Skip to main content

बौध धम्म


विकिपीडिया
ships wheel with eight spokes represents the Noble Eightfold Path
धम्मचक्रातील आठ आरे हे अष्टांगिक मार्ग दर्शवतात.

अष्टांगिक मार्ग (पाली: अरियो अठ्ठ्ंगिको मग्ग) हा गौतम बुद्धांनी सांगितलेला काम, क्रोध, द्वेष, इ. दोष दूर करून जीवन निर्मळ करण्याचा सदाचाराचा मार्ग आहे. यासं मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात.

बौद्ध धर्माच्या शिकवणुकीत अष्टांगिक मार्गाला फार महत्त्व आहे. अष्टांगिक मार्गाचा परिपूर्ण अवलंब केला तर मनुष्य निर्वाण प्राप्त करू शकतो. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही कल्पना समजावून देताना म्हटले आहे की, निर्वाण म्हणजे धर्ममार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा ताबा आपल्या प्रवृत्तींवर असणे. निब्बाण(निर्वाण) म्हणजे निर्दोष जीवन. काम, क्रोध, द्वेष वगैरे दोष आपले जीवन दूषित करून सोडतात. हे दूर करून जीवन निर्मळ करण्याचा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग. हा मार्ग मनुष्याला पाहायला शिकवतो, जाणायला शिकवतो, ज्ञान देतो. त्यामुळे चित्ताला शांती लाभू शकते. मनुष्याच्या दैनंदिन जीवनात मनुष्य जितके या मार्गाने वाटचाल करतील तितके जीवन अधिक आनंदी होत जाईल.

अष्टांगिक मार्ग

१) सम्यक् दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.

२) सम्यक् संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.

३) सम्यक् वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.

४) सम्यक् कर्मान्त :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.

५) सम्यक् आजीविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.

६) सम्यक् व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.

७) सम्यक् स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.

८) सम्यक् समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे

सम्यक दृष्टीसंपादन करा

अष्टांगामध्ये पहिले सूत्र आहे- सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे जे आहे, जसे आहे तसे पाहणे. एखाद्या व्यक्तीविषयी मनात राग असेल किंवा काही पूर्वग्रह असतील तर ती व्यक्ती जे काही करेल त्यात आपल्याला दोषच दिसू लागतात. कधी कधी मन विषादाने भरून गेले असले की भव्य आकाश, तेजस्वी नक्षत्रे, सुगंधाची आणि सौंदर्याची बरसात करणारी फुले यांच्या दर्शनाने आनंद होत नाही. मूळ वस्तू जशी आहे तशी न बघता विकारग्रस्त मनाने बघितली की तिच्या बाबतीतील आपले आकलन दूषित होते. म्हणून माणूस, वस्तू, निसर्ग सगळ्यांकडे शांत, समतोल, पूर्वग्रहविरहित दृष्टीने बघावे. म्हणजे बघणारा आणि बघितले जाणारे यांच्यात योग्य संबंध प्रस्थापित होतात.

सम्यक संकल्पसंपादन करा

दुसरे सूत्र आहे सम्यक संकल्प. आपला संकल्प, आपले ध्येय हे फार आवाक्याबाहेरचे नको तसेच फार साधे, अगदी सहजसाध्य, कुवतीपेक्षा पुष्कळ कमी असेही नको. आपल्या नेहमीच्या जगण्यात, विशेषत: आजच्या काळात तर सम्यक संकल्प फार महत्त्वाचा ठरतो. आपल्या मुलांसाठी अवास्तव अपेक्षा बाळगणारे पालक मुलांसमोर न झेपणारे ध्येय ठेवतात. त्या ध्येयाकडे वाटचाल करताना मुले आणि पालक दोघेही दु:खी होतात. ध्येय साध्य झाले नाही की आत्मविश्वास ओसरू लागतो. ताण येतो. आपण पालकांच्या अपेक्षा पुऱ्या करू शकलो नाही याचे दु:ख होते. अशा वेळी आत्यंतिक निराशेने मुलांनी आत्महत्या केल्याचीही उदाहरणे आहेत. याखेरीज संकल्पामध्ये दुराग्रह असू शकतो. खोटी प्रतिष्ठा आणि अहंकारापायी अमुक एक करून दाखवीन आणि मगच विसावेन, या संकल्पामुळे आयुष्यातील मौल्यवान काळ फुकट जाऊ शकतो. मनापासून नको असलेली गोष्ट करणे म्हणजे मानसिक शक्तींचा अपव्यय असतो. दुसरीकडे आळशीपणा करून, आपल्याकडे असलेली शक्ती, ताकद, कौशल्य फुकट घालविणे हे सुद्धा दु:खदच म्हणावे लागेल. ही माणसे आपले आणि समाजाचे नुकसान करीत असतात. तेव्हा कुवतीनुसार समतोल ध्येय म्हणजे सम्यक संकल्प आवश्यक असतो

सम्यक वाणीसंपादन करा

हे तिसरे सूत्र आहे, सम्यक वाणी. आपले बोलणे सत्य, सरळ आणि प्रिय असावे. खोटेपणा, ढोंग फसवणूक आपले अनेक तऱ्हांनी नुकसान करतात. आपल्या रोजच्या जगण्यात पुष्कळदा आपण आत काहीतरी दडवतो. एखाद्याबद्दल राग असताना बाहेर मात्र गोड गोड बोलतो. राग दडपल्यामुळे तो वेगळ्या प्रसंगी वेगळ्या मार्गाने बाहेर पडू शकतो. अशी माणसे अकारण हिंसक होऊ शकतात. विपरीत किंवा बदलून न सांगता जे आहे जसं आहे तसं सांगायला हवे . राजाचे हेर किंवा मंत्री खोटे आणि गोड बोलू लागले तर राज्याचा विनाश ओढवेल. स्तुतीही नव्हे आणि निंदाही नव्हे. साधेपणी अहिंसात्मक तऱ्हेने सत्य सांगणे. गरज नसताना वृथा न बोलणे या सर्व बाबी सम्यक वाणीत समाविष्ट होतात.[१]

सम्यक कर्मांतसंपादन करा

चौथं सूत्र आहे सम्यक कर्मांत. योग्य ते आणि योग्य तेवढं कर्म करणं म्हणजे सम्यक कर्मांत. यात आत्महत्या, चोरी, हिंसा, परस्त्रीविषयी लोभ, अशी सारी कर्मे निषिद्ध आहेत. दुसरीकडे कितीही मिळाले तरी, ‘अजून हवे’ ची लालसा न सुटणे, त्यासाठी जिवाच्या आकांताने कर्म करीत राहणे हे सुद्धा वर्ज्य असावे. सगळे ज्ञानी लोक याचा उद्घोष करतात. या संदर्भातील टॉलस्टॉयची कथा प्रसिद्ध आहे. एका माणसाला सांगितले गेले की, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तू जिथपर्यंत धावत जाशील तेवढी जमीन तुझी होईल. सूर्यास्तापर्यंत खूप अंतर पार करायला हवे म्हणून तो लोभामुळे जोराने धावत राहिला. सूर्यास्त झाल्यावर तो थांबला आणि अतिश्रमाने मृत्यू पावला. त्याला पुरण्यास साडेतीन हात जमीन पुरेशी झाली. आपल्याला योग्य असे साध्य ठरविल्यावर त्या दिशेने शांतपणे कर्म करत राहणे, म्हणजे सम्यक कर्मांत.

सम्यक उपजीविकासंपादन करा

सम्यक उपजीविका हे पाचवे सूत्र आहे. आपली उपजीविका ही आपल्या आवडीनुसार असावी. परंतु त्यापासून इतरांना त्रास, दु:ख, कष्ट, कोणतीही इजा होता कामा नये. उपजीविका सन्मार्गाने करावी. चोरी, फसवाफसवी, पाप, हिंसा करून उपजीविका करू नये. आपण जितक्या खोटय़ा गोष्टी करून आणि इतरांना त्रास देऊन उपजीविका करतो तितके आपण अपराधी, भीतिग्रस्त, संतापी असतो. समाधानी, शांत जीवनापासून वंचित राहतो. चंबळच्या डाकूंना सुद्धा ही गोष्ट अनुभवाला आली म्हणून त्यांनी खून, दरोडे, मारामाऱ्या, लुटालूट सोडून विनोबांपुढे शस्त्रे ठेवीत शरणागती पत्करली व शेतीसारखी कष्टाची पण शांत, समाधानी उपजीविका पत्करली.

