Jay Bhim, We try to give some information of Buddha's peaceful path. Articles or messages of greatest personalities.Connect with us to get some knowledge every day.
Jaymangal And It's Marathi meaning | जयमंङ्गल अठ्ठगाथा व मराठी अर्थ
ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, हत्यार धारण करुन सहस्रबाहू गिरीमेखाला, हत्तीवर आरुढ झालेल्या, अत्यंत भयानक सेनेसह आलेल्या माराला, आपल्या दान आदि धम्म बलाने जिंकले त्या भगवान बुद्धांच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||१|| ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, माराव्यतिरिक्त समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर, दुर्धर आणि निष्ठूर-ह्रदयी अशा आलवक नामक यक्षाला, शांती आणि संयम बलाने जिंकले त्या भगवान बुद्धांच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||२|| ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, अग्नीचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्तम अशा निलगीरी हत्तीला आपल्या मैत्रीरुपी पावसाने जिंकले, त्या बुद्धाच्या प्रतापाने तुझे कल्याण होवो.||३|| ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, हातात तलवार घेऊन एक योजनेपर्यंत न थांबता धावणार्या अत्यंत भयानक अंगुलीमालाला आपल्या, आपल्या रिद्धी बलाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||४|| ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने,पोटावर काष्ट बांधून गर्भवती सारखे आपले पोट मोठे त्या चिंचा नामक स्त्रीला(जी बुद्धाला कलंक लावू पाहत होती) आपल्या शांत आणि सौम्य बलानो जिंकले, त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||५|| ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, सत्य सोडलेल्या व असत्य वादाचा पोषक, अभिमानी वादविवादात पारंगत व अहंकाराने अंध झालेल्या सच्चक नामक परिव्राजकाला प्रज्ञा - दीपाने जिंकले त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||६|| ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, विविध ऋद्धी संपन्न नंदोपनंद नामक भुजंगाला आपल्या महामौद़ल्यायन शिष्याकडून ऋद्धी, शक्ती आणि उपदेशाच्या बलानो जिंकले, त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||७|| ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, भयंकर मिथ्थादृष्टीरुपी सापाने डसलेल्या विशुद्ध ज्योती आणि ऋद्धी शक्ती संपन्न बक नामक ब्रम्हज्ञान्याला ज्ञानरुपी औषध देऊन जिंकले, त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||८|| जो कोणी पाठक ह्या बुध्दाच्या आठ मंगल गाथा दक्षतापूर्वक दररोज म्हणेल तो बुध्दिमान पुरुष नाना प्रकारच्या. उपद्रवापासून मुक्त होऊन सुख प्राप्त करील.||९||
मराठी अर्थ सारे प्राणीमात्र सुखी होवोत, सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न होवो. ||१|| भूतलावरील आणि अवकाशातील जेवढे प्राणीमात्र येथे उपस्थित आहेत, ते सर्व प्राणिमात्र समाधानी होवोत आणि हे सुभाषित लक्ष देऊन ऐकोत.||२|| म्हणून सर्व प्राणीमात्रांनो ऐका, मानवी प्रजेवर प्रेम करा, जे तुमच्या हिताकरिता अहोरात्र झटतात, त्यांचे जागरूकपणे रक्षण करा.||३||
क्यों असरदार होते हैं बीज मंत्र? व्यावहारिक जीवन में किसी समस्या के समाधान के लिए जब धार्मिक उपायों को अपनाया जाता है, तो उनमें मंत्र शक्ति को बहुत प्रभावी माना जाता है। मंत्र जप में भी बीज मंत्रों द्वारा देव उपासना वांछित सिद्धि या फल प्राप्त करने के लिए बहुत असरदार मानी जाती है। खासतौर पर तंत्र विज्ञान में बीज मंत्रों की बहुत अहमियत है। यहां जानते हैं क्या होते हैं बीज मंत्र और उनके प्रभावी होने के कारण। असल में बीज मंत्र देव शक्तियों के प्रतीक है। बीज मंत्र के अक्षर उनमें छुपी शक्तियों और देवी-देवताओं के दिव्य रूप के संकेत होते हैं। जिनका गहरा अर्थ होता है। अलग-अलग बीज मंत्र सामूहिक रूप से देवीय ऊर्जा पैदा करते हैं। यही कारण है कि जब किसी देवी-देवताओं के मंत्र विशेष के साथ बीज मंत्र बोले जाते हैं तो उस मंत्र का प्रभाव बढ़ जाता है। धार्मिक दृष्टि से बीज मंत्रों की ताकत इतनी अधिक होती है कि वह देव शक्तियों को भी वश में कर लेती है और मंत्र जप, यज्ञ के माध्यम से दिखाई देने वाले सकारात्मक परिणामा ईश्वरीय कृपा की अनुभूति करा देते हैं। यही कारण है कि हिन्दू धर्म में गायत्री एवं महामृत्युंज...
