पांढऱ्या पेशी
व्हायरस, बॅक्टेरीया, फंगस, अन्य पार्टीकल्स इत्यादीं बाहेरील घटकांचे रक्तामध्ये संक्रमण होते तेव्हा त्यांचा प्रतिकार करण्याचे कार्य पांढ-या पेशी करत असतात. आकारानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या पांढ-या पेशी रक्तामध्ये असतात. त्यांचे प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे असते. काही पांढ-या पेशी जीवाणूंचा प्रतिकार करुन नष्ट करतात. काही पांढ-या पेशी संक्रमित पेशींवर हल्ला करतात व काही ऍलर्जीक प्रतिक्रीया देण्याचे कार्य निभावतात.
कोणत्याही प्रकारच्या संक्रमणाच्या वेळेस पांढ-या पेशी स्वत:ची संख्या वाढवतात. अर्थात जास्त पांढ-या पेशी असणे चांगले असते असे मानले जाऊ नये. किंवा पांढ-या पेशीँची जास्त संख्या हा कोणता विशिष्ट आजारही नाही. मात्र पांढ-या पेशींचे प्रमाण योग्य त्या रेंजमध्ये असणे उचित ठरते.
जेंव्हा आपल्या शरीरात जन्तु संसर्ग होतो त्यावेळी त्यांच्याशी लढणारे सैनिक म्हणजे ह्या पांढऱ्या पेशी असतात. त्यांची संख्या वाढलेली असणं हे जंतुसंसर्ग झाला असल्याचं सिद्ध करतं. पण एकदा का हा जंतुसंसर्ग गेला की त्या आपोआप कमी होतात.
Comments
Post a Comment