सम्यक व्यायामसंपादन करा

सम्यक व्यायाम हे सहावे सूत्र आहे. वाईट विचार मनात उत्पन्न होऊ नये म्हणून प्रयत्न करणे. उदा. दुसऱ्याचे धन हडप करावे असा विचार मनात नसतो, पण तशी संधी समोर आली तर मोह होऊ शकतो. अशा प्रसंगीही वाईट विचार न करण्याचे वळण मनाला लावायला हवे. वाईट विचारांनी फक्त विध्वंस घडतो. त्यामुळे एकतर मनाला टोचणी लागते किंवा अधिक विध्वंसाची आग भडकते. चांगली कृत्ये करणे, मनात सुविचार उत्पन्न होतील असा प्रयत्न करणे, सुविचार मनात नीट रुजविणे, ते पूर्णत्वाला नेऊन जीवनात त्यांचा अंतर्भाव करणे या मानसिक प्रयत्नांना सम्यक व्यायाम म्हणतात.

सम्यक स्मृतीसंपादन करा

सम्यक स्मृती हे सातवे सूत्र आहे. व्यर्थ ते विसरणे आणि सार्थ ते स्मरणात ठेवणे दैनंदिन जीवनात घडावयास हवे. पण उलटच घडते. वाईट गोष्टींच्या स्मृती पक्क्या होतात. कोणी आपल्याकरता काय केले हे लक्षात राहात नाही. उलट काय केले नाही तेवढे मात्र लक्षात राहते. दैनंदिन जीवनात हे दु:खाला कारणीभूत ठरते. आपल्या शरीरमनातील सुखदु:खादींचे साक्षित्वाने अवलोकन करीत त्यांचे स्वरूप समजावून घेणे, त्याबाबतीत मन सावध, जागृत व संतुलित असणे म्हणजे सम्यक स्मृती.

सम्यक समाधीसंपादन करा

सम्यक समाधी हा अंतिम टप्पा आहे. दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करणे कठीण आहे. दु:ख आणि षड्रिपूंच्या पलीकडे जात अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी सात्त्विक मार्गाने जगता जगता हळूहळू मनाची तयारी होऊन ‘हर्ष खेद ते मावळले’ अशी स्थिती आली की मन विशुद्ध आनंदाने भरून जाते. अंतर्यामीच्या या स्थितीला सम्यक समाधी म्हणता येईल.



विकिपीडिया

पंचशील ही बौद्ध धम्मातील एक आचरण नियमावली आहे. सामान्यत: पाच तत्त्वांना पंचशील म्हणून संबोधले जाते. पंचशील हे पाच नियम आहेत, पाच गुण आहेत. बुद्धांनीसामान्य माणसाकरिता आपल्या शरिरावर नियत्रंण ठेवण्यासाठी व शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी, त्यापासून परावृत्त होण्याकरीता हे पाच गुण सांगितले आहेत. खालिल पाच शीलांची शिकवण तथागत बुद्धांनी आपल्या शिष्यांना दिली होती. सामान्यत: जगातील सर्व बौद्ध पाच ही शीलाचे पालन करतात.

पंचशीलाचा पाली व मराठीतील अनुवाद पुढील प्रमाणे.
१) पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ: मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

२) अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी 
अर्थ : मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

३) कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी'
अर्थ : मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

४) मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

५) सुरा-मेरय-मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी मद्य, त्याचप्रमाणे मोहात पडणार्या इत्तर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

वरील पाच ही गुण महत्त्वाचे आहे. व्यक्तीने मन व शरीरावर संयम ठेवून हे पाचही शील आत्मसात केले तर ती व्यक्ती शीलवान बनते.

शीलग्रहन प्राप्तीसाठी पायऱ्यासंपादन करा

शील ग्रहणाच्या दोन पद्धती आहेत. ज्याठिकाणी भिक्खू नाहित तेथे पाच शीलाचा उच्चार व्यक्तीनेच (बौद्ध उपासक) करावयाचा असतो. दुसरी पद्धत अशी की, व्यक्तीने/उपासकाने भिक्खूसमोर नम्रपणे बसावे व हात जोडून भिक्खूना शील देण्यासाठी विनंती करावी.

ओकास वन्दामि भन्ते ।
ओकास द्वारत्तयेन कतं संब्ब अपराधं खमतूमे भन्ते
ओकास अहं भन्ते तिसणेन सह पंचशील धम्म याचामि ।
अनुग्गहं कत्वा शीलं देयमे भन्ते ।।
दुतियम्पि ओकास अहं भन्ते, तिसरणेनसह पंचशील धम्मं याचामि ।
अनुग्गहं कत्वा शीलं देयमे भन्ते ।
ततियाम्पि ओकास अहं भन्ते, तिसरणेनसह पंचशील धम्मं याचामि
अनुग्गहं कत्वा शीलं देयमे भन्ते ।।


नंतर भंते खालिल ओळी तीन वेळा म्हणतील :-

नमोतस्स भगवन्तो अरहतो । सम्मासम्म बुद्धस

बौद्ध उपासकांनी हे त्यांच्या मागे म्हणावे. त्रिशरण ग्रहणानंतर खालिल ओळी भन्ते म्हणतील:-

त्रिशरण

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स..!

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स..!

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स..!

बुद्ध वंदणेतील पाली शब्दांचे मराठी अर्थ

  • नमो — वंदन, नमस्कार, हात जोडणे
  • तस्स — तुझ्या सारखा, गौतमा (बुद्ध) सारखा.
  • भगवतो — पवित्र (Blassedone)
  • भगवा — तेजस्वी (Bright)
  • भगवतो — उदात (Sublime)
  • अर्हतो — निष्पाप (Worthyone)
  • सम्मा — योग्य (Righty)
  • सम्मासबुद्ध — संबोधी प्राप्त, प्रज्ञा प्राप्त (Enlightened one)


विकिपीडिया

बुद्ध वंदना, धम्म वंदना व संघ वंदना यांना एकत्रितपणे त्रिरत्न वंदना असे म्हणतात.

१. बुद्ध वंदनासंपादन करा

इति पि सो भगवा अरहं, स्म्मासम्बुद्धो,
विज्जाचरणसम्पन्नो, सुगतो, लोकविदु, अनुत्तरो, पुरिसधम्मसारथि, सत्था देव अनुस्सानं, बुद्धो भगवाति ।।

बुद्धं जीवितं परियन्तं सरणं गच्छामि ।

ये च बुद्धा अतीता च, ये च बुद्धा अनागता।
पच्चुपन्ना च ये बुद्धा, अहं वन्दामि सब्बदा। ||१||

नत्थि मे सरणं अञ्ञं, बुद्धो मे सरणं वरं।
एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंङ्गलं ।||२||

उत्तमग्गेन वंदे हं पादपंसु वरुत्तमं।
बुद्धे यो खलितो दोसो, बुद्धो खमतु तं ममं।||३||
य किन्ची रतनलोके विज्ज्ती विविधं पुथु |
रतन बुद्धसमं नात्थ्इ, तस्मा सोत्थी भवतुमे ||४||

यो सन्निसिन्नो वरबोधि मुले, मारं ससेनं महंति विजेत्वा
सम्बोधिमागच्चि अनंतञान, लोकत्तमो तं प नमामी बुद्ध||४||


