मलाही तोच प्रश्न पडलाय... बघूया विद्वानांचं काय मत आहे ते?

वाल्याचा वाल्मीकी झाला.

पूर्वी रानात एक वाल्या कोळी नावाचा दरोडेखोर राहत होता. तो काय करायचा? रानात एक मार्ग होता. तेथून येणार्‍या-जाणार्‍या लोकांना भीती दाखवून आणि धाक दाखवून लुटायचा. त्यांचे पैसे आणि दागिने काढून घ्यायचा. त्या पैशावर आपले घर चालवायचा.

त्याला एकदा नारदमुनींनी बघितले. नारदमुनी हे देवांचे ऋषी आणि विष्णूचे भक्त होते. ते 'नारायण नारायण।' हा नामजप करायचे.

🔴नारदमुनींना वाईट वाटले. वाल्या कोळी जर असेच पाप करू लागला, तर त्याला नरकात शिक्षा भोगावी लागेल. 🔴

ते लगेच वाल्या कोळीकडे गेले आणि त्याला म्हणाले, ''अरे, तू हे पाप का करतोस? लोकांना त्रास देऊन त्यांचे पैसे घेणे हे पाप आहे.'' त्यावर वाल्या कोळी म्हणाला, ''मी हे पाप माझ्या बायका-मुलांना खायला-प्यायला मिळावे म्हणून करतो.''

🔴 तेव्हा नारदमुनी म्हणाले, ''तू त्यांच्यासाठी करतोस, तर मग जा. त्यांना विचार की, मी पाप करून सगळे तुम्हाला देतो. तर माझ्या पापाचा अर्धा वाटा तुम्ही घेणार का?'' वाल्या कोळी घरी गेला आणि त्याने आपल्या बायका-मुलांना विचारले. तेव्हा ती म्हणाली, ''तुमच्या पापाचे फळ आम्ही भोगणार नाही.

🔴तुम्ही लोकांना त्रास देऊन पैसे मिळविता, तर त्याचे पाप तुम्ही भोगा.''

👉हे ऐकल्यावर वाल्या कोळ्य़ाला वाईट वाटले. आपण एवढी वर्षे निरपराध लोकांना फार त्रास दिला. त्याला त्याच्या कर्माचा पश्‍चात्ताप झाला.

🔴तो लगेच नारदमुनींना शरण गेला आणि म्हणाला, ''आपण मला क्षमा करा. या घोर पापातून मला मुक्त करा.''

🙏🏼तेव्हा नारदमुनी प्रेमाने म्हणाले, ''वाल्या, तुला पश्‍चात्ताप होतोय ना? आता तुझ्या पापातून मुक्त होण्यासाठी तू 'राम राम' असा नामजप कर.🙏🏼

👉जोपयर्ंत मी परत येत नाही तोपयर्ंत तू इथेच नामजप करत बस. मी लगेच जाऊन येतो,'' असे म्हणून नारदमुनी गेले.

  • 👉 आता वाल्या कोळी एका जागी बसून नामस्मरण करू लागला.
  • 👉त्याला 'राम राम' असे म्हणता येत नव्हते; म्हणून तो 'मरा मरा' असा नामजप करायचा;
  • 👉पण तो नामस्मरण फार मनापासून करत होता.
  • 👉असे करता करता एक दिवस गेला, चार दिवस गेले, एक आठवडा झाला,
  • 👉तरी वाल्या कोळी नामस्मरणच करत होता. १ मास, २ मास असे करत करत वर्षे झाली;
  • 👉पण नारदमुनी आले नाहीत; पण वाल्याचा नामजप अखंड चालूच होता.

🔴🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜तो ज्या रानात बसला होता, तेथे वाल्या कोळ्य़ाच्या भोवती रानातील लाल मुंग्यांनी वारूळ बनविले, तरीही वाल्या कोळी उठला नाही. 🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜

🗣️हळूहळू वाल्याचे सगळे शरीर मुंग्यांच्या वारुळाखाली झाकले गेले. त्याने मनाशी निश्‍चय केला होता की, नारदमुनींनी सांगितलंय ना?

