व भोळी मनोवृत्तीचे केंद्र आहे. म्हणून बसवण्णांनी आपल्या अनुयायांना मंदिर न बांधण्याचा आदेश दिला आहे. आपल्या देहालाच देवालय माना. देवालयापेक्षा देहालय श्रेष्ठ आहे.अशी शुद्ध विचारसरणी बसवण्णांची होती.

शरण सर्वंज्ञांचे वचनसंपादन करा

बसवगुरूंचे नाव जाणे ना कोण? या जगी नाश होने ना बोलुनी खोटे लिंगायतांचा कर्ता बसवण्णांच जाणा सर्वज्ञ.

लिंगायत धर्म चळवळसंपादन करा

लिंगायत स्वतंत्र धर्म आहे. तो अन्य कोणत्याही धर्माची जात, उपजात, शाखा अथवा पंथ नव्हे. बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन धर्माला ज्या वैशिष्ट्यामुळे स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळाली ती सर्व वैशिष्ट्ये लिंगायत धर्म पूर्ण करतो. म्हणून तो एक स्वतंत्र धर्म आहे. स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळविण्यासाठी धर्मगुरु, धर्मसंहिता, धर्मचिन्ह,धर्माचे नाव,धर्मक्षेत्र, धार्मिक केंद्र, धर्मसंस्कार, धार्मिक विधी, धर्माचा ध्वज, धर्माचे ध्येय इ. लक्षणे असावी लागतात. ती लिंगायत धर्मात आहेत. म्हणून तो स्वतंत्र धर्म आहे.संदर्भ हवा ]

  • धर्मगुरु:- विश्वगुरु महात्मा बसवण्णा.
  • धर्मसंहिता:- वचनसंहिता.
  • धर्मग्रंथ:- समानता पटवून देणारे वचन साहित्य.
  • धर्मभाषा:- लोकभाषा कन्नड.
  • धर्मचिन्ह:-सुष्टीकर्ता, समतेचे प्रतिक असणारे इष्टलिंग.
  • धर्माचे नाव:- लिंगायत
  • धर्मक्षेत्र:- बसवण्णांचे ऐक्य क्षेत्र कुडलसंगम, शरण भूमी बसवकल्याण, उळवी, बसवन-बागेवाडी.
  • धर्मसंस्कार:- इष्टलिंग दीक्षा.
  • धार्मिक व्रत:- शरण व्रत.
  • प्रार्थना केंद्र:- अनुभवमंटप.
  • धर्मतत्वे:- अष्टावरण, पंचाचार, षटस्थल.
  • धर्माचा ध्वज:- इष्टलिंग असणारे षटस्थल ध्वज.
  • धर्माचे ध्येय:- जात , वर्ग, वर्णरहित धर्मसहित कल्याण राज्य निर्माण करणे.
  • धार्मिक सण आणि उत्सव:- बसवादी शरणांचे स्मृती उत्सव
  • धर्मानुयायी:- शरण: कोटींच्या संख्येत आहेत.

[२]

व्यवस्था परिवर्तनसंपादन करा

महात्मा बसवण्णानी व्यवस्था परिवर्तन केले व्यवस्थेत बदल केला. एकांताकडून- लोकांताकडे, अज्ञानाकडून- ज्ञानाकडे दानधर्माकडून- दासोहाकडे, मंदिराकडून- अनुभवमंटपाकडे, वैराग्याकडून- गृहस्थीजीवनाकडे, कठोरतेकडून- सहजतेकडे, शिष्यत्वाकडून- शरणजीवनाकडे, बहुदेवतावादाकडून-एकेश्वरवादाकडे, संस्कृतकडून- लोकभाषा कन्नडकडे, अंधश्रद्धेकडून विवेकवादाकडे ऐतखाऊवृत्तीकडून कायकवादाकडे, विषमतेकडून- - समानतेकडे, शिवलिंगाकडून- इष्टलिंगाकडे, देवालयाकडून-देहालयाकडे, शैवपंथाकडुन- स्वतंत्र लिंगायत धर्माकडे, कल्पोकल्पित ग्रंथाकडून- अनुभवी वचनसाहित्याकडे, देहदंडणाकडून- देहधर्माकडे, ग्रंथप्रमाण्यवादाकडून-बुद्धिप्रामाण्यवादाकडे घेऊन जाणारी नवी व्यवस्था निर्माण करणारे बसवण्णा सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होती. नवा पथ मार्ग शोधणारे ते एक पथदर्शी होते.