अर्थ

अर्हंत (जीवनमुक्ति) , सम्यक (संपुर्ण), सम्बुद्ध (जागृत), विद्या व आचरण यांनी युक्त, सुगति ज्याने प्राप्त केलेली आहे. असा लोकांना जाणणारा, सर्वश्रेष्ठ, दमनशील पुरुषांचा सारथि व आधार देणारे, देव मनुष्य व यांचा गुरु असा हा भगवान बुद्ध आहे.
अशा या बुद्ध भगवंताचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करित आहे ।।१।।
मागे जे बुद्ध होऊन गेलेत पुढे जे बुद्ध होतील व हल्ली जे बुद्ध आहेत त्या सर्वांनाच मी सदैव वंदन करतो ।।२।।
मला दुसऱ्‍या कोणाचाही आधार नाही, केवळ बुद्ध माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे. ह्या सत्य उच्चाराने माझे जयमंगल होवो ।।३।।
बुद्धाच्या पवित्र चरणधुळीला मस्तक वाकवून मी वंदन करतो. बुद्धाच्या संबंधी माझ्या हातून काही दोष घडला असला तर तो बुद्ध भगवान मला क्षमा करो ।।४।।
ह्या लोकी निरनिराळ्या प्रकारची जी अनेक रत्ने आहेत त्यापैकी कशानेही बुद्धाची बरोबरी होणार नाही. त्या (बुद्ध) रत्नाने माझे कल्याण होवो. (ज्ञान प्राप्त झालेल्या) ज्याने पुज्य बोधिवृक्षाखाली बसून मार (कामदेव) ह्याच्या अफाट सेनेसह पराभव केला. अनंत ज्ञान प्राप्त करुन ज्याने बुद्धत्वप्राप्त करुन घेतले. जो सर्व जगात श्रेष्ठ आहे. अशा बुद्धाला मी नमस्कार करतो ।।५।।

२. धम्म वंदनासंपादन करा

स्वाक्खातो भगवता धम्मो सन्दिट्ठिको अकालिको,
एहिपस्सिको ओपनाय्यिको पच्चतं वेदित्ब्बो विञ्ञुही’ति।
धम्मं जीवित परियन्तं सरणं गच्छामि।
ये च धम्मा अतीता च, ये च धम्मा अनागता।
पच्चुपन्ना च ये धम्मा, अहं वन्दामि सब्बदा।
नत्थि मे सरणं अञ्ञं धम्मो मे सरणं वरं।
एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं।
उत्तमङ्गेन वन्देहं, धम्मञ्च दुविधं वरं।
धम्मे यो खलितो दोसो, धम्मो खमतु तं ममं।


अर्थ

भगवंताने ज्या धम्माचा सुंदर उपदेश केला, ज्याचे सत्यत्व येथेच डोळ्यासमोर पाहता येते, जो धर्म आपले फळ ताबडतोप देतो, कोणीही ज्याचा अनुभव घ्यावा, जो निर्वाणाकडे घेऊन जातो हा सिद्धांत विज्ञानाच्या द्वारे स्वतः अनुभवून पहाता येतो, अशा या धम्माचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करीत आहे. ।।१।।
जो भूतकाळातील बुद्धां द्वारे उपदेशिला धम्म आहे जो भविष्यकाळात बुद्धा द्वारे उपदेशिला धम्म असेल, तसेच वर्तमान काळात बुद्धाद्वारे उपदेशिला धम्म आहे, त्या सर्व धम्माला मी सदैव वंदन करीतो. ।।२।।
मी दुसऱ्‍या कोणाला शरण जाणार नाही. दुसऱ्‍या कोणाचा मी आधार घेणार नाही. बुद्ध धम्मच माझा एकमेव आधार आहे. ह्या सत्य उच्चाराने माझे जयमंगल होवो. ।।३।।
सर्व दृष्टीने श्रेष्ठ असलेल्या ह्या बुद्ध धम्माला मी मस्तक नम्र करुन वन्दन करतो, धम्मा संबंधी माझ्या कडून काही दोष घडला असेल तर धम्म त्या बद्दल मला क्षमा करो ।।४।।
ह्या लोकी जी निरनिराळी अनेक रत्न आहेत, एकानेही बुद्धाच्या धम्माची बरोबरी केली नाही, ह्यामुळे माझे कल्याण होवो ।।५।।
हा जो लोकांसाठी उपयुक्त, श्रेष्ठ अष्टांगिक मार्ग आहे, हा जो निर्वाण प्राप्तिसाठी सरळ मार्ग आहे जो सर्वश्रेष्ठ शान्तीदायक सधम्म आहे, मी त्या धम्माला वंदन करतो ।।६।।

३.संघ वंदनासंपादन करा

सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो, उजुपतिपन्नो भगवतो सावकसंघो,
ञायपटिपन्नो भगवतो सावकसंघो, सामीचपटिपन्नो भगवतो सावकसंघो।
यदिदं चत्तारि पुरिसयुगानी, अठ्ठपुरिसपुग्गला
एस भगवतो सावकसंघो, आहुनेय्यो, पाहुनेय्यो,
दक्खिनेय्यो, अञ्जलिकरणीयो, अनुत्तरं पुञ्ञक्खेतं लोकस्सा’ति॥
संघं जीवित परियन्तं सरणं गच्छामि।
ये च संघा अतीता च, ये संघा अनागता।
पच्चुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सब्बदा।
नत्थि मे सरणं अञ्ञं, संघो मे सरणं वरं।
एतेन सच्चवज्जेन, होतु मे जयमङगलं॥
उत्तमङ्गेन, वन्देहं, संघ ञ्च तिविधुत्तमं।
संघे यो खलितो दोसो, संघो खमतु तं ममं॥


अर्थ

भगवन्ताचा शिष्यसंघ अशा नर रत्नांचा आहे की ज्याने चार जोड्या अशा आठ सप्तपदाची प्राप्ती करुन घेतली आहे, हा संघ निमंत्रण देण्यास योग्य, स्वागत करण्यास योग्य, दक्षिणा देण्यास पात्र, तसेच जगात सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र आहे. असा हा संघ नमस्कार करण्यास योग्य आहे. मी जन्मभर असा संघाचे अनुकरण करीत आहे. ।।१।।
असा जो भूतकाळातील, भविष्य काळातील व हल्लीही असलेला भगवान बुद्धाचा श्रावक संघ आहे. त्या सर्वांना मी सदैव वंदन करतो ।।२।।
मला दुसऱ्‍या कशाचाही आधार नाही. बुद्धाचा शिष्य संघच माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे, ह्या सत्वचनाने माझे जयमंगल होवो ।।३।।
तिन्ही प्रकारानी श्रेष्ठ असलेल्या ह्या संघाला मी मस्तक वाकवून प्रणाम करतो. संघ संबंधी जर माझ्याकडून काही दोष घडला असेल तर संघ त्याबद्दल क्षमा करो. ।।४।।
ह्या लोकी जी निरनिराळी अनेक रत्ने आहेत यापैकी एकाच्यानेही संघाची बरोबरी होणार नाही. याच्यामुळे माझे कल्याण होवो. ।।५।।
संघ विशुद्ध, श्रेष्ठ, दक्षिणा देण्यास योग्य, शांत इन्द्रियांचा, सर्व प्रकारच्या अलिप्त, अनेक गुणांनी युक्त तसाच निष्पाप आहे. ह्या संघाला मी प्रणाम करतो.



विकिपीडिया
चार आर्यसत्यांची शिकवण देतांना तथागत बुद्ध.

चार आर्यसत्य हा बौद्ध धम्माचा पाया होय. साधारणतः २५७५ वर्षापूर्वी बनारस जवळील सारनाथ (ईशान्य भारत) येथे बुद्धांनी पहिला धम्मसंदेश आपल्या पाच शिष्यास दिला होता. व त्यावेळी चार आर्यसत्य सांगितली होती —

  1. जगात दुःख आहे.
  2. त्या दुःखाला कारण आहे.
  3. हे कारण म्हणजे तृष्णा (वासना) होय.
  4. वासना नियंत्रित करणे हा दुःख निवारण्याचा उपाय / मार्ग आहे.

पहिले आर्यसत्य – दुःखसंपादन करा

दुःख तथा विफलता दैनंदिन जीवनातील प्रश्नांशी निगडीत आहे. जन्म, वृद्धत्व, आजार, मृत्यू, क्लेष आणि सर्वप्रकारचे वैफल्य म्हणजे दुःख होय. अनावश्यक वस्तूची प्राप्ती तथा आवश्यक वस्तूची अप्राप्ती म्हणजे दुःख होय.

दुसरे आर्यसत्य – दुःखाचे मूळसंपादन करा

बुद्धांनी दुःखाच्या उगमस्थीनाविषयी सांगितले आहे की, प्रत्येक दुःखाच्या मूळाशी उत्कट इच्छा असते. त्याचा परिनाम म्हणजे अज्ञान व भ्रांती होय. उत्कट इच्छा आनंद प्राप्तीकरिता, अस्तित्वाकरिता किंवा आत्मनाशाकरिता असू शकते.

