सार शिंपी, कुलवंतवाणी घाँची, कानोडी जाती ओबीसीमध्ये

सार शिंपी, कुलवंतवाणी घाँची, कानोडी जाती ओबीसीमध्ये

शुक्रवार, 7 जून 2019

या जाती वगळल्या ओबीसींच्या यादीत क्र. २२० वर भामट जातीबाबतचा उल्लेख आहे. याचा संदर्भ ग्रंथात आढळून येत नसल्याने घंटीचोर व भाम्पटा या जातींना ओबीसीच्या यादीतून वगळण्यात आले आहे. कामाटी जातीचा विमुक्त (अ) मधील अ. क्र. भामटाची जात म्हणून ठेवण्यात आली असल्याने ओबीसीच्या यादीतून त्याला वगळण्यात आले आहे.


example

नागपूर - मराठा समाजाचा ओबीसी जातीत समावेश करण्याची धडपड सुरू असताना मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीवरून राज्य सरकारने चार जातींचा इतर मागासवर्ग (ओबीसी) व तर काहींचा भटक्‍या जमातीत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

कानोडी, कानडी, भावसार, घाँची, कुलवंतवाणी समाजातील पोटजातींचा ओबीसींमध्ये तर कुमावत, हरदास समाजाचा भटक्‍या जमाती तर खारवा, खारवीचा विशेष मागास प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. धनगर जातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्याची मागणी अनेक वर्षांची प्रलंबित आहे. तर कैकाडी समाजाची अनुसूचित जातीत समावेश करण्याची मागणी आहे. या शिवायही अनेक जातींचा अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसीत समावेश करण्याची मागणी आहे. यासाठी आंदोलनेही झालीत. मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणावरूनही अनेक आंदोलने झाली. काहींनी मराठा समाजाचा ओबीसीच्या यादीत टाकण्याची मागणी आहे. मराठा समाजाला राज्य शासनाने स्वतंत्र १६ टक्के आरक्षण दिले आहे. आता राज्य शासनाने काही जाती, उपजातींचा ओबीसी आणि भटक्‍या जमातीच्या यादीत समावेश केला आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीवरून शासनाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार कानोडी, कानडी समाजाची ओबीसी यादीत ३४५ नव्याने अंतर्भूत करण्यात आले. त्याचप्रमाणे १७० क्रमांकावरील भावसार या जातीसमोर भावसार शिंपी, भावसार क्षत्रिय, रंगारी, भावसार रंगारी, रंगारी भावसार, भावसार क्षत्रिय रंगारी, भावसार क्षत्रिय शिंपी, रॅंग्रेज, रंग्रेज अशी नोंद करण्यात आली आहे. कुलवंतवाणी ओबीसीच्या यादीत १९० क्रमांकावर असून येथे कुलवंत वाणी, कु.वाणी, वाणी (कुलवंत), कुलवंत-वाणी, कुणबी वाणी अशी नोंद करण्यात आली आहे. घाँची समाजाचा इतर मागासवर्गाच्या यादीमध्ये १८१ वर तेलीची उपजात म्हणून समावेश करण्यात आला आहे.

लिंगायत आंबी हे नावाडी जातीचे असल्यामुळे महाराष्ट्रात भटक्‍या जमातीच्या यादीत अ. क्र. २५ भोई या जातीसमोरील जात क्र १८ वर नमूद असलेल्या नावाडी जातीचे दाखले देण्याची शिफारस केली आहे. भटक्‍या जमातीमधील बेलदार या जातीसमोर तत्सम जात म्हणून कुमावत जातीचा समावेश करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. हरदास या जातीचाही भटक्‍या जमातीत (मुस्लिम धर्म वगळून) समावेश करण्यात आला आहे. तर खारवा, खारवी जातीचा विशेष मागास प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

क्यों असरदार होते हैं बीज मंत्र?

इतिहास लेखन पद्धति

अनुसूचित जाती व जमाती