महात्मा बसवण्णांचा संदेशसंपादन करा

महात्मा बसवण्णांनी जनसामान्यांना सहज साधी शिकवण दिली. त्यांची शिकवण सामान्य माणसासाठी आहे. ती सहज साधी आणि सोपी आहे. संसारी माणसाच्या जगण्याचे जीवन तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. ते घरोघरी जात. शरणूशरणार्थी करत. शरण कक्कय्या, हरळय्या, चेन्नय्या, नुलीय चंदय्या, मडिवाळ माचीदेव, व घटीवाळय्या या कष्टकरी, दीनदलित, आदिवासी, अठरा आलुतेदार, बारा बलुतेदार, यांना बसवण्णा एकत्र करू लागले. त्यांना सहज साधे जीवन तत्त्वज्ञान सांगू लागली एकाच देवाची इष्टलिंगाची साधना करा. देहच देवालय आहे. एकत्र या चर्चा करा. सुसंवाद करा. स्त्रियांना समान अधिकार द्या. पंचसूतके पाहू नका. दलितांना समान संधी द्या. जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद करू नका. कोंबडे-बकरे कापू नका. स्वकष्टावर जगा. भिक्षा मागून खाऊ नका. काम कष्ट करा. कायकात कैलास आहे. दासोह समाजसेवा आहे. पर्यावरण रक्षण करा. दगडधोंडे पुजू नका. पुरोहिताच्याहस्ते देवपूजा करू नका. ज्योतिष, भविष्य, वास्तुशास्त्र, पंचांग पाहू नका. यज्ञ, होम-हवन करु नका. अनुभव मंटपात बसा. प्रश्न उत्तर करा, चर्चा करा. वचन साहित्य द्या. शुभाशुभ पाहू नका. नदी-स्नान करू नका. एकमेकांच्या पाया पडू नका. शरणूशरणार्थी म्हणा. संन्यासवादाचे उदात्तीकरण करू नका. संसारिक जीवन जगा. अस्पृश्यता पाळू नका. माणसाला माणसाप्रमाणे वागवा. पशुहत्या करू नका. मांसाहार करू नका व्यसनाधीन बनू नका. चोरी करु नका. हत्या करु नका. रागावू नका. खोटे बोलू नका. कोणाची घृणा करु नका. दया हाच धर्म आहे. सदाचाराने वागा. निती-नैतिकता आणि विवेकाने वागा. दयाच धर्माचा मूलमंत्र आहे. शरणांची थट्टा मस्करी करू नका. नवस-सायास करू नका. अंधश्रद्धा सोडून द्या. प्राणीमात्रावर दया करा. भुकेलेल्याला अन्न द्या. घोर जपतप करू नका. झोपच जप आहे. कठोर देहदंडण, इंद्रियदमन करू नका. देहाला कष्ट देऊ नका. देह कायकासाठी कष्टवा. उपवास-तापास, व्रतवैकल्ये करू नका. वेळेवर दिवस वर्ष यात भेद करू नका. प्रत्येक दिवस, वार शुभच आहे. मरण महानवमी आहे, त्याचे स्वागत करा. सुखी संसार करा, संसार सोडून हिमालयात जाऊ नका. संन्यास धारण करण्याची गरज नाही. मूर्तिपूजा सोडून द्या. अनावश्यक खर्च करू नका. काल्पनिक स्वर्ग-नरक यावर विश्वास ठेवू नका. सदाचार स्वर्ग आहे. अनाचार नरक आहे. देवघर गाव सोडून अन्यत्र भटकू नका. शेत पावनभूमी आहे. कष्टाची भाकरच महाप्रसाद आहे. जिवंत नागाला मारून चित्रातल्या नागाची पूजा करू नका, विसंगत व्यवहार सोडून द्या. निसर्गनियमाप्रमाणे देहधर्माप्रमाणे वागा. अनावश्यक देहाला त्रास देऊ नका. चारित्र्य सांभाळा. दासोह करा. गरजेपुरती संपत्ती बाळगू नका. फुकटचे कोणाला काही देऊ नका. फुकटचे कोणाचे काही घेऊ नका. दानधर्मापेक्षा दासोह महत्त्वाचा आहे. शिक्षण घ्या, वचने लिहा, वाचनसाहित्य वाचा. ज्ञानी व्हा, नैतिक बना, विवेकी बना, स्वतःमध्ये बदल करा. स्वतामधील दोष दूर करा. कर्मकांड दूर करा. स्वतःची स्तुती करू नका अशी सहज साधी शिकवण बसवण्णांनी दिली. आम-आदमीने ती आत्मसात केली आणि आचरणात आणले.