आपली तीव्र इच्छा (तृष्णा, वासना, आवड, पसंती) हिच दुःखाचे मूळ कारण होय. उदा. महेशला मोटारकार हवी आहे. तो त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो. १५, १६ तास अविशांत काम करतो, पैसा मिळवतो. अतिरिक्त श्रम केल्याने तो आजारी पडतो. त्याला दुःख होते. यावरून तीव्र इच्छा ही मूळ दुःखाचे कारण आहे. सामान्य माणसाने आहे त्यात आनंद मानून जीवन प्रवाह चालू ठेवावा. म्हणजे गरीबच राहावे असे नाही तर मध्यम मार्गाचा अवलंब करून संयमाने आपल्या उन्नती वा प्रगतीसाठी प्रयत्न करावे.

तिसरे आर्यसत्य – दुःख निरोधसंपादन करा

बौद्ध धम्माचा मूळ उद्देश आहे तो दुःख निरोध वा दुःख निवारण. लोभ, द्वेष व भ्रम यांचा नाश करणे हा मूळ हेतू आहे. जेव्हा तृष्णा तथा उत्कट इच्छेची जागा निर्वाण घेईल त्यावेळी शाश्वत आनंत प्राप्त होतो. लोभ, द्वेष व भ्रम यांना क्षीण करण्यासाठी मनुष्याने धम्म जाणला पाहिजे व तो आचारणात आणला पाहिजे. अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्यास तृष्णा क्षीण होते व मनुष्यात दुःखापासून मूक्ती मिळते.

चौर्थ आर्यसत्य – दुःख निरोधाचा मार्गसंपादन करा

बुद्ध धम्म जीवनाचा मार्ग दर्शवतो. धम्म म्हणजे नीति होय. नीतिचा विकास म्हणजे दुःख निरोध होय. नीति आचरणात आणल्यास मनुष्य निश्चित उद्धिस्टापर्यंत पोहचू शकतो. त्यालाच धम्म शिकवणूकीप्रमाणे अष्टांगिक मार्ग म्हणतात. अष्टांगिक मार्ग म्हणजे आठ घटकांचा मार्ग आहे. यास मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. तो पुढिलप्रमाणे —

  1. सम्यक दृष्टी
  2. सम्यक संकल्प
  3. सम्यक वाणी
  4. सम्यक कर्मात
  5. सम्यक उपजीविका
  6. सम्यक व्यायाम
  7. सम्यक स्मृती
  8. सम्यक समाधी

जीवनाचा विजयसंपादन करा

बौद्ध धर्म असे सांगतो की, कोणत्याही प्रश्नाची उकल शीलाचे पालन आवश्यक आहे. आत्मसंयम (नीति), समाधी (मनसंयम) व प्रज्ञा (ज्ञानवंत) आवश्यक आहेत. म्हणून प्रज्ञा, शील, समाधी ह्या तीन बाबींना धम्मात महत्त्वाचे स्थान आहे. ह्या तीन बाबींवर अष्टांगिक मार्ग आधारित आहे.

काम तृष्णा, भव तृष्णा व विभव तृष्णा ह्या दुःखाच्या मुळाशी असतात. याविषयीची जाणीव ठेवून तृष्णेवर प्रभुत्व मिळवणे म्हणजे जीवनाचा सर्वात मोठा विजय आहे.



विकिपीडिया

मध्यम मार्ग किंवा मध्य मार्ग (पालीमज्झीमापतिपदासंस्कृतमध्यमाप्रतिपदा) ही एक बौद्ध धम्मातील संज्ञा आहे. गौतम बुद्धांनी अष्टांगिक मार्गाचे वैशिष्ट्य वर्णन करण्यासाठी या संज्ञेचा वापर केला. ज्याद्वारे निर्वाण पदाला माणूस पोहचतो.

थेरवाद बौद्ध आणि पाली सिद्धांतसंपादन करा

धम्मचक्कप्पवत्तन सुत्तसंपादन करा

थेरवादी बौद्ध धम्मातील पाली साहित्यातील धम्मचक्कप्पवत्तन सुत्तात (धम्मचक्रचक्र प्रवर्तन सूत्र) मध्यम मार्ग संज्ञेचा वापर करण्यात आलेला आहे. बौद्ध परंपरेनुसार ज्ञान प्राप्ती नंतर दिलेल्या प्रवचनात याचा समावेश होतो.[a]बौद्ध सुत्तात, बुद्धाने अष्टांगिक मार्ग संवेदना आणि संवेदनहीनता आणि आत्म-उन्नती यांच्यासाठी मध्यम मार्ग उपकारक आहे, असे सांगितले आहे.[१]

तथागत बुद्धांच्या मते, जीवन व प्रसंगातील चढाओढांपासून दूर राहण्यासाठी मध्यम मार्ग परिपूर्ण स्त्रोत आहे. जो दृष्टी, ज्ञान, आणि शांती प्रदान करतो आणि तो मार्ग निब्बाणाकडे जातो. तथागतांच्या मते मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग होय.

अष्टांगिक मार्ग खालिलप्रमाणे आहेत
  1. सम्यक् दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.
  2. सम्यक् संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.
  3. सम्यक् वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.
  4. सम्यक् कर्मान्त :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
  5. सम्यक् आजीविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
  6. सम्यक् व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.
  7. सम्यक् स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.
  8. सम्यक् समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.

याचे आचरण म्हणजेच मध्यम मार्ग आचरण होय.[२]

अवलंबित उत्पत्तिसंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; DS नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ Piyadassi (1999).



चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.



विकिपीडिया

प्रतीत्यसमुत्पाद

'== 1]प्रतित्य समुत्पाद  ==

विविध भाषेत नाव
प्रतीत्यसमुत्पाद
इंग्रजीdependent origination,
dependent arising,
interdependent co-arising,
conditioned arising,
etc.
पालीपटिच्चसमुप्पाद
संस्कृतप्रतीत्यसमुत्पाद
बंगालीপ্রতীত্যসমুৎপাদ
बर्मीसाचा:My
चीनी緣起 
(pinyinyuánqǐ)
जपानी縁起 
(rōmajiengi)
सिंहलाපටිච්චසමුප්පාද
तिबेटीརྟེན་ཅིང་འབྲེ
ལ་བར་འབྱུང་བ་
 
(Wylie: rten cing 'brel bar
'byung ba
THL: ten-ching drelwar
jungwa
)
थाईปฏิจจสมุปบาท

बौद्ध धर्म

DharmaWheelGIF.gif

प्रतित्य समुत्पाद प्रतित्य म्हणजे निर्माण होवुन नष्ट होणे तर,समुत्पाद म्हणजे निर्माण होवुन नष्ट होणारी क्रिया पुन्हा,पुन्हा होणे म्हणजेच पुनरूपी जनम,पुनरूपी मरण होय.कार्यकारण भाव म्हणजेच कोणतीही गोष्ट कारणांशीवाय घडत नाही तो सांगणारा सिद्धांत म्हणजेच प्रतित्यसमुत्पाद सिद्धांत होय.

2]बुध्द धम्मातील प्रतित्य समुत्पाद सिद्धांतसंपादन करा

बुध्द धम्मातील प्रतित्य समुत्पाद सिद्धांत

प्रतित्य म्हणजे निर्माण होवुन नष्ट होणे तर,समुत्पाद म्हणजे निर्माण होवुन नष्ट होणारी क्रिया पुन्हा,पुन्हा होणे म्हणजेच पुनरूपी जनम,पुनरूपी मरण होय.कार्यकारण भाव म्हणजेच कोणतीही गोष्ट कारणांशीवाय घडत नाही तो सांगणारा सिद्धांत म्हणजेच प्रतित्यसमुत्पाद सिद्धांत होय.जन्माला येणे हे जरी आपल्या हातात नसले तरी मानव जन्मात तथागतांच्या धम्माला न जाणताच,न आचरताच मरणे या सारखे अभागी दुसरे कोणी नसुन जे मुकले तेच होय.ज्यांनी,ज्यांनी तथागतांचा धम्म अभ्यासला जाणला अन त्यानुसार आचरण केले ते प्रतित्य समुत्पाद सिद्धांतानुसार दुःख मुक्तीच्या !!!अत्त दिप भव !!! च्या अशोक चक्रातील चोवीस आऱ्या असलेल्या भवचक्रातील 24आऱ्य तील खालच्या अंधारातील, अधोगतीच्या 12 आऱ्यात नसुन ते अंधारातुन प्रकाशाकडील भवचक्रातील वरच्या,प्रगतीच्या12 आऱ्यात आहेत. तेव्हा अनित्य काय आहे ? शुन्यवाद म्हणजे काय ?अनात्मवाद म्हणजे काय ? पुनर्जन्म आहे काय ? असल्यास कशाचा ? धम्मचक्र,अशोक चक्र, भवचक्र,संसारचक्र काय आहे ?24 आऱ्या किंवा कडा काय आहेत ? त्याचा मानवाशी काय सबंध आहे ? ते कसे फिरते ? यातुन बाहेर कसे पडायचे ? या सर्व प्प्रश्नांची उकल आपण या लेखातुन जाणुन घेऊ.

