घरातील व्यक्तीचं निधन झाल्यानंतर सुतक पाळण्यामागचं शास्त्र काय आहे?
घरातील व्यक्तीचं निधन झाल्यानंतर सुतक पाळण्या मागचं शास्त्र काय आहे?
माझ्या मते शास्त्र।कडे जाण्यास अगोदर काही साध्या गोष्टी आहेत, त्याकडे अगोदर लक्ष देऊ.
जेव्हा घरात किंवा नात्यात मृत्यू होतो, तेव्हा तो प्रसंग जरी निसर्ग निर्मित असला, तरी आपण माया, मोह अशा भावनिक बंधनात असल्याने अंत्यत दुःख होते. त्या व्यक्तीने उचलेल्या जबाबदारी व्यतिरीक्त तिचे आपल्या बरोबर प्रेमाचे ऋणानुबंध, सहवास अशा आठवणी मुळे सहनशक्तीच्या पलीकडे मानसिक त्रास होतो. परंतु सत्य एकच की ती व्यक्ती आता परत तुम्हाला कधीच भेटणार नसते. अशा विचारांमुळे घसा कोरडा पडणे, छातीत धडक भरणे, अस्वस्थ होणे अशा प्रकारे त्रास होतो. आणि याला कोणी अंध श्रद्धा पण म्हणू शकत नाही. एवढा मानसिक त्रास असतांना काही दिवसाकरीता तरी आपला व्यवसाय काय पण अन्न पाणी पण गोड लागत नाही.
मृत्यूमुळे त्या घरावरच एक अपशकुन व संकट आले असे म्हणायला हरकत नाही. मग हा बोझ हलका कसा करणार, त्यातुन मार्ग काढायलाच पाहीजे. यासाठी काही काळ आपण निष्क्रिय असतो. यातून बाहेर पडायला काही तरी रेषा पाहीजे, म्हणुन सुतक म्हणजे आमच्या कुळावर अनिष्ट घटनेचा आघात झाला आहे, व त्या मानसिकते मधुन बाहेर पडण्यास हा सुतकाचा कालावधी खुप मोठा आधार आहे.
त्यामुळे सुतक ही हिंदु धर्मातली एक प्रथा आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. नात्यातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही दिवस सुतक पाळले जाते. नाते किती जवळचे आहे यावर सुतकाचे दिवस अवलंबून असतात. ही सर्व माहिती पंचांगात असते. बाहेरगावच्या माणसाठी मृत्यूची वार्ता समजल्यानंतर सुतक सुरू होते. सुतक म्हणजेच सोयर किंवा अशौच, मृत माणसाबद्दल धरावयाचा विटाळ. तो का पाळायचा याचे मानसिक कारण मी अगोदर लिहिले आहे.
सुतकालाच अशौच असेही म्हटले जाते. व्यक्तीच्या निधनानंतर १ ते १३ दिवस सुतक / अशौच पाळण्याची प्राचीन प्रथा आहे. रामायण, स्मृतिग्रंथ, पुराणे, गृह्यसूत्रे अशा विविध ग्रंथांत याविषयी उल्लेख किंवा माहिती दिलेली आहे. वस्तुत: ज्या काळात स्वच्छतेची आणि जंतुसंसर्ग टाळण्याची साधने पुरेशा प्रमाणात उपल्ब्ध नव्हती, त्याकाळात ही प्रथा अस्तित्वात आली असावी. सुतक संपल्यावर निधनाचा शोक कमी झाला असल्याने पुनः आपल्या दिनक्रमाची सुरुवात करण्याचा संकेत प्राचीन काळी रूढ होता व आपण पण आज तो पाळत आहे.
तक्षक / गरुड : छायाचित्र स्रोत गुगल
गरुड पुराणात तक्षक याने भगवान विष्णु यांना मृत्यू झाल्यापासून तर एक वर्ष पुर्ण होई पर्यंत आत्मा कसा प्रवास करतो, असा प्रश्न विचारला. त्यावर भगवान विष्णूंनी त्याला जी कथा सांगितली त्यालाच "गरुड पुराण " असे म्हणतात.
सुतक कसे पाळावे :
- सुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जाऊ नये.
- कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही.
- आपला जो नित्यक्रम आहे तो करावा, उदाहरणार्थ हरिपाठ वाचन, गायत्री मंत्र सोडून इतर नाम जप, किर्तन, प्रवचन करण्यास हरकत नाही.
- नित्याची नोकरी, कामधंद्यास जायला हरकत नाही. मात्र ज्याने अग्नी दिला आहे, त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नयेत व दहा दिवस घराबाहेर जाऊ नये.
- सुतकामध्ये पलंग, गादीवर झोपू नये.
- दररोज आंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लाऊ नये.
- अत्तर किंवा सेंट वापरू नये.
- नवीन वस्त्र परिधान करू नये. बाकी नित्याचे व्यवहार चालू ठेवावेत.
- दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करावी, सूतकातील सर्व कपडे धुवावीत आणि घरात गोमूत्र शिंपडावे.
- अकराव्या दिवशी कपाळाला कुंकू, टिकली किंवा गंध लावावे.
- या आत्म्याला पुढील गतीकरता अकरावा, बारावा व तेराव्या दिवशीचे विधी करावे.
- चौदाव्या दिवशी घरात निधनशांत व उदकशांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी. त्या दिवशी खांदेकर्यांना, नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे. संध्याकाळी अग्नी देणार्याने डोक्यावर नवीन टोपी घालावी. खांद्यावर टॉवेल किंवा उपर्णे घ्यावे व शंकराच्या मंदिरात जाऊन गाभार्यात तुपाचे निरांजन लावून ठेवावे, शंकर ही मृत्यूची देवता आहे, आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे, अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व उपर्णे तेथेच काढून ठेवावे. लावलेले निरांजन घरी आणू नये.
आधार : निर्णयसिंधू, गरूड पुराण.
जन्तु संसर्ग (असली तर) होऊ नये म्हणून दहा दिवसांचा सूतक. दुख विसरण्याकरिता व दहा दिवस वेळ काढायला गरुड पुराण वगैरे ऐकवत होते बहुधा
संशोधन करून मग टिप्पणी द्यायला हवी,
पाश्चात्त्य अजूनही आत्म्याला शोधत आहेत
त्यांनी सांगितले की मग मात्र आपण लगेच विश्वास ठेवतो.
आत्ता जो कणं सापडला आहे त्याला देवकणं म्हणत आहेत ते!🙂
अणू पासून ब्रम्हांडापर्यंत सर्व शोधून झालं आहे भारतीय संस्कृती मध्ये.
एका प्रसिद्ध शास्त्रज्ञाने हिमालयामध्ये साधूंना भेटल्यावर जे वक्तव्य केले आहे ते असं आहे की, या विश्वामध्ये ज्या गोष्टींचा ज्याप्रकारे विचार करता येईल त्या सर्व कृती भारतामध्ये अगोदरच करून झाल्या आहेत, सर्व शक्यता व त्यांचे निष्कर्ष यांच्याकडे आहेत.संशोधनासाठी काहीही शिल्लक नाही.
Comments
Post a Comment