चातुर्वर्ण्य व कर्मकांड विषयक विचारसंपादन करा

वर्ण धर्माला वेडाचार ठरवतांना बसवण्णा म्हणतात,

     चांभार उत्तम तो दुर्वास
कश्यप लोहार, कौंडिण्य तो न्हावी
तिन्ही लोकी बरवी प्रसिद्धी ती
जातीचे श्रेष्ठत्व हाची वेडाचार.

भस्म, गंध टिळा लावून काय उपयोग आहे, मणी गळ्यात बांधून काय उपयोग आहे जर तुमच्यात शुद्ध अंतरंग नसेल, मनाची शुद्धता नसेल हे सर्व देखावा आहे. लोक, ज्या गोष्टी आपल्या आचरणात येणे कठीण आहे त्याच गोष्टीच्या बाह्य अवडंबराने स्वतः शुद्ध मनाचे आहोत असा खोटा आव आणतात. जे देवाला दूध, लोणी, तूप अर्पण करतात ते अंधभक्त होत. त्या संदर्भात बसवण्णा म्हणतात,

       दुग्ध ते उच्छिट तथा वासराचे।
पाणी ते मत्स्याचे उच्छिष्टची।
पुष्प ते उच्छिट तथा भ्रमराचे।
साधन पूजेचे काय सांगा ?

दूध हे वासराचे उष्ट असते, पाणी माशांचे उष्ट असते, पुष्प भ्रमराचे उष्ट असते असे वापरलेले अस्वच्छ उष्ट साधने देवाच्या पूजेचे साधन होऊ शकते का ? अशाप्रकारे बसवण्णांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीयता, बळी प्रथा, व्रतवैकल्य, उपास-तापास इत्यादींवर प्रखर हल्ला केला आहे. वीरशैव विचारधारा ही लिंगायतांना धार्मिक, मानसिक आणि सांस्कृतिक गुलाम करण्याचे षड्यंत्र आहे. आज लिंगायत विरुद्ध वीरशैव असा भेद निर्माण झाला आहे. वीरशैव हे सनातन धर्माचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. वर्णधर्म त्यांना मान्य आहे, ब्राह्मण व्रतवैकल्ये मान्य आहेत. वीरशैव विचारधारेचा प्रमुख ग्रंथ सिंद्धान्त ’शिखामणी’ हा वर्णाश्रम धर्मावर आधारित असल्याचे कारण हा ग्रंथ आगम, निगम, शैवपुराण, वेद शास्त्र इत्यादींच्या मूळ स्रोतांशी बांधलेला आहे. बसवण्णा एका वचनात म्हणतात : -

       दगडाचा देव देव नव्हे।
मातीचा देव देव नव्हे।।
वृक्षदेव देव नव्हे।
सेतु बंध रामेश्वर।।
अन् इतर क्षेत्राचा।
देव देव नव्हे।।
देव तुमच्या अंतर्यामी।
हे कुडलसंगमदेवा।।

आज परिस्थिति अशी आहे की लिंगायत धर्माचा मूळ उद्देश आणि बसवण्णांची शिकवण काय आहे हे लोकांना माहीत नाही. लिंगायत हे पूर्णपणे ब्राह्मणी वर्चस्वाखाली आहेत. लिंगायत राशीभविष्य पाहतात तेही ब्राह्मणाकडून; लग्नाचे मुहूर्त ब्राह्मणाकडून काढून घेतात; त्यांचे लग्न व अन्य धार्मिक संस्कार ब्राह्मणच करतात. लिंगायत हे बसवण्णांच्या मूळ विचारधारणेपासून दुरावला गेला आहे. त्यांचे ब्राह्मणीकरण केले गेले. लिंगायत हे कर्मकांड, देव, व्रतवैकल्य, भविष्यवाणी, यज्ञ, अंधश्रद्धा, आत्मा अशा चाकोरीत गुंतलेले आहेत. त्यामुळे लोकांना वाटते की ते ब्राह्मण आहेत. असाच प्रचार व प्रसार करून ब्राह्मणवादी लोक यशस्वी झाले आणि लिंगायतांना ब्राह्मणी धर्माच्या अधीन बनवले. संत बसवण्णांनी आयुष्यभर भटशाहीतून मुक्त करण्यासाठी अनुभव मंटपाची स्थापना केली. त्यातून साहित्य निर्माण केले. वेद, पुराण, स्वर्ग, देव देवता, आत्मा, पुनर्जन्म, यज्ञ, वैकल्य ही थोतांडे नाकारली आणि ७७० परगड जातीतील लोकांना सोबत घेऊन लिंगायत धर्माची स्थापना केली.