                           तत्पुर्वी काल मला धर्म अन धम्म यातील मुलभुत फरक समजत नसल्याने धम्माला जाणत नव्हतो परंतु आज मी धम्माला जाणेन धम्म म्हणजेच मानवाला पुजा,अर्चा,यज्ञयापन पुजाविधी करण्यापेक्षा मानवाच्या नैसर्गिक प्रवृत्तीला सुसंस्कृत वळण लावण्याचे काम करते तर एखादयाला उचित तत्व सापडल्यास त्यापासुन विचलीत न होण्याचे सांगते.त्याधम्मानुसार आचरण करेन त्याची सुरूवात बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञेपासुन आणि तथागतांनी दिलेल्या पंचशीलेपासुन करेन अशी प्रतिज्ञा करून आपण आपला जिवनमार्ग सुधारू शकतो याची प्रचीती तुम्हाला आल्यावाचुन राहणार नाही. पंचशीलेपासुन सुरूवात झाल्यावर  अष्टांग मार्गावर म्हणजेच सदाचाराच्या मार्गावर आरूढ होवुन दस पारमीता,जिवनाच्या दहा अवस्था तसेच कम्म सिद्धांत आणि प्रतित्य समुत्पाद सिद्धांत जाणुन !!! अत्त दिप भव !!! प्रमाणे स्वतः उजाळुन दुस-यासही उजाळुन काढील असा सम्यक संकल्प केल्यास जग हे धम्मराज्य होवुन धम्म हा सध्दम्मस्वरूप होण्यास फारसा वेळ लागणार नाही आणि प्रबुध्द हो मानवा असेही म्हणण्याची वेळ कोणावर येणार नाही.

         तथागतांचा धम्म हा एक वैज्ञानीक शोध आहे तो दुःख मुक्तीचा मार्ग आहे तर ‘अत्त दिप भव’ प्रमाणे उजाळावयाचे आहे.

3]अनित्यसंपादन करा

अनित्यतेच्या सिद्धांताला तिन पैलु आहेत.

3.1)अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तु अनित्य आहेतसंपादन करा

1)अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तु अनित्य आहेत.ः- सर्व वस्तु हया हेतु आणि प्रत्यय यामुळे उत्पन्न होतात त्यांचे स्वतंत्र असे अस्तित्व नसते.हेतु प्रत्ययाचा उच्छेद झाला की,वस्तुचे अस्तित्व उरत नाही.जसे सजीव प्राण्यांचे षरीर पृथ्वी,आप,तेज,आणि वायु या चार महाभुतांचा परिणाम आणि जर या चार महाभुतांचे पृथक्करण झाले तर हा प्राणी, प्राणी म्हणुन उरत नाही.

3.2) व्यक्तीगत रूपाने प्राणी अनित्य आहे.संपादन करा

2) व्यक्तीगत रूपाने प्राणी अनित्य आहे.ः- सजीव प्राण्याच्या अनित्यतेचे वर्णन ‘तो नाही,तो होत आहे’या शब्दात करता येईल.मनुष्यप्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे.आपल्या जीवनाच्या कोणत्याही दोन क्षणी तो असु शकत नाही.

3.3)प्रतित्य समुत्पन्न वस्तुचे आत्मतत्व अनित्य आहेसंपादन करा

3)प्रतित्य समुत्पन्न वस्तुचे आत्मतत्व अनित्य आहे.ः- प्रत्येक सजीव प्राणी जीवंत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे. शुन्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे या ऐहीक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालु आहे.शुन्य हा एक बिंदु समान पदार्थ असुन त्याला आषय आहे परंतु त्याला लांबी रूंदी नाही.शुन्यतेमुळेच सर्व अस्तित्व शक्य होते.जर मनुष्यप्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील झाला नसता तर मानवजातीची प्रगतीच खुंटलीअसती.

 

3.4]अनात्मवादसंपादन करा

बुध्द धम्म आत्मा मानीत नसल्यानेच अनात्मवाद हा प्रत्यय उदयास आला. बुध्द आत्म्याचा पुनर्जन्म मानित नसुन पृथ्वी,आप,तेज,वायु याशरीर घटकांचे पुनर्जन्म मानतात.

                                     

4]24 कडा असलेली वर्तुळाकार प्रक्रियासंपादन करा

मानवी जिवनाला ना सुरूवात आहे ना अंत आहे.ती एक वर्तुळाकार प्रक्रिया आहे.ते वेगाने घडयाळया प्रमाणे फिरते या फिरणा-या चक्रालाच जिवनचक्र,संसार चक्र,भवचक्र,अशोकचक्र असे संबोधले जाते. या अशोकचक्राला एकुण 24 आऱ्या,कडया आहेत. वर्तुळाला जसा व्यास असतो अगदी असाच यालाही एक व्यास आहे या व्यासाच्या पासुन घडयाळयाच्या दिषेने खालुन वर वेगाने  जाणाऱ्या कडीलाच जिवनचक्र असेही म्हणतात.व्यासाच्या खालच्या 12 कडया या अविदये पासुन सुरू होवुन दुःखा जवळ संपतात.हया अंधारातल्या तर व्यासाच्या वरील प्रकाशातल्या 12 कडयांची दुःखा पासुन सुरूवात होवुन निर्वाणा जवळ संपतात.अंधारातही दुःख आहे अन प्रकाशातही दुःख आहे.कारण दुःखाच्या दोन अवस्था आहेत ते ही आपण पाहु. अंधारातील या खालील 12 कडयांपैकी अविदया ,संस्कार या दोन कडया हया भुतकाळात तर विज्ञान,नामरूप, षडायतन, स्पर्ष,वेदना,तृष्णा हया सहा कडया वर्तमानकाळात असतात आणि उपादान,(ग्रहण)भव,जाति (जन्म),दुःख (जरा मरण) हया चार कडया भविष्यकाळातल्या होत.सर्वात प्रथम आपण या 24 कडयातील खालच्या दिशेने म्हणजेच अंधारातल्या,अधोगतीतल्या 12 कडया काय आहेत त्यांना काय म्हणतात ते पाहु या वर्तुळातील घडयाळयाच्या दिशेने व्यासापासुन जी सुरूवात होते ती पहिली कडी अविदया होय.

*4.1) अविदया:-संपादन करा

अविदया:-' तथागतांनी अविदये बाबत अडिच हजार वर्षापुर्वीच सांगीतले.तदनंतर 1848 साली क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले यांनी अविदयेचे म्हणजेच अज्ञाणाचे महत्व विषद करताना म्हटले ‘‘विदये विना मती गेली,मती विना निती गेली,निती विना गती गेली,गती विना वित्त गेले,वित्त विना शुद्र खचले एवढे सारे अनर्थ एका अविदयेने केले.अविदयेमुळे माणुस आंधळा होतो अज्ञाण हेच त्याच्या नाशाला कारणीभुत ठरते.त्याला चांगले वाईट हेच समजत नाही.आपण श्रेष्ठ आहोत ‘मी’ पणा येतो.वेगवेगळया आसक्ती,लोभ,लालसा,प्रेम यातच तो गुरफटला जातो.सर्व नित्य आहे,जग हे सुखमय आहे,आत्मा आहे अशा भ्रामक कल्पनांवरच तो जगत असतो.अशा प्रकारे अविदयेतुन नविन कर्म त्याच्याकडुन होतात अन त्याच कर्माचा परिणाम नविन कारणांना जन्म देतात.त्यास वास्तवतेतील खरे अस्तित्वाचे दर्शन झालेले नसते तो आंधळाच असतो.

