जोहार मायबाप म्हणजे काय?
नाही, जौहर हा परकीय आक्रमण व त्यातील पराभवानंतर, स्वतःचा आत्मसन्मान राखण्यासाठी केलेली गोष्ट आहे. सती हे पतीच्या निधनानंतर आपले त्याच्यावरील प्रेम वा समर्पण प्रकट करीत त्याच्या अंतिम संस्कारात सोबतीने केलेले सहगमन आहे.
राणी पद्मिनी व इतर स्त्रियानी राणा रावल रतन सिंहाच्या पराभव व मृत्यूनंतर आपला आत्मसन्मान राखण्यासाठी जौहर म्हणजेच, स्वेच्छेने अग्निप्रवेश केला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इहलोकातून विरक्त होऊन अडीच महिन्याच्या काळात, महाराणी पुतळाबाई यांनी, सतीचे वाण घेऊन सहगमन केले होते…
👉जेंव्हा जेंव्हा राजपूत राजे परकीय शत्रूविरुद्ध लढाया हरत असत त्या वेळी शत्रूच्या हातून शीलाची / शरीराची विटंबना होऊ नये म्हणुन राजपूत स्त्रीया सामुहिक जौहर करीत.
नवरा मेल्यानंतर विधवा स्त्री सासरच्या स्थावर जंगम मालमत्तेमध्ये हिस्सेदार होईल या भीतीने सासरची मंडळी स्वर्गप्राप्ती, पतिव्रता, किंवा रिवाज अशा गोंडस नावाखाली विधवा स्रियांना सती जाण्यास भाग पाडत.
अर्थात हे मी माझे अवांतर वाचन व तर्काच्या आधारे लिहिले आहे. श्रद्धाळूचे काही वेगळे म्हणणे असु शकते.
👉सर, एक पुस्तक वाचले होते त्यात अस लिहले होते की नारायण राव पेशवे ला आपली वहिनी म्हणजे रमाबाई जेंव्हा माधवराव वारल्यानंतर सती गेली तेंव्हा ती सुद्धा तिला जाळू नका अशी आकांड तांडव करत होती(आणि ते नैसर्गिक पण आहे).तिला मधवरवचे मुंडके मांडीवर घेउन चितेवर बसवून मग चिते ला अग्नी दिल.जर्नव अशी स्त्री उठून पळून जायला लागते तेंव्हा चिते च्या आसपास खूप लोके हातात काठी किंवा हत्यारे घेऊन त्या स्त्रीला बाहेर न येऊन द्यायचा प्रयत्न करायचे.ते नारायणराव ने पाहिले होते.आता नाव नाही आठवत.पण ती सती जायची प्रथा खूप वाईट होती त्यात वाद नाही.इंग्रजांचे आभार ती प्रथा बंद केल्याबद्दल.
👉अगदी बरोबर,
सती जाणाऱ्या स्त्रीयांचा आक्रोश दाबण्यासाठी मोठ मोठयाने वाद्ये वाजविली जायची, घंटानाद केला जायचा, थाळ्या, पराती वाजवल्या जायच्या.
या अमानुष प्रथेविरुद्ध राजा राम मोहन रॉय यांनी इंग्लंडच्या राणी पर्यंत निवेदने सादर करून कायदा करून ही प्रथा कायद्याने गुन्हा ठरविली.
👉१८२०-२२च्या दरम्यान माझ्या घरातील शेवटची स्त्री सती म्हणून गेली. तिच्या अंत्ययात्रेदरम्यान तिला ज्या ठिकाणी सतीचे वाण दिले होते ती जागा अजून आम्ही संरक्षित करून ठेवली आहे. व ज्या ठिकाणी ती सती गेली त्या ठिकाणी आज मंदिर उभारले आहे.दरवर्षी कुठलेही शुभ कार्य करण्याआधी तिथे भेट द्यावी असा नियम आहे नाहीतर विघ्न येतात असा अनुभव आहे.
👉स्त्रीला अशाप्रकारे जाळणे अशी जर श्रद्धा असेल तर अशा क्रूर लोंकांचे ्र्श्रद्धाळू म्हणून आपण कसे काय समर्थन करू शकतो?
फरक आहे. जोहार म्हणजे आपल्या अब्रूचा शत्रूपासून बचाव करण्याचा उपाय. पण सती जाणं म्हणजे पतीच्या म्रुत्यू नंतर विधवेचा आचार सांभाळण्यापेक्षा आणि समाजच्या टीकेपासून बचाव व इतर पुरुषांच्या नजरांपासून स्वताला सांभाळण्याचा मार्ग.
नाही अजिबात नाही
जौहार म्हणजे स्वता आग लावणे आणि त्या आगीत उडी घेणे स्वता महिलेच्या मार्जिणे हे जास्तकरून उत्तर भारतात राजपूत घराने करत
सती म्हणजे महिलेची इच्छा असो व नसो नवरा मेल्यांनातर आगीत उडी घ्यायलाच लागत होती .हे संपूर्ण भारतभर चालू होते .
🔴गावांच्या वेशी बाहेर मारुती मंदीर का असते? व नमस्कार घालताना रामराम हा उच्चार केव्हापासुन प्रचलित झाला?🔴
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला अन त्याच शकांत १५९६ जेष्ठ वद्य नवमी माँ साहेब जिजाऊ यांना देवाज्ञा झाली . त्याची उत्तरक्रीया महाराजांनी केली या वेळी ते शोकांतात होते . अश्विन शुध्द पंचमीचा मुहूर्त त्यांनी पुन्हा सिंहासनारोहण सभा केली परंतु राजदरबारात मन लागेना पावसाळा गेला यानंतर लगेच संभाजी राजे व कारभारी यांचे सोबत संपत्ती व सरदार अष्टप्रधान फ़ौज घेवून ते राजगडावर आले . प्रतापगडच्या देवीचे दर्शन घेवून रामदास स्वामी यांना भेटायला गेले. त्या वेळी महाराजांना भेटण्यास अनेक लोक येत होते. व ज़ोहार करत होते. त्यावेळी समर्थ रामदास स्वामींनी प्रश्न केला जोहार म्हणजे काय ?या वर महाराज म्हणाले जोहार म्हणजे वंदन करणे . रामदास स्वामी बोलले जोहार या शब्दाचा अर्थ समजत नाही या जागेवर राम राम बोलावे. हा उपदेश सोबत असलेल्या सर्व सेवेकरी सैन्य व जमावाने मान्य केला . त्या नंतर महाराजांनी स्वामींना परळी कील्ला (सातारा) येथे येण्यास विनंती केली व चाफळच्या श्रीराम उत्सवासाठी अकरा गावे मोकासे (कर वसुली) व सरदेशमुखी नेमुन ११००० होन देवून बंदोबस्त केला व स्वामीनी तेथे स्वीमिंग रहावे अशी विनंती केली तेथे राजमंदीर दरवाज़ा व हवालदार सर्व आपल्या आज्ञेत असेल आपण केव्हाही येवून राहू शकता असे सुचविले याउपर स्वामींनी सांगीतले आपले राज्य जेथे तेथे हनुमान मंदिर बांधावे आम्ही जेथे मंदिर तेथे राहू हा उपदेश महाराजांनी स्वीकारला व अनेक गावी महाराज स्वत्: उपस्थित राहून मंदिरे करीवली काही स्वामींनी तर काही सरदारांनी मंदिरे उभारली . या मुळे प्रत्येक गावात ग्राम दैवत हनुमान मंदिर बनले जेथे मंदिर तेथे महाराजांचा अंबल होता. धर्म स्थापनेतील ही गोष्ट अभ्यासक व सर्वांनाच खुप महत्वाची ठरते.
शिवराय असे शक्ती दाता…🚩
👉हनुमाजींची मंदिरे, भक्ति आणि तालीम ह्या तीन गोष्टींचा प्रचार व प्रसार हा समर्थ रामदास ह्यांनी महाराष्ट्र भर स्वराज्यची मोहिमे बरोबर केला. समर्थांचा प्रसार मंत्र होता ‘ श्रीराम जयराम जयजय राम’. ह्यां मंत्राच्या प्रचारात अपभ्रंश होता होता ग्रामीण भागांत रामराम एवढाच मंत्र राहीला, असे मी प्रवचनात ऐकले आहे.
अशी मान्यता आहे कि हनुमानजींना रामराम ऐकणे आवडते. त्यामुळे हनुमान मंदिरात प्रवेश केल्यावर प्रथम रामनाम घ्या नंतर हनुमानाचे स्मरण करा. बाहेर निघतांना परत रामनाम ह्या. तरच हनुमान भक्ति पुर्ण होउन, हनुमान प्रसन्न होतात.
गावात कुठलीही वाईट किंवा अनिष्ट शक्तिचा प्रवेश होउ नये ह्या करीता वेसेवर हनुमानजींचे मंदिर असते.
Comments
Post a Comment