बसवण्णा हे नाग लोकांचे दैवत आहे हे पटवून सांगताना अक्कामहादेवी आपल्या वचनात म्हणतात:-

    देव लोकांचा देव बसवण्णा
मत्स लोकांचा देव बसवण्णा,
नाग लोकांचा देव बसवण्णा। मेदुगिरि मंदागिरीचा देव बसवण्णा।
चेन्नमल्लिकार्जुना माझा तुमचा। तव शरणांचा देव बसवण्णा।

संदर्भसंपादन करा

वचन -संपादक डॉ. एम एम कलबुर्गी. बसव समिती (३३ भाषेत उपलब्ध.)

महाराष्ट्र बसव परिषद

वचन सिद्धांत सार, मूळ कन्नड संपादक (अनुवाद: आर. एम. करडीगुद्दी.) शरण जीवन दर्शन- राजू ब जुबरे. धीमंत सत्यशोधक डॉ. एम एम कलबुर्गी- संपादक राजू ब जुबरे. लिंगायत एक स्वतंत्र धर्म( संपादक : राजू जुबरे.) विश्वगुरु म. बसवण्णांची वचनगाथा -शिवानंद. क्रांतिकारी युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर- डॉ. अशोक मेनकुदळे

प्रा. भीमराव पाटील सर लिखित

महात्मा बसवण्णा जीवनकथा महात्मा बसवण्णा चरित्र, त्यांची तत्वे आणि समाज. अक्कमहादेवीची जीवनगाथा. अनुभवमंटप कायक आणि दासोह शरण आंदोलन आणि वचन साहित्य (डॉ. विजयकुमार करजकर, प्रा भीमराव पाटील. शाहू स्वायत्त महाविद्यालयाच्या MA मराठीच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट.) काश्मीरचे शरण

डॉ सचितानंद बिचेवार

परिवर्तनाचा महामेरू महात्मा बसवेश्वर लिंगायत एक स्वतंत्र धर्म (संपादक: डॉ. सचितानंद बिचेवार, म.ब.प.)

प्रा. आनंद कर्णे

२१ व्या शतकाचे प्रेरणास्त्रोत महात्मा बसवेश्वर महात्मा बसवण्णांचा वचनसंदेश.

माते महादेवी (विश्वकल्याण मिशन ट्रस्ट)

शरणरत्ने परिपूर्ण महामानव विश्वगुरु बसवण्णा तरंगिनी वचनदर्पण अक्कमहादेवीची सुमनवचने.

  • कबीर और बसवेश्वर तुलनात्मक अध्ययन (हिंदी, लेखक - डॉ. शंकरराव कप्पीकेरी)
  • महात्मा बसवेश्वर - कार्य आणि कर्तृत्व (मराठी, लेखक - सुभाष देशपांडे)
  • महात्मा बसवेश्वर आणि शरणकार्य (लेखक - डॉ. अशोक प्रभाकर कामत)
  • बसवेश्वर - काव्यशक्ति और सामाजिक शक्ति (हिंदी, लेखक - काशीनाथ अंबलगे)
  • बसवेश्वर (इंग्रजी, लेखक - अनंत पै)

बाह्य दुवेसंपादन करा

    https://www.youtube.com/channel/UC05eu1-OK2R1Ss7IKYsVoWA लिंगायत धर्म] (मराठी मजकूर)


    1. ^ सोलापुरे, राजशेखर. लिंगायत : एक स्वतंत्र धर्म.
    2. ^ महात्मा बसवण्णांचा वचनसंदेश - लेखक प्रा. आनंद बळीराम कर्णे
    • श्री स्वामी समर्थ

    विकिपीडिया
    Imbox content.pngह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोतजोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेलतर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.


    श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी(प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८) हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोटयेथे खूप काळ वास्तव्य केलेलेश्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वतीयांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. "मी नृसिंह भान असून श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे" हे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले.