ते येईपयर्ंत मी इथेच नामस्मरण करत बसणार. असे न खाता-पिता शेकडो वर्षे नामजप करणार्‍या वाल्याला देव प्रसन्न झाला

  • आणि त्याला म्हणाला, ''मी तुझ्या नामस्मरणामुळे प्रसन्न झालो आहे.
  • तुझे सगळे अपराध मी क्षमा करतो.
  • तू आता वाल्या कोळी नाहीस.
  • आजपासून वाल्मीकी ऋषी आहेस. असे म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला.
  • याच वाल्मीकी ऋषींनी 'रामायण' लिहिले.
  • वाल्मीकी ऋषी फार प्रेमळ होते.
  • त्यांच्या आश्रमात वाघ आणि हरिणसुद्धा एकत्र राहायचे.
  • हे सगळे कशामुळे झाले, तर नामस्मरणामुळे.
  • मग आपणसुद्धा प्रतिदिन नामजप वहीत लिहूया. वाल्या कोळ्य़ाचा वाल्मीकी बनण्यासाठी त्याला नारदमुनींनी साहाय्य केले. मुलांनो, नारदमुनींच्या सत्संगामुळे वाल्याला आपल्या पापाचा पश्‍चात्ताप झाला.

तात्पर्य : सत्संगामुळे आपण चांगले बनतो; पण आपली संगत वाईट असेल, तर आपल्याला चांगले बनावे वाटेल की नाही? मग आपण नेहमी चांगल्याच मुलांच्या संगतीत राहिले पाहिजे.

दोन वर्षापुर्वी चा एक टिका आठवली.

अनेक गुंडांना भाजपात प्रवेश देऊन त्यांना पावन करून घेणारे व आम्ही वाल्याचा वाल्मिकी करतो असे समर्थन करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आता गुंडांसोबतच विजय माल्ल्यासारख्या कर्जबुडव्या उद्योगपतींचे समर्थन करत आहेत. हा विजय माल्ल्याचाही वाल्मिकी करण्याचा प्रयत्न आहे. अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

ईश्वर एक नाम अनेकचा संभ्रम करून, केवळ बहुजनांचा वध उघड होऊ नये यासाठी " वाल्याचा वाल्मिकी करण्यात आला". वाल्या कोळी बहुतेक महादेव कोळी या जमातीचे असावेत. ते शासनकर्ती जमात असावी. केवळ ऋषी, महर्षी पद दिले असे सांगून मुळ वाल्याला वारूळातच अदृश्य करण्यात आला असावा. बहुजणांचा अजिनाथ जरी असला तरी सवर्ण लोक " आज्या " म्हणतात, आमुच्या वाल्या वाल्मिकी होणं शक्यच नाही.

-रुपांतर, वेषांतर, धर्मांतर, देशांतर करण्यात पटाईत असणाऱ्यांनीच प्रकरण दाबले असणार. वाल्याचा वाल्मिकी श्रेष्ठ असेल तर आम्हांला आनंद आहेच. परंतू तो आमुचा वाल्या नाहीचय याची शंका ही आहे.

कुणाच्याच धार्मिक भावना दुखण्याचं कारण नाहीय. माझ्या आदीवासी जमातीचे मुळनिवासी जमातीच्या वीराला खुनी,दरोडेखोर, लुटारू, चोर म्हणणे, तसा उल्लेख करणे योग्य आहे का?

एकीकडे वाल्या कोळी, चोर, दरोडेखोर, म्हणून शुद्र सिध्द करायचे आणि दुसरीकडे नामजपाने वाल्मीकी ऋषी झाला म्हणायचे निश्चितच पटण्यासारखे नाहीय.

सभेमध्ये स्टेजवर सत्कार करायचा आणि हा एकेकाळचा चोर, दरोडेखोर, गरिबांना लुटायचा पण आम्हाला शरण आला आता पाप मुक्त होऊन नावारूपाला असे वारंवार म्हणून मनुवादांच्या वरदहस्तांतूनच शुद्रांचा उद्धार होतो हे सिद्ध करायचेय काय?

स्वतः नारदमुनी नारायण नारायण म्हणतात. आणि वाल्याकडून राम राम म्हणायला लावतात. ( शंका उपस्थित केलीच तर नारायण राम एकच म्हणत सारवासारव नेहमीचीच) परंतू नारदमुनींनी खरं तर वाल्याला नारायण नारायण म्हणायला सांगायला हवे होते. किमान स्वामी निष्ठेसाठी तरी.

पुराणामध्ये, रामायण, महाभारतामध्ये जेवढेही वध झालेली पात्रे आहेत ते सर्वच्या सर्व अनुसुचित जाती, जमाती आणि मागासवर्ग आहे तेच मुल निवासी आहेत. जेवढया कांही जाती आहेत त्या सर्व इथले मुळ निवासी आहेत.

पाप पुण्याच्या नादात, बहुजनांच्या चारित्र्याचं विकृतीकरण आता तरी थांबवायला हवं ना? झालं गेलं गंगेला मिळालं. 

Comments

Popular posts from this blog

क्यों असरदार होते हैं बीज मंत्र?

इतिहास लेखन पद्धति

अनुसूचित जाती व जमाती