*4.2) संस्कार:-'संपादन करा

संस्कार:- अविदयेतुन संस्काराची निर्मिती होते.संस्कार म्हणजे मनाची ठेवण,मनावर होणारे परिणाम हे दोन प्रकारचे आहेत.

4.2.1)चांगले संस्कार:-संपादन करा

1)चांगले संस्कार:- दुसऱ्याला मदत करणे,लोभाचा त्याग करणे,आईवडीलांची सेवा करणे, उपकाराची जाण ठेवणे आदी.

4.2.2) वाईट संस्कार:-संपादन करा

2) वाईट संस्कार:- चांगल्या संस्काराच्या विरूध्द वाईट संस्कार होय. व्देष, मत्सर करणे,लोभी असणे,वाईट चिंतणे उपकाराची जाण न ठेवणे आदी,

*4.3] विज्ञान:-संपादन करा

विज्ञान:-' संस्काराच्या कडीतुन विज्ञानाची कडी निर्माण होते.संस्काराच्या आधारे आपल्या मनावर झालेले परिणाम त्यामुळे झालेली मनोवृत्ती म्हणजेच विज्ञान होय.जस जसे आपल्यावर बाहय जगाचा सबंध येतो अन आपले पुर्वसंस्कार चुकीचे आहेत असे समजुन आपण त्यांना त्यागतो ते त्यागल्यास नविन विज्ञान मनोवृत्ती होते. म्हणजेच विज्ञान स्थिर नसते ते सतत बदलत असते.विज्ञानाचेही सहा प्रकार आहेत.

4.3.1)चक्षु विज्ञान:संपादन करा

1)चक्षु विज्ञान:- डोळयाने पाहुन मिळविलेले ज्ञान चक्षु विज्ञान

4.3.2) श्रोत विज्ञान:-संपादन करा

2) श्रोत विज्ञान:- कानाने ऐकुन मिळविलेले ज्ञान हे श्रोत विज्ञान

4.3.3)घ्राण विज्ञान:-संपादन करा

3)घ्राण विज्ञान:- नाकाने वास घेऊन मिळविलेले ज्ञान हे घ्राण विज्ञान

4.3.4)जिव्हा विज्ञान:-संपादन करा

4)जिव्हा विज्ञान:- जिभेच्या चवीच्या सहाय्याने मिळविलेले ज्ञान हे जिव्हा विज्ञान होय.

4.3.5)स्पर्श विज्ञान:-संपादन करा

5)स्पर्श विज्ञान:- त्वचेला स्पर्शकरून मिळविलेले ज्ञान हे स्पर्शविज्ञान

4.3.6) मनोविज्ञान:-संपादन करा

'6) मनोविज्ञान:- मनावर होणारे संस्कार व त्या संस्कारामुळे मिळालेले ज्ञान म्हणजेच मनपटलावर उमटलेले परिणाम यालाच मनोविज्ञान म्हणतात.

*4.4) नामरूप:-संपादन करा

                    

नामरूप:-विज्ञान कडी पासुन नामरूप निर्माण होते.नामरूपाशिवाय स्वतंत्र अस्तित्व नाही.मानवाच्या संपुर्ण अस्तित्वाचेच कारण विज्ञान आहे.तेच नामरूप पंचस्कंधामध्ये विभागले गेले  आहे
                '.ते खालील प्रमाणे 

4.4.1) रूपसंपादन करा

1)रूप:- रूप स्कंधामध्ये चार घटक आहेत पृथ्वी,आप,तेज,वायु या चार घटकांनी मिळुन शरीर बनते.म्हणजेच मानवरूप होय.

4.4.1.1)पृथ्वी,संपादन करा

4.4.1.2) आपसंपादन करा

4.4.1.3) तेजसंपादन करा

4.4.1.4) वायुसंपादन करा

4.4.2) वेदनासंपादन करा

2)वेदना:- या तिन प्रकारच्या आहेत

4.4.2.1) सुखकारकसंपादन करा

4.4.2.2) दुःखकारकसंपादन करा

4.4.2.3) उपेक्षा वेदना ना सुखकारक,ना दुःखकारकसंपादन करा

4.4.3)संज्ञा:-संपादन करा

3)संज्ञा:- घर,झाड, गाव,स्त्री,पुरूष आदी नाव देण्याच्या क्रियेलाच संज्ञा म्हणतात.

4.4.4)संस्कार:संपादन करा

4)संस्कार:- मनावर होणारे संस्कार

4.4.5)विज्ञान:-संपादन करा

5)विज्ञान:- विज्ञान म्हणजेच जाणीव,चेतना.

*4.5) षडायतन:-संपादन करा

' षडायतन:-षडायतन म्हणजेच सहा इंद्रिये,सहा अडथळे यालाच आयतन असेही म्हणतात आयतन म्हणजे व्दार नामरूपातुन याची निर्मिती होते.यामध्ये कान ऐकणे,नाक वास,गंध घेणे,डोळे पहाणे,जिभ चव घेणे,त्वचा स्पर्ष व मन हे मानसीक इंद्रिय आहे.बाहय गोष्टी या इंद्रियामधुन प्रवेश करतात.आपण जागृतपणे त्यांचे निरिक्षण केले व त्या बाहय गोष्टींचा आपल्यावर परिणाम होवु दिला नाही तर या ठिकाणी भवचक्र थांबते व पुढे होणारा अनर्थ टळतो.शक्यतो आनंदाने हुरळुन जाऊ नये,दुःखाने खच्चुन जाऊ नये दुःखा नंतर सुख व सुखा नंतर दुःख हे चालुच असते.तेव्हा समतेत राहिल्यास या बाहय गोष्टींचा प्रवेश होणार नाही आणि भवचक्रातही अडकणार नाही.

4.5.1] कान ऐकणे,संपादन करा

4.5.2] नाक वास,गंध घेणेसंपादन करा

4.5.3] डोळे पहाणेसंपादन करा

4.5.4] जिभ चव घेणेसंपादन करा

4.5.5] त्वचा स्पर्शाची जाणीव होणेसंपादन करा

4.5.6] मन हे मानसीक इंद्रिय आहेसंपादन करा

*4.6) स्पर्श :-संपादन करा

स्पर्श :बाहय जगाचा सहा इंद्रियांशी येणारा सबंध म्हणजेच स्पर्शहोय.स्पर्शदेखील सहा प्रकारचे आहेत चक्षुस्पर्श,श्रोतस्पर्श,घ्राणस्पर्श,जिव्हास्पर्श,कायास्पर्श आणि मनस्पर्श होय.वाईट प्रवृत्ती रोखणे हे महत्वाचे आहे.

*4.7) वेदना:-संपादन करा

वेदना:-सहा इंद्रियांव्दारे बाहय जगाचा संपर्क आल्यास वेदना होतात.यालाच संवेदना असेही म्हणतात.सुख दुःखाचा प्रत्यक्ष अनुभव करणे म्हणजेच त्या एकप्रकारच्या संवेदनाच होय.या तिन प्रकारच्या आहेत 1)सुखद वेदना,2)दुःखद वेदना आणि 3) ना सुखकारक,ना दुःखकारक वेदना (उपेक्षा वेदना)या 3 प्रकारच्या वेदना 6 इंद्रियाच्या संपर्काने 3 Х 6 = 18 होतात तर या 18 तिन काळात (भुतकाळ,वर्तमानकाळ आणि भविश्यकाळात) मिळुन 18 Х 3 =  54 होतात तर कुशल ऊर्ध्वगती आणी अकुशल अधोगामी या दोहोत 54 Х 2 = 108 प्रकारच्या वेदना होतात.या 108 प्रकारच्या वेदनांपासुन मुक्ती मिळविण्यासाठी सावध चित्ताने,मनाने समतेत राहुन आचरण केल्यास भवचक्रात अडकणार नाही.