    श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट)
    ShriSwamiSamarth.jpg
    श्रीस्वामी समर्थ (अक्कलकोट)
    संप्रदायदत्त संप्रदाय
    भाषामराठी
    कार्यमहाराष्ट्र व कर्नाटकात दत्त संप्रदायाचा प्रसार
    प्रसिद्ध वचन'भिऊ नकोस, 
    मी तुझ्या पाठीशी आहे'
    संबंधित तीर्थक्षेत्रेअक्कलकोट, गाणगापूर

    जीवनसंपादन करा

    स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्रप्रदेशातल्या श्री शैल्यमक्षेत्राजवळील कर्दळीवनातून प्रकट झाले.[१] त्यांनी तेथून आसेतुहिमाचल भ्रमण केले.

    स्वामी समर्थ प्रकट दिनसंपादन करा

    इ.स. १८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटासआले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोटनगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे,रविवार दि. ०६/०४/१८५६ हा होता.

    वासुदेव बळवंत फडकेसंपादन करा

    इ.स. १८७५ सालच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते, त्या वेळी त्यांनी फडक्यांना सध्या लढायची वेळ नाही असा सल्ला दिल्याचे सांगितले.संदर्भ हवा ]

    महतीसंपादन करा

    सबसे बडा गुरू... गुरूसे बडा गुरू का ध्यास... और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज... तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...! अशा शब्दांंमधे स्वामी समर्थांंची महती वर्णन केली जाते.

    प्रकटनाची पूर्वपीठिकासंपादन करा

    इ.स. १४५९ मध्ये, माघ वद्य १, शके १३८० या दिवशी[२] श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत. .

    आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले; पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले.

    दीक्षासंपादन करा

    श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्यावेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.

    अक्कलकोट प्रवेशसंपादन करा

    इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले.

    अवतार कार्य समाप्तीसंपादन करा

    स्वामींनी अनेकांना कामाला लावून इसवी सन १८७८ मध्ये त्यांचा एक आविष्कार संपविला असे भासवले. प्रत्यक्षात स्वामी महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील अशी धारणा आहे.

    स्वामी समर्थ पुण्यतिथीसंपादन करा

    श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दि. ३० एप्रिल १८७८ रोजी (चैत्र वद्य त्रयोदशी, शके १८००, बहुधान्य नाम संवत्सर) अक्कलकोट येथे 'वटवृक्ष समाधी मठ स्थानी' माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. नंतर श्री स्वामी समर्थ यांना त्यांचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले. असे म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले...

    महाराजांची काही चरित्रेसंपादन करा

    1. स्वामी चरित्र सारामृत (पारायणासाठी पोथी, लेखक - विष्णू बळवंत थोरात)

    चित्रपटसंपादन करा

    • स्वामी समर्थ यांच्या आयुष्यावर ’देऊळ बंद’ हा चित्रपट २०१५ साली निघाला. त्यात स्वामींची भूमिका मोहन जोशी यांनी केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडेव प्रणीत कुलकर्णी यांनी केले आहे.
    • तत्पूर्वी २०१२ साली ’कृपासिंधू श्री स्वामी समर्थ’ ही दूरचित्रवांणी मालिका ’मी मराठी’ या वाहिनीवर आली होती. हिचे प्रसरण शंभराहून अधिक भागांत झाले होते.या मालिकेचे दिग्दर्शक ???

    संदर्भसंपादन करा

    1. ^ Hanumante, Mukund M. (1999). A Glimpse of Divinity: Shri Swami Samarth Maharaj of Akkalkot. Kenner, USA: Akkalkot Swami Samarth Foundation ISBN 978-0-9669943-0-8
    2. ^http://balsanskar.com/marathi/lekh/486.html

    🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴


    कर्दळीवन

    कर्दळीवन आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैल्य या ज्योतिर्लिग क्षेत्राजवळचे ठिकाण आहे. अक्कलकोट स्वामींची बखरगुरुचरित्रद्विसहस्र गुरुचरित्रपंतमहाराज बाळेकुंद्रीकर यांचे चरित्र, श्रीपाद वल्लभ यांचे चरित्र, इत्यादी दत्त संप्रदायातीलसाहित्यामध्ये कर्दळीवनाचा उल्लेख आहे.

