वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणाची मूळ प्रत कोठे व कोणाकडे आहे?

वाल्मिकी ऋषींनी मूळ जे रामायण लिहिले हे तुम्हाला मान्य असेल तर, रामायण हे त्रेतायुगात होऊन गेले. जे आजपासून किमान 8 - 9 लाख वर्षांपूर्वी. (हिंदू कालगणनेनुसार). त्यामुळे त्याची मूळ प्रत असण्याची शक्यता नाही. आज जे काही रामायण आपल्याला ज्ञात आहे तेही पुढच्या पुढच्या पिढीने जतन करत आलेलं आहे त्यात कित्तेक लेखकांनी कित्तेक बदल केलेले आहेत.

तसं हे कोणी मान्य करू शकणार नाही म्हणा कारण पुरावा पाहिजे. (पण मला वाटतं पुरावा शोधायला लायकी पण पाहिजे कारण जे तंत्र वापरून आपण रामायण महाभारत वगैरे कधी घडले हे शोधण्याचा प्रयत्न करतोय ते तंत्र योग्य आहे का हाच प्रश्न आहे)

8–9 लाख वर्षांपूर्वी मानवजात तरी अस्तित्वात होती का? असली तर अश्मयूग चालू असेल किंवा माणूस माकडांच्या स्वरूपात असेल. मग तेव्हा रामायण कसे घडेल. हा जो युगांचा लाखो वर्षांचा काळ सांगितला जातो त्यावरूनच रामायण, महाभारत ह्या सर्व गोष्टी आहेत, इतिहास नाही हे लक्षात येते.

रामायण घडले त्रेतायुगात (आपण त्रेतायुगाचा शेवटचा काळ गृहित धरू), महाभारत घडले द्वापरयुगात आणि आत्ता आपण आहोत कलियुगात. द्वापरयुगाचा एकुण कालावधी ८,६४,००० वर्ष इतका होता. म्हणजे त्रेतायुग आणि कलियुग या दोघांमधलं वेळेचं अंतर ८,६४,००० वर्ष इतकं होतं. जर रामायण ही फक्त गोष्ट आहे तर मग रामसेतुचं काय ?

जवळपास 50000 वर्षांपूर्वी होमो सेपियन अस्तित्वात आले. त्याआधी मानव रानटी आयुष्य जगत होता. मग हा 864000 वर्षांचा द्वापर युगाचा काळ व त्याआधीचा त्रेता युगाचा काळ पटत नाही. ज्या गोष्टींना काही पुरावे नाहीत त्या फक्त पुराणात लिहिल्या आहेत म्हणून विश्वास ठेवू नये. आणि रामसेतू रामाने बांधला याचा काय पुरावा आहे? आणि संशोधनाप्रमाणे रामसेतू 5000 वर्ष जुना आहे, 8 लाख वर्ष नाही.

पुराणांमधले नाही तर मग कशातले पुरावा पाहिजेत तुम्हाला ?

व्हिडीओ शुटींग, ऑडिओ रेकॉर्डींग, मेसेज ?

वेळ, काळ, युग यांचा वाद तर मोठमोठ्या संशोधकांमध्ये चाललाय. आपण लहान सहान आहोत.

संशोधना नुसार “ रामसेतु एका ‘ असामान्य ‘ व्यक्तीने बांधला आहे “. तुमच्या म्हणण्या नुसार ती ‘ असामान्य व्यक्ती ‘ प्रभु श्रीरामचंद्र नाहीत तर मग दुसरं कोण आहे ?

स्वित्झर्लंड मधल्या जिनिवा येथे युरोपियन देशांनी मिळुन CERN - Conseil européen pour la recherche nucléaire (The European Organization for Nuclear Research) नावाची एक प्रयोगशाळा तयार केली आहे. त्या प्रयोगशाळे मध्ये ब्रह्मांडाच्या उत्पत्ती विषयी Large Hadron Colider या जगातल्या सगळ्यात किचकट यंत्राद्वारे संशोधन चालु आहे. तिथल्या शास्त्रज्ञांनी त्या प्रयोगशाळेत नटराज देवतेच्या (तांडव करणाऱ्या महादेवांच्या) मुर्तीची स्थापना केली आहे. शास्त्रज्ञांच्या मते ब्रह्मांडाची उत्पत्ती होताना जो महाविस्फोट (Big Bang) झाला होता, त्या महाविस्फोटाच्या उर्जेचे अधिपती स्वयं महादेव आहेत.

बाकी आता संस्कृती किती जुणी ? खरी की खोटी ? याचा अंदाज तुम्हीच बांधा.

Ramayan kdhi lihile tyapeksha aaplya aajchya jivnashi Ramayanacha kahi relevance ahe ka he pahne khup mahttvache ahe Ani jar konala relevance sapdat nasel tar jast vichar karu naye. Karan saglyanach sarvkahi lakshat yeil he Shakya nahi..

दादा, युरोपियन शास्त्रज्ञांचे संशोधन जगातील अंतिम सत्य होते का???

हे तुम्ही कोणत्या पुराव्याचा आधारावर सांगताय?

प्रत्येक शुभप्रसंगी देश-काल कथन करण्यात येतो. त्याचं गणित केल्यावर आपल्याला लक्षात येईल.

एखाद्या शुभप्रसंगाचे उदाहरण देवून स्पष्ट करावे ही विनंती. शिवाय रामायण/महाभारत यांचा कालखंड कोणत्या तंत्राद्वारे शोधण्याचा प्रयत्न केला जातो तेही स्पष्ट करावे.

करावे.


कदाचित ह्या पुस्तकाची मदत होईल तुम्हाला.

Time counting in all religions Indian Vedic or Non-Vedic as well as Abrahmic religions like Judaism, Christianity or Islam is total wrong and exagerated..as we know today when developed humans born….when human developed languages and when first systematic languages originated …All cultures which includes dead cultures like Mayan Mesopotanian or Harrappan are developed not more than 12000 years ago…so this 10 lacs year is wrong way of counting ..inserted in all religious texts of all religions during dark period of Medieval ages (Our Puranas are also written in that period…ancient text of Vedas do not have mention of Rama or Krishna…

रामायण महाभारतात वर्णन केलेल्या राशी, नक्षत्रं वगैरेंच्या स्थानावरून आणि त्यांच्या सध्याच्या स्थानावरून, संगणकाच्या सहाय्यानं, बर्‍याच शास्त्रज्ञांनी काळाचं गणित केलं आहे. त्यानुसार, रामायण सुमारे ७ हजार वर्षांपूर्वी तर महाभारत सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी घडलं असावं असा सबळ निष्कर्ष निघतो.


Comments

Popular posts from this blog

क्यों असरदार होते हैं बीज मंत्र?

इतिहास लेखन पद्धति

अनुसूचित जाती व जमाती