इतिहासलेखनपद्धति इतिहासलेखनपद्धति : प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत उपलब्ध पुराव्यांवरून त्या त्या काळातील मानवी प्रयत्न, सामाजिक जीवनातील घडामोडी व परिस्थिती यांविषयी स्थळ, काळ व व्यक्ती यांच्या निर्देशांसह जे लेखन केले जाते, त्यास इतिहासलेखन म्हणतात. इतिहासलेखनास प्रथम केव्हा सुरुवात झाली हे ज्ञात नाही तथापि ईजिप्त, ॲसिरिया, बॅबिलोनिया, चीन वगैरे देशांत इ. स. पू. १५०० पासून पुढे इतिहासविषयक काही लेखन केलेले आढळते. त्यांत राजांच्या कुळी, त्यांचे पराक्रम व तत्संबंधित माहिती ग्रथित केलेली आहे. बहुतेक लेखनावर तत्कालीन धर्माचे वर्चस्व आढळते आणि बहुसंख्या लेखन शिलालेख, मृत्पात्रे, भाजलेल्या मातीच्या विटा व पपायरसे (ईजिप्तमधील कागद), भूर्जपत्रे, ताडपत्रे, कातडी ह्यांवर लिहिलेले असून गद्यापेक्षा पद्याचा त्यात अधिक उपयोग केलेला आहे. मात्र शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाऐवजी पुराणकथा व दंतकथांचाच त्यात अधिक भरणा आढळतो. त्यामुळे वरील इतिहासलेखनावरून तत्कालीन समाजाची, त्यांच्या चालीरीतींची व धार्मिक कल्पनांची माहिती मिळत असली, तरी तत्कालीन राजकीय घडामोडींची विश्वसनीय माहिती उपलब्ध होत नाही. म...
अनुसूचित जाती व जमाती > समाजशास्त्र > अनुसूचित जाती व जमाती अनुसूचित जाती व जमाती : भारतीय संविधानाच्या ३४१ व ३४२ या अनुच्छेदांनुसार मागासलेले म्हणून जे वर्ग राष्ट्रपतींद्वारा जाहीर केले जातात, त्यांपैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ह्या संख्येच्या व त्यांच्या समस्यांच्या व्यापकतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाच्या गणल्या जातात. या व्यतिरिक्त इतर कोणते वर्ग मागासलेले म्हणून स्वीकारावेत, याचा निर्णय राज्य सरकारांवर सोपविला आहे याशिवाय महाराष्ट्र शासनाने आणखी दोन वर्गांना मागासलेले म्हणून मान्यता दिलेली आहे. यांत (१) विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि (२) नवदीक्षित बौद्ध व आर्थिक दृष्ट्या मागासलेले यांचा समावेश होतो [→विमुक्त जाती]. अनुसूचित जाती : अनुसूचित जाती ही संज्ञा प्रथम सायमन कमिशनने वापरली व तीच पुढे १९३५च्या कायद्यात अंतर्भूत करण्यात आली. सामान्यतः अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींचा समावेश अनुसूचित जातीत होतो. १९३५च्या कायद्याच्या परिशिष्टात अशा अनुसूचित जातींची पहिली अधिकृत यादी प्रकाशित करण्यात आली. अनुसूचित जातींची संख्या १९६१ सालच्या जनगणनेप्रमाणे अदमा...