    आख्यायिकासंपादन करा

    लौकिक अर्थाने खूप प्रसिद्धी झाल्यावर आणि आपले अवतार कार्य पूर्ण झाल्यावर नृसिंह सरस्वती श्रीशैल्य येथे गेले. तेथे पाताळगंगेमध्ये जाऊन त्यांनी शिष्यांना ‘पुष्पाचे आसन’ करायला सांगितले. शिष्यांनी एक मोठी बांबूची टोपली तयार केली. त्याला सर्व बाजूंनी कर्दळीच्या पानांनी लपेटले. त्यावर शेवंती, कुमुद, मालती इ. फुले पसरून पुष्पासन तयार केले. त्या दिवशी गुरू कन्या राशीत होता, बहुधान्य नाम संवत्सर होते (शके १४४०), उत्तरायण सुरू होते. सूर्य कुंभ राशीत होता, माघ वद्य प्रतिपदा होती आणि शुक्रवार होता. त्या दिवशी प्रातःसमयी नृसिंह सरस्वती पुष्पासनावर बसले, पाताळगंगेतून कर्दळीवनाकडे गेले आणि दिसेनासे झाले. कर्दळीवनात सर्वत्र ते चैतन्यरूपाने राहत आहेत अशी समजूत आहे.

    नृसिंह सरस्वती यांनी तेथे निबिड अरण्यात एका प्रशस्त ठिकाणी समाधीच्या स्थितीत राहण्याचे ठरविले. नीरव शांतता, उंचच उंच वृक्ष असलेल्या ठिकाणी एका पहाडाच्या कोपर्‍यात एक गुहा होती. त्या गुहेला लागून वटवृक्ष, औदुंबर आणि अश्वत्थ हे तिन्ही वृक्ष एकत्र वाढलेले होते. त्या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून ध्यानस्थ बसले. असे म्हणतात की ३५० हून अधिक वर्षे ते तेथे समाधी अवस्थेत बसून होते. त्यांच्या आजूबाजूला जंगल वाढले होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या शरीराभोवतीही एक प्रचंड मोठे वारूळ तयार झाले होते. ते वारूळ त्यांच्या मस्तकाहूनही ८ ते १० फूट उंच झाले होते. वारुळामध्ये नागांचा मुक्त संचार होत होता. एके दिवशी एक चेंचू आदिवासी लाकूड तोडण्यासाठी त्या घनदाट जंगलात भटकत होता. भटकता भटकता जेथे श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून बसले होते तेथे आला आणि तेथील वृक्षावर त्याने घाव घातला. तो घाव चुकून त्या वारुळावर बसला आणि समाधी स्थितीत बसलेल्या श्री नृसिंहसरस्वतींच्या मांडीपर्यंत पोहोचला. तेथून भळाभळा रक्त वाहू लागले. श्री नृसिंह सरस्वतींची शेकडो वर्षांची समाधी त्यामुळे भंगली आणि ते त्या वारुळातून स्वामी समर्थरूपाने बाहेर पडले.

    असे सांगितले जाते की अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना कलकत्ता येथे एका पारशी गृहस्थाने ‘आपण कोठून आलात?’ असा प्रश्न विचारला. स्वामी समर्थ स्वतःबद्दल कधीही आणि काहीही बोलत नसत. मात्र या वेळी स्वामींनी उत्तर दिले- ‘प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली. पूर्व बंगाल हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले. गंगातटाने फिरत फिरत हरिद्वारकेदारेश्वर आणि अखंड भारतातील सर्व भागातील प्रमुख गावे फिरलो.’ याचा अर्थ स्वामी समर्थ हे कर्दळीवनातून आले.

    दत्तसंप्रदायातील सर्व परंपरांचा कर्दळीवनाशी अतूट असा संबंध आहे. पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे गुरू बालमुकुंद बालावधूत महाराज हेही अवतार समाप्तीच्या वेळी श्रीशैल्यजवळील कर्दळीवनामध्ये गेले, असा उल्लेख आहे. रामदासी परंपरेतील थोर विभूती दत्तावतार श्रीधरस्वामी यांनीही कर्दळीवनाची परिक्रमा केली होती.