*4.8) तृष्णा:-संपादन करा

तृष्णा:- यालाच सुखोपभोगाची तिव्र इच्छा असेही म्हणतात.सर्व दुःखाचे मुळ कारण तृष्णा आहे.तृष्णेमुळेच माणसात निरनिराळया रूपांची हाव निर्माण होते.तृष्णाच मानवाला पैसा पत,प्रतिश्ठा,सामर्थ्य तसेच कोणतेही नैतीक,अनैतीक गोष्टी करण्यास प्रवृत्त करते.जसे विस्तवात तुप ओतावे अगदी त्या प्रमाणे माणुस त्यात पोळला जातो.तृष्णा तिन प्रकारच्या आहेत. 1)काम तृष्णा  2)भव तृष्णा 3)विभव तृष्णा  असे तिन प्रकार असुन षडायतन म्हणजेच सहा इंद्रिये तेव्हा 3 Х 6 = 18 झाल्या. तिन्ही भुत,वर्तमान व भविष्यकाळात धरून त्या 18 Х 3 = 54 झाल्या परंतु त्या अध्यात्मीक काळात व लौकीक काळातही असल्याने या दोन्हींच्या मिळुन 54 Х 2 = 108 झाल्या.वेदना आणि तृष्णा यांचा एकमेकांशी घनिष्ठ सबंध आहे.तृष्णा ही आग असुन जागृत राहुन तृष्णा त्याग करावयाचा आहे तसे केल्याने तो पुन्हा पुन्हा भवचक्रात अडकणार नाही.

*4.9) उपादान:-'संपादन करा

उपादान:- तृष्णेच्या तृप्तीसाठी जी क्रिया करतो त्याला उपादान असे संबोधतात.ते चार प्रकारचे आहेत.1)काम 2) मिथ्या दृश्टी 3) शीलव्रत  4)आलवाद  तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते आणि तृष्णेच्या स्वरूपाप्रमाणे आपण बाहय वस्तु बाबत आसक्त होतो.त्यातुनच संघर्ष होतो आणि आपण भवचक्रात अडकतो.आपण काही भ्रामक कल्पना, चुकीचे दृश्टीकोन,स्वबदलाच्या कल्पना,इंद्रिय सुखोपयोग,अनिष्ट सवयींच्या मागे लागतो.त्यातुनच भवाची निर्मिती होते.यापासुन दुर राहिल्यास भव निर्माण होणार नाही आणि भवचक्रातही अडकणार नाही.

*4.10) भव:-संपादन करा

भव:- यालाच नविन निर्मितीची प्रक्रिया असेही म्हणतात.ही उपादानातुनच पुढची कडी म्हणुन निर्माण होते.या सर्व कडया एकमेकांपासुनच निर्माण होत आहेत तेव्हा कोणती कडी तोडुन आपण वरच्या म्हणजे प्रकाशाच्या कडयात जायचे ते आपण आपल्या आचरणानेच ठरवु शकतो.भवाचे तिन प्रकार आहेत 1)काम अथवा कर्मभव 2)रूपभव 3)अरूप भव होय.जगातील प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे.पण त्याच बरोबर हे ही खरे की जगातील काहीच नष्ट होत नसते फक्त त्याचे स्वरूप बदलते.जसे घन पदार्थाचे द्रव पदार्थात द्रवाचे बाष्पात रूपांतर होते.जरी हे बदल होत असले तरी पदार्थाचे संख्यात्मक घटक नष्ट होत नाहीत त्यांच्यात बदल होत असतो.मनुष्य मेल्यावर त्याच्यावर अग्नी संस्कार किंवा दहन असे संस्कार केल्याने त्याच्या शरीरातील घटक नष्ट होत नाहीत.त्यांच्यात बदल होत असतो.मनुष्य हा पंच स्कंधाने बनलेला आहे ते म्हणजेच रूप,वेदना,संज्ञा,संस्कार आणि विज्ञान हे होय.रूप,शरीर हे हे अग्नीसंस्काराने बाष्प किंवा भस्म यात रूपांतरीत होते.लहाण मुलगा वाढत जाऊन मोठा होवुन वृध्द झाला म्हणुन लहाण मुलगा आणि मोठा माणुस एक नाही.असे म्हणताच येणार नाही.म्हणुन भ.बुध्दांनी हा पण नाही अन तो पण नाही (न च सो न च त्र तिरप्या मुद्राक्षरातील मजकूरओ)असे म्हटलेले आहे.जगात काहीच स्थिर नाही.अनित्यतेच्या नियमाप्रमाणे प्रत्येक वस्तु परिवर्तनशील असल्याने ती नेहमी दुसरे काही तरी बनण्याच्या प्रक्रियेत असते यालाच भव असे म्हटले आहे.

*4.11) जाती:-संपादन करा

जाती:- भव निर्मितीच्या प्रक्रियेतुन जाती,जन्म ची निर्मिती होते.तृष्णेमुळे नविन जन्म अस्तित्वात येतो.जसे एखादया कुतीतुन निर्माण होणारे नविन अस्तित्व नव जन्म.तृष्णेमुळे जिवनात अनेक संघर्ष निर्माण होतात संघर्ष मिटत नाहीत तर त्याचे स्वरूप बदलते.हा संघर्ष चालु असतानाच नवा जन्माची घटना निर्माण होते.संघर्ष नष्ट झाला तर निर्वाण पदाची प्राप्ती होते.तेव्हा तृष्णा  त्याग म्हणजेच धम्म होय.आज भारताची लोकसंख्या याचे उत्तम उदाहरण देता येईल त्यासाठी तृष्णेवर मध्यम मार्गाने अंकुश लावुन लोकसंख्या मर्यादीत करा.ते आपल्या सर्वाच्याच अन पर्यायाने देशाच्या हिताचे आहे.

*4.12) दुःख:-संपादन करा

दुःख:- यालाच जरा मरण असेही संबोधतात.जरा म्हणजे म्हातारपण अन मरण म्हणजे मृत्यु होय.जन्म, मरण, रडणे,ओरडणे,ऱ्हास, असंतुष्टता, चिंता, त्रास, पिडा हे सर्व पुढे जन्माच्या साखळीतुनच पुढे निर्माण होत असतात. ज्या,ज्या वस्तुचा,जीवांचा जन्म झाला त्या पुढे जिर्ण होतात.उदा.त्वचा सुरकतणे,केस पांढरे होणे,जाणे, दात पडणे,इंद्रियांची शिथीलता या होण्याच्या क्रियेलाच जरा,म्हातारपण म्हणतात.तर,पंच स्कंधाच्या विस्कळीत पणाने मृत्यु येतो.म्हणजेच पंचस्कंधातील 1)रूप हे पृथ्वी,आप,तेज,वायु पासुन बनलेले आहे.2) वेदना 3) संज्ञा 4) संस्कार आणि 5) विज्ञान हे विस्कळीत होतात,नष्ट होवुन दुसऱ्यात परावर्तीत होतात.जगातील कोणतीही शक्ती कोणालाही विनाशापासुन वाचवु शकत नाही.प्रचंड ग्रह,तारे,सूर्यमंडळ,आकाशगंगा या देखील कोटयावधी वर्षानंतर नष्ट  होणार आहेत.तेव्हा मानवाने आपल्या प्रिय व्यक्तिच्या वियोगामुळे किंवा संयोगामुळे रडणे,शोक करणे,चिंता करणे,त्रास करणे,पिडा करणे म्हणजेच दुःख करणे टाळावे.त्यामुळे तो भवचक्रात अडकतो. या भवचक्रातुन मुक्त होण्यासाठी मानवाने स्वतःहुन प्रयत्न करणे गरजेचे आहे.

मानवाच्या जिवनात दोन प्रकारचे मार्ग आहेत.एक अधोगतीचा तर,दुसरा प्रगतीचा प्रकाशाचा या दुसऱ्या मार्गाने गेल्यास मानवाची प्रगती होते अन मानवास निर्वाण प्राप्त होते.आत्ता आपण प्रगतीचा मार्ग पाहु.

*4.13) दुःख:-संपादन करा

दुःख:- चक्राला गती मिळाल्याने अंधारातील आरा दुःखी होतो अन तो प्रकाशात येतो तेव्हा प्रकाशातील पहिला आरा हा दुःखाचा होय.

   

*4.14) श्रध्दा:-'संपादन करा

              

श्रध्दा:- श्रध्देमध्ये निष्ठा आहे,प्रेम आहे.प्रकाशातल्या पहिल्या दुःखाच्या आराला श्रध्देची साथ मिळाल्याने हा दुसरा श्रध्देचा आरा प्रगत होतो.अन तो प्रगत झाल्याने मोद,हर्ष,प्रमोद होतो. 

                     

*4.15) प्रमोद:-संपादन करा

प्रमोद:-दुःखाच्या आऱ्याला श्रध्देची साथ मिळाल्याने दुःख प्रगत होते अन याच श्रध्देतुन प्रमोद होतो.

*4.16) प्रिती:-संपादन करा

प्रिती:- प्रमोदातुन प्रिती प्राप्त होते.ती इच्छासहीत असते त्या प्रितीत प्रसन्ता असते.

*4.17)प्रष्नाब्धि:संपादन करा

 प्रष्नाब्धि:- प्रितीतुन प्रष्नाब्धि म्हणजेच पुर्ण विश्वास प्राप्त होतो.यापुर्ण विश्वासामुळे दुःख ते दुःख राहत नाही ते सुखाकडे जाते. 
                     

*4.18) सुख:-'संपादन करा

सुख:- पूर्ण विश्वासाने सुखाची प्राप्ती होत असल्याने ते सक्षम बनते त्या सुखातुन मन समाधीकडे जाते.हेसुख क्षणीक

                 नाही.त्या सुखातुन मन एकाग्र होते.मन एकाग्र होण्याने समाधी लागते.

*4.19)समाधी:-संपादन करा

' समाधी:- समाधी म्हणजेच मनाची एकाग्रता,सुखातुन चित्त एकाग्र होते.समाधी लागते

*4.20)यथाभुत ज्ञान दर्शन  (प्रज्ञा प्राप्त होणे):-संपादन करा

यथाभुत ज्ञान दर्शन  (प्रज्ञा प्राप्त होणे):- समाधी मधुनच यथाभुत ज्ञानदर्शनहोते,प्रज्ञा प्राप्त होते.

*4.21)उकताहट (अधिरता,लवकर):-संपादन करा

उकताहट (अधिरता,लवकर) :-' एकदा ज्ञान प्राप्त झाल्यावर ज्या अनित्याच्या बाबी आहेत त्या समजुन लवकरात लवकर कामवासनेचा त्याग करणे त्यातुनच परिवर्तन होते आणि विराग किंवा

                              रागहिन होता येते.  

                                       

*4.22)विराग (विरक्ती,परिवर्तन,रागहिन):-संपादन करा

विराग (विरक्ती,परिवर्तन,रागहिन):- उकताहटाने कामवासनेचा त्याग केल्याने विराग निर्माण होतो.विरक्ति येते,रागहिन होता येते.                  

                                                               

*4.23)विमुक्ती (बंधनातुन मुक्ती):-संपादन करा

विमुक्ती (बंधनातुन मुक्ती):-विरक्ति,रागहिन विरागाचे जीवन सुरू झाल्याने कार्यभार,नियम बंधनातुन बाहेर पडता येते त्याला मुक्ति मिळते.

*4.24)निर्वाण (तृष्णा नसलेले जीवन,संबोधी प्राप्त होणे):-संपादन करा

निर्वाण (तृष्णा नसलेले जीवन,संबोधी प्राप्त होणे):-विमुक्तीतून पुर्णतः मुक्ति मिळाल्याने संबोधी प्राप्त होते.तृष्णा नसलेले जीवन बनते.म्हणजेच निर्वाण प्राप्त होते.

                                                                                    तेव्हा या प्रतित्यसमुत्पाद सिद्धांताच्या आधारे मानवी जीवनाचे सोने करून घेण्याची हिच वेळ आहे असे समजुन आपल्याला लाभलेल्या या जीवनास !!!अत्त दिप भव !!! प्रमाणे उजाळु अन दुस-यासही उजाळुन काढु हाच सम्यक संकल्प करू त्यामुळे प्रज्ञा,शील,करूणा जतन व संवर्धन होवुन जग हे धम्मराज्य होवुन धम्माला सध्दधम्म स्वरूप प्राप्त होईल आणि कुशल कम्माने नैतीक व्यवस्था कुशल होवुन सारी मानवजात सुखी क्षेमी आनंदी होईल.

!!! नमो बुध्दाय !!! जयभिम !!!

                                                                                   

विकिपीडिया

बौद्ध धर्मानुसार धम्म (पाली: धम्म ; संस्कृत: धर्म) म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आणि त्या शिकवणीनुसार दु:खातून मुक्त होण्याचा मार्ग होय.[१] धम्म हे त्रिशरणांपैकी एक आहे. धम्म म्हणजे बुद्ध तत्त्वज्ञान किंवा बौद्ध तत्त्वज्ञान असून ते धर्म (Religion) याहून अधिक भिन्न शब्द आहे.

व्युत्पत्ती व भाषांनुसार नामभेदसंपादन करा

धम्म हा पाली भाषेतील शब्द धर्म या "योग्य व न्याय्य मार्ग" अश्या अर्थाच्या संस्कृत शब्दावरून आला आहे[२].

पूर्व आशियात धम्म या संज्ञेसाठी 法 हे चिन्ह वापरले जाते; ज्याचा मॅंडरिन भाषेत फाजपानी भाषेत हो व कोरियन भाषेत बेओप असा उच्चार होतो. तिबेटी भाषेत या संज्ञेसाठी चोस असा शब्द आहे. उय्गुरमंगोलियन व अन्य काही मध्य आशियाई भाषांमध्ये धम्म या संज्ञेस नोम हा शब्द असून, तो प्राचीन ग्रीक भाषेती नोमोस (ग्रीक: νόμος) या "कायदा" असा अर्थ असलेल्या शब्दावरून आला आहे.

चार आर्यसत्यसंपादन करा

मुख्य लेख: चार आर्यसत्य

दुःख आहे, दुःखाची उत्पत्ति आहे, दुःखातून मुक्ती आहे आणि मुक्तिगामी आर्य आष्टांगिक मार्ग ही चार आर्यसत्ये म्हणून ओळखली जातात.[३]

आष्टांगिक मार्गसंपादन करा

प्रज्ञा १) सम्यक दृष्टी २) सम्यक संकल्प

शील ३) सम्यक वाचा ४) सम्यक कर्मान्त ५) सम्यक आजीविका

समाधी ६) सम्यक व्यायाम ७) सम्यक स्मृती ८) सम्यक समाधी[४]

बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मविषयक दृष्टिकोणसंपादन करा


Broom icon.svgया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनासमदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चाचर्चापानावर पहावी. 


बाबासाहेबांनी एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुने जग उलथवण्याची शक्ती असलेले साहित्य उभे राहिले . तो शब्द म्हणजे ‘ धम्म ’ . ‘ धम्म ’ या शब्दाने समाजात माणसाचे श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटले .संदर्भ हवा ] बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असे झाले नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचे त्यांना जिथे जिथे अपूर्व मिश्रण आढळले , त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. अंधश्रद्धांवर आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणाऱ्या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केलासंदर्भ हवा ]. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचे नाव ‘ धम्म ’ असे आहेसंदर्भ हवा ].

भारताच्या राष्ट्रपतींच्या खुर्चीवर "धम्म चक्र प्रवर्तनाय" हा बुद्धाचा प्रथम संदेश कोरला आहेसंदर्भ हवा ]. याचा मूळ हेतू हाच की भारत एक धम्मशासित राज्य निर्माण व्हावे आणि एक उज्ज्वल राष्ट्र घडावेसंदर्भ हवा ]. सारा भारत बौद्धमय व्हावा, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आंतरिक इच्छा होतीसंदर्भ हवा ].

संदर्भसंपादन करा

  1. ^ "पाली ग्लोसरी संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). ७ नोव्हेंबर, इ.स. २०११ ; रात्रौ ८ वाजून ४५ मिनिटे रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ टर्नर,राल्फ. अ कंपॅरेटिव्ह ॲंड इटायमोलॉजिकल डिक्शनरी ऑफ द इंडो-आर्यन लॅग्वेजेस (इंडो-आर्यन भाषांचा तौलनिक व व्युत्पत्तिशास्त्रीय शब्दकोश) ग्रंथातील नोंद क्रमांक ६७५३ (इंग्लिश भाषेत).
  3. ^http://www.mahanayakonline.com/brandnews.aspx?bid=903
  4. ^http://www.maayboli.com/node/28927


अधिक वाचनसंपादन करा

Comments

Popular posts from this blog

क्यों असरदार होते हैं बीज मंत्र?

इतिहास लेखन पद्धति

अनुसूचित जाती व जमाती