पंचावतार
आद्यसमाजक्रांतिकारक श्रीगोविंदप्रभू Early Social Revolutionary ShriGovindPrabhu
बाराव्या शतकात उदयाला आलेल्या महानुभाव पंथाचे कार्य फार मोठे आहे.
बाराव्या शतकात उदयाला आलेल्या महानुभाव पंथाचे कार्य फार मोठे आहे.
👉स्पृश्यास्पृश्य व उच्चनीचतेच्या कल्पनेपलीकडे जाउन मोक्षाधिकार सर्व थरातील लोकांना आहे, हे महानुभाव पंथाने पटवून दिले. त्यांनी स्त्रियांना संन्यासाची व आत्मोद्धाराची संधी दिली. श्री चक्रधररस्वामी यांनी श्रीगोविंदप्रभूंकडून प्रेरणा घेउन द्वैतवादी विचार प्रणाली समाजासमोर मांडली.
🔴त्यानंतर महानुभाव पंथाचा विशेष प्रसार झाला.
श्रीकृष्ण,
श्री दत्तात्रेय प्रभू,
श्री चांगदेव राऊळ (श्री चक्रपाणी),
श्री गोविंदप्रभू (श्री गुंडम राऊळ) आणि
श्री चक्रधररस्वामी
हे महानुभाव पंथाचे पाच कृष्णावतार होत.
आद्य समाजक्रांतिकारक श्री गोविंदप्रभू अत्यंत ज्ञानी होते.
निर्भयता, लोकमान्यता, अहिंसावृत्ती, कनवाळूपणा, उपजतविनोदबुद्धी, अखंड ब्रम्हचर्य, कलाभिज्ञता, शिस्तप्रियता, खोडकर वृत्ती, साधी राहणी उच्च विचारसरणी, अचाट बुद्धिमत्ता, नि:स्पृहवृत्ती, संवेदनशीलता अशा असंख्य गुणांनी नटलेल्या गोविंदप्रभूंनी सातशे वर्षांपूर्वी केलेली वैचारिक क्रांती खरोखर भूषणावह आहे.
Comments
Post a Comment