    कर्दळीवनाचा भूगोल आणि अन्य माहितीसंपादन करा

    कर्दळीवन हे ठिकाण आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैल्य या ज्योतिर्लिग क्षेत्राजवळ आहे. हैदराबादपासून २१० किमी अंतरावर श्रीशैल्य आहे. तेथे कृष्णा नदी पाताळगंगा या नावाने ओळखली जाते. हा सर्व परिसर अत्यंत घनदाट अरण्याने वेढलेला आणि दुर्गम असा आहे. कर्दळीवनात चेंचुआ या जमातीचे आदिवासी लोक राहतात. कर्दळीवन परिक्रमेसंबंधी अनेक समज, अपसमज आणि श्रद्धा आहेत. इतर तीर्थक्षेत्री आपल्याला इच्छा झाली की लगेच जाता येते. कर्दळीवनात जाण्यासाठी अवधूतांची आणि स्वामींची इच्छा असल्याशिवाय जाता येत नाही, असे मानले जाते. भारतात दरवर्षी एक लाखातून एक व्यक्ती काशी-रामेश्वरला जाते, दहा लाखांतून एक बद्रीकेदारला जाते, २५ लाखांतून एक नर्मदा परिक्रमा करते, ५० लाखांतून एक कैलास मानस सरोवर यात्रेला जाते. मात्र कर्दळीवनात एक कोटीतून एखादीच भाग्यवान व्यक्ती जाऊ शकते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे कर्दळीवनाविषयी लोकांना फार माहिती नाही. कर्दळीवन नवनाथ आणि नाथपंथी साधू, योगी यांचे साधनास्थळ आहे. तसेच ती सिद्धांची भूमी आहे. नागार्जुन, रत्‍नाकर इत्यादी सिद्धांची प्रयोगशाळा म्हणजे कर्दळीवन. कोणत्याही मूलद्रव्याचे सुवर्णामध्ये रूपांतर करायचे तंत्र त्यांनी विकसित केले होते, अशी समजूत आहे. कर्दळीवनात विलक्षण दैवी अनुभव येतात. वीरशैव समाजामध्येही कर्दळीवनाचे अपरंपार माहात्म्य असून कर्नाटकातील थोर संत अक्कमहादेवी यांनी कर्दळीवनामध्ये तपश्चर्या केली आणि त्या तेथेच मल्लिकार्जुनामध्ये विलीन झाल्या अशी श्रद्धा आहे. अशाप्रकारे श्रीदत्त संप्रदाय आणि इतरही आध्यात्मिक संप्रदायांमध्ये कर्दळीवनाचे विशेष माहात्म्य आहे.

    कर्दळीवनात कसे जावे?संपादन करा

    कर्दळीवनामध्ये जाणे थोडे अवघड आहे, मात्र अशक्य नाही. कर्दळीवनाच्या परिक्रमेमध्ये एकूण पाच स्थानी दर्शन घ्यावे लागते आणि मग आपली परिक्रमा पूर्ण होते. ही स्थाने म्हणजे अक्कमहादेवी मंदिर, व्यंकटेश किनारा, अक्कमहादेवी गुहा, स्वामी प्रकट स्थान आणि बिल्ववन (मार्कंडेय ऋषी तपस्थळ) ही आहेत. या परिक्रमेमध्ये एकूण ३६ कि.मी. चालावे लागते. शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि श्रद्धावान अशी कोणतीही व्यक्ती ही परिक्रमा सहजतेने पूर्ण करू शकते. स्त्री-पुरुष सर्व जण ही परिक्रमा करू शकतात. आध्यात्मिक अनुभूतींबरोबरच कर्दळीवनातील जैवविविधता, तेथील निसर्ग, गुहा, घनदाट जंगल हेही मुख्य आकर्षण आहे. तरुणाईसाठी कर्दळीवन परिक्रमा म्हणजे एक साहसी आध्यात्मिक ट्रेकिंग आणि पर्यटन आहे. परिक्रमेची सुरुवात आदल्या दिवशी श्रीशैल्य येथे पोहोचून श्रीमल्लिकार्जुन स्वामी आणि श्रीभ्रमरांबा माता देवीचे दर्शन घेऊन करावी लागते. पाताळगंगेतून बोटीने साधारण २८ कि.मी. प्रवास करून व्यंकटेश किनार्‍याला पोहोचावे लागते. साधारणपणे नोव्हेंबर ते मे या काळामध्ये कर्दळीवन परिक्रमा करता येते. पावसाळ्यामध्ये तेथे जाता येत नाही.

    कर्दळीवनाच्या यात्रेवरील पुस्तकसंपादन करा

    Comments

    Popular posts from this blog

    क्यों असरदार होते हैं बीज मंत्र?

    इतिहास लेखन पद्धति

    अनुसूचित